क्रिकेट - २

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in क्रिडा जगत
5 Jan 2017 - 2:11 pm

मिपाच्या नवीन आरेखनात क्रिकेटचा पहिला धागा अदृश्य झाला आहे. तो धागा शोधून त्यात प्रतिसाद लिहिला तरी मुख्य पानावर किंवा नंतरच्या पानांवर तो धागा दिसतच नाही. त्यामुळे हा नवीन धागा सुरू करीत आहे.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

5 Sep 2021 - 11:52 pm | श्रीगुरुजी

दिवसाखेर इंग्लंड ७७/०. विजयासाठी उद्या ९० षटकांत २९१ धावा हव्या.

गुल्लू दादा's picture

6 Sep 2021 - 4:35 pm | गुल्लू दादा

जे काम भल्या-भल्यांना जमत नाही ते काम ठाकूर अंकल करून जातात.

श्रीगुरुजी's picture

6 Sep 2021 - 6:56 pm | श्रीगुरुजी

इंग्लंड १४९/६. अजून ५३ षटके शिल्लक आहेत.

गुल्लू दादा's picture

6 Sep 2021 - 7:54 pm | गुल्लू दादा

'जो' ला 'रुटा'तून उपटले आहे.

श्रीगुरुजी's picture

6 Sep 2021 - 8:14 pm | श्रीगुरुजी

१९३/८.

चहापान.

अजून ३७.५ षटके शिल्लक आहेत.

गुल्लू दादा's picture

6 Sep 2021 - 9:09 pm | गुल्लू दादा

अभिनंदन.

गामा पैलवान's picture

6 Sep 2021 - 9:17 pm | गामा पैलवान

गेल्या कसोटीतल्या सर्वबाद ७८ नंतर व चालू कसोटीतल्या १०० धावांच्या पिछाडीनंतर जी विजयी मजल मारलीये त्याबद्दल कोहली व कोहलीसेनेचे मनापासून अभिनंदन.
-गा.पै.

लोकहो,

नॉटिंग(ह)म येथल्या पहिल्या कसोटीत भारतास शेवटच्या दिवशी जिंकावयास केवळ १५७ धावा हव्या होत्या व ९ गाडी बाकी होते. इंग्लिश पावसाने एक चेंडूही टाकू दिला नाही व भारताचा विजय हिरावला गेला.

मात्र लंडनच्या चौथ्या कसोटीत नेमक्या तितक्याच म्हणजे १५७ धावांनी इंग्लंडचा पराभव झाला. जणू इंग्लिश हवेने भारतीय संघावर प्रसन्न होऊन एकदा नाकारलेली भेट परत दिली.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

10 Sep 2021 - 6:13 pm | श्रीगुरुजी

चिनी विषाणू संसर्गाच्या भीतिने आजपासून सुरू होणारा ५ वा कसोटी सामना रद्द झाला आहे.

श्री's picture

11 Sep 2021 - 9:39 am | श्री

आय पी एल साठी शेवटच्या कसोटीचा बळी दिला

श्रीगुरुजी's picture

11 Sep 2021 - 9:48 am | श्रीगुरुजी

असंच दिसतंय. चिनी विषाणूचा संसर्ग नको म्हणून ५ वा कसोटी सामना रद्द केला. पण १९ तारखेपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत हा धोका दिसत नाही.

श्रीगुरुजी's picture

13 Oct 2021 - 11:22 pm | श्रीगुरुजी

आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना कलकत्ता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शुक्रवारी १५ ऑक्टोबरला सायंकाळी ७:३० वाजता खेळला जाईल.

श्रीगुरुजी's picture

16 Oct 2021 - 5:36 pm | श्रीगुरुजी

शेवटी चेन्नई जिंकले. कलकत्त्याने अत्यंत वाईट गोलंदाजी केली व फलंदाजी करताना दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतक करून भक्कम सुरूवात देऊनही पुढचे सगळे फाफलले. नितीश राणा, कार्तिक, मॉर्गन, शाकिब, त्रिपाठी हे सर्वजण पूर्ण अपयशी झाले.

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2021 - 10:14 pm | श्रीगुरुजी

कालपासून ट-२० विश्वचषक स्पर्धा सुरू झाली. काल ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा व इंग्लंडने वेस्ट इंडीजचा पराभव केला.

आज श्रीलंकेने बांगलादेशाचा पराभव केला.

आता भारत-पाकिस्तान सामना सुरू आहे. भारत पराभवाच्या मार्गावर आहे.

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2021 - 11:21 pm | श्रीगुरुजी

भारत १५१/७ (२०)
पाकडे १५२/० (१७.५)

अत्यंत वाईट पद्धतीने हरलो. अतिशय सुमार गोलंदाजी.

अबब!हरलो ,मी पाहत नव्हते सामना .पण फारच उदो उदो चालला होता टीमचा !अति आत्मविश्वास.

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Oct 2021 - 12:57 pm | ज्ञानोबाचे पैजार

लैच बेक्कार हरलो राव आणि ते सुध्दा पाकड्यां कडून.
इतके भिकारचोट हरु असे वाटले नव्हते. काय ती बॉलिंग आणि काय ती बॅटींग अरारा, बघवत नव्हती मॅच,
रोहित, हर्दिक, राहुल, जडेजा, शमी आणि भुवनेश्वर सरळ बाहेर बसवले पाहिजेत.
इतके वाईट तर गल्ली क्रिकेट मधे सुध्दा कोणी हरत नाही.
पैजारबुवा,

असे देश .
इस्त्रायल -. फिलिस्तान,अरब देश
एकमेकाच्या देशात सांस्कृतिक देवाण घेवाण,फक्त ह्याच देशात खेळाच्या स्पर्धा आयोजित केलेले कधी ऐकलं आहे का.
जागतिक स्पर्धा सोडून फक्त दोन च देशात जे एकमेकाचे पक्के वैरी आहेत.
खेळाच्या स्पर्धा होतात का?
फक्त भारत ,पाकिस्तान हे दोन च देश असले उद्योग करतात.
भारतीय खेळाडू पाकिस्तान च्या खेळाडू बरोबर लग्न करते .
मग सामान्य लोकांनी काय घोड मारले आहे
परवाच वाचले रेखा आणि इम्रान खान ची मैत्री होती.
मग सामान्य लोकांनीच एकमेकाची डोकी फोडायची का?

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Oct 2021 - 1:29 pm | ज्ञानोबाचे पैजार

भारतीय खेळाडू पाकिस्तान च्या खेळाडू बरोबर लग्न करते .
मग सामान्य लोकांनी काय घोड मारले आहे...

सामान्य लोकांनीही जमले तर करावे की लग्न.... एखाद्या सामान्य पाकिस्तानी लोकीणी बरोबर, (अर्थात त्या करता सामान्य लोकांची मिपावरची मौक्तिके तिच्या वाचनात नाही आली पाहिजेत. नाहीतर ती लग्न करायचे सोडून गळफास घेणे पसंत करेल)

पैजारबुवा,

सुरिया's picture

25 Oct 2021 - 2:00 pm | सुरिया

सामान्य लोकांची मिपावरची मौक्तिके तिच्या वाचनात नाही आली पाहिजेत. नाहीतर ती लग्न करायचे सोडून गळफास घेणे पसंत करेल
गळफास कशाला घेईल. उलट इंप्रेस होईल. इतका एक्सलन्स त्यानातरी कुठे साधलाय. कदाचित पुढेमागे जावाईबापू म्हणून तिकल्ल्या फारिन मिनिस्ट्रीचे प्रवक्ते म्हणून वर्णी लागू शकते.

रात्रीचे चांदणे's picture

25 Oct 2021 - 1:31 pm | रात्रीचे चांदणे

सामान्य लोकांनी एकमेकांची डोकी फोडायला पाहिजे कोण म्हणतंय? पण भारत पाकिस्तान match असताना भारत हारायला पाहिजे असं मनात तरी कसं काय येतंय? चालू असलेली worldt20 ही जागतिक स्पर्धा नाही का?

श्रीगुरुजी's picture

26 Oct 2021 - 11:11 pm | श्रीगुरुजी

पाकड्यांनी न्यूझीलंडला हरवून सलग दुसरा विजय मिळविला व आपला उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास नक्की केलाय. या गटातून उपांत्य फेरीत जाणारा दुसरा संघ हा भारत-न्यूझीलंड सामन्यातील विजेता असेल.

दुसरीकडे सलग दोन पराभवानंतर विंडीज उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.

श्रीगुरुजी's picture

28 Oct 2021 - 8:33 am | श्रीगुरुजी

इंग्लंड व पाकड्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास नक्की झालाय.

विंडीज, स्कॉटलंड व बांगडे उपांत्य फेरीत येणार नाहीत हे जवळपास नक्की झालंय.

भारत-न्यूझीलंड सामन्यातील विजेता उपांत्य फेरीत जाणारा अजून एक संघ असेल.

श्रीगुरुजी's picture

7 Nov 2021 - 9:48 pm | श्रीगुरुजी

प्राथमिक फेरीतील शेवटचा सामना खेळण्याआधीच भारत उपांत्य फेरीत जाणार नाही हे नक्की झालंय.

अत्यंत व्यग्र वेळापत्रक व त्यामुळे झालेली दमछाक, संघात चुकीच्या खेळाडूंची निवड, अतिशय वाईट फलंदाजी व गोलंदाजी, आयपीएलचा अतिरेक यामुळे वाईट कामगिरी होणे अपेक्षितच होते. आयपीएल स्पर्धेला सर्वोच्च प्राधान्य देऊन त्यासाठी रणजी करंडक स्पर्धा व इंग्लंडबरोबरील ५ वा कसोटी सामना रद्द करण्यात आला. यापुढे आयपीएल मुळे भारतात अनेक आयपीएल हिरो तयार होतील, परंतु आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांचा निभाव लागणे अवघड आहे. येणाऱ्या वर्षापासून आयपीएल स्पर्धेत ८ ऐवजी १० संघ असणार आहेत. त्यामुळे एकूण सामन्यांची संख्या ६० वरून ९४ वर जाईल. कदाचित स्पर्धेचा कालावधी सुद्धा एक दीड महिन्याने वाढेल व त्यासाठी रणजी करंडकासारखी स्थानिक स्पर्धा, कसोटी सामने यांचा बळी दिला जाईल. यामुळे तंत्रशुद्ध फलंदाजी, गोलंदाजीचे प्रयोग, क्लासिक क्रिकेट भारतातून कायमस्वरूपी हद्दपार होईल अशी भीति वाटत आहे.

श्रीगुरुजी's picture

14 Nov 2021 - 11:14 pm | श्रीगुरुजी

७ व्या ट-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला अगदी सहज हरवून विजेतेपद पटकावले.

इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरूद्ध कसोटी मालिका सुरू झालीये. आज सुरू झालेल्या लॉर्ड्सवरील पहिल्या कसोटीत पहिल्या दिवशी सर्वबाद १३२ अशी न्यूझीलंडची वाईट अवस्था झाली. ३९ वर्षे ३०७ दिवस वयाच्या मध्यमगती गोलंदाज जेम्स अँडरसनने उत्कृष्ट गोलंदाजी करून ४ फलंदाज बाद केले.

श्रीगुरुजी's picture

2 Jun 2022 - 11:03 pm | श्रीगुरुजी

इंग्लंड दिवसाखेर ११६/७

सुजित जाधव's picture

3 Jun 2022 - 9:38 am | सुजित जाधव

नवीन धागा काढा...

श्रीगुरुजी's picture

3 Jun 2022 - 7:52 pm | श्रीगुरुजी

इंग्लंड-न्यूझीलंड लॉर्ड्स येथे पहिला कसोटी सामना दुसरा दिवस -

न्यूझीलंड पहिला डाव १३२/१०
इंग्लंड पहिला डाव १४१/१०
न्यूझीलंड दुसरा डाव १११/४

सुजित जाधव's picture

11 Jun 2022 - 7:19 pm | सुजित जाधव

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिका:

खराब गोलंदाजीमुळे पहिलाच सामना आपण हरलो. आवेश खानचा अपवाद वगळता प्रत्येक गोलंदाजाने १०+ च्या गतीने धावा दिल्या..हर्षल पटेल डेथ ओव्हर मध्ये विकेट घेतो पण धावा जास्त देतो त्याच्यापेक्षा प्रसिद्ध कृष्णा चांगला पर्याय वाटतो मला..

हार्दिक पंड्या आणि ईशान किशन यांची फलंदाजी आवडली..

डेव्हिड मिलर तुफान फॉर्म मध्ये दिसतोय..

श्रीगुरुजी's picture

11 Jun 2022 - 9:30 pm | श्रीगुरुजी

Van Der Dussen चा श्रेयस अय्यरने सोडलेला झेल, १६ व्या व १७ व्या षटकात दिलेल्या प्रत्येकी २२ धावा या गोष्टी फारच महागात गेल्या. तसाही हा आपला पूर्ण संघ नाही. बुमराह, शमी, राहुल, कोहली, रोहीत हे या संघात नाहीत.

सुजित जाधव's picture

13 Jun 2022 - 9:27 pm | सुजित जाधव

दुसरा सामना पण हरलो...
मला जरा फलंदाजी क्रम व्यवस्थित वाटत नाहीये..
श्रेयस अय्यर तिसऱ्या
चार नंबर हार्दिक पांड्या
आणि मग पंत, कार्तिक, अक्षर यांना खेळवायला हवं..
कारण पंत टी-२० मध्ये टिकून राहण्यापेक्षा आक्रमक खेळ जास्त करतो...आणि पांड्या ने आयपीएल मध्ये चार नंबर वर चांगली फलंदाजी करून दाखवली आहे..
आणि कार्तिक ला फक्त फिनिशर म्हणून संघात ठेवणे हे पण पटत नाहीये ..कारण काल तेराव्या षटकात ४ बाद ९० अशी धावसंख्या असताना अनुभवी कार्तिकला पाठीमागे ठेवून अक्षर पटेलला पाठवले.. २०२१ च्या आयपीएल आधी कार्तिक हा ३,४ किंवा ५ नंबर ला खेळायचा हे विसरतो आहे आपण...

श्रीगुरुजी's picture

13 Jun 2022 - 10:12 pm | श्रीगुरुजी

कार्तिकला ४ थ्या व पंड्याला ५ व्या क्रमांकावर पाठवायला हवे. ऋतुराज गायकवाडला विश्रांती द्यावी.

सुजित जाधव's picture

17 Jun 2022 - 9:56 pm | सुजित जाधव

पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट मधील सर्वाधिक धावांचा त्यांचाच विक्रम मोडून इंग्लंड संघाने आज नेदरलँड बरोबर खेळताना ४ बाद ४९८ धावा बनवल्या...यादरम्यान त्यांनी एकूण २६ षटकार आणि ३६ चौकरांची बरसात केली...इंग्लंड च्या तीन फलंदाजांनी शतक ठोकले... जॉस बटलर ने अवघ्या ७० चेंडूत १६२ धावांची आतिषबाजी खेळी केली..ज्यात त्याने १४ षटकार आणि ७ चौकार लगावले..सलामीवीर फिलिप सॉल्ट(१२२) आणि डेव्हिड मलान (१२५) यांनीही शतके लगावली...

श्रीगुरुजी's picture

17 Jun 2022 - 10:08 pm | श्रीगुरुजी

हा सामना अधिकृत होता का? कारण नेदरलँड्स संघाला मान्यता नाही असा माझा अंदाज आहे.

सुजित जाधव's picture

18 Jun 2022 - 10:20 pm | सुजित जाधव

इतकं काही माहीत नाही...पण आयसीसी ने त्यांच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम हॅण्डल वरून विक्रमाची नोंद घेतली आहे..

श्रीगुरुजी's picture

19 Jun 2022 - 10:45 pm | श्रीगुरुजी

भारत-आफ्रिका ५ वा ट-२० सामना पावसाने रद्द झाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २८/२ (३.३) अश्या धावा केल्यानंतर जोरदार पावसामुळे सामना रद्द झाला. मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.

पहिल्या कसोटी सामन्यात विंडीजने बांगड्यांचा ७ फलंदाज राखून पराभव झाला.
बांगडे १०३/१० व २४५/१०
विंडीज २६५ व ८८/३

लंका- ऑस्ट्रेलिया तिसरा एकदिवसीय सामना
ऑस्ट्रेलिया २९१/६ (५०)
लंका २९२/४ (४८.३)
मालिका श्रीलंकेने ३-० अशी एकतर्फी जिंकली.

श्रीगुरुजी's picture

3 Jul 2022 - 7:41 pm | श्रीगुरुजी

मागील मालिकेत न झालेला ५ वा कसोटी सामना -

भारत ४१६ व ४/१
इंग्लंड २८४

श्रीगुरुजी's picture

3 Jul 2022 - 11:53 pm | श्रीगुरुजी

तिसऱ्या दिवसाखेर भारत १२५/३. भारताकडे २५७ धावांचे आधिक्य.

श्रीगुरुजी's picture

4 Jul 2022 - 11:10 pm | श्रीगुरुजी

भारत ४१६ व २४५
इंग्लंड २८४ व २५९/३

सामना जिंकायला इंग्लंडला अजून १२४ धावा हव्या. भारताच्या हातून सामना निसटला आहे. उद्या एखादा चमत्कारच सामना वाचवू शकतो.

श्रीगुरुजी's picture

5 Jul 2022 - 11:44 pm | श्रीगुरुजी

अत्यंत वाईट फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण यामुळे भारत सामना हरला.

गामा पैलवान's picture

6 Jul 2022 - 2:26 am | गामा पैलवान

पुजारा गेला आणि फलंदाजी ढेपाळली. किमान ४५० चं लक्ष्य ठेवायला हवं होतं. तरीपण कितपत उपयोग झाला असता याची शंकाच आहे. मात्र पूर्ण प्रयत्न केल्याचं समाधान तरी लाभलं असतं. असो. तूर्तास, या दिमाखदार विजयाबद्दल इंग्लंडचं अभिनंदन.
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

7 Aug 2022 - 10:47 pm | श्रीगुरुजी

राष्ट्रकुल स्पर्धेत भारत वि. ऑस्ट्रेलिया महिलांचा अंतिम फेरीतील ट-२० सामना सुरू आहे.

ऑस्ट्रेलिया महिला १३८/५ (१७)

श्रीगुरुजी's picture

7 Aug 2022 - 11:02 pm | श्रीगुरुजी

ऑस्ट्रेलियन महिला १६१/८ (२०)

गामा पैलवान's picture

7 Aug 2022 - 11:11 pm | गामा पैलवान

मानधना, मार दनादना ! आज आपल्याला मानधनाचं शतक पाहिजे.
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

7 Aug 2022 - 11:25 pm | श्रीगुरुजी

मंधाना आणि शेफाली वर्मा गेल्या. भारत २२/२ (३.३).

श्रीगुरुजी's picture

7 Aug 2022 - 11:50 pm | श्रीगुरुजी

भारत ७८/२ (१०.२)

श्रीगुरुजी's picture

8 Aug 2022 - 12:53 am | श्रीगुरुजी

भारत हरला. सर्वबाद १५२.

११८/२ (१४.२) अश्या अत्यंत भक्कम स्थितीतून आत्मघाती फलंदाजीमुळे पराभव.

श्रीगुरुजी's picture

28 Aug 2022 - 10:25 pm | श्रीगुरुजी

आशिया चषक (ट-२०) स्पर्धा कालपासून दुबईत सुरू झाली. कालच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा दारूण पराभव केला.

आज भारत-पाकिस्तान सामना सुरू आहे. पाकिस्तान १४७/१० (२०), भारत ५०/२ (८).

श्रीगुरुजी's picture

28 Aug 2022 - 11:53 pm | श्रीगुरुजी

अत्यंत चुरशीचा सामना भारताने जिंकला.

पाकिस्तान १४७/१० (१९.५)
भारत १४८/५ (१९.४)