मालकांनी थालिपीठाच्या निवडणूका घेतल्या. अस्मादिकांची भूक चाळवली गेली.
सो आज बेत होता थालिपीठांचा.
साहित्य :
१.आडीच - तीन कप थालिपीठ भाजणी
२.दोन लहान चमचे तिखट
३.एक लहान चमचा मीठ
४.एक चमचा धणे-जिरे पुड
५.५-६ काड्या चिरलेली कोथिंबीर
६.एक चिरलेली मिरची
७.एक कांदा चिरून
एका भांड्यात वरील सर्व साहित्य घ्या.
पाण्याचा हबका मारा.
हळू हळू पाणी टाकत भाजणीचा गोळा बनवा.
या गोळ्याचे चार ते पाच समान आकाराचे गोळे बनवा.
एका प्लास्टीकच्या कागदाला तेलाचा हात लावा.
त्यावर ह्यातला एक गोळा घेउन बोटाने थापा.
पसरट झाला की त्याला तीन चार छिद्रे पाडा.
आता हे थालिपीठ एका तव्यावर ठेवा.
पाडलेल्या तीन-चार छिद्रांमधे थोडे थोडे तेल ओता.
झाकण ठेवून चार पाच मिनिटे शिजू द्या.
एकदा पलटून मिनीटभर दुसरी बाजू भाजून घ्या.
मस्त दही आणी साजुक तुपासोबत लुफ्त लुटा.
प्रतिक्रिया
21 Feb 2010 - 3:05 am | शुचि
संगणकावर कसा लुत्फ लुटायचा ते ही सांगा :P
*********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
21 Feb 2010 - 11:18 am | प्रभो
प्रकाशचित्रे पाहून.. :)
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
21 Feb 2010 - 11:42 am | टारझन
अच्छा .. म्हणून आपण तात्याची खरडवही बुकमार्क करून ठेवलीये होय :)
चालु द्या :)
आपलाच,
टार्या.
21 Feb 2010 - 11:19 am | प्रभो
प्रकाटाआ
21 Feb 2010 - 3:09 am | रेवती
मस्त रे प्रभो!
तू फारच चांगला गणपा दिसतोस!;)
फोटो ग्रेट आलेत.
अवांतर: आणि थालीपिठांच्या निवडणूका कधी झाल्या?
मला लोणच्यांच्या आठवतायत.
रेवती
21 Feb 2010 - 11:23 am | प्रभो
ह्या घ्या थालिपीठांच्या निवडणूका...
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
21 Feb 2010 - 3:50 am | टारझन
प्रभो जी, एक प्रश्न आहे !
ह्या थालिपीठांना ती छिद्र का पाडतात ? जर छिद्रं न पाडता केवळ चपाती/भाकरी सारखे अखंड ठेवले तर टेस्ट मधे काही फरक पडतो का ?
- टारझन
हल्लीच्या पाकृधाग्यांच्या प्रश्नांवर आधारीत प्रतिसाद
21 Feb 2010 - 4:14 am | रेवती
टारझनजी,
पोळी, भाकरी आपल्याला गोलगरगरीत फुटबॉलसारखी फुगलेली त्याचबरोबर मऊसूत हवी असते, थालीपीठ खमंग, कुरकुरीत असणे अपेक्षित आहे तसेच ते जाड असल्याने नीट शिजावे म्हणून अशी छिद्रे पाडून त्यात तेला/तुपाचे थेंब सोडतात.
रेवती
21 Feb 2010 - 4:00 am | चिरोटा
मस्त पाकृ.
तेल नीट मुरावे म्हणून तसे करत असतील.
भेंडी
P = NP
21 Feb 2010 - 5:15 am | मेघवेडा
हाण तिज्यायला! फोटो एकदम झक्कास्स!!!
-- मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
21 Feb 2010 - 11:36 am | सुनील
चविष्ट!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
21 Feb 2010 - 12:56 pm | विसोबा खेचर
शब्दच संपले!
तात्या.
21 Feb 2010 - 2:04 pm | चतुरंग
आवडेश एकदम!
(चला लाळेरं बांधायची वेळ झाली)
चतुरंग
22 Feb 2010 - 10:45 am | अस्मी
खूप भारी... :)
- मधुमती
22 Feb 2010 - 1:25 pm | सुप्रिया
तात्यांनी धागा काढला तेव्हा थालिपिठाची भाजणी करायच्या विचाराने उचल खाल्ली. पण नेहमीप्रमाणे माझा आळस नडला. पण आता भाजणी मस्ट!
24 Feb 2010 - 5:44 am | प्रशु
या धाग्यातुन प्रेरणा घेऊन बेडेकरांची तयार भाजणी आणली आणी झकास पे॑की थाली पीठं बनवली......
24 Feb 2010 - 5:57 am | तुकाम्हणे
कशी करतात? म्हणजे रेडीमेड मिळत नसेल तर
25 Feb 2010 - 9:38 pm | चित्रा
थालिपीठ झकास दिसते आहे.
आज तेच करणार.
26 Feb 2010 - 12:13 am | प्रभो
धागा वर आलाय तर सगळ्यांचे आभार मानून घेतो...
@तुकाम्हणे : भाजणी नंतर टाकेन कधीतरी... :) तो पर्यंत चकलीताईच्या ब्लॉग वर बघा.
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी