फेब्रुवारी मधे न्यूअर्क न्यूजर्सीवरून बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स मधे येत असताना. खिडकी होती आणि स्वच्छ सूर्यप्रकाश होता... त्याचा फायदा घेऊन काढलेली ही छायाचित्रे: (ही छायाचित्रे मॅसॅचुसेट्स मधे आल्यानंतरची आहेत.):
From Massachusetts Sky View
From Massachusetts Sky View
वरचे छायाचित्र मॅसेच्युसेट्स मधील केपकॉड नावाच्या (प्रॉविन्सटाऊन गाव) आहे. तेथे जमीन निमुळती होत आल्याने दोन्हीकडे समुद्र किनारा आहे. उन्हाळ्यात हा भाग फिरण्यासाठी एकदम मस्त आहे.
हिमच्छादीत बॉस्टनचा भाग
From Massachusetts Sky View
बॉस्टन आणि आजुबाजुच्या २५+ गावे/शहरांचा मलनि:सारण प्रकल्प. हा एका अॅटलांटीकसमुद्रातील बेटावर आहे. (एका बाजूने बेट, दुसरीकडून आता जोडलेले). (डिअर आयलंड ट्रिटमेंट प्लँट). हा फोटो अगदी विमान उतरत असताना काढलेला आहे.
छायाचित्रे उस्फुर्तपणे काढल्याने विशेष कलात्मक लक्ष न देता काढली आहेत. त्यामुळे काही बदल सुचवायचे असतील तर अवश्य सुचवा.
प्रतिक्रिया
15 Jul 2009 - 7:53 am | सहज
एरीयल फोटोग्राफी नेहमीच भूरळ घालणारी असते. फोटोंचा आकार जरा मोठा कराल का?
अवांतर - खूप वर्षापुर्वी ऐकले होते की कोणीतरी (बहुदा मराठी व्यक्ती) कालीदासाच्या कथेतील [मेघदूत??] वर्णनानुसार त्या मेघाच्या (का राजहंसाच्या) प्रवासाचा मागोवा विमानातुन घेतला होता. त्याचे काही फोटो जालावर उपलब्ध आहेत का?
15 Jul 2009 - 7:58 am | Nile
फोटो भारी! जर मोठे फोटो imageshack वर अपलोड करता आले तर अजुन मजा येईल. :)
@सहजरावः ते डॉ(?). भावे. आणि त्यांच्या मते जसे वर्णन मेघदुतात आहे तसेच तो मार्ग आहे. (तेही इतक्या वर्षांनंतर!)
मला पटकन ही एक बातमी सापडली.
15 Jul 2009 - 8:57 am | टारझन
हाहाहा
हे वाक्य हृदयाला भिडले .. मी नेहमीच म्हणत आलेलो आहे .. बिगर इज अल्वेज बेटर !! =))
असो .. विमानातून फोटूग्राफिचे काय तंत्र आहे ? त्यासाठी आकाशातंच जावे लागते का ? विमानात बसून खालूनच फोटोग्राफी शक्य आहे काय ? कॅमेर्यात काय काय बदल करावे लागतात ? तुम्ही काय केले ? विमान कोणत्या कंपनीचे असावे , इत्यादी अनेक क्वालिटी प्रश्न मनात उद्भवलेले आहेत
15 Jul 2009 - 12:35 pm | विनायक प्रभू
द्व्यर्थी वाक्ये लिहिलीत तर आपणावर पण आयोग बसवावा लागेल हे ध्यानात घ्या टारझन राव.
फोटो मस्त
शाकाहार पाळा
तमोगुणाना आळा
विप्र्संहिता
15 Jul 2009 - 2:43 pm | टारझन
ते आयोग वगैरे आम्ही फाट्यावर मारू !! अर्थ काढणे हे सर्वस्वी आणि सर्वस्वी फक्त काढणार्यावर अवलंबून आहे .. उलट असा दुसरा अर्थ काढून बोंब ठोकणार्यांच्यावरच आम्ही आमची समिती नेमू .. काय समजले ?
- (रोकठोक) टार्या - द बाभळीचा फोक
15 Jul 2009 - 8:29 am | विकास
तुमच्या सुचनेप्रमाणे फोटो अजून मोठे केलेत.
15 Jul 2009 - 8:34 am | सहज
याहून मोठे फोटो पाहीले थेट पिकासावर. :-)
नाइलराव धन्यु. डॉ. भावेंनी काढलेले फोटो जालावर आहेत का?
15 Jul 2009 - 7:54 am | मदनबाण
छान फोटो.
फोटोंचा आकार जरा मोठा कराल का?
असेच विचारतो. :)
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
15 Jul 2009 - 8:22 am | विसोबा खेचर
क्लास!
तात्या.
15 Jul 2009 - 9:52 am | आशिष सुर्वे
छायाचित्रे छान आहेत..
-
कोकणी फणस
15 Jul 2009 - 10:35 am | सुनील
छायाचित्रे छानच आहेत. नेहेमीच्या कॅमेर्याने काढली का मोबाईलच्या ?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
15 Jul 2009 - 11:11 am | ऋषिकेश
प्रकाशचित्रे आवडली. विषेशतः पहिले चित्र अधिक आवडले
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
15 Jul 2009 - 11:58 am | नंदन
छायाचित्रे मस्त आलीत. आमच्याही गावाचा हा विमानातून काढलेला फोटो -
कोरोनॅडो ब्रिज, सॅन डिएगो

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
15 Jul 2009 - 12:50 pm | जागु
छानच आहेत. अजुन जरा मोठे करा.
15 Jul 2009 - 1:04 pm | प्रकाश घाटपांडे
वा वा इकासराव हे आमाला गुगलअर्थवानी वाटत . मुदलातला घोडा दिसतो आहे त्यावरचे व्याज कुठे कुठे दिसत नाही. असो ईमायनातुन लई भारी दिसत आसन ब्वॉ
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
15 Jul 2009 - 1:46 pm | क्रान्ति
छायाचित्रे.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
15 Jul 2009 - 5:02 pm | विकास
धन्यवाद! सुनील आणि टारझनने विचारल्याप्रमाणे कॅमेरा सम्दर्भात लिहायचे विसरलो: आत्ता जवळ नाही, पण कोडॅक झी सिरीज मधील सुरवातीचे मॉडेल आहे (१० मेगापिक्सल). मध्यम झूम करून फोटो काढले आहेत. पहील्या फोटोचे खालील डिटेल्स. साधारणपणे असेच इतर सर्व फोटोंचे आहेतः
Camera: EASTMAN KODAK COMPANY
Model: KODAK Z712 IS ZOOM DIGITAL CAMERA
ISO: 64
Exposure: 1/200 sec
Aperture: 3.2
Focal Length: 17.6mm
Flash Used: No
15 Jul 2009 - 10:10 pm | धनंजय
पहिल्या चित्रातले ते वळणावळणाचे जलप्रवाह विमानातून बघताना नेहमीच खूप आचंभा वाटतो.
15 Jul 2009 - 11:47 pm | बिपिन कार्यकर्ते
खूपच छान आहेत छायाचित्रं.
परवा आफ्रिकेला जाताना लेक व्हिक्टोरिया या आफ्रिकेतल्या सगळ्यात मोठ्या गोड्या पाण्याच्या सरोवरावरून विमान उडत होते. अगदी काचेला नाक लावून बघत होतो. फोटो काढले, पण असे सुंदर नाही आले. पण तो लेक व्हिक्टोरिया पण भारीच होता. किती तरी वेळ संपतच नव्हता. त्यात अगदी मोठी मोठी बेटं पण होती चक्क.
बिपिन कार्यकर्ते
16 Jul 2009 - 12:13 am | प्राजु
मस्तच!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Jul 2009 - 10:32 am | विशाल कुलकर्णी
सुंदर छायाचित्रे, मस्तच आहेत.
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...