माझ्या आयुष्यातील छोटासा भाग चाळीत गेला आहे, त्यामुळेच चाळी बद्धलची आत्मियता अजुनही मनात कुठेतरी घर करुन आहे. गिरगाव मध्ये गेलो तर तिथल्या एका चाळीत आजही जाणे होते.चाळीचा अनुभव, तिथली माणुसकी, तिथला लोकांचा असलेला मनमोकळेपणा हे एक वेगळच जगं आहे. चाळ हा असा अनुभव आहे जो शब्दात देखील व्यक्त करणे मला कठीण आहे.मला चाळ संस्कृतीचा बालपणी आनंद मिळाला याचा मला अधिकचा विशेष आनंद आहे. गच्चीत जाऊन आराम खुर्चीत बसुन निरभ्र आकाश बघण्याचा जो आनंद मला तिथे मिळाला होता, तसाच तो आनंद मला परत कधीच मिळाला नाही...
जशी सवड मिळेल तशी या भागात भर घालत राहीन, आपणही आपली भर जरुर टाका. :)
मदनबाण.....
आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग १०
प्रतिक्रिया
10 Mar 2023 - 10:25 pm | चौथा कोनाडा
सुंदर माहितीपट ! धन्यू फॉर शेअरींग !
सुदैवाने एक - दोन वर्षे चाळीत रहाण्याचा योग आला. तिथं असनार्या हक्काची येणार्या आपुलकीची तुलना कशाशी ही होऊ शकत नाही.
आता सुद्धा फ्लॅटमध्ये राहतोय आणि शेजारी चाळकर्यांसारखेच आहेत. इथेही आदबशीर आपुलकीचा अनुभव येतोय !
कालाय तस्मै नमः
11 Mar 2023 - 10:56 am | चंद्रसूर्यकुमार
दुसर्या महायुध्दात अतोनात रस असल्याने त्याविषयीच्या डॉक्युमेन्टरी मी नेहमी बघत असतो. सध्या सोव्हिएट स्टॉर्म ही डॉक्युमेन्टरी बघत आहे. ही डॉक्युमेन्टरी रशियन टीव्हीसाठी २०११ मध्ये बनविण्यात आली होती. मुळात रशियन भाषेत असलेली ही डॉक्युमेन्टरी इंग्लिशमध्ये डब केली आहे. लेनिनग्राडचा वेढा, स्टालिनग्राड आणि मॉस्कोची लढाई, कुर्स्कची लढाई वगैरे भाग अगदी झपाटल्यासारखे बघितले. एकूण १८ भागात असलेल्या या डॉक्युमेन्टरीचा सध्या ११ वा भाग बघत आहे. पहिला भाग खाली एम्बेड करत आहे.
या विषयावरील सगळ्यात पहिला व्हिडिओ बघितला होता १९४३ मध्ये बनविलेली प्रोपागांडा फिल्म- Why we fight: The Battle of Russia. लेनिनग्राडच्या वेढ्याविषयी पूर्वी वाचले होते पण नुसती पुस्तके वाचून तो किती भयानक प्रकार होता याची कल्पना येत नाही. ती कल्पना व्हिडिओ बघून येते.
12 Mar 2023 - 12:16 pm | मदनबाण
बर्याच काळाने एक सुंदर वेब सिरीज अगदी मन लावुन पाहिली.या वेब सिरीज मधले एकही पात्र उगाचच तिथे आहे असे एकदाही जाणवले नाही. या वेब सिरीज मधील अनेक सीन्स युट्युबवर देखील हीट ठरले आहेत. ही वेब सिरीज पाहताना मी क्षणभर पार भुतकाळात गेलो होतो... मानसिंग पवार, रवी पटवर्धन, माया गुजर अशी काही नावे देखील स्मृतीत आहेत हे लक्षात आले. सरपंच आणि सगळी माणसं गप्पा-टप्पा करत आहेत आणि नंतर माया गुजर उखाणा घेत असं आधुंक आठवल पण ती मराठी मालिका कोणती ते च्यामारी काही आठवेना, आमची माती आमची माणसं असं देखील आठवलं पण नक्की ती मालिका कोणती ते अजुनही आठवत नाहीये. [ कोणाला आठवले तर नक्की सांगा. ]
तर फुलेरा गावातील लोकांची आणि त्यांच्या रोजच्या आयुष्यात घडणार्या घटनांवर आधारीत ही वेबसिरीज प्रचंड लोकप्रिय झाली आणि मी त्यांचे दोन्ही सिझन अगदी मन लावून पाहिले. प्रधानजी ची भूमिका रघुवीर यादव यांनी साकारली आहे, त्यांना पाहिले की नेहमीच भुतकाळातील मुंगेरीलाल के हसीन सपने आठवते.
आता ३र्या सिझनची वाट पाहतोय...
जाता जाता :- देख रहा ना बिनोद, अंग्रेजी बोल बोल के कैसे बात को घुमाया जाता है ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Besuri Me | Extended Version | :- VED
12 Mar 2023 - 3:54 pm | नपा
आमची माती आमची माणसे या मालिकेतील गप्पागोष्टी या सदरात:
'... मानसिंग पवार, रवी पटवर्धन, माया गुजर अशी काही नावे देखील स्मृतीत आहेत हे लक्षात आले. सरपंच आणि सगळी माणसं गप्पा-टप्पा करत आहेत आणि नंतर माया गुजर उखाणा घेत असं आधुंक आठवल पण ती मराठी मालिका कोणती ते च्यामारी काही आठवेना, आमची माती आमची माणसं असं देखील आठवलं पण नक्की ती मालिका कोणती ते अजुनही आठवत नाहीये..."
12 Mar 2023 - 6:14 pm | मदनबाण
@नपा
विशेष आभार _/\_
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Besuri Me | Extended Version | :- VED
12 Mar 2023 - 5:04 pm | चित्रगुप्त
नितीन चंद्रकांत देसाई यांची दोन भागातील मुलाखत (रंगा येई वो)
12 Mar 2023 - 6:24 pm | मदनबाण
@ चंद्रसूर्यकुमार
Why we fight अर्धी पाहली आहे, वेळ मिळताच बाकीचा भाग देखील पाहेन.
@चित्रगुप्त
तुम्ही दिलेल्या मुलाखती नक्की पाहिन, या निमित्त्याने मी दोन भन्नाट मुलाखती पाहिल्या होत्या त्या इथे देऊन जातो.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Besuri Me | Extended Version | :- VED
12 Mar 2023 - 11:15 pm | अक्षय देपोलकर
2008 च्या मंदी वेळी आणि त्याच्या आधी झालेल्या घटना असलेला चित्रपट..
प्राईमवर आहे, आर्थिक आणि शेअर मार्केट मध्ये रस असलेल्यांनी जरूर बघावा
13 Mar 2023 - 6:04 am | चौकस२१२
चाळी वरून आठवले "चाळ नावाची वाचाळ वस्ती" चे भाग कुठे आहेत का ? चंदू पारखी , उषा नाडकर्णी वैगरे कलाकार होते
सद्या बघण्यासारखी माईक म्हणजे "पोस्ट ऑफिस उघडे आहे "
त्यातील नातंच संच हा महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील आहे , मला तरी महा हास्य जत्रा फारच बसखल वाटते म्हणून हि नाव मालिका बघू नये असे सुरवातीला वाटले परंतु प्रत्यक्ष बघून आवडली, जरी मकरंद अनासपुरेंच्या त्यांच इतर कामातून काही लकबी वारंवार कंटाळवाण्या होत असतात पण यातील गुळस्कर हि व्यक्तिरेखा र्त्यांनी अप्रतिम उभी केली आहे बाकी हि ठीक, लेखकाने छान लिहुले आहे , सगळेच इरसाल .. नास्ता नक्की बघा
14 Mar 2023 - 1:17 am | NiluMP
Black Mirror on Netflix : Future Technology and it adv and dis advantage.
14 Mar 2023 - 1:40 am | NiluMP
Netflix : Indian Predator: Murder In A Courtroom
14 Mar 2023 - 8:44 am | कुमार१
गोल्ड
मूळ मल्याळम. हिंदी आवृत्ती प्राईमवर पाहिली.
हलका फुलका छान वाटला. माणसाची सोन्याची हाव आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या गमतीजमती आवडल्या.
प्रमुख भूमिकेत पृथ्वीराज सुकुमारन. उत्तम !
19 Mar 2023 - 7:18 pm | कुमार१
जातिव्यवस्थेवरील भेदक भाष्य. शेवटपर्यंत वास्तवदर्शी.
नवे कलाकार असूनही अतिशय उत्कृष्ट कामगिरी
लहान मुलांच्या भूमिकाही उत्तम.
19 Mar 2023 - 7:19 pm | कुमार१
https://www.youtube.com/watch?app=desktop&v=y4CBUDfmB5A
25 Mar 2023 - 7:31 pm | मदनबाण
मध्यंतरी पाहिलेल्या २ वेब सरिज आज इथे सांगतो.
याच बरोबर Breathe: Into The Shadows सिझन २ रा देखील पाहिला. आय लव्ह नित्या मेनन ! ;) सुंदर दिसली आहेच पण अभिनय देखील सुंदर केला आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Badshah - Sajna | Say Yes To The Dress (Official Video) | Payal Dev
25 Mar 2023 - 7:36 pm | कुमार१
युट्युबवर वसंत कानेटकरांचे बेईमान हे नाटक तीन भागांमध्ये आलेले आहे. छान आहे.
प्र भू.
गिरीश ओक किरण करमरकर आणि आसावरी जोशी
हे नाटक बेकेट या फ्रेंच नाटकावर आधारित आहे.
तिसरा अंक तर अप्रतिम.
उत्कर्ष बिंदू अगदी सुरेख.
27 Mar 2023 - 12:39 am | पर्णिका
All Quiet on the Western Front पाहिला (नेफि). माझी मुलं वर्ल्ड वॉर्सवर आधारित चित्रपट, माहितीपट आवर्जून पाहतात. तसेच या चित्रपटाला यावर्षीचे ऑस्कर नॉमिनेशन असल्यामुळे बघायचा होताच. आवडला असे म्हणू शकत नाही, मात्र अतिशय परिणामकारक चित्रपट आहे हे नक्की ! युद्धाचा खरा चेहरा किती भयानक असतो, याचे अगदी वास्तव दर्शन घडवतो. Dunkirk, 1917 या चित्रपटांप्रमाणे हासुद्धा बरेच दिवस मनात रेंगाळत राहतो.
6 Apr 2023 - 2:56 am | चित्रगुप्त
7 May 2023 - 9:29 am | कुमार१
कृष्णधवल. खुनाचा न्यायालयीन खटला. न्यायसंस्थेच्या मर्यादा. मृत्युदंडाची शिक्षा असू नये यावर न्यायाधीशाच्या भूमिकेतील अशोककुमार यांचे छोटेसे भाषण.
चित्रपटात एकही गाणे नाही असे ऐकले होते म्हणून मुद्दाम पाहिला.
परंतु दोन नृत्यसंगीते आहेत.
10 Aug 2023 - 8:02 pm | मदनबाण
एकंदर, इतक्या काळात घेतलेल्या मेहनतीवर बोळा फिरवला गेलेला दिसतोय !
असो...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Imagine Dragons - Bones (Official Music Video)
12 Nov 2023 - 9:39 am | मदनबाण
हा चित्रपट काल पाहिला. खरंतर धनुष आणि नित्या मेनन यांचे Thaai Kelavi हे गाणं माझ्या पाहण्यात आलं होतं आणि त्यात नित्याचा सहज सुंदर अभिनय पाहुन हा चित्रपट पहावासा वाटला ! :) कुठलीही फालतू सर्कस नसलेला हा एक सुंदर चित्रपट आहे,एकदा नक्कीच पाहु शकता.
जाता जाता :- नित्या प्रत्येक फ्रेम मध्ये सुंदर दिसली आहे !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Thenmozhi - Official Video Song | Thiruchitrambalam | Dhanush | Anirudh | Sun Pictures
28 Nov 2023 - 7:51 pm | कुमार१
https://youtu.be/mhCne1iWWvY?si=TYZ17EUgUVNi-o2U
सध्याचे लग्न जुळवण्याचे टप्पे ...
सुरेख !
29 Nov 2023 - 5:44 pm | Bhakti
द वैक्सीन वॉर
भारतात विज्ञानावर आधारित खुप कमी सिनेमे बनतात.हा सिनेमा आवडला आहे.अगदीच पाच तारे देण्याइतपत नाही पण विविध भागात याची मांडणी , प्रोटोकॉल आधारित कथा त्यामुळे आवडला.
9 Dec 2023 - 10:52 am | मदनबाण
गेल्या काही काळा पासुन मी 4K कंटेट कन्झुम करायला लागलो आहे. बरचंस कंटेट अर्थातच यूट्युबवरच आहे, परंतु ते बर्याचश्या प्रमाणात निसर्ग,शहरं आणि ड्रोन फुटेज असते. तुमच्या पैकी कोणी 4K कंटेट कन्झुम करत असेल आणि यूट्युबवर कोणेते इतर 4K प्रकारचे पर्याय पाहण्यास उपलब्ध असतील ते नक्की सांगा.
---
--
-
जेलर :-
बर्याच प्रदीर्घ काळाने मी रजनीकांत यांचा चित्रपट पाहिला आणि तो म्हणजे "जेलर" ! या वयातही त्यांची जादू कायम आहे. सबकुछ रजनीकांत असा चित्रपट असल्याने त्याची एक वेगळी मजा आहे. तम्मना चा कॅमिओ असुन एक गाणं आणि २/४ दृष्यात ती दिसते. चित्रपट फुल टु टाईमपास असुन तुम्हाला जर काय पहायचे ? असं सुचतं नसेल तर हा चित्रपट नक्क्कीच ट्राय करु शकता. :)
आर्या :-
आर्या चा ताजा सिझन पाहिला आहे. पहिल्या सिझनची मजा आता या सिरीज मध्ये उरलेली नाही, तसेच सुष्मिता सेनचा पहिल्या सिझन मधला लुक,फिल आणि अभिनय या सिझन मध्ये अजिबात जाणवला नाही. या सिझन मध्ये ती पहिल्या सिझन पेक्षा फार वयस्क आणि सुजलेला चेहरा असलेली मला वाटली.
स्कॅम २००३ :- द तेलगी स्टोरी :-
स्कॅम च्या या सिझन मध्ये अब्दुल करीम तेलगी आणि त्याच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याची कथा दाखवलेली आहे ! अगदी तेलगी सारखाच चेहरा पट्टी असणारा अभिनेता मिळवण्यात या मालिकेला यश आलेले आहेत.खर्या तेलगी ने नार्को टेस्ट मध्ये शरद पवार आणि छगन भुजबळ यांचे नाव घेतले होते.
असो...
घोडचूक :- "वाळवी" नावाचा मराठी चित्रपट पाहण्याची घोडचूक मी केलेली आहे, पाव चित्रपट ठीक आहे नंतर तद्दन कचरा !
जाता जाता :- कोणी Kaathu Vaakula Rendu Kadhal म्हणजेच KRK पाहिला आहे का ? असेल तर पाहण्या सारखा आहे का ? याचे Dippam Dappam गाणं आवडल्याने हा चित्रपट पहावा का ? या विचारात आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- JAILER - Kaavaalaa Video Song | Superstar Rajinikanth | Sun Pictures | Anirudh | Nelson | Tamannaah
11 Dec 2023 - 4:39 pm | पक्षी
सध्या मी यूट्यूबवर abhi and Niyu ह्यांचे व्हिडिओ बघतो आहे. अतिशय माहितीपूर्वक असतात ह्यांचे विडिओ. खूप मेहनत घेऊन आणि विचार पूर्वक बनवतात विडिओ. राजकारण, खेळ, AI , चालू घडामोडी. ह्यांचा विषयाचा अवाका खूप मोठा आहे.
दुसरा content creator म्हणजे Dhruv Rathi. ह्याचे पण व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असतात.
ह्या दोघांच्या विडिओ मध्ये मला तरी कुठल्याही प्रकारचा पक्षपातीपणा, उथळपणा जाणवला नाही.
13 Dec 2023 - 9:37 pm | मदनबाण
वरती 4K कंटेंट चा उल्लेख केला आहे त्यामुळे त्याचे एक सुरेख उदाहरण द्यायचा मोह टाळता येत नाहीये ! :)
THE RISE OF HANUMAN | Official TEASER 2023 | First Look | The Untold Story |Jai Shri Ram
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Fly Project - Toca Toca | Official Music Video
15 Dec 2023 - 8:42 am | Bhakti
बिंज वॉचिंग.
लेक तीन दिवस गावाला गेली होती,बजावून गेली एंजॉय करू नका(खडूस सासू होणार आहे ती ;))
तरीही ओटीटीवर खुप सिनेमा पाहिले.
१.खडक सिंग
पंकज त्रिपाठी एक जेम आहेच,पण त्याच्याबरोबर इतर कलाकार विशेष करून त्याच्या मुलीचा रोल करणारी आवडली.सतत फ्लॅशबॅक मध्ये फिरणारी तरी योग्य गती असणारा गूढ सोडवणारा सिनेमा आहे.
२.हर हर महादेव
आता कुठे मला जरा इतिहास समजू लागल्यामुळे ऐतिहासिक सिनेमे, शिवरायांवर आधारित आवडतात.बरचश्या अतिशयोक्ती सोडून ऐतिहासिक व्यक्तींची ओळख ,कार्य अल्प समजते.
३.गदर-२
पहिल्याच सीनमध्ये नगरचं टंन्क म्युझियम पाहून उत्साह वाटला (याचं जवळपास जास्त शुटिंग नगर मिलिटरी भागात झालंय)पण नंतर जे काही गाण्यांची रांग सुरू झाली विचारूच नका, चांगला पळवला सिनेमा,बरेचदा हसू आवरत नव्हतं.तो बोरवेल उखडणार तो प्रसंग पाहून तर प्रचंड हसले.अशाप्रकारे एक तास वाया घालवला.
४.बरीड सीड-Buried Seed
भारतीय अमेरिकन शेफ विकास खन्ना यांच्यावर आधारित डॉक्युमेंटरी ज्यात भारतातून अमेरिकेत जाण्यापर्यतचा प्रवास आहे.पण अमेरिकेत स्थिरावतांना त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला.नैशनल जिओग्राफीने अतिशय सुंदर पद्धतीने सिनेमाटोग्राफी वापरत ही बनविली आहे.
५.Star Chef Kristen Kish Hosts ‘Restaurants At The End Of The World’
यातला पहिला भाग पनामाचा पाहिला , खुप छान आहे.जगातले अगदी दुर्गम तरी गुणवत्ता पूर्ण होटेल कशाप्रकारे उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती वापरून नंदनवन फुलवतात याचा रोचक प्रवास
-भक्ती
15 Dec 2023 - 9:52 am | Bhakti
ते १.कडक सिंग असं आहे.
16 Dec 2023 - 3:23 am | पर्णिका
' धक धक' हा हिंदी चित्रपट पाहिला. अत्यंत सुंदर कल्पना, भरपूर पोटेन्शिअल असलेली कथा यांमुळे हा चित्रपट कितीतरी चांगला होऊ शकला असता, पण चित्रपट अति अति निराश करतो. अरे किमान डोळयांचे पारणे फेडणाऱ्या लडाख आणि खरदुंग ला पास येथील निसर्गाच्या फ्रेम्स तरी दाखवा ना... पण तेही नाही.
चार वेगळ्या वयोगटाच्या, वेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेल्या स्त्रिया... पण कुणाचीच गोष्ट प्रभाव पाडत नाही, हा दिग्दर्शकाचा, पटकथा/संवाद लेखक यांचा दोष आहे. चित्रपट संपल्यावर एखादे कॅरेक्टर, दृश्य असे काहीच लक्षांत राहत नाही. रत्ना पाठक शाहसारखी उत्तम अभिनेत्रीही हा चित्रपट तारू शकली नाही.
एक उदाहरण देते, किती मूर्खपणा असावा!
स्पॉईलर अलर्ट :
चार जणींच्या या टीममधील एकजण अत्यंत क्रिटिकल अवस्थेत हॉस्पिटलाईज्ड आहे. तिला ऑक्सिजन सिलेंडर त्वरित मिळणे ही गरज आहे. दोघी जणी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करून ते मिळवतात ही... तेव्हढ्यांत एकीला पोलिस पकडून घेऊन जातात, पण हेल्थ इमर्जन्सी असूनही तो पोलिस इन्स्पेक्टर एखाद्या हवालदाराकडून ऑक्सिजन सिलेंडर हॉस्पिटलमध्ये पाठवत नाही. दुसरीचा तर याहून अजब किस्सा, ती तिच्या गुरूंच्या आश्रमांत जाते आणि तिथे सहज उपलब्ध असलेले ऑक्सिजन सिलेंडर घेते, ( गुरुमैय्याला फोन करून कुणाबरोबर तरी ते सिलेंडर पाठवून दे असे सांगू शकली असती, आश्रम एकदम पॉश आहे ) पण ऐनवेळी तिच्या घरचे येऊन तिला तू आता कुठेही जायचे नाही, उद्या सकाळी घरी परतायचे असे सांगतात. पुन्हा तेच, आश्रमात अनेक गाड्या असून, अनेक शिष्य असून कोणीही सिलेंडर घेऊन जात नाही. तोपर्यंत तिसरी दिल्ली एअरपोर्टला पोहोचलेली असते, मग या तिघीही एकाच वेळी आपापला ऑक्सिजन सिलेंडर घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. (काळ-वेळेचे गणित तुम्हीच करा.) माझे डोकं बधिर झालं होतं.
16 Dec 2023 - 2:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हिंदीतलं बै पण भारी स्वरुप आहे का ? नेटफ्लिक्सवर दिसतोय. चार महिला देशभर भटकंतीला निघालेल्या दिसल्या. बघू की नको ?
-दिलीप बिरुटे
17 Dec 2023 - 6:22 am | पर्णिका
एकदा(च) बघायला हरकत नाही, वेळ असेल तर! वाटल्यास पळवत पळवत पहा. एक गाणं मात्र मला आवडले. आम्हीपण नेटफ्लिक्सवरच बघितला.
संकल्पना सुरेखच आहे, पण प्रभावी झाली नाही असे माझे अन माझ्या नवऱ्याचेही मत आहे. नंतर उतारा म्हणून आम्ही साधारण त्याच मार्गाच्या आसपास चित्रित झालेले ' बहती हवा सा था वो...' हे गाणे पाहिले. :)
नायबा... बै पण, झिम्मा... असे चित्रपट पाहायचे धाडस आजवर केलेले नाही, त्यामुळे नाही सांगू शकत. :)
31 Dec 2023 - 6:52 pm | कुमार१
गोष्ट एका पैठणीची
युट्युब वर पाहिला. छान भावनिक नाट्य.
सायली संजीव, सुव्रत जोशी उत्तम .
6 Jan 2024 - 5:15 am | पर्णिका
12th Fail पहिला. अतिशय सुरेख चित्रपट आहे. सत्यकथेवर आधारित आहे, हे कळल्यावर तर कणभर अधिकच आवडला.
विधु विनोद चोप्राने कमाल दिग्दर्शन केले आहे. पात्र निवड, संवाद, पटकथा सर्व भट्टीच मस्त जमली आहे.
कणखर तितकीच प्रेमळ आजी, आई,भाऊ, बहीण यांचा सपोर्ट, मनोज-श्रद्धा यांचे प्रगल्भ प्रेम, नि:स्वार्थपणे मदत करणारी मित्रमंडळी हे सर्वजण चित्रपट संपल्यावरही लक्षांत राहतात.
विक्रांत मेसी अक्षरश: जगलाय ही भूमिका ! श्रद्धाने परत जायला सांगितल्यावर मनोज जेव्हा आपल्या घरी परत जातो, तेव्हाचा त्याचा आणि त्याच्या आईचा प्रसंग फारच हृद्य झालाय ! आणि इंटरव्ह्यूच्या निकालानंतरच्या प्रसंगाबद्दल तर काय लिहू ? संपूर्ण चित्रपटातील हे दोन प्रसंग मला फारच आवडले.
लोकहो, हा चित्रपट जरूर बघा. Disney-Hulu वर उपलब्ध आहे.
8 Jan 2024 - 11:34 pm | राघवेंद्र
नेटफ्लिक्स वर Fool Me Once सिरीज विकांताला पाहिली. सस्पेन्स मस्त आहे
10 Jan 2024 - 10:52 am | Bhakti
12th Fail (ट्वेल्थ फेल)काल संध्याकाळी वेळ होता तेव्हा लेकीसोबत पाहिला.खुपच अप्रतिम झालाय सिनेमा.
एकदा रिक्षाची वाट पाहत असताना आम्ही भारती विद्यापीठ समोर उभे होते.
तेव्हा मी तिला सहज म्हटलं होतं की"इथे मी डॉक्टर होण्यासाठी एक प्रवेश परीक्षा द्यायला आले होते." तिने विचारले,"मग तू का झाली नाही डॉक्टर?".माझ्या आतल्या मनाने तिला खरं सांगून टाकलं "अग ,मी नापास झाले ना".
तेव्हापासून 'नापास' शब्द तिच्या डोक्यात आणि ही संकल्पना की नापास झाल्यावर जे व्हायचं आहे ते होता येत नाही ही बसली बहुतेक.कारण अनेकदा ती मला तू नापास झाली होती ना असं विचारायची ;).
पण कालचा सिनेमा तिने खूप मन लावून पाहिला.युपीएससी काय ? त्यासाठी घर सोडावं लागतं का?मग बसमध्ये एकटी असताना माझीही बैग चोरीला जाईल का? (कारण मी पुण्यात पहिल्यांदा एकटी गेले तेव्हा माझीही पर्स चोरीला गेली होती,हे मी तिला सांगितले होतं :))
हा नापास झाला?आता पोलीस बनणार नाही ना?याची मुलाखत झाली नाही?म्हणजे तो परत नापास झाला?असे अनेक प्रश्न तिचे होते.
पण अखेर तो आयपीएस होतो.नापास होऊनही त्याला जे व्हायचं ते तो होतो हे तिच्या लक्षात आलं.
आणि आता ती 'नापास' यालाही सकारात्मक घेऊ लागेल नक्कीच!शेवटच्या प्रसंगातील नाट्य पाहतांना माझ्या लेकीच्या चेहर्यावरचा आनंद मला मोबाईलमध्ये टिपून घ्यावा वाटतं होता!
उत्कृष्ट सिनेमा.
13 Jan 2024 - 11:17 am | कुमार१
१. 2023 च्या मॅजेस्टिक गप्पा बऱ्याच उपलब्ध आहेत. त्यापैकी परेश मोकाशी आणि बायको, अनंत सामंत, लग्नसंस्थेवरील तीन स्त्रियांच्या मुलाखती हे सर्व पाहिले आणि आवडले.
२. वाळवी : पाहिला, आवडला. एक तास वीस मिनिटात गतिमान बसवला आहे.
24 Jan 2024 - 8:43 am | कुमार१
एक चांगला मराठी रहस्यपट
रचना
शरद पोंक्षे, ऋचा आपटे दोघांचेही काम उत्तम.
28 Jan 2024 - 10:49 am | सौन्दर्य
चित्रपट अतिशय सुंदर व उत्कंठावर्धक आहे.
मात्र खोलात जाऊन विचार केल्यास त्यात काही त्रुटी जाणवतात. तरी देखील पाहण्यासाठी चांगलाच.
28 Jan 2024 - 12:33 pm | कुमार१
होय.
त्यातली एक गंमत :
इंग्लिश उपशीर्षकांमध्ये एक ‘ध चा ‘मा’ असा प्रकार झाल्याने शब्दाचा अर्थ पार बदलून गेला !
वरील रहस्यपटात कारच्या अपघाताची चौकशी चालू आहे.
त्यात w(ipers) ऐवजी v(ipers) असे झाल्याने वायपर्सचे साप होऊन बसले. :)
29 Jan 2024 - 9:28 pm | सौन्दर्य
सिनेमा मराठीत असल्याने सब टायटल्सकडे फारसे लक्ष दिले गेले नाही.
ह्याला 'अनुवाद करणाऱ्याच्या डुलक्या' असे म्हणता येईल.
26 Jan 2024 - 9:04 pm | Bhakti
Where the Crawdads Sing
थोरोचं वॉल्डनकाठी विचार-विहार वाचलं असेल ,तर नदीकाठाचा एकांतवास, निसर्गाची साथ,ऋतूंचे बदल अनुभवायचं सुख अशा वेळेस ओसांडत असतं हे उमगले असेलच.पण हाच नदीकाठ ,लादलेला एकांतवास आणि त्यातून एक जग उभं राहतं मार्श गर्लचं-काया हिचं.
काया या चिमुरडीच्या नशीबातलं आईचं प्रेम दूरावतं आणि बाकीचं कुटुंबही तिला सोडून जातं.चिमुरडी पडत धडपडत शिंपले विकत जगायला शिकते.जगापासून तुटते पण जंगलाच्या पक्षांच्या जगाला जोडली जाते.माणसांपासून दूर दूर राहणाऱ्या कायाला जगात केटची मैत्री मिळते.एक जंगलातील जीवन ,पक्षी यांच्याकडे पाहण्याची संशोधक वृत्ती तिला तो देतो आणि प्रेमही देतो.पण काया बाहेरच्या जगात कधीच रूजणार नाही हे समजून तोही तिला सोडतो.कियाला लवकरच भेटू सांगतो,किया पहिल्यांदा आनंदाने सजते प्रियकरासाठी पण तो येतच नाही.सगळे सोडून जाण्यासाठीच आयुष्यात येतात हे तिला खरं वाटू लागते.
घर वाचवण्यासाठी पैशांची तरदूत करतांना तिला वन्यजीवनावर पुस्तक लिहिण्याचा टेटचा सल्ला अवलंबवा लागतो.आयुष्यात स्वनिर्मित यशाची गोड चव चाखतांना कायाला एक नवं क्षितीज खुलं होतं
आयुष्यात परत दुसरं प्रेम येतं,पण ते एका कटू वाटेवर घेऊन जाते.
त्या कटू वाटेतले काटे कसे दूर करून मार्श गर्ल जीवन एक सुरेल गाणं कसं करते..याचा हा नितांत सुंदर सिनेमा आहे.
यातल्या कायाच काम करणाऱ्या गुणी अभिनेत्रीचे कौतुक करावे तेवढं कमीच आहे.
एका बेस्टसेलर पुस्तकावर आधारित फिक्शनल २०२२ मधला सिनेमा आहे.
-भक्ती
ओटीटी -सोनी लिव,नेटफ्लिक्स,यू-ट्यूब
30 Jan 2024 - 10:55 am | Bhakti
Samबहादूर!
२६ जानेवारीला झी५ वर पाहिला.प्रचंड आवडला.कमाल होते 'सैम हॉरमुसजी फेमजी जमशेदजी मानेकशॉ'.हाडाचे सैनिक होते.जागतिक महायुद्ध ते १९४७ काश्मिरची परिस्थिती हाताळणे ते१९७१ पाक-बांगलादेश चे युद्ध यशस्वी सांभाळणारे पहिले फील्ड मार्शल ते होते.थिअटरला हा सिनेमा पाहिला पाहिजे होता.विकी कौशलने अप्रतिम काम केल आहे.
31 Jan 2024 - 9:18 pm | कुमार१
सुंदर मराठी लघुपट
अमृता सुभाष उत्तम !
नेटका व तरल..
3 Feb 2024 - 1:03 pm | नगरी
बकेट लिस्ट अप्रीतीम,
माझ्या आवडीचे मोर्गन फ्रीमन , jack nicholson दोघे दादा actor.
3 Feb 2024 - 7:59 pm | मदनबाण
The Railway Men | Official Trailer | Netflix India
The Railway Men ही वेब सिरीज पाहिली, चांगली आहे. के.के मेनन असल्या मुळेच ही वेब सिरीज पाहिली.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- M.I.A - Time Traveller (Lyrics)
4 Feb 2024 - 8:07 pm | Bhakti
स्पायडर मैन -नो वे होम
समांतर जगातून ते वेगवेगळे व्हिलन आणि तीनही पीटर पार्कर एकत्रित आल्यावर उडालेल्या गोंधळाचा सिनेमा आहे.पीटर पार्कर चा पीटर की स्पायडर हा दुभंग झाल्यावर सगळ्यांनी पाटी कोरी करावी असं डॉ.स्ट्रेंजला विनंती करतो.ते तसं करतांना वेळोवेळी त्यांना संभ्रमात पीटर टाकत असतो.एका क्षणी तो मी व्हिलनला यांना सुधारतो मगच घरी म्हणजे होमला पाठवतो असं तो ठरवतो तेव्हा साऊथचा वा बोलीवूडचा कैवारी हिरो ह्यांच्या अंगात घुसला काय असं समजून कपाळावर हात मारला ;).
बाबारे दूर्योधनालाही खुप संधी मिळाल्या पण तो सुधारला नाही अशाप्रकारे डॉ.स्ट्रेंज समजवू शकले असते:).स्ट्रेंजलाच गायब करत प्लांट वाढवला दिसतो.ते उरलेले करण अर्जून (स्पायडर) खुप उशीरा येतात.पण आल्यावर कसं तरी मारून थोपटून व्हिलन लोक माणसं होतं आपापल्या घरी जातात.पण स्पाडरचा -पीटरचा दुभंग लोक विसरतात .परत पाटी कोरी करत पीटर पार्कर मोकळा श्वास घेत घरी पोहचतो.मी घरीच ओटीटीवर सिनेमा पाहिल्याने आय हॅड वे टू होम ;)
5 Feb 2024 - 10:04 am | अमरेंद्र बाहुबली
डाॅ. स्ट्रेंजचा आताच आलेला एक सिनेमा पाहीला होता, तेव्हापासून असल्या सिनेमांच्या नादी न लागण्याची शपथ खाल्लीय.
7 Feb 2024 - 8:59 pm | Bhakti
'सीक्रेट्स ऑफ द बुद्धा रेलिक्स'
डिस्कवरी वर मनोज वाजपेयी सुत्रसंचलित डोक्युमेंटरी आहे . वयाच्या ८० व्या वर्षानंतर बुद्धांच्या महापरिनिर्वाणाचा प्रवास नंतर त्यांच्या अस्थी,राख हे कसे विविध राजांकडे सात स्तूपात ठेवले .अशोकाने यासाठी ८४,००० स्तूप खरच बांधले असतील का? यापैकी किती स्तूप भारतात आहेत या प्रश्नांचा विचार केला आहे.
21 Mar 2024 - 11:54 am | कुमार१
१. लघुपट
दोन तास
"दोन तास बाई हवी" असे म्हणून एक कामगार एका वेश्येला घरी नेतो आणि पुढे घडते..... एक हृदयस्पर्शी कलाटणी
उत्तम !
..
२. कृतांत चित्रपट
संदीप कुलकर्णी,युयोग गोर्हे,
मनुष्याला कुटुंबासाठी तर सोडा स्वत:साठी देखील वेळ नाही. अशात जेव्हा अंतर्मनात डोकावण्याची वेळ येते तेव्हा काय घडतं हे दर्शवणारा हा चित्रपट.
आवडला.
21 Mar 2024 - 11:54 am | कुमार१
,युयोग >>>> सुयोग हवे.
26 Mar 2024 - 9:59 pm | Bhakti
भ्रमयुगम्.. मल्याळम हिंदी डब्ड पाहिला.काल पौर्णिमा त्यात रात्री १२ वाजेपर्यंत दातखीळ बसू पर्यंत हा थोडासा भयपट सिनेमा पाहिला.तुंबाडची आठवण आली,पण तुंबाड इतका भारी नाहीये.पूर्णपणे कृष्णधवल असल्याने जास्त भयकारक वाटतो.
30 Mar 2024 - 10:14 am | मदनबाण
आर्या चा शेवटचा सिझन पाहुन ही वेब सिरीज एकदाची पाहुन संपवली ! होय, संपवली कारण ती पाहण्याचा रस उरलाच नव्हता !
प्रार्थना बेहेरेचा मस्का पाहिला... म्हणजे तीची प्रमुख भुमिका असलेला मस्का चित्रपट ! कथा चांगली वाटली, या चित्रपटाचा दुसरा भाग अजुन आला नाहीये याचे नवल वाटले !
THREE THOUSAND YEARS OF LONGING हा जरा वेगळा चित्रपट पाहिला ! कथा ज्या प्रमाणे उलघडुन सांगितली आहे ते आवडले, विशेष म्हणजे या चित्रपटातील संवाद मला आवडले ! एखाद दुसरे नग्न दृष्य आहे ते सोडुन चित्रपट ठीक ठाक वाटला.
चक्क Pulp Fiction पाहिला ! [ डाऊनलोड मारुन बराच काळ पडुन होता, पाहु की नको या विचारात बराच काळ दुर्लक्ष करुन पडीक ठेवला होता.]
The Dictator बद्धल खूप ऐकलेले होते, तो देखील पाहिला.
माझी लईच फेव्हरेट असलेल्या नित्या मेननची Kumari Srimathi ही वेब सिरीज पाहिली ! :) अगदी गोंडस हापूस हो ! :))) वेब सिरीज ठीक-ठाक आहे, हापूस च्या आपलं Kumari Srimathi च्या पुढच्या सिझनची वाट पाहणे आले ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rema, Selena Gomez - Calm Down (Official Music Video)
10 Apr 2024 - 12:01 pm | कुमार१
बात पते की
एकटेपणाची समस्या . . . त्यावर शोधलेली युक्ती आणि आलेले अनुभव . . . सुरेख शेवट !
16 Apr 2024 - 7:48 pm | कुमार१
सापळा
सुंदर मराठी रहस्यपट + भयपट
समीर धर्माधिकारी आणि चिन्मय मांडलेकर यांची जुगलबंदी उत्तम !
28 Apr 2024 - 9:29 am | कुमार१
Of human bondage (१९२४)
सॉमरसेट मॉम यांच्या “ऑफ ह्यूमन बाँडेज” या साडेसहाशे पानांच्या बृहदकादंबरीवर आधारित. 1980 च्या दशकात मी ही कादंबरी संपूर्ण वाचली होती. ती आत्मचरित्रात्मक आहे.
तिचा आवाका खूप मोठा असून तो एक तास वीस मिनिटाच्या चित्रपटात बसवणे तसे अवघडच होते. तरी पण त्या कालानुरूप एकंदरीत ठीक वाटला.
Bette Davis या गाजलेल्या अभिनेत्रींनी त्यात नायकाच्या प्रेयसीची भूमिका केली आहे.