हायब्रिड जमाना

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in काथ्याकूट
22 Jul 2010 - 11:13 pm
गाभा: 

साऱ्‍या दुनियेचं हायब्रिडिंग झालंय. नवनव्या संकरित बियाण्यांपासून उपजलेली निसत्व पिके खाऊन शरीर पोकळ बनलेय. धान्यांच्या बिजापासून ते स्त्री-पुरुष बिजापर्यँत सर्वच ठिकाणी संकरित जग विस्तारलंय.
पूर्वीची माणसं ऐटीत जगायची, हसता हसता गचकायची, कळायचंसुद्धा नाही. आता मरणाचंही हायब्रिडिंग होत असतं! आजकाल सहज, सुखनैव मृत्यु येतच नाही. किमान दोन दिवस तरी कृत्रिम श्वासावर मेलेल्या म्हाताऱ्‍यांना ताटकळत ठेवतात. (पुरेसं बिल वसूल झाले की मगच डेथ डिक्लिअर करतात!)
जगणेसुद्धा संकरितच म्हणायचे. कारण गर्भ रहावा म्हणून गोळ्या, तो टिकावा म्हणून इंजेक्शने, सुखरूप प्रसूतिसाठी अनेक उपचार सुरू असतात. (अखेर सिझेरियनच होते हा भाग सोडून द्या.) बाळाच्या जन्मापासूनच रोगप्रतिबंधक लशींचा मारा जो सुरू होतो, तो थेट म्हातारपणापर्यँत गोळ्या इंजक्शने चालूच...
पूर्वीच्या धडधाकट बायका आदल्या दिवशी कणाकणा काम करून दुसऱ्‍या दिवशी दणादणा कळा देत मोकळ्या व्हायच्या. अंधाऱ्‍या रात्री, ऊसाच्या फडात, बैलगाडीतच बाळंत झालेल्या अनेक म्हाताऱ्‍या कोताऱ्‍या आजही त्यांच्या सोशिकतेचा गौरव सांगतांना हरखून गेलेल्या आढळतील. ही झाली महिलांची गोष्ट.
हायब्रिड पुरुषांबाबत तर बोलायलाच नको. त्यांचे शरीर म्हणजे चव ना चोथा झाले आहे. केवळ हँडसम दिसणे म्हणजे पुरुषार्थ नव्हे. पूर्वीचे तरूण बलोपासक असत. चारशे पाचशे जोरबैठका मारत, दोन चार लिटर दूध पित. आत्ताची पोरं पाच पंचविस जोरातच बेजार होतात, अंथरूण धरतात, पावशेर दूधही ह्यांना पचत नाही. पचणार तरी कसे म्हणा? कारण तेही संकरित जनावरांचेच असते किंवा म्हशीला/गाईला ऑक्सिटोसीन इंजेक्शन टोचून ओरबाडलेले असते. तापवलेलं दूधच जिथे आपल्याला पचवता येत नाही तिथे निरसं दूध काय सोसणार?
हायब्रिडच्या धान्यातून फक्त भरघोस उत्पन्न मिळतं, सकसता नाही. संकरित बियाण्यांमध्ये अधिक उत्पादनासाठी जनुकिय बदल केलेले असतात. त्यामुळे त्यातून फार काही उत्कृष्ट मूल्ये प्राप्त होतील ही अपेक्षा न ठेवलेलीच बरी. मूळ बियाणे आता अस्तित्वातच नाहीत. त्यामुळे मूळासारखी दणकट शक्ति असलेली मूळ माणसंही दुरापास्त झालीत. नेहमी नेहमी हे हायब्रिड धान्य खाऊन बहुतेकांचा शक्तिपात होतोय. हायब्रिड धान्य बियाणे म्हणून वापरता येत नाही. कारण ती शक्तीच त्यामध्ये नसते. असे वांझोटे अन्न खावून मानवातील नपुंसकत्व वाढलं आहे, हे पेपरातील पानभरून येणाऱ्‍या यौनशक्तिवर्धक औषधांच्या जाहिरातींमुळे लक्षात येईलच.
आणखीही खूप काही सांगता येईल. हायब्रिड जमान्यातील लोक जास्त वर्षे जगत असली तरी त्या रडत खडत जगण्याला अर्थ उरला नाहीये. दणकून खाल्लं तर पचत नाही. कणकून काम केलं तर सोसत नाही. गादीवरच जिथे झोप येत नाही, तिथे दगड उशाला घेऊन आकाश पांघरण्याची कृती म्हणजे कादंबरीय स्वप्नेच ठरतात.
जगण्यातला, वागण्यातला अन् बोलण्यातलाही अस्सलपणा गायब होऊन उरलाय केवळ हायब्रिडपणा!
इतकेच काय तर लेखन क्षेत्रातसुद्धा संकरित भाषा, वाक्ये, शब्द घुसडले गेले आहेत. कुठे ती आठशे पानी कादंबरी लिहिणारी मुरब्बी लेखक मंडळी? अन् कुठे आजकालची चार पाच पानांतच का कू करणारी संकरित रब्बी हंगामाची लेखकू मंडळी!
एकूण काय तर सगळाच हायब्रिड जमाना आलाय बघा...
( 'मिश्किली' मधून.)

प्रतिक्रिया

Pain's picture

23 Jul 2010 - 4:23 am | Pain

बळच. उगाच काहीच्या काही.

राजेश घासकडवी's picture

23 Jul 2010 - 8:31 am | राजेश घासकडवी

एकंदरीत 'पूर्वीची कधीतरीची' लोकं आजच्यापेक्षा शुद्ध, सकस, अधिक भरभरून जगायची असं तुमचं म्हणणं दिसतंय. हा काळ कुठचा हे तुम्ही नक्की पिनपॉइंट करून सांगता येईल का? साधारण दशक किंवा शतक सांगितलंत तरी चालेल. त्यावेळपासून आपण नक्की काय कमावलंय आणि नक्की काय गमावलंय हे तपासून बघता येईल.

नितिन थत्ते's picture

23 Jul 2010 - 9:49 pm | नितिन थत्ते

अहो गुर्जी, नका मनावर घेऊ.

हे लेखन मिश्किली मधील आहे. :)
(हल्लीच्य हायब्रिड लोकांना विणोद पण कळत नाहीत). ;)

नितिन थत्ते

डॉ.श्रीराम दिवटे's picture

23 Jul 2010 - 11:50 am | डॉ.श्रीराम दिवटे

साधारणतः स्वातंत्र्यपूर्व काळातील लोक सुद्रुढ होते असे म्हणता येईल.

*************************************
माझं पुस्तक, माझा ब्लॉग.

चिरोटा's picture

23 Jul 2010 - 11:55 am | चिरोटा

खरे आहे.राहणीमानात फरक पडल्यामुळे तसे असावे.साठीत चालु होणारे रक्तदाब्/ह्रुदयविकार्/मधुमेह आता ३५/४० तच बघायला मिळता आहेत.चाळिशी आली की चष्मा आणि केस पिकणे असे आधी होते.सध्या तीशी पार करायच्या आधीच बर्‍याच तरुणांचे केस पिकलेले दिसतात.
---
बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,सॅन्टा क्लारा,सनिव्हेल ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालापाहिजे.

राजेश घासकडवी's picture

23 Jul 2010 - 10:19 pm | राजेश घासकडवी

तुम्ही पुलंचं चाळ एक चिंतन वाचलंय का? त्यात महायुद्धाने त्या वेळच्या बापांच्या पिढीचा कणा मोडला असं कायसं लिहिलेलं आहे. म्हणजे चाळीसच्या दशकातले आधीच मरतुकडे झाले होते. त्यांच्या मते त्या आधीची पिढी अधिक सुधृढ होती.

तुम्हाला २० चं दशक म्हणायचं आहे का?

विजुभाऊ's picture

23 Jul 2010 - 5:15 pm | विजुभाऊ

साठीत चालु होणारे रक्तदाब्/ह्रुदयविकार्/मधुमेह आता ३५/४० तच बघायला मिळता आहेत
तुम्ही म्हणता त्या काळच्या सारखेच जीवन आज जगणार्‍या लोकांना कधितरी भेटा. ते तस्सेच दिसतील आजही.
हायब्रीड आयूष्य जगतोय आपण सारे.
इन्टरनेटवर साईबाबांचे फोटो १२ जणाना धाडा तर सूख शांती मिळेल असे इमेल रीसीव्ह करतोय. चन्द्रावर पाऊल ठेवण्याची भाषा चतुर्थीचा उपास सोडतोय.
जुने ते सारे चांगले असे नाही पण नवे ते सारे वाईट असेही नाहिय्ये.
कुठे ती आठशे पानी कादंबरी लिहिणारी मुरब्बी लेखक मंडळी? अन् कुठे आजकालची चार पाच पानांतच का कू करणारी संकरित रब्बी हंगामाची लेखकू मंडळी!
इथे एकोळी धागे लिहिणारेही आहेत आणि विश्वास पाटलांसारखी मातबर मंडळी आहेत .
ती सगळ्याच काळात होती. १८ अध्यायांची भगव्द्गीता आणि अवघ्या ५३ श्लोकांची अष्टावक्र गीता देखील जुनीच
असे वांझोटे अन्न खावून मानवातील नपुंसकत्व वाढलं आहे,
असे असेल तर वीसएक वर्षात लोकसंख्येचा प्रश्न निकालात निघेल
बाकी इतर बाबी म्हणजे केस पिकणे / केस गळणे वगैरे बदलेल्या जीवनमान , अन्नाच्या सवयी ,रहाणीमान , वर्क कल्चर , ताणतणाव वगैरे गोष्टीसुद्धा याला हातभार लावतात.
shikari

तिमा's picture

23 Jul 2010 - 5:44 pm | तिमा

सगळेच हायब्रीड या विधानाला शास्त्रीय आधार नाही. सध्या पिकते ते धान्य निकस हे कसे ठरवणार ?
भेसळीचे खाल्ले तर अपाय होईल. पण उदाहरणच द्यायचे झाले तर आजही घरी केलेले तूप हे तुम्ही म्हणता त्या काळाइतकेच शुध्द असते.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

परिकथेतील राजकुमार's picture

23 Jul 2010 - 5:57 pm | परिकथेतील राजकुमार

अत्यंत सुंदर व मार्मिक लेखन.
लेखातुन बरीच नविन माहिती मिळाली. आमची आजची तरुण पिढी कशा कशाला मुकत आहे हे फार प्रकर्षाने जाणवले.

तुमचे लेखन कायमच मार्गदर्शक व जतन करुन ठेवावे असे असते. असेच लिहित रहा.
पु.ले.शु.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अवलिया's picture

23 Jul 2010 - 6:00 pm | अवलिया

सहमत आहे.

--अवलिया

सविता's picture

23 Jul 2010 - 9:44 pm | सविता

मला ती "परा" च्या वरची लपवलेली दोन "डेव्हिल" ची शिंगे दिसली..ती खरी आहेत की आभास?

८-१० महिने मिसळ्पाव वाचून कोण कशा प्रतिक्रिया देते माहितीये....

तुमची वरवर इतकी निरुपद्रवी दिसणारी प्रतिक्रिया मला सहनच होत नाहीये!!!!

=)) =)) =)) =))
------------
आयुष्याचे हे चक्र चालते....साद घालते आशा....स्वप्नामागून सत्य धावते...ही दैवाची रेषा......

जन्मापासून कोण खेळवी...तुलाच नाही ठावे......हवे...हवे.....ची हाव सरेना...किती हिंडशी गावे.....

परिकथेतील राजकुमार's picture

24 Jul 2010 - 11:32 am | परिकथेतील राजकुमार

मला ती "परा" च्या वरची लपवलेली दोन "डेव्हिल" ची शिंगे दिसली..ती खरी आहेत की आभास?

I swear I'm an Angel.......the Horns are just an Accessory.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

Nile's picture

24 Jul 2010 - 12:13 pm | Nile

and what about the tail?

अर्र्रर्रर्रर्र, गंडलं काय? जयपालराव चिकटवा हो बरोबर चित्रं, आम्हाला सापडतंच नाहीत. ;)

-Nile

वाहीदा's picture

24 Jul 2010 - 12:47 pm | वाहीदा

क्या अदा B) क्या जलवे B) तेरे पर्रा ... :>
दिलके तुकडे होगए हजारा ;-)

~ वाहीदा

राजेश घासकडवी's picture

24 Jul 2010 - 10:08 pm | राजेश घासकडवी

परा,

अरे तुला आठवड्याभरापूर्वीच पाहिलं. इतक्यात एवढा बदल? तुझी सुंदर परी झालेली आहे! तुमच्या कॅफेच्या आसपासचे ब्युटी पार्लरवाले लोक फारच कांपिटंट दिसतात. पुणेरी दुकानदार वागायला कसेही असले तरी त्यांच्यात कला आहे हो.

कानडाऊ योगेशु's picture

23 Jul 2010 - 6:11 pm | कानडाऊ योगेशु

पूर्वीची माणसं ऐटीत जगायची,

आजची माणसे आय.टीत जगतात.

कुठे ती आठशे पानी कादंबरी लिहिणारी मुरब्बी लेखक मंडळी?

कादंबरी लिहिणारी मंडळी नसतील पण आठआठशे पाने प्रतिसाद देणारी मंडळी भरपुर आहेत.
एवढेच वाचु शकलो.बाकीचे वाचतानाच धाप लागली.

कार्लोस's picture

23 Jul 2010 - 9:54 pm | कार्लोस
मराठमोळा's picture

23 Jul 2010 - 10:09 pm | मराठमोळा

लेख आवडला. :)
लेखकाच्या विचारांशी पुर्णपणे सहमत आहे.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

शुचि's picture

23 Jul 2010 - 10:31 pm | शुचि

>> कारण गर्भ रहावा म्हणून गोळ्या, तो टिकावा म्हणून इंजेक्शने, सुखरूप प्रसूतिसाठी अनेक उपचार सुरू असतात. (अखेर सिझेरियनच होते हा भाग सोडून द्या.) >>

अय्या!! तुम्ही कित्ती कित्ती छान लिहीता गडे!! =D>

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अप्पा जोगळेकर's picture

24 Jul 2010 - 12:05 pm | अप्पा जोगळेकर

हे म्हणजे कैच्या कैच आहे. जुन्या काळात माणसं भरभरुन जगायची काय ? आणि मग ती भरभरुन मरायची त्याचं काय ? आली पटकीची साथ की गचकली शेपाचशे. आला प्लेग की मेले दहा-बारा हजार अशी अवस्था होती. आयुर्मानही अत्यंत कमी होतं. आधुनिक काळात जगत असताना धावपळीच्या जीवनशैलीमुळे (किंबहुना आळसामुळे) लोकं व्यायाम करत नाहीत. रोजचं काम बैठं असतं त्यामुळे शारिरीक श्रम होत नाहीत. आणि आजार ओढवतात. यावर उपाय म्हणून पुन्हा जुनी जीवनशैली स्वीकारणे हा नव्हे तर नव्या शैलीत बदल करणे (जसे नियमित व्यायाम करणे, सकस अन्न खाणे असे उपाय सुचवले असते तर ठीक होतं.) तुम्ही पुर्वीच्या सकस जगण्याबद्दल लिहिलंय. असं तर म्हणायचं नाहीये ना की पुन्हा पूर्वीसारखंच जगायचं. म्हणजे पंप वगैरे बंद मोटेने पाणी काढायचं. स्वतः शेंदलंत तर अतिउत्तम. हपिसात चालत जायचं .(डोंबिवली ते बीकेसी किती वेळ लागेल बरं? कल्पनेनेच फाटल्येय.) कंप्युटर बंद. सगळ हाताने लिहायचं. सैनिकांनी घोड्यावर स्वार होउन ढाल- तलवारीने लढायचं. वगैरे वगैरे.