लागणारे साहित्य :
करांदे धुवुन काप करुन
आपट्याचा पाला
राखाडी
मिठ (जाडे असल्यास चांगले)
पाककृती:
कापलेले करांदे राखेमध्ये घोळवुन तो पातेल्यात आपट्याचा पाला मध्ये मध्ये घालून रचावे. टोपाच्या कडेने करांदे बुडे पर्यंत अलगद पाणी टाकावे आता हे उकळवत ठेवावे. उकळी आली की पाणी काढुन टाकावे (टोपावर झाकण ठेउन टोपाच्या दोन कडांना झाकणा सकट धरुन उतरते धरुन पाणी काढावे). हे पाणि एकुण दोन वेळा काढावे. तिसर्या पाण्यात मिठ घालावे व करांदे शिजवुन घ्यावेत. मग हे पुर्ण गार झाल्यावर स्वच्छ धुवुन खायला घ्यावेत.
हे आहेत धुतलेले करांदे.
हा आहे आपट्याचा पाला जो आपण दसर्याला सोने म्हणुन वाटतो.
ह्या आहेत कापलेल्या करांद्याचे काप :
अश्या प्रकारे राखाडीत घोळवायच्या.
आपट्याचा पाला घालून अश्याप्रकारे हे काप रचायचे.
अश्या प्रकारे पाणी घालुन उकळवावे.
दोनदा पाणी बदलल्यावर मिठ घातलेल्या पाण्यात उकळवुन काढल्यावर स्वच्छ धुतलेल्या करांद्याच्या फोडी.
प्रतिक्रिया
25 Jun 2010 - 4:39 pm | सहज
अवघड व अनाकर्षक प्रकार आहे.
करांदे खाल्यावर काहीतरी खास होत असेल तर ठीक अन्यथा
पास! :-)
25 Jun 2010 - 4:47 pm | गणपा
पहिल्यांदाच पहातोय.
एकंदरीत प्रथमदर्षनी पाहुन खावासा वाटत नाही.
आपला पण पास :)
काही तरी खास म्हणजे खाज सुटली तरी खाणार काहो पंत :?
25 Jun 2010 - 5:44 pm | मेघवेडा
नुसते उकडूनसुद्धा चांगले लागतात ना? राखेचं काय प्रयोजन?
25 Jun 2010 - 6:24 pm | श्रीराजे
हा काय प्रकार आहे बॉ....!
करांदे हे पहिल्यांदाच पाहिले..कोणते फळ आहे हे?
कुठे मिळते...?
गोड कि आंबट?
का कडू लागते म्हणुन राखेमध्ये घोळवायचे?
सविस्तर माहिती सांगितले तर बरे होईल. तरी पण खावसे वाटत नाही.
25 Jun 2010 - 6:42 pm | कच्चा पापड पक्क...
:W ह्यावर जी मुळे आहेत ती काढली तर जरा खाणेबल दिसेल
25 Jun 2010 - 6:52 pm | स्मिता चावरे
आमच्याकडे कारंदे नावाच्या फळाचे वेल उगवतात पावसाळ्यात. ती कारंदी आम्ही उकडून खातो. पण हा कंद मात्र ओळखीचा नाही वाटत.
25 Jun 2010 - 7:17 pm | पिंगू
मी मात्र पावसाळ्यात आवर्जून करांदे आणि कारंदी खातो.. अतिशय पोषक असतात..
- (कंदमूळप्रेमी) पिंगू
25 Jun 2010 - 7:38 pm | रामदास
मला काहीवेळा बटाट्यापेक्षाही चवीला बरे वाटतात. उपासाला नक्कीच .
25 Jun 2010 - 7:45 pm | पांथस्थ
च्यामारी! एकदम आदिम अन्नप्रकार दिसतो आहे. खायला आवडेल बुवा.
बाकी रानभाज्यांच्या माहितीबद्दल तुम्हाला शि.सा. नमस्कार!
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
25 Jun 2010 - 8:58 pm | जागु
पिंगु मला वाटत फक्त तुम्हालाच करांदे माहीत आहेत.
करांद्याचा वेल असतो. हा कंद जमिनीत असतो. डोंगरात, ओसाड जमिनीत, रानात हे कंद सापडतात. हिवाळ्यात ह्याच्या वेलिवर छोटे छोटे कंद येतात त्याला केस नसतात. पण तेही कडू असतात. ते चुलीत भाजुन वगैरे खातात.
हे करांदे नुसते खाण शक्य नसत म्हणजे राखाडी, आपट्याचा पाला टाकुन तिन पाण्यातुन काढल्यावर त्याचा कडवटपणा कमी होतो. भाजीत किंवा नुसते खाता येत नाहीत हे. नुसते खातात ते करांदे गोडे करांदे असतात. ते इतके कडू नसतात.
लहानपणापासुन ऐकते की हे करांदे पोटासाठी चांगले असतात. कडू असले तरी मी सुद्धा लहानपणी खायचे. पण एकदा दोनदा खाल्ले की ह्याची चव आवडायला लागते. कारण हे वरील प्रमाणे शिजवल्यावर त्याचा बहुतांशी कडूपणा जाउन त्याला चव येते.
अस म्हणतात की एखाद्याच्या हातुनच हे कमी कडू होतात. त्यामूळे ज्यांच्या घरी आज्या आहेत त्याच बहुतांशी करतात. ( मी आमच्या घरची आजी आहे बहुतेक :S )
25 Jun 2010 - 9:05 pm | जागु

25 Jun 2010 - 9:06 pm | जागु

25 Jun 2010 - 9:14 pm | टारझन
यक्क्क्क्क्क्क्क्क्क्क !!!
-(यक्कु पिताजी) क्रुरसिंग