गेल्यावेळेस बेसनचा ढोकळा केला तेव्हा माझ्या नवर्याचं म्हणणं पडलं की त्याला पांढरा ढोकळा जास्त आवडतो, मग म्हटलं याच पद्धतीनं रव्याचा ढोकळाही बनवायला हरकत नाहीये...रवा ढोकळा बनवायचा हा तसा माझा पहीलाच प्रयोग पण छान लागतो हा ही ढोकळा...आणि बेसन ढोकळ्यापेक्षा तसा जास्त पैष्टिकही असेल असं म्हणायला हरकत नाहीये :)
साहीत्यः
ढोकळा
१ कप बारिक रवा (जाड + बारिक रवा असं ही घेता येइल...)
३/४ कप दही (आंबट असेल तर उत्तम...)
१.५ टीस्पून इनो
१ टेस्पून तेल
२ चमचे लिंबाचा रस किंवा १/२ चमचा सायट्रीक अॅसिड पाण्यात विरघळुन घेणे.
चवीनुसार मीठ
१ टेस्पून साखर (ऐच्छिक)
२ चमचे आले-मिरची पेस्ट
थोडेसे पाणी (कधी कधी लागतही नाही, रवा आणि दह्यावर अवलंबुन असते...)
चिमुटभर हिंग
फोडणी:
तेल
मोहरी
मिरची
हिंग
काळे तीळ (ऐच्छिक)
२ चमचे पाणी
कढीपत्ता
कोथिंबीर
कृती:
१) एका खोल पातेलीत रवा घ्या.
२) रव्यात दही+तेल + मीठ् + लिंबाचा रस + आले-मिरची + हिंग नीट मिसळुन घेणे.
३) गरज असल्यास हळुहळू पाणी घालावे, अंदाजे इडलीच्या मिश्रणासारखे झाले पाहीजे.
४) ज्यात ढोकळा वाफवावा लागेल अश्या पातेल्यात पाणी उकळत ठेवावे ...
५) पाण्याला उकळी फुटली की वरिल मिश्रणात इनो मिसळावे आणि एकाच बाजुने हलक्या हाताने गोल-गोल ढवळावे, १/२ - १ मिनीटात हे मिश्रण फुगून येइल...जर नाही आले तर अजुन थोडेसे इनो टाकावे किंवा चिमुटभर सोडा टाकावा...हे अगदी वाफवण्याआधीच करावे... खुप आधी करुन ठेवल्यास ढोकळा नीट फुगणार नाही.
६) एका तेल लावलेल्या खोलगट थाळीत मिश्रण टाकुन २५-३० मि. मध्यम आंचेवर वाफवावे..
७) ढोकळा वाफवुन झाला की त्याचे चौकोनी तुकडे करावेत. ढोकळा थोडा थंड झाल्यावरच कापावा...
८) आता फोडणीसाठी तेल तापवत ठेवावे...तेल तापले की मोहरी टाकावी. मोहरी तडतडल्यावर तीळ्,कढीपत्ता,मिरची आणि हिंग टाकावा.
९) आंच बंद करुन २ चमचे पाणी टाकुन हे लगेचच ढोकळ्यांवर ओतावे...
१०) कोथिंबीर घालून सजवा... आणि खायच्या कामाला लागा...
प्रतिक्रिया
21 Sep 2009 - 9:19 pm | दशानन
अरे कोणी आहे काय रे... हे पाककृती सदर बंद करा नाही तर मला दिसणार नाही अशी व्यवस्था करा रे...
मेलो....
गचकलो.....
ठार झालो..........
भयानक फोटो !
***
राज दरबार.....
21 Sep 2009 - 9:26 pm | श्रावण मोडक
राजे ते शक्य नाही. दुसरा मार्ग पहा. या विनंत्या करून थकलो आपण. इथं लोकशाही आहे. त्यामुळं लोकशाहीत लोकांचं ऐकलं जात नसतंच हे विसरू नका. ;)
21 Sep 2009 - 9:21 pm | श्रावण मोडक
पहिलं छायाचित्र म्हणजे खल्लास. ढोकळ्याची चव जिभेवर आली एकदम. मी बाकी काही वाचलेलं नाहीये. :)
21 Sep 2009 - 9:26 pm | प्राजु
माझाही हा आवडता प्रकार आहे. खमण पेक्षा मला रवा ढोकळा जास्ती आवडतो.
याची कृती नव्हती माहिती. दिल्याबद्दल खूप खूप खूऽऽऽऽप आभार. :)
मी नेहमी तो इस्टंट करायचे प्रिया चा. आता हा दिपालीचाही करू बघेन. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
21 Sep 2009 - 9:30 pm | बिपिन कार्यकर्ते
आली ही परत !!! X(
बिपिन कार्यकर्ते
21 Sep 2009 - 9:44 pm | टारझन
शब्दश: बादलीभर लाळ गळाली आहे !! बनेल ओला झाला :(
मॅडमचा णिषेध आहे .. किमान फोटो तरी फडतूस काढावेत
-('रूपा'चा बनेल वापरणारा ) टारझन
21 Sep 2009 - 9:57 pm | चतुरंग
परवाचा ढोकळा खाऊन जरा हुश्य म्हणतोय तोवर पुन्हा आज हे हजर?
लई म्हणजे लईच्च त्रास बुवा! [(
(खुद के साथ बातां : रंगा, दिवाळीआधीच एवढा छळ सुरु आहे! नीलकांतला विचारुन दिपालीतैंच्या पाकृंवर प्रकाशनपूर्व अनुमतीचे बंधन लादण्याची व्यवस्था करावी काय? :?)
(ठोकळा)चतुरंग
21 Sep 2009 - 10:03 pm | श्रावण मोडक
(खुद के साथ बातां : रंगा, दिवाळीआधीच एवढा छळ सुरु आहे! नीलकांतला विचारुन दिपालीतैंच्या पाकृंवर प्रकाशनपूर्व अनुमतीचे बंधन लादण्याची व्यवस्था करावी काय? Thinking)
पाककृतीच्या सगळ्याच धाग्यांवर बंधन घाला. अशी पार्शालिटी चालणार नाही. पार्शालिटीचा विचार मनात आणल्याबद्दल सत्ताधाऱ्यांचा निषेध. त्रिवार निषेध. निषेध!!!
21 Sep 2009 - 10:10 pm | वेताळ
अहो गेली दोन महिने डायटींग करतो आहे.अहो जरा तरी दया दाखवा आम्हावर.
बाकी रवा डोसा माहित होता,रवा ढोकळा ही असतो हे आज कळाले.
वेताळ
21 Sep 2009 - 10:25 pm | दिपाली पाटिल
डायटिंगसाठी बेश्ट आहे हा ढोकळा फक्त जास्त तेलाची फोडणी नका टाकू...
दिपाली :)
21 Sep 2009 - 10:44 pm | श्रावण मोडक
हे आणि वर... #o
21 Sep 2009 - 10:22 pm | स्वाती२
धन्यवाद दिपाली पाकृ बद्दल. मी हा रवा ढोकळा एका ओळखीच्यांकडे खाल्ला होता. पण त्या बाई पाकृ काही देइनात. आता करुन बघेन.
21 Sep 2009 - 10:32 pm | दिपाली पाटिल
>>पण त्या बाई पाकृ काही देइनात. =))
माझी एक नातेवाइक आहे ती पण असंच करते... =))
दिपाली :)
21 Sep 2009 - 10:49 pm | वेताळ
पण त्या बाई पाकृ काही देइनात.
बहुधा त्या पाककलेचे पुस्तक लिहण्याच्या विचारात असाव्यात. त्यामुळे पुस्तकाचे गिर्हाईक त्याना गमवायचे नसेल. =))
वेताळ
21 Sep 2009 - 11:21 pm | रेवती
ऑ? रवा ढोकळाही असतो हे माहितच नव्हते!
एकदम नवीन पाकृ कळाली. फोटू छान!
काही महिन्यांपुर्वी 'पेढा मालिका' आली होती तशी ही 'ढोकळा मालिका' आहे का?
रेवती
22 Sep 2009 - 12:09 am | दिपाली पाटिल
नाही गं रेवती...हे दोन प्रकारचेच ढोकळे येतात मला आणि त्यातला पण हा रवा ढोकळा ट्रायल & एर्रर ने केला पण जमला... :) बेसनाच्या ढोकळ्यापेक्षा हा जास्त छान लागतो...करुन बघा नक्की...
दिपाली :)
21 Sep 2009 - 11:28 pm | अवलिया
निषेध म्हणुन प्रतिक्रिया काढुन टाकली आहे. X(
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
21 Sep 2009 - 11:44 pm | चकली
फोटो मस्त आलाय
चकली
http://chakali.blogspot.com
22 Sep 2009 - 12:36 am | शाहरुख
टु-डु लिस्ट मधे अजुन एक पदार्थ !!
(निम्म्याहून अधिक वेळा मुगाच्या खिचडीत भाज्या घालून खाणारा 'वन पॉट मिलचा' पुरस्कर्ता) शाहरुख
22 Sep 2009 - 1:43 am | गणपा
वाह आधी खमण ढोकळा आणि आता हा रवा ढोकळा दोन्ही एकदम खल्लास पाककृती. पुढच्या रैवारची सोय पण झाली. धन्यु.
-गणपा.
22 Sep 2009 - 4:03 am | लवंगी
हा पण किलोभर पाठव. :)
22 Sep 2009 - 8:00 am | दिपाली पाटिल
पाठवते... :D
दिपाली :)
22 Sep 2009 - 8:04 am | सहज
दिपाली तै हा ढोकळापण भारी.
22 Sep 2009 - 8:19 am | मदनबाण
व्वा. मस्त... :)
मदनबाण.....
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
22 Sep 2009 - 9:54 am | पाषाणभेद
हा पण १० स्टेपी ढोकळा छान.
-----------------------------------
माझे नवरात्रीचे उपास चालू आहेत, तोंडाला पाणी सोडल्याबद्दल तुमचा "अखिल जागतीय एकमेव कैदी उद्धारण एकसंघातर्फे" जाहिर निषेध. आमच्या देवळात लोक असले पदार्थ देत नसल्याने यापुढे काही दिवस उपासाचेच पदार्थ टाका.
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
22 Sep 2009 - 10:02 am | दिपक
22 Sep 2009 - 4:21 pm | सूहास (not verified)
@) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @)
सही ....सही ....सही ....सही ....सही ....सही ....सही ....सही ....सही ....सही ....सही ....सही ....
बघतच राहिलो....
सू हा स...
22 Sep 2009 - 5:58 pm | स्वाती राजेश
मला ढोकळ्यापेक्षा त्याचे प्रेझेंटेशन आवडले. मस्त हिरवी डिश आहे....
रेसिपी सुद्धा मस्त! इथे काही जणांना बेसनाची अॅलर्जी असते त्यांच्यासाठी करायला मस्तच!
23 Sep 2009 - 4:21 am | दिपाली पाटिल
सर्व वाचकांचे आणि प्रतिक्रिया देणार्यांचे धन्यवाद...
दिपाली :)
24 Sep 2009 - 3:54 pm | स्वाती दिनेश
रवा ढोकळा मस्त..
स्वाती
25 Sep 2009 - 11:50 am | सोनम
पाककृती खूपच छान आहे. :) :)
फोटो ही उत्तम आहे. :) :)