बर्याचदा बँकेत ग्राहकांच्या सेवेसाठी काउंटरवर जी बॉलपेन्स ठेवलेली असतात ती आकाराने लहान, टोपण नसलेली आणि लहानशा साखळीने बांधलेली असतात. बर्याचदा चेकवर सहीसाठी अथवा डिपॉझीट फॉर्मवर सही करायला अशा लहान, टोपण नसलेल्या साखळीने बांधलेल्या पेनाचा ग्राहक वापर करतात. तर अशी ही लहान, टोपण नसलेली साखळीने बांधलेली बॉलपेन्स काउंटरवर ठेवण्यामागे आणि स्वतःचे पेन न वापरता तेच पेन (कधी कधी थोडेसे झटकून) वापरण्यामागे आर्थिक कारण काय असू शकेल? ;)
प्रतिक्रिया
6 Jun 2009 - 12:30 am | टारझन
घ्या !! आम्ही धागा काढायचा टाळला... ते काम आपण पुर्ण केलं ...
छाण आहे .. चालू द्या इकासराव
6 Jun 2009 - 12:36 am | धनंजय
बॉलपेनांची टोपणे हरवतात, किंवा हरवतील म्हणून लावतच नाहीत. पेनाच्या टोकावरची शाई वाळते.
पण ग्राहकांना पेन झटकल्याचा व्यायाम व्हावा असा उदात्त उद्देश असल्याचे कारण पब्लिक रिलेशन ऑफिसर सांगतो. लोकांनी ऊठसूट पैसे काढू नयेत, विथड्रावल स्लिपवर सही करता-करता कटकटून परत जावे, असे एक मॅनेजर सांगतो. पण मग भरती करणार्या लोकांचे काय? तर म्हणे भरतीची स्लिप आम्ही सहीशिवाय स्वीकारतो.
**बँक कर्मचार्यांचे वरील संवाद काल्पनिक आहेत.**
6 Jun 2009 - 1:10 am | Nile
हा हा!
विकास यांचा ID चुकुन कुठल्या काथ्याकुट्प्रेमीला (साखळीने?) अडकुन बसला की काय?;)
6 Jun 2009 - 9:07 am | प्रकाश घाटपांडे
मी घरात टेलीफोन व पेन यांचे साहचर्य रहावे म्हणुन पेनला लोकरीचा धागा बांधुन ते कायम फोनजवळ राहील असा प्रयत्न केला पण घरातील इतर सदस्यांच्या बेशिस्तीला कंटाळून हा प्रयोग सोडुन दिला. तसेच पेन व टोपण , बाटली / डबा व झाकण, डावा मोजा व उजवा मोजा यांचे साहचर्य राखण्याचा प्रयत्न केला तो ही असफल झाला .शेवटी ही माझी वस्तु याला हात लावायचा नाही अशी कठोर भुमिका घेउन झाली पण त्यामुळे आम्ही खलनायकाच्या प्रतिमेत जाउ लागलो. तसेच मुलीच्या लाघवी/लबाड पणा मुळे (माझ्या )वस्तु हे गरजेच्या / आयत्या वेळी सापडण्याचे हमखास ठिकाण अशी 'सोय' होउ लागली.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
6 Jun 2009 - 12:59 am | छोटा डॉन
करेक्ट विकासराव, आम्ही देखील ह्या प्रश्नाचा अतिशय सुक्ष्मात जाऊन सांगोपांग विचार केला =)) =))
आम्हाला एक अत्यंत साधा उपाय सुचला आहे.
जर बँकेच्या बाहेर एक टपरी टाकुन तिथे "गावठी कट्टे , सुरे, चाकु" वगैरे भाडेतत्वावर द्यायचे ठरवले तर पेनाची आवश्यकताच भासणार नाही. इथुन जे काही हवे आहे ते नाममात्र भाड्यावर भाड्याने घ्यायचे, आत जायचे, भाड्याने घेतलेली वस्तु कॅशियरला ( आधी चुकुन भाड्याला असे लिहले होते ) दाखवायची, पैसे घ्यायचे, बाहेर यायचे, वस्तु परत करायची, भाडे इच्छा असल्यास भरायचे अथवा तिच वस्तु परत न करता त्याच्या जोरावर पलायन करायचे ...
कसा आहे उपाय ?
ना रहा पेन और ना रहा उसका साखळीसे लोंबकाळणा ...
बरोबर ना ???
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
6 Jun 2009 - 1:20 am | लिखाळ
बँकेच्या काऊंटरवर चेक, स्लीप व फॉर्म ठेऊन ते भरायचे, खातेदारांनी एकमेकांना व्याजदर वगैरेचे सल्ले द्यावेत. निवृत्तीनंतरची आर्थिक स्थिती पक्की राहावी म्हणून योग्य ठिकाणी गुंतवणूक केली जात असावी असे वाटते.
बाकी बॉलपेने विकत घ्यायला लागत असल्याने एकमेकांना टोपण काढून, साखळी लाऊन नुसते पेन देणे परवडते त्या मागे इतर कारण काही नसावे असे वाटते.
विकासराव असे नुसते प्रश्न विचारणारे धागे काढायचे कधी सुरु करणार आहात ? (ह. घ्या) :)
अवांतर : खातेदार अशावेळी बँकेत स्वतःचे पेन घेऊन का जात नाहीत असा धागा काढावा वाटतो आहे ! ;)
प्रेरणा
-- लिखुटे.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
6 Jun 2009 - 2:02 am | चतुरंग
विकासराव, डोळे भरुन आले, डबडबले, सद्गदित झालो, भावबंध ओसंडून(ण) वाहिले! तुम्ही असा धागा काढाला आहे की आज मिपा धन्य झाले. नवीन सेवादात्याचे असे उदघाटन केलेत शाबास!!
मी त्या साखळी पेनचा वापर दोन कारणांसाठी करतो!
१ - बँकेने दिलेल्या सोयीचा यथायोग्य वापर झाला पाहिजे.
(चालणारे पेन असेल तर प्रश्नच नाही. चालणारे नसले तर तिथल्या कर्मचार्यांना ते बदलायला सांगता येते.)
२ - ते पेन न वापरता जर मी माझे चालणारे पेन वापरले तर ते पेन कोणी मागण्याचा दाट संशय. मग माझ्या पेनचे टोपण मी माझ्याच हातात ठेवतो आणि फक्त सुटे पेन लिहायला देतो. पण कित्येकदा लिहिणारी व्यक्ती इतका वेळ लावते की माझा रांगेतला क्रमांक मागे पडून मला विनाकारण उशीर होतो, असे होऊ नये म्हणून!
(चिकट)चतुरंग
6 Jun 2009 - 9:35 am | प्रकाश घाटपांडे
यकदा पोस्टात यकानी पेन मागितले मी दिले. त्यानंतर त्याचे काम झाल्यावर माझ्याशी गप्पा मारता मारता माझ्या समोर त्यानी पेन स्वतंच्या खिशात घातले नी निघुन गेला. जेव्हा नंतर मला पेनची आठवण आली त्यावेळी ते लक्षात आले.
एक मित्र सारखा पेन मागायचा. त्याला मी द्यायचो . यकदा वैतागुन त्याला म्हणालो ,"च्यायला एवढा पगार घेतो नी तुला साधा दोन रुपयाचा पेन ठेवता येत नाही का? " नंतर त्यानी पेन मागितला कि मी दोन रुपये देत असे. पुढे तो अशा दोन दोन रुपयांनी श्रीमंत होउ लागला.. नी मी गरीब व्हायचे बंद केले व त्याला न कुरकुरता पेन देउ लागलो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
6 Jun 2009 - 9:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>यकदा पोस्टात यकानी पेन मागितले मी दिले. त्यानंतर त्याचे काम झाल्यावर माझ्याशी गप्पा मारता मारता माझ्या समोर त्यानी पेन स्वतंच्या खिशात घातले नी निघुन गेला.
बँकेत लोक पेन मागतात आणि परत करायचे विसरुन जातात, त्यावर मी पेन दिसणार नाही असा ठेवतो. :)
-दिलीप बिरुटे
6 Jun 2009 - 10:14 am | अवलिया
अगदी बरोबर !
आपले पेन ही आपली वैयक्तिक मालमत्ता असते, उगाच कुणाच्या दृष्टीस पडुन दृष्ट नको लागायला ! :)
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
6 Jun 2009 - 6:25 am | अवलिया
हाण तेजायला !!
अरे नीलकांत! बाबा, काल नवीन सेवादात्यावर डेटा आणतांना काहीतरी भुताटकी झाल्याचे ऐकीवात होते. त्यात काही सदस्यांचे पण घोळ झाले की काय? च्यामारी, विकास सदस्यनामावरुन सकाळी सकाळी काही तरी वैचारीक, डोक्याला भुंगा लावणारे वाचायला मिळेल या अपेक्षेने धागा उघडला, तर वेगळाच "विकास" नजरेस पडला :)
आम्हाला आमच्या जुन्या एका मित्राची आठवण आली :)
बाकी, विकासराव एका ओळीचे निरर्थक धागे, हिण आणि हिणकस विडंबने, काही झाले की मिपाकरांना सल्ला विचारा असले धागे काढणा-यांच्या (म्हणजेच पर्यायाने आमच्यासारख्यांच्या) पंथात सामील झाल्या बद्दल अभिनंदन आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! :)
जियो विकासराव जियो !!!
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
6 Jun 2009 - 7:18 am | विकास
बाकी, विकासराव एका ओळीचे निरर्थक धागे, हिण आणि हिणकस विडंबने, काही झाले की मिपाकरांना सल्ला विचारा असले धागे काढणा-यांच्या (म्हणजेच पर्यायाने आमच्यासारख्यांच्या) पंथात सामील झाल्या बद्दल अभिनंदन आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
धन्यवाद, तुम्हाला आणि इतर प्रतिसादकर्त्यांना पण ;)
विकास सदस्यनामावरुन सकाळी सकाळी काही तरी वैचारीक, डोक्याला भुंगा लावणारे वाचायला मिळेल या अपेक्षेने धागा उघडला, तर वेगळाच "विकास" नजरेस पडला
किमान "बॅंकेतल्या पेन" वर लिहीत असताना तरी "पेनफूल" लिहीले गेले नसावे अशी आशा करतो :-)
6 Jun 2009 - 9:12 am | अवलिया
किमान "बॅंकेतल्या पेन" वर लिहीत असताना तरी "पेनफूल" लिहीले गेले नसावे अशी आशा करतो
हा हा हा
"पेनफुल" असते तर "प्रतिक्रिया" दिलीच नसती ;)
(बघा तुमचे आणि माझे एकमत आहे की नाही, "पेनफुल" असले की प्रतिक्रिया नाही :D )
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
6 Jun 2009 - 9:12 am | टारझन
आग्गायाया ... फुटलो =)) =)) =))
पारूसा पारूसा हा प्रतिसाद वाचला .. नी खल्लास !!
6 Jun 2009 - 9:16 am | अवलिया
पारूसा पारूसा हा प्रतिसाद वाचला .. ... नी खल्लास !!
:?
वायरलेसवर मेसेज आला की काय तुझ्याकडे ? :)
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
6 Jun 2009 - 10:19 am | अविनाशकुलकर्णी
जी गोष्ट बॅंकेतल्या पेन ची तशिच पोष्टातल्या डिंकाच्या बाटलिचि..या वर धागा टाकु का? पण नको...तो एक ओळिचा होइल...
6 Jun 2009 - 10:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>जी गोष्ट बॅंकेतल्या पेन ची तशिच पोष्टातल्या डिंकाच्या बाटलिचि..या वर धागा टाकु का?
वेलकम ! :)
स्वगत: शुन्य मिनिटात त्या धाग्याला...नै यमसदनाला धाडला तर नावाचा प्रा.डॉ नै ;)!
6 Jun 2009 - 10:29 am | अवलिया
स्वगत: शुन्य मिनिटात त्या धाग्याला...नै यमसदनाला धाडला तर नावाचा प्रा.डॉ नै !
संपादकीय पदाचा गैरवापर.
साहित्यिक मुस्कटदाबी करणा-यांचा निषेध निषेध निषेध
अवांतर - अशाच काही धाग्यांची यादी व्यनी करतो, जरा बघा त्यांच्याकडे ;)
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
6 Jun 2009 - 10:36 am | टारझन
अरे "बँकेतलं पेन " काय ... पोष्टातली "डिंकाची बाटली" काय ? लै अश्लिल होत चाल्लंय हल्ली पब्लिक !! मास्तरच्या नादाला लागलेत सारे...
बाकी बिरूटे सर .. तुम्हाला धागा यमसदनी पाठवण्याची तसदी नको .. आमच्या सारख्या हौषी यमदुतांना थोडी क्रिडा करू द्या ना त्या ऐवजी !!
- (यमदूत) टारझन
7 Jun 2009 - 3:34 am | संदीप चित्रे
अशी एक साधारण धारणा असते :)
7 Jun 2009 - 11:18 am | हरकाम्या
विकासराव, तुम्हि आमच्या बैंकेत या राव तुम्हाला पेन नाहीतरी
बोथट टाचण्या नक्की मिळतील.
18 Jun 2009 - 8:35 am | विसोबा खेचर
विकासभावजी,
अहो तुम्हीसुद्धा आता असले वेडझवे घागे काढू लागतात? कमाल आहे! :)
घरी काही भांडणबिंडण झालंय का? तरी १०-१० वेळा बजावून सांगत होतो की लग्न करू नक म्हणून! :)
तात्या.
18 Jun 2009 - 9:06 am | विकास
अहो हा महत्वाचा प्रश्न आहे. (बँकेतल्या पेना संबंधीचा, घरी भांडणाचा नाही! :) )
>>>घरी काही भांडणबिंडण झालंय का? तरी १०-१० वेळा बजावून सांगत होतो की लग्न करू नक म्हणून! <<
अहो (तुम्ही बजावलेत इतकेच)खरं आहे, पण आम्हाला भांडण टाळण्याची अनोखी पद्धत माहीत आहे. आलटून पालटून मिपावर (म्युचुअली एक्स्लुजिव्ह) टंकत रहाणे ;)
18 Jun 2009 - 11:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
विकासरावांशी सहमत.
लग्न करणार्याला भांडणं टाळण्याच्या पद्धती माहित असाव्याच लागतात, नाहीतर समुपदेशकाकडे नाही का जावं लागणार? ज्याला/जिला पोरगी/पोरगा पटवता येते/तो, त्या व्यक्तीशी लग्न करण्याएवढा अंगात दम असतो त्याला भांडणं का टाळता येऊ नयेत? सारखं सारखं काय उठलं की समुपदेशक, किंवा मिपाकरांकडे सल्ले मागायचे!!
18 Jun 2009 - 4:38 pm | चतुरंग
भांडण झालं तर झालं! टाळायचं कशाला? ते काय कायमचं असतं का? आपण चविष्ट जेवण बनवायला मस्तपैकी गरम मसाला वापरतो ना? तसंच असतं भांडणाचं!!
(चविष्ट)चतुरंग
18 Jun 2009 - 1:23 pm | ऋषिकेश
अरे वा नव्या सेवादात्यावर विकासरावांचा भलताच विकास झालेला दिसतोय.. ;) चालु दे :) :)
(ऑनलाईन बँकर) ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे