१० स्टेप्स खमण ढोकळा...
१० स्टेप्स खमण ढोकळा...
साहीत्यः
खमणः
१ कप बेसन
१ टीस्पून इनो
१ टेस्पून तेल
२-३ चमचे लिंबाचा रस किंवा १/२ चमचा सायट्रीक अॅसिड पाण्यात विरघळुन घेणे.
चवीनुसार मीठ
१ टेस्पून साखर
१ चमचा आले-मिरची पेस्ट
१/२ कप पाणी
चिमुटभर हिंग
फोडणी:
तेल
मोहरी
मिरची
हिंग
तीळ (ऐच्छिक)
२ चमचे पाणी
कढीपत्ता (ऐच्छिक)
कृती:
१) बेसन चाळुन घ्या.
२) बेसनमध्ये तेल + मीठ् + साखर + लिंबाचा रस + आले-मिरची + हिंग नीट मिसळुन घेणे.
३) यात हळुहळू पाणी घालावे, पुर्ण १/२ कप वापरावेच असे नाही, इडलीच्या मिश्रणासारखे झाले पाहीजे.
४) ज्यात ढोकळा वाफवावा लागेल अश्या पातेल्यात पाणी उकळत ठेवावे ...
५) पाण्याला उकळी फुटली की वरिल मिश्रणात इनो मिसळावे.आता हे मिश्रण फुगून येइल...जर नाही आले तर अजुन इनो टाकावे किंवा चिमुटभर सोडा टाकावा...हे अगदी वेळेवर करावे...आधी करुन ठेवल्यास ढोकळा नीट फुगणार नाही आणि मिश्रण काळपट व्हायची शक्यता असते. काही ठिकाणी इनो ऐवजी पापडखारही वापरतात...
६) एका तेल लावलेल्या खोलगट थाळीत मिश्रण टाकुन २०-२२ मि. मध्यम आंचेवर वाफवावे..
७) ढोकळा वाफवुन झाला की त्याचे चौकोनी तुकडे करावेत. ढोकळा थोडा थंड झाल्यावरच कापावा...
८) आता फोडणीसाठी तेल तापवत ठेवावे...तेल तापले की मोहरी टाकावी. मोहरी तडतडल्यावर तीळ्,कढीपत्ता,मिरची आणि हिंग टाकावा.
९) आंच बंद करुन २ चमचे पाणी टाकुन हे लगेचच ढोकळ्यांवर ओतावे...
१०) सजावट काहीही करा...कोथिंबीर, खोबरे ही घालू शकता... या ढोकळ्यात हळद घालू नये..इनोमुळे रंग काळपट होऊ शकतो...रंग टाकायचा असल्यास अगदी थोडा टाकावा...

वाचन
19300
प्रतिक्रिया
56