अनिवासी भारतीयांनाही मिळणार मतदानाचा अधिकार

शाहरुख's picture
शाहरुख in काथ्याकूट
9 Jan 2010 - 9:28 am
गाभा: 

सगळं गाव पेपर वाचतंय याची संपूर्ण जाणीव आहे..बातमी महत्वाची वाटल्याने द्यायची इच्छा झाली.

अनिवासी भारतीयांनाही मिळणार मतदानाचा अधिकार

नवी दिल्ली - अनिवासी भारतीयांना 2014 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मतदानाचा अधिकार मिळू शकतो, असे संकेत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी शुक्रवारी दिले. आठव्या प्रवासी भारतीय संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. ""मतदानात आणि भारतातील निर्णयप्रक्रियेत आपल्यालाही महत्त्व मिळावे, ही अनिवासी भारतीयांना इच्छा मान्य आहे. त्यामुळेच आपण यावर लक्ष केंद्रित केले असून, पुढील निवडणुकांपर्यंत अनिवासी भारतीयांना मतदानाची संधी मिळेल,'' असे पंतप्रधान म्हणाले

-पत्रकार शाहरुख

प्रतिक्रिया

अमृतांजन's picture

9 Jan 2010 - 9:54 am | अमृतांजन

भाजपची मते वाढतील

विकास's picture

9 Jan 2010 - 6:50 pm | विकास

भाजपची मते वाढतील

तात्पुरते असे म्हणू की वरील विधान बरोबर आहे. पण विचार करा, की एका मतदारसंघातील असे किती अनिभा असतील जे त्या मतदारसंघातील निभांच्या तुलनेत सगळी एकगठ्ठा मते टाकून एखाद्या उमेदवारास, या संदर्भात भाजपला जिंकून देतील? बरं तसे असते तर तुम्हाला काय वाटते मनमोहनसिंग असे बोलू शकले असते का? :-)

मला वाटते एकदा का अनिभांना मतदानाच हक्क आला (यात मी पिआयओ पण समजत आहे) की राजकीय आर्थिकमदत पण घेता येईल आणि सोनीयांचे तसेच जर सुब्रम्हण्यम स्वामींच्या आरोपात तथ्य असेल तर राहूलचे घोडे गंगेत कायदेशीर न्हाऊ शकेल असे वाटते.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

चिरोटा's picture

9 Jan 2010 - 7:53 pm | चिरोटा

सध्यातरी सत्ताधार्‍यांचा हेतु आर्थिक मदत घेणे हा दिसतोय्.अनिभा जवळपास आता जगातल्या सर्व देशांमध्ये पसरले आहेत्.परकिय गंगाजळ वाढवणे ,भारत आणि ईतर राष्टांमधील संबंध वाढवणे,बिगर्-काँग्रेस पक्षांना मतदान करणारा उच्च मध्यम वर्ग आपल्याकडे खेचणे ही मुख्य कारणे असावीत.
अनिभाची अमूक एका पक्षाला एक गठ्ठा मते पडली असे होणार नाही कारण अनिभा हा एक वर्ग असला तरी तो अनेक आर्थिक/सामाजिक स्तरांमध्ये विभागला गेला आहे.
भेंडी
P = NP

विकास's picture

9 Jan 2010 - 8:00 pm | विकास

परकिय गंगाजळ वाढवणे ,भारत आणि ईतर राष्टांमधील संबंध वाढवणे

बाकी प्रतिसादाशी सहमत. वरील संदर्भात थोडे वेगळे वाटते. परकीय गंगाजळी नुसतीच वाढवायची असेल तर मतदानाच्या हक्काची गरज नाही. तेच इतर राष्ट्रांशी संबंध तयार करण्यासंदर्भात. सुदैवाने सध्या या दोन्ही गोष्टी आपल्या (भारताच्या) सक्षमतेमुळे चांगल्या चालेल्या आहेत.

येथे मला वाटते की पॉलीटीकल कॉण्ट्रीब्युशन सोपे व्हावे आणि त्यानिमित्ताने काळ्याचा पांढरा पैसा करणे देखील शक्य व्हावे हा "उदात्त हेतू" असावा.

बाकी एकंदरीतच या संदर्भात (असे होणे माझ्या व्यक्तिगत हिताचे असले तरी), पीव्हीएन रावांचे पंतप्रधान म्हणून केलेले वक्तव्य मला आवडले होते आणि अजूनही बर्‍याच अंशी पटते: त्यांना जेंव्हा विचारले की दुहेरी नागरीकत्व का केले जात नाही तेंव्हा ते म्हणाले होते की "इतके जर ते सोपे असते (कॉम्प्लिकेटेड नसते) तर ते आधीच केले गेले असते..." बर्‍याच अंशी म्हणायचे कारण इतकेच की याला काही तोडगे असू शकतात असे वाटते.

एकंदरीतच मतदानाचा हक्क हा पिआयओंना देणे म्हणजे दुहेरी नागरीकत्वच आहे आणि त्याचे सर्वकष परीणाम बघणे महत्वाचे आहे असे वाटते.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

पाषाणभेद's picture

9 Jan 2010 - 11:12 am | पाषाणभेद

अनिवासी भारतीय ऑनलाईन मते टाकतील. तिच सुविधा भारतीय जनतेला दिली तर होणारा खर्च कितीतरी वाचू शकेल.
(असा विचार आपल्यासारखे करू शकतात, पण पुढारी फाडारी करतील काय?)
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

JAGOMOHANPYARE's picture

9 Jan 2010 - 12:53 pm | JAGOMOHANPYARE

अनिवासी भारतीयाना( एन आर आय..) मतदानाचा अधिकार असतोच.... तो द्यायला कशाला हवा? बहुतेक त्याना पर्सन ऑफ इन्डियन ओरिजिन म्हणायचे असावे,

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

नितिन थत्ते's picture

9 Jan 2010 - 1:20 pm | नितिन थत्ते

सहमत.
एन आर आय ना अधिकार असतोच.

POI म्हणजे आता भारतीय नागरिक नसलेले लोक म्हणायचे असतील तर त्यांना अधिकार देऊ नये असे वाटते

नितिन थत्ते

शाहरुख's picture

10 Jan 2010 - 4:05 am | शाहरुख

कदाचित एन आर आय ना निवडणूकीच्या वेळी भारतात नसतानाही मतदानाचा हक्क बजावता येईल असे वाटते.

पी.आय.ओ बद्दलच्या आपल्या मताशी मी ही सहमत आहे.

अपडेट -

“So far, the draft of the bill in the Rajya Sabha says that you will have to come back to India to cast your vote. Unless that draft is changed, it won’t be a real gift for the pravasis,” Tharoor said.

इंग्रजी बातम्यांतही एन.आर.आय. शब्द वापरल्याने माझा गोंधळ झाला..

Nile's picture

10 Jan 2010 - 5:52 am | Nile

अनिवासींना Overseas Citizenship of India असे नागरीकत्व मिळवता येते. म्हणजे भारतीय नागरीकत्व, पण सध्या तरी मतदानाचा अधिकार त्यांना नसतो. (पीआयओ पेक्षा ओसीआय मध्ये जास्त अधिकार आहेत) त्यांना अधिकार देण्याबद्दल बोलत असावेत.

तुम्हाला 'पीआयओंना मतदानाचा अधिकार देउ नये' असे का वाटते हे जाणुन घ्यायला आवडेल.

शाहरुख's picture

11 Jan 2010 - 10:48 am | शाहरुख

प्रश्न मला विचारलेला नाहीय मला माहितेय पण मी माझे मत वर व्यक्त केल्याने उत्तर देतोय..

शुड वन नॉट पे फॉर गिव्हींग अप हिज / हर इंडियन पासपोर्ट ?

कृपया वरील वाक्याचा तशा व्यक्तीच्या भारतावर असलेल्या निष्ठा, प्रेम वगैरे गोष्टींशी संबंध लावू नये.

Nile's picture

11 Jan 2010 - 11:29 am | Nile

पीआयओ मध्ये भारतीय नागरीक पालकांचे परदेशात जन्मलेले मुलही येते. ही हॅज नॉट गिव्हन अप हिज पासपोर्ट!?

शाहरुख's picture

11 Jan 2010 - 11:45 am | शाहरुख

होय पण माझ्या माहितीप्रमाणे तशा मुलाला वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर भारताचा नागरिक होण्याचा पर्याय उपलब्ध असतो.जर तो मुलगा तसा निर्णय घेत नसेल तर ही शुड हॅव टू पे अ‍ॅज वेल..

Nile's picture

11 Jan 2010 - 12:29 pm | Nile

आय डोंट रीअली सी व्हाट इस ही पेईंग बाय नॉट गेटींग अ चान्स टू वोट.

ही इज पेईंग नोट ईन मनी बट फोर हिज इंडीविजूल राईट
ही इज नोट पार्ट ओफ लार्ज डेमोक्रेटीक नेशन - ईंडीया

~ वाहीदा

नितिन थत्ते's picture

11 Jan 2010 - 3:56 pm | नितिन थत्ते

>>तुम्हाला 'पीआयओंना मतदानाचा अधिकार देउ नये' असे का वाटते हे जाणुन घ्यायला आवडेल
पी आय ओ म्हणजे बहुधा ४-५ पिढ्या किंवा त्याही पूर्वी परदेशात स्थायिक झालेले लोक असावेत असे मला वाटते. त्यांना मतदानाचा अधिकार देण्याची काहीच गरज नाही.

महत्त्वाचे: मतदानाचा हक्क हा घटनात्मक अधिकार आहे. तो कोणाला असावा/द्यावा याचा निर्णय घेण्याचा अधिकार सरकार नावाच्या संस्थेस बहुधा नाही. तो अधिकार PIO ना द्यायचा असेल तर त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल असे वाटते.

नितिन थत्ते

II विकास II's picture

9 Jan 2010 - 7:02 pm | II विकास II

मतदान सक्तीचे करणे, झुंडशाही थांबवणे, राजकीय सेन्सरशिप बंद करणे असे अजुन ही काही गोष्टी आहेत.

एकंदरीत ही बातमी वाचुन करमणुक छान झाली.या मंडळींना मतदानाचा हक्क देण्याआधी या मंडळींनी आपल्याला मत द्यावे यासाठी
या राजकीय नेते मंडळींना किती कष्ट उपसावे लागतील याची कल्पना आपल्या पंतप्रधानांना आली नसावी असे वाटते. याबाबतची खालील उदाहरणे तपासुन बघु.
१) प्रचारासाठी परदेशात जाणे आलेच तेथे सभा कशा घेता येणार ?
२) ह्या खर्चावर निवडणुक आयोगाचा डोळा असल्यावर काय ?
३) तेथे "वाढदिवसाचे " फलक लावायचे म्हणजे शुभेच्छुक कुठुन आणायचे "
४) तेथे प्रचारासाठी " ट्रक " भरुन माणसे कशी जमवायची ?
५) सभेच्या सुरुवातीला " फटाक्यांची जंगी " माळ कशी लावायची "
आणि एवढे "कष्ट " उपसल्यानंतर "श्रमपरिहार " कुठे करणार "
एकतर आपले नेते या जनतेची "काळजी " घेउन अगदी "टेकीस" आलेले आहेत. त्यात ही भलतीच आफत.

शहारुख-जी,
अमेरिकन नागरिक असलेले व जकार्तात स्थायिक असलेले माझे कांहीं मित्र इथे त्यांच्या राजदूतावासात (embassy) जाऊन मतदान करतात. जरा चौकशी करून कृपया सांगावे कीं म.मो.सिंग यांनी असे करण्याबाबत कांहीं निवेदन दिले होते कां?
धन्यवाद
------------------------
सुधीर काळे, "जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!"

शाहरुख's picture

11 Jan 2010 - 7:31 am | शाहरुख

या विषयावरील मी वाचलेल्या ३-४ बातम्यांत तरी या साठीच्या लॉजिस्टिक्सचा (मराठी शब्द ?) कुठेच उल्लेख नव्हता..त्यामुळे तुमच्या प्रश्नाचे माझ्याकडे तरी उत्तर नाहीय.

आत्ताच शशी थरूर यांची ही मुलाखत बघितली.एन आर आय ना मतदान हक्क मिळण्याबद्दलचा प्रश्न त्यात आहे..त्याचे उत्तर नक्की ऐकावे. पी आय ओ बद्दलचा खुलासा त्यातून व्हायला हरकत नाही. (वेळ - २.२५ ते ३.२५ मिनीट)

"Its (voting right) part of their commitment to the country whose passport they carry"

"We are not suggesting that non-Indians should get to vote but Indian citizens should not be denied to vote because they happen to be working abroad"