जस्सं च्या तस्स राहिल का सारं ?हाक नुसती एकुन थांबेल का वारं?धपाट्याबरोबर मिळतील काआईच्या हातचे पोहे ?रिजल्टवरच्या सहीसहबाबांचा प्रश्न - काय हे ?सहलीच्या आदल्या दिवशीउडालेली झोप,आजीबरोबर लावलेलं
पहिलंवहिलं रोपती दीड रुपया भाड्याची सायकलब्रेकडान्स व मुनवौककरणारा तो मायकलखांद्यावर दिसेल का तीआदिदासची बॅग ?अन मानेला रुतेल का तो नव्याशर्टाचा टॅग ?आवडती छत्री हरवेल का परत ?मोडतील का बेत आल्यावर ठरत ?
शाळेतील मैत्रीण मारेल कापरत हाक ?मिळेल का कधी खिडकीजवळचा बाक ?ऐन सुट्टीत हरवेल कापत्त्यांचा कॅट ?ऑउट झालो कारण चांगलीनव्हती बॅट ?होईल का ब्लॅक अन व्हाईटचा कलर ?पाहिल्यावर एकदम चोरेल का
ती नजर ?आईस्क्रीमची ती टिंग-टिंगऐकुन पळतील का पोरं ?शेंगदाणेवाल्याकडे मिळतीलका बोरं ?जस्सं च्या तस्स राहिल का सारं ?हाक नुसती ऐकुन थांबेल का वारं ?.......................!!पण जस्सं च्या तस्स काही
राहत नाहीथांबवायला गेलो वारं तरवादळ आल्याशिवाय राहत नाहीधपाटा मारण्यासाठी काहोईना पण वाटतंकी आई जवळ हवी होतीअन दरवाज्यातल्यामोटारीपेक्षा वाटतंकी जुनी सायकलच बरी होतीआदिदास असो वा रामदास असो,
आजीच्या हातच्या लोणच्यापुढंसारं काही दास आहेत्यांचीच आठवण येऊन आजमन मात्र उदास आहेआठवणींच्या ह्यासावल्यांकडे मी आजकाल पहात नाहीथांबवायला गेलो वारं तरवादळ आल्याशिवाय राहत नाहीपुर्वी छत्री हरवली होते,
आता छत्रही हरवलं आहे प्रेयसीला लिहिलेलंपहिलंवहिलं पत्रही हरवलं आहेपावसाच्या प्रत्यक थेंबाप्रमाणेतिची छबी नवी होतीनजर चुकवण्यासाठी का होईनापण ती जवळ हवी होतीएरवी मुसळधार पावसातही
चिंब भिजणारा मीआजकाल पावसाच्या वाटेलाहीजात नाहीथांबवायला गेलो वारं तरवादळ आल्याशिवाय राहत नाहीकाळ बदलला.. वेळ बदलली.. देशबदलला... वेष बदललानाती बदलली .. माती बदलली ..तरीसुद्धा ... तरीसुद्धा ..
मन काही प्रवाहाबरोबर वाहत नाही ...खरंच .... थांबवायला गेलो वारंतर वादळ आल्याशिवाय राहत नाही...------------------------------------------कवी : अनामिकस्त्रोतः पुढे ढकललेला विरोप.
प्रतिक्रिया
25 Feb 2008 - 2:26 pm | राजमुद्रा
खूप छान धमालदादा,
कविता वाचून मला शानच्या 'पूरानी जिन्स' या गाण्याची आठवण आली. आणि बर्याच आठवणी जाग्या झाल्या, धन्यवाद!
राजमुद्रा :)
25 Feb 2008 - 2:29 pm | मनस्वी
खूपच छान आहे कविता धमु. लहानपणीचे दिवस आठवले.
मनस्वी
25 Feb 2008 - 3:13 pm | किशोरी
खूपच छान आहे ,अगदी मनातल्या भावना वाटत आहेत !!
25 Feb 2008 - 9:28 pm | प्राजु
खरंच शाळेतले दिवस आठवले.
- (सर्वव्यापी)प्राजु
26 Feb 2008 - 12:52 am | लेले
खर असा काहि वाचला ना की मग ते शाळेतले ते सोन्याचे दिवस आटवतात.
26 Feb 2008 - 2:01 am | llपुण्याचे पेशवेll
लहान असताना कायम वाटायचे लवकर मोठे व्हावे पण आता कायम वाटते परत लहान व्हावे.
:) :)
पुण्याचे पेशवे
27 Feb 2008 - 3:13 am | पिवळा डांबिस
कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही...
27 Feb 2008 - 6:10 am | विसोबा खेचर
शाळेतील मैत्रीण मारेल कापरत हाक ?मिळेल का कधी खिडकीजवळचा बाक ?
धपाटा मारण्यासाठी काहोईना पण वाटतंकी आई जवळ हवी होतीअन दरवाज्यातल्यामोटारीपेक्षा वाटतंकी जुनी सायकलच बरी होती
डोळ्याच्या कडा ओलावल्या रे धमाला!
सुंदर कविता..
त्या अज्ञात कवीला आपला सलाम!
तात्या.
27 Feb 2008 - 10:37 am | धमाल मुलगा
माझ्या ईकडे-तिकडे तो॑ड मारत फिरण्यातून गवसलेल्या ह्या कवितेला आपण इतके छान प्रतिसाद दिलेत त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.-(सद्गदित) ध मा ल.
5 Mar 2008 - 8:34 pm | विवेकवि
नमस्कार साहेब ...........
कविता उत्तम आहे आणि तुम्हीही.........
धन्यवाद......
आपली ........
मिनु जोशी.