फरसाणा...

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
14 Dec 2010 - 11:13 am

परवाच पुण्यात एका लग्नाला जाणेचा योग आला,
कार्यालयातील जेवण छानच होते (पुणेरी),
त्यावेळी एक प्रकार दिसला..
फरसाणा...
साहित्य- कांदा बारीक चिरुन, फरसाणा एक वाटी, कोथिंबींर, चिचेचे पाणी-भेळेसाठी करतो तसे,मिठ चवीनुसार.
कॄती- फरसाणा, कांदा , कोथिंबींर, चिच पाणी एकत्र कालवुन घ्या. वाटले तर मीठ घाला.
झाले तय्यार एक झकास तोंडीलावणे.

प्रतिक्रिया

महेश काळे's picture

14 Dec 2010 - 11:37 am | महेश काळे

ऐकावं ते नवलच !!!
एकदा प्रयोग करुन पहावा लगेल

चिंतामणी's picture

14 Dec 2010 - 12:57 pm | चिंतामणी

:(

;)

परिकथेतील राजकुमार's picture

14 Dec 2010 - 1:38 pm | परिकथेतील राजकुमार

कशाचे सोबत खाणार?????

हा बेष्ट चकणा आहे ;)

मुम्बैस ष्टाक एक्स्चेन्ज जवळ एक गोल्डन भेळ म्हणून बिन चुरमुर्‍याची भेळ (नुसते फरसाण आणि चिंचादि ओल्या चटण्या) मिळते (ळायची). नसाच प्रकार असणार हा.

त्या भेळेसाठी पाय ओढत तिथवर जायचो पूर्वी.

मस्त आहे. सोपेही.

ह्म्म्म हा भेळ विदाउट कुरमुरा प्रकार दिसतोय. :)
मला तर फरसाण चहात बुडवुन (आहेत काही विचित्रसवयी मला) भयंकर आवडते. त्यानंरत चहाला जो स्वाद येतो की बस्स्स्स्स.
अजुन एक आवडता प्रकार म्हणजे चिकन / मटनाच्या रश्यात बुडवुन. एक लाजवाब चखणा म्हणुन.
आणि शेवटचा पण सगळ्यात आवडता प्रकार म्हणजे आपली मिसळ. :)

मटण रश्श्यातली मिसळ खाल्ली आहेत की नाही?

कोल्हापूर परिसरात मिळते.

तांबडा मटणरस्सा असतो त्यात बनवलेली मिसळ.

हाच तांबडा रस्सा पाणीपुरीच्या पुरीतूनही मिळतो.

मस्त कलंदर's picture

14 Dec 2010 - 1:30 pm | मस्त कलंदर

आमचा कँटिनवाला हा प्रकार खास आमच्यासाठी बनवतो. आणि याला आम्ही नांव दिलंय, 'चटपटीत'!!!
यात वरील सर्व पदार्थ तर येतातच, आणि थोडी तिखट मिरचीही अगदी बारीक कापून असते त्यात!! मस्त आठवण झालीय चटपटीतची.

संदीप चित्रे's picture

15 Dec 2010 - 12:58 am | संदीप चित्रे

खाद्यप्रकार खात खात एकीकडे पुस्तक वाचणं ह्याला स्वर्गसुख असंही म्हणतात !

निवेदिता-ताई's picture

15 Dec 2010 - 9:55 am | निवेदिता-ताई

अगदी बरोबर..संदीप

इंटरनेटस्नेही's picture

16 Dec 2010 - 8:05 am | इंटरनेटस्नेही

मस्त! टोन्डाला पाणी सुटले!

दादरला सौराष्ट्रच्या दुकानात फरसाण उत्तम मिळते... :)