१० स्टेप्स खमण ढोकळा...
साहीत्यः
खमणः
१ कप बेसन
१ टीस्पून इनो
१ टेस्पून तेल
२-३ चमचे लिंबाचा रस किंवा १/२ चमचा सायट्रीक अॅसिड पाण्यात विरघळुन घेणे.
चवीनुसार मीठ
१ टेस्पून साखर
१ चमचा आले-मिरची पेस्ट
१/२ कप पाणी
चिमुटभर हिंग
फोडणी:
तेल
मोहरी
मिरची
हिंग
तीळ (ऐच्छिक)
२ चमचे पाणी
कढीपत्ता (ऐच्छिक)
कृती:
१) बेसन चाळुन घ्या.
२) बेसनमध्ये तेल + मीठ् + साखर + लिंबाचा रस + आले-मिरची + हिंग नीट मिसळुन घेणे.
३) यात हळुहळू पाणी घालावे, पुर्ण १/२ कप वापरावेच असे नाही, इडलीच्या मिश्रणासारखे झाले पाहीजे.
४) ज्यात ढोकळा वाफवावा लागेल अश्या पातेल्यात पाणी उकळत ठेवावे ...
५) पाण्याला उकळी फुटली की वरिल मिश्रणात इनो मिसळावे.आता हे मिश्रण फुगून येइल...जर नाही आले तर अजुन इनो टाकावे किंवा चिमुटभर सोडा टाकावा...हे अगदी वेळेवर करावे...आधी करुन ठेवल्यास ढोकळा नीट फुगणार नाही आणि मिश्रण काळपट व्हायची शक्यता असते. काही ठिकाणी इनो ऐवजी पापडखारही वापरतात...
६) एका तेल लावलेल्या खोलगट थाळीत मिश्रण टाकुन २०-२२ मि. मध्यम आंचेवर वाफवावे..
७) ढोकळा वाफवुन झाला की त्याचे चौकोनी तुकडे करावेत. ढोकळा थोडा थंड झाल्यावरच कापावा...
८) आता फोडणीसाठी तेल तापवत ठेवावे...तेल तापले की मोहरी टाकावी. मोहरी तडतडल्यावर तीळ्,कढीपत्ता,मिरची आणि हिंग टाकावा.
९) आंच बंद करुन २ चमचे पाणी टाकुन हे लगेचच ढोकळ्यांवर ओतावे...
१०) सजावट काहीही करा...कोथिंबीर, खोबरे ही घालू शकता... या ढोकळ्यात हळद घालू नये..इनोमुळे रंग काळपट होऊ शकतो...रंग टाकायचा असल्यास अगदी थोडा टाकावा...
प्रतिक्रिया
17 Sep 2009 - 10:47 pm | अवलिया
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
17 Sep 2009 - 11:07 pm | दिपाली पाटिल
दिपाली :D
17 Sep 2009 - 11:10 pm | अवलिया
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
18 Sep 2009 - 12:46 pm | सोनम
दिपाली ताई आम्ही वाट पाहत आहोत म्हटल... :)

१० स्टेप्स करण्यापेक्षा एकच स्टेप्स केली तर...
फक्त खाण्याची. :)
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
17 Sep 2009 - 10:57 pm | संदीप चित्रे
पहिल्याच चित्रात अडखळलो !
ढोकळा 'अशक्य' दिसतोय.
फोटोतही ढोकळ्याचा हलकेपणा जाणवतोय :)
18 Sep 2009 - 4:14 am | नंदन
असेच म्हणतो. दुपारी चारच्या मधल्या वेळाला ही रेसिपी बघून चूकच केली की :(
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
17 Sep 2009 - 10:59 pm | चतुरंग
ख ण ख णी त, ख म ण !!! =P~ =P~
(किंचित अवांतर -साहित्यात दिलेली 'इनोची मात्रा' जरा वाढवता येईल का? तेवढीच उपयोगी! :?)
(खपाटीला गेलेला)चतुरंग
17 Sep 2009 - 11:13 pm | दिपाली पाटिल
>>साहित्यात दिलेली 'इनोची मात्रा' जरा वाढवता येईल का? तेवढीच उपयोगी!
वाढवता येइल ना...चव बिघडायची शक्यता आहे..हवं असल्यास नंतर घ्या इनो हवं तेव्हढं... :D
दिपाली :)
17 Sep 2009 - 11:14 pm | अवलिया
खपाटीला का वो?... बीटाच्या वड्या खाल्या ना?
बर जावु द्या... ढोकळा खा !
ढोकळा शब्द आल्याने प्रतिसाद अवांतर नाही.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
17 Sep 2009 - 11:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ढोकळा भारीच दिसतोय.
त्याच्यासोबत काही चटणी बिटणी नै का ?
-दिलीप बिरुटे
17 Sep 2009 - 11:10 pm | दिपाली पाटिल
चटणी बिटणीसाठी कोण वाट बघणार असं म्हणणं पडलं.... :D
दिपाली :)
17 Sep 2009 - 11:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ढोकळे सुरेख दिस्ताहेत त्यामुळे चटणीची वाट कोण पाहणार हे अगदी मान्य........! :)
17 Sep 2009 - 11:06 pm | बेसनलाडू
(ढोकळाप्रेमी)बेसनलाडू
17 Sep 2009 - 11:13 pm | प्राजु
मस्त आहे फोटो. सह्ही दिसतोय.
एक सूचना सांग गं सगळ्यांना. ढोकळ्याला फोडणी घालताना चुकून सुद्धा हळद घालायची नाही . नाहीतर ढोकळा लाल होईल.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
17 Sep 2009 - 11:18 pm | दिपाली पाटिल
हो गं मला ते लिहायचं होतं ...विसरलीच की...आता संपादन करते..
दिपाली :)
17 Sep 2009 - 11:24 pm | रेवती
झकास दिसतोय ढोकळा!
आत्ता लगेच करावा का?:)
थांब आधी बघते सगळ्या वस्तू आहेत का?
हो, आहेत.
दिपालीबाई, आमच्याकडे इनोची वारंवार गरज पडत नसल्याने;) जरा मागच्या वर्षीचा इनो आहे तो चालेल का?
रेवती
17 Sep 2009 - 11:27 pm | दिपाली पाटिल
चालवून बघ...चालला तर ठीक नाहीतर सोडा घाल थोडा... :D
मला वाटतं इनो थोडा जास्त घालावा लागेल...पण चव घेतघेतच बनव ...
दिपाली :)
17 Sep 2009 - 11:31 pm | रेवती
हम्म! बघते.
आणि साधा सोडा नै ना बै माझ्याकडे.
कोक घातल्यावर रंग काळा होणार्..हुं!
रेवती
17 Sep 2009 - 11:33 pm | दिपाली पाटिल
अगं तो सोडा नव्हे...खायचा सोडा...पांढर्या रंगाची पावडर असतो तो... :)
दिपाली :)
17 Sep 2009 - 11:35 pm | रेवती
होय गं ते माहितीये, पण एकदा आपलं मनात येवून गेलं की कोक घातल्यास किती सोपं पडेल्.......म्हणजे मी नाही घालणार.
रेवती
18 Sep 2009 - 2:00 am | गणपा
या वाक्या वर फुटलो. =))
(रेवती तै चा प्रतिसाद वाचुन आधी ट्युब पेटली न्हवती. :? )
चला बाकी या रैवाच्या नाशत्याची सोय झाली. धन्यु .
फटु पण मस्त आलेत.
17 Sep 2009 - 11:38 pm | दिपाली पाटिल
:D ... साखरही त्यातुनच मिळेल..प्रयोग करुन बघायला हरकत नाहीये...गोड सोडा वापरुन...
दिपाली :)
17 Sep 2009 - 11:44 pm | विसोबा खेचर
खल्लास फोटू...
तात्या.
17 Sep 2009 - 11:48 pm | प्रभो
१ नंबर दिपालीतै....
झकास...जेवण केल्यानंतर पण हे वाचून आणी पाहून भूक लगली..आजुन काय सांगू..
--प्रभो
18 Sep 2009 - 2:32 am | टारझन
फोटू पाहून बेषुद्ध झालो होतो ... आणि बेषुद्ध्हावस्थेत ढोकळा खाल्ला असावा ...
:)
जियो दिपाली ...
-(ढोकळाप्रेमी) टारोबा खल्लास फोटू
18 Sep 2009 - 2:47 am | बिपिन कार्यकर्ते
:''( :''( :''( :''( :''( :''(
बिपिन कार्यकर्ते
18 Sep 2009 - 3:00 am | लवंगी
१ किलो पाठव इकडे.
18 Sep 2009 - 3:00 am | लवंगी
१ किलो पाठव इकडे.
18 Sep 2009 - 3:18 am | दिपाली पाटिल
१ किलो काय.. तु येत असशील घ्यायला तर पाचेक किलोच घेउन जा... :D
दिपाली :)
18 Sep 2009 - 10:12 am | टारझन
हॅहॅहॅहॅ ... विसेक किलोंच वेगळं गाठोडं बांधून द्या मग त्यांच्याकडेच ...
मी कलेक्ट करेल हो त्यांच्याकडून
-टणाझन
18 Sep 2009 - 10:18 am | दिपाली पाटिल
तुला विसेक किलो की टन म्हणायचय?
दिपाली :)
18 Sep 2009 - 3:20 am | रेवती
छान झाला आहे ढोकळा. फोटू पाठवते बरं का दिपालीतै!
रेवती
18 Sep 2009 - 3:24 am | दिपाली पाटिल
पाठव पाठव...
दिपाली :)
18 Sep 2009 - 3:34 am | मुक्ता
एनो ऐवजी सोडाखार वापरावा आणि शेवटी फोडणीत जे पाणी घातले त्यात
चमचाभ्रर साखर मिसळावी.
लिंबाचा रस आणि फ्रुट सोल्ट घातल्यास एनो, सोडाखार घालवा लागत नाही
../(सासू) मुक्ता
आमच्यात सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नको
18 Sep 2009 - 3:44 am | रेवती
पुरावा.....ढोकळा केल्याचा!
रेवती
18 Sep 2009 - 4:11 am | दिपाली पाटिल
छान दिसतोय ढोकळा...म्हणजे ते इनो चालतंय तर... :D
दिपाली :)
18 Sep 2009 - 6:03 am | गुंडोपंत
वा झकास दिसतोय हा ढोकळा.
धणे घातल्याने फार छान स्वाद येतो!
ही' ला सांगण्याची सोय नाही. (मलाच कांडून उकडून काढेल ती!)
त्यामुळे मी पण लगेच आमच्या मेनरोड वर असलेल्या सूरती फरसाण मार्ट मध्ये जाऊन ढोकळा हाणायचा इरादा केला आहे.
आपला
गुंडोपंत
18 Sep 2009 - 8:08 am | सहज
मस्त!
18 Sep 2009 - 8:36 am | मदनबाण
मस्त,मस्त आणि मस्तच... :)
मदनबाण.....
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
18 Sep 2009 - 9:08 am | दशानन
:(
निषेध !!
18 Sep 2009 - 10:40 am | वेताळ
मस्तच दिपाली ताई ढोकळा झाला आहे.
वेताळ
18 Sep 2009 - 10:50 am | सुबक ठेंगणी
इथे बाकी सगळं आहे गं पण हिरवी मिरची, कोथिंबीर, कढिपत्ता आणि खोबरं नाहिये. :(
18 Sep 2009 - 10:58 am | दिपक
18 Sep 2009 - 11:02 am | संताजी धनाजी
भुक लागली हो!
- संताजी धनाजी
18 Sep 2009 - 1:19 pm | मसक्कली
लै झक्कास्..... ;)
मी पण करुन बघेल आता.... :W :)
18 Sep 2009 - 1:53 pm | किट्टु
दिपाली,
ढोकळा मस्तच दिसतोय.
पण असाच ढोकळा "माइक्रोव्हव" मधे होइल का? माझ्याकडे कुकर नाही आहे :(
आणि आता ढोकळा खायची प्रचंड इच्छा होते आहे....
18 Sep 2009 - 2:03 pm | परिकथेतील राजकुमार
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
18 Sep 2009 - 3:16 pm | सोनम
पराने किती मोठे काटे-चमचा आणले आहे. :)) :)) :))
ढोकळ्याच्या मानाने खूपच मोठे आहे रे.=)) =)) =))
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
18 Sep 2009 - 3:46 pm | दिपक
अहो ते फोटोतल्या परापेक्षाही मोठे आहेत. =))
20 Sep 2009 - 11:24 am | मराठमोळा
>>अहो ते फोटोतल्या परापेक्षाही मोठे आहेत
=)) =)) =))
फुटलो...
बाकी दिपालीतै,
तुमच्या पाककृतींना आमचा सलाम!!!!!!
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
18 Sep 2009 - 3:19 pm | कानडाऊ योगेशु
लै बेस्ट... अगदी तोंडाला पाणी सुटले..
वरचा अवलियासाहेबांचा प्रतिसाद एक नंबर!!!!
20 Sep 2009 - 9:58 am | चित्रादेव
मस्त आहे.
दिपाली, अग हळद न टाकता मस्त पिवळा रंग आलाय. वाटत नाही हळद नाही टाकली ते.
मी साधे बेसन वापरूनही ह्याच पद्धतीने केला तरीही बर्याच वेळ गिच्च गोळा झालाय. मग लाडू बेसन वापरले व झाला नीट.
मग तु लाडू बेसन वापरलेस की साधे बेसन सांगशील का?
20 Sep 2009 - 10:59 am | पाषाणभेद
मला वाटले की एकावर एक असे दहा थरी ढोकळा आहे की काय?
हा तर नॉर्मलच ढोकळा दिसतोय.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
21 Sep 2009 - 5:11 am | नंदा
बेसनाऐवजी चण्याची दाळ तीन-चार तास भिजवून, ते पाणी निचरून, आणि दाळ वाटून केलेला (बाकी कृती या ढोकळ्याप्रमाणेच, ईनो जास्त लागणार नाही) ढोकळा अधिक चविष्ट आणि पचायला हलका असतो. गॅसेसचा त्रास होत नाही.
21 Sep 2009 - 6:26 pm | सोज्वळ
आपला प्रयत्न आवडला... :)
- सोज्वळ
23 Sep 2009 - 4:19 am | दिपाली पाटिल
सर्व वाचकांना आणि प्रतिक्रिया देणार्यांना धन्यवाद...
दिपाली :)