समरसतेची ऐशी-तैशी
===========
--राजीव उपाध्ये
गेल्या काही आठवड्यातल्या बातम्या जर व्यवस्थित समजाऊन घेतल्या तर काही ठळक गोष्टी लक्षात येतात - संघाने आजवर सोडलेल्या पुड्यांपैकी ’समरसतेच्या’ पुडीला छानपैकी चुना लागलेला आहे.
संघाच्या शंभरीच्या निमित्ताने जो उन्माद बाहेर पडला त्यात एक गोष्ट परत-परत उगाळली गेली, ती म्हणजे संघ बदलला पण टीकाकार तिथेच आहेत. हा उन्माद संघाच्या दिशाभूल करण्याच्या रणनीतीला साजेसाच आहे. पण एक लक्षात घेतले पाहिजे की उन्माद त्या व्यक्तीला/समूहाला नेहेमी बेसावध ठेवतो. हा बेसावधपणा मग कमकुवत बाजूला उघडं पाडतो.
- केरळातल्या आनंदुची लैंगिक छळाला कंटाळून आत्महत्त्या
- कर्नाटकात संघावर बंदी
- संभाजीनगरमध्ये स्वयंसेवक भरतीला झालेला विरोध आणि मग त्याची नंतरच्या घटनांमध्ये परिणती...
समरसतेचं तत्त्वज्ञान किती फसलं आहे, याचे अन्य दूसरे चपखल उदाहरण देता येत नाही.
-जोपर्यंत मनुस्मृतीचा निर्लज्ज पुरस्कार काही धर्माचार्य उघडपणे करत आहेत,
-तसेच जोपर्यंत अर्धवट डोक्याचे स्वयंसेवक जर लोकांच्या घरात घुसून व्यक्तीगत आयुष्यावर ताबा मिळवायचा करत आहेत,
-पश्चिमेच्या ज्ञानाचे फायदे घेऊन त्याबद्दल द्वेष पसरवत आहेत,
-जोपर्यंत टाकाऊ कल्पना परत रुजविण्याचा आटापिटा केला जात आहे,
-आणि सर्वात महत्त्वाचे जोपर्यंत संघाचे शीर्षस्थ नेते आणि तळागाळातले कार्यकर्ते यांच्यात एकवाक्यता नाही,
तोपर्यंत संघाबद्दल आत्मीयता निर्माण होणे शक्य नाही.
या घटना आत्ता खुप छोट्या दिसत आहेत. प्रत्येक ठिणगी सुरुवातीला छोटीच असते. शिवाय शेकोटी पेटवताना एका काडीत पेटेलच याची खात्री देता येत नाही.
माझ्यामते आता संघाला टक्कर फक्त आंबेडकरवादी चळवळच देऊ शकते. फक्त त्यांनी संघाला समांतर अशी "भगवान बुद्ध स्वयंसेवक संघ" अशी संघटना स्थापन करावी आणि चालवावी...मनोज जरांगे सारखी सामान्य व्यक्ती जर व्यवस्थेला घाम फोडू शकते तर "भगवान बुद्ध स्वयंसेवक संघ" काय करू शकेल याची कल्पनाच केलेली बरी...
प्रतिक्रिया
24 Oct 2025 - 10:04 am | सुबोध खरे
सुमार केतकर क्रमांक 2
24 Oct 2025 - 10:49 am | कांदा लिंबू
व्वा! अतिशय उत्तम मनोरंजन! अजून येऊ द्या. पुलेशु, पुभाप्र.
24 Oct 2025 - 11:42 am | नावातकायआहे
कर्नाटकात संघावर बंदी! उत्तम!!
राज्य खांग्रेसचे आहे. ताबडतोप अंमलबजावणी करावी!
24 Oct 2025 - 7:13 pm | अभ्या..
तुम्हाला अजून संघ समजलाच(काही अंशी ते पूर्णांशाने) नाही. कळलाच नाही, वळलाच नाही, ओळखताच आला नाही, जाणवलाच नाही, झेपलाच नाही, स्वीकारताच आला नाही, मानवलाच नाही,
विरोध करायची पध्दत आतातरी बदला.
पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो.
24 Oct 2025 - 10:10 pm | आग्या१९९०
केरळच्या २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने संघाच्या " कामाचा " अनुभव घेतला. कामाचा दर्जा मानवाला नाही.गेला बिचारा.
24 Oct 2025 - 11:13 pm | रामचंद्र
पुढून थेट हल्ला करण्यापेक्षा मागून (शब्दशः) शिरकाव करावा अशा अर्थाचे ते धोरण असावे!
25 Oct 2025 - 9:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छ. संभाजीनगर येथे शैक्षणिक संस्थांच्या बाहेर उभे राहून 'ज्वाइन अस' चे स्टॉल लावल्यानंतर शहरभर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिकांनी या गोष्टीचा'योग्य समाचार' घेतला.
संघटनेच्या द्वेष पसरविणे आणि देशविघातक कारवाया विचारात घेऊन देशातील कायद्याचे राज्य आणि सामाजिक सौहार्द टीकविण्यासाठी या रास्वसं या संघटनेवर बंदी घालावी यासाठी शहरात मोर्चा काढण्यात आला.
-दिलीप बिरुटे
25 Oct 2025 - 6:21 pm | समाधान राऊत
Rss सारख्या संघटनेला 100 वर्ष पूर्ण होतात , भलेही इतरांच्या नजरेत निष्क्रिय असू द्या ,तरीही 100 वर्ष पूर्ण झाली , हे काही खपण्यासारखी गोष्ट नाही , शिवाय हे असेच चालू राहिले तर आपले नेक इरादे जसे की फोडा आणि राज्य करा सोबत सार्वभौमत्व नष्ट करा हे पूर्ण होणार नाहीत , म्हणून हे चालू झाले आहे बाकी काही नाही ,
100 वे वर्ष साजरे करत असताना अशा घटनांसाठी किती तयार होता हे काही ऐकिवात नाही , पण असे नोंदणी किंवा join rss सारखे कार्यक्रम 100 वर्ष चालूच होते तेव्हा नाही पण अचानक जाग आल्यासारखे आताच कस काय आठवण आली काही कळत नाही बुवा, अशी बंदी वैगेरे संघासाठी नवीन नाही ,
25 Oct 2025 - 6:22 pm | समाधान राऊत
भाजप आणि तत्सम विचारसरणीला हरवायचे असेल तर मुळावर घाव घालायचे हे एक कारण असू शकते म्हणून नवीन टार्गेट सेट केले असावे बहुतेक ,
25 Oct 2025 - 6:41 pm | अभ्या..
कुणाचे सार्वभौमत्व राउतसाहेब?
कोण नष्ट करतंय? कसे?
आणि नोंदणी कसली? नोंदणी तर नसते ना संघात?
जॉइन एबीव्हीपी असे स्टीकर/पोस्टर्स्/वॉलपेन्टिंग बघितलेले आहेत कित्येक वर्षे. स्वयंसेवक संघाची कधी नाही पाहिली.
25 Oct 2025 - 11:57 pm | समाधान राऊत
एखाद्या विशिष्ट भागाला स्वातंत्र्य देशाचा दर्जा द्या किंवा इतर देशाच्या घशात घाला म्हणून म्हणून चालू असलेली धडपड सर्वश्रुत आहेत , हे फक्त काश्मीर साठी लागू होत नाही , देशाच्या इतर भागात मुस्लिम तसेच व्यतिरिक्त संघटना सुद्धा अश्याच मागण्या जोर धरत असतात , मिनी पाकिस्तान शब्द वापरत असताना , सार्वभौमत्व सारखे शब्द शब्दकोशातून नाहीसे करावे लागतात .
नोंदणी म्हणजे सर्टिफिकेशन ही संकल्पना इथे नाही , ज्यांना शाखेमध्ये जायच आहे परंतु कसे ते माहिती नाही त्यासाठी जॉइन आरएसएस हा उपक्रम / संकल्पना आहे , जो येईल त्याला बरोबर माहिती देणे , पटले तर शाखेत येईल अथवा नाही , जॉइन आरएसएस ही संकल्पना एखाद्या दिशा दर्शक फलकाप्रमाणे आहे , पुढे शाळा आहे , खड्डा आहे , विहिर आहे , मंदिर आहे वैगेरे , जायचे किंवा नाही हे ज्याने त्याने ठरवावे ,
25 Oct 2025 - 11:37 am | आग्या१९९०
संघाला आपल्या मर्यादांची जाणीव करून दिली हे योग्य केले. न केलेल्या कार्याचे श्रेय घेऊन हजार वर्ष संघटना टिकवून ठेऊ शकाल. उघडपणे आपले मनसुबे पूर्ण कराल तर संघटना वर्षभरात नष्ट होईल.
27 Oct 2025 - 8:35 am | युयुत्सु
https://www.youtube.com/watch?v=sQaKLlgV7hk
27 Oct 2025 - 9:25 am | युयुत्सु
आणखी एक-
https://www.youtube.com/watch?v=XH1daUCQzIs
31 Oct 2025 - 9:13 am | अर्धवटराव
आंबेडकरी चळवळ संघाला टक्कर देणार ? ते ही बौद्ध स्वयंसेवक संघ स्थापुन ? =) =)
आजवर दलीतांना नीट न्याय देऊ शकली नाहि, बौद्धेतर दलीतांना आपलसं करु शकली नाहि, ति आंबेडकरी चळवळ पॅन इण्डीया पातळीवर संघाला पर्याय उभा करणार ?
संघाला पर्याय म्हणुन एक ते सेवादल आहे.. होतं म्हणायला हवं खरं तर. समाजवादाचा बाजार मांडणार्यांनी पार ऐसीतैसी केली त्याची. काँग्रेससारख्या प्रचंड जनाधार असलेल्या पक्षाला घराणेशाहीच्या दावणीला बांधुन एकतर त्या सेवादलाची राजकीय शक्ती क्षीण केली. वरतुन ममता, पवार साहेबांसारख्यांना पक्षाबाहेर फेकुन वर त्यांची ससेहोलपट केली.. आणि त्यांचा सामाजीक विचार रुजु द्यायला त्यांना उसंतच दिली नाहि. संघाच्या धार्मीक+सांस्कृतीक राष्ट्रवादाला वैचारीक भुमीकेतुन आव्हान द्यायला जो सांस्कृतीक समाजवाद आकाराला यायला हवा होता त्याला तर केराची टोपली दाखवली.
अण्णा हजारे आणि तत्सम मंडळींनी सामाजीक उत्तरदायीत्वाचं भान असलेलं स्वच्छ राजकीय चारित्र्याचं बीजारोपण करतो म्हटलं तर ते व्यवस्थीत डेव्हलप होण्याअगोदर त्याची फळ ओरपण्याचा हावरटपणा केला दिल्लीकरांनी.
साम्यवादी विचारधारेबाबत तर न बोललेलच. चांगला दिवस उगवला असताना मुद्दाम अंधार करुन दिवे विकायचे धंदे यांचे.
ही सर्व पापं करुन वर सर्वजण संघाला आवर घालण्याची पोपटपंची करायला मोकळे.
म्हणुनच संघाचं फावतं म्हणा.
1 Nov 2025 - 8:22 pm | सुबोध खरे
साम्यवादी विचारधारेबाबत तर न बोललेलच. चांगला दिवस उगवला असताना मुद्दाम अंधार करुन दिवे विकायचे धंदे
ह ह पु वा