ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२ (भाग २)

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in काथ्याकूट
8 Jan 2022 - 6:06 pm
गाभा: 

आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.

निवडणुक आयोगाने पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशात १०, १४, २०, २३, २७ फेब्रुवारी आणि ३ आणि ७ मार्चला ७ टप्प्यात मतदान होणार आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात १४ फेब्रुवारीला तर मणीपूरमध्ये २७ फेब्रुवारी आणि ३ मार्चला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी गुरूवार १० मार्चला होणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर सध्या १५ जानेवारीपर्यंत रोड शो, प्रचारसभांना बंदी असेल. तसेच मतदानकेंद्रांची संख्या वाढवून मतदारांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक मतदानकेंद्रावर सॅनिटायझर, थर्मल गन वगैरे गोष्टी असतील. मतदानाची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आहे. जर मतदाराचे अंगाचे तपमान जास्त आढळल्यास त्या मतदाराला टोकन दिले जाऊन शेवटच्या एक तासात मतदानासाठी परत बोलावले जाईल. ज्येष्ठ नागरीक, अपंग आणि कोविड रूग्णांना पोस्टाने मतदान करायची परवानगी दिली गेली आहे. मतमोजणीनंतर विजयी उमेदवाराला विजययात्रा काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.

https://timesofindia.indiatimes.com/india/covid-protocols-for-assembly-e...

प्रतिक्रिया

गेल्या महिन्यात ज्या २ घटना [ १] पार्कर प्रोब ने सूर्याच्या करोना मधुन प्रवास केला. २] जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप चे अवकाशात प्रक्षपण. ] माझ्या पाहण्यात आल्या त्या संबंधी मी पाहिलेले व्हिडियो इथे देत आहे.

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप च्या प्रवासाची लाईव्ह फिड इथे पाहता येईल. :-

अवांतर :-

बरेच दिवस मी एका मिपाकर आयडी ची फार आठवण काढत होतो... म्हणजे त्यांचे नाव आठवण्याचा प्रयत्न करत होतो. पण काही केल्या ते आठवतच नव्हते !
पण आत्ता आचनक मी स्वतःचेच मिपावरचे ग्रह तार्‍यांवर दिलेले प्रतिसाद शोधण्याच्या प्रयत्नात अचानक मला तो मिपाकर सापडला.
मी सर्च केले "ग्रह misalpav मदनबाण" तेव्हा सर्च रिझल्ट मध्ये संवेदना https://savedanaa.blogspot.com/2012/04/blog-post_14.html हा ब्लॉग आलेला दिसला आणि त्या मध्ये मला माझी आयडी नमुद असलेली दिसली, सहज उत्सुकता चाळावली म्हणुन लिंक उघडली आणि भोचक मला परत जालिय स्वरुपात मिळाले.
हा त्यांचा ब्लॉग :- https://bhochak.blogspot.com/
रस्त्यावरील अपघातात या मिपाकराला मिपाकर मंडळी कायमची गमावुन बसली !
दुसर्‍या दिवशी विकास काकांनी या घटनेमुळे रस्त्यावरील अपघात हा धागा लिहला होता.
भोचक यांचे मिपावरील सर्व लिखाण इथे पाहता येईल :- http://www.misalpav.com/user/680/authored
जुन्या मिपाकरांच्या आठवणी पाठलाग सोडत नाहीत...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Imran Khan - Satisfya (Official Music Video)

सुक्या's picture

9 Jan 2022 - 8:41 am | सुक्या

भोचक यांची आठवण काढली आणी कसेसेच झाले ...
त्याबरोबर श्रामो (श्रावण मोडक) पण आठवले ...

सहमत आहे

पोटे

चंपाबाई

उद्दाम

हे त्यापैकीच काही ....

हे सगळेच, माझ्यावर चांगलेच प्रेम करायचे .... नंतर बिचारे गायब व्हायचे ...

नंतर बिचारे गायब व्हायचे

म्हणजे पृथ्वीलोक सोडुन गेले का?

मुक्त विहारि's picture

9 Jan 2022 - 4:57 pm | मुक्त विहारि

असो

नंतर बिचारे गायब व्हायचे

म्हणजे पृथ्वीलोक सोडुन गेले का?

करोनामुळे, सभा, मिरवणुकावर व इतर प्रचारावर बंधने आली आहेत. त्यामुळे कोणाला फायदा होईल?

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Jan 2022 - 7:37 am | अमरेंद्र बाहुबली

https://www.lokmat.com/jarahatke/sun-burn-out-will-turn-frozen-sun-says-...
फार गंभीर बातमी आहे. सर्वानी काळजी घ्यावी.
हे काय चाललंय आघाडी सरकारच्या काळात??
मला तरी भाजपशीवाय पर्याय नाही. -
भक्तविहारी.

आनन्दा's picture

9 Jan 2022 - 9:52 am | आनन्दा

पुढची पाच अब्ज वर्ष भाजप सरकार येउद्या, मग बोलू आपण याच्यावर :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jan 2022 - 10:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उत्तरप्रदेशातील आणि इतर राज्यातील निवडणुकांचे बिगुल वाजले. करोना, ओमायक्रॉनमुळे प्रचार रॅल्यांना, संभांना बंदी असे असणार आहे, तेव्हा माध्यमं असतील ऑनलाईन आणि इतर अ‍ॅप्लीकेशन्स त्यावर प्रचाराचां भडीमार दिसणार आहे. प्रासंगिक, धार्मिक, सामाजिक, विकासाचे मुद्यांचं घमासान विविध जाल माध्यमांवर असणार आहेत, तेव्हा प्रचारात आघाडी अर्थात भाजपाची असेल आणि ते सर्वात पुढे असतील. समाजवादी पार्टी, बहुजन पार्टी, काँग्रेस यांना कंबर कसावी लागणार आहे, असे असले तरी उत्तरप्रदेशात इतर पक्षांचे सरकार येईल असे वाटत नाही, हा केवळ अंदाज. मागील निवडणुकीत बहुमताच्या आकड्यांपेक्षा शंभराने अधिक आघाडी भाजपाने घेतलेली होती. शेतकरी आंदोलन, केंद्रीय मुद्दे, राज्यसरकाराचे मुद्दे, याने तो अधिकचा आकडा कमी झाला तरी सरकार अल्पमतात येईल असे चिन्ह नाही. 'रिकाम्या खुर्च्या ते सुरक्षेतील त्रुटी' या सर्वांचा फायदा कोणाला होईल कसा होईल हे येत्या काळात दिसून येईल.

भारतात माध्यमांचा सुकाळ सुळसुळाट पाहता भले बुरे परिणाम त्याचे दिसायला लागले आहेत. एकदा एखाद्या विचाराला योग्य आयडेंटेटी मिळाली किंवा त्यावर लादली की तो आपोआप एका गोटात आणि गटात चालल्या जातो. जगण्या मरण्याच्या प्रश्नांपेक्षा तो क्षणिक भडकाऊ विचार मेंदूचा ताबा घेतो आणि मग फेसबूक, इंस्टाग्राम, ट्वीटर, वाट्सॅप, विविध वृत्तवाहिन्यांवर चोवीस बाय सात दळण दळणारे भडक विचारांचे एक्सपर्ट्स आणि अगदी सार्वजनिक चर्चेच्या संकेतस्थळावरही चित्र विचित्र आयडींनी हे भडक विचारांचे लोन पसरवण्याचा उद्योग दिसतो. शिवराळ भाषा, धाकधपटशा, आक्रस्ताळपणा, भडक विचारांचा मारा या निवडणूकीत असणार आहे, तेव्हा प्रभावी मुद्देसुद विचार, आणि विकासाचे विचार, प्रत्यक्ष काम याला किती महत्व असेल ते या निवडणूकीत दिसेल, असे वाटते

माध्यमांची ताकद मोठी असते, ती पुढे वाढतच जाणार आहे, या माध्यमांचा वापर उपयोग जनतेच्या हक्कांसाठी व्हायला हवा. तसा झाला नाही तर अनागोंदी माजेल आणि या माध्यमांवर गदा येईल असे वाटते, त्या सर्वच दृष्टीने ही निवडणूक वेगळी ठरेल असे वाटते.

-दिलीप बिरुटे

Trump's picture

9 Jan 2022 - 12:58 pm | Trump

सुप्रभात सर.
तुमच्या विचाराचे मोती थोडे आमच्याकडे पण टाका.

भारतात माध्यमांचा सुकाळ सुळसुळाट पाहता भले बुरे परिणाम त्याचे दिसायला लागले आहेत. एकदा एखाद्या विचाराला योग्य आयडेंटेटी मिळाली किंवा त्यावर लादली की तो आपोआप एका गोटात आणि गटात चालल्या जातो. जगण्या मरण्याच्या प्रश्नांपेक्षा तो क्षणिक भडकाऊ विचार मेंदूचा ताबा घेतो आणि मग फेसबूक, इंस्टाग्राम, ट्वीटर, वाट्सॅप, विविध वृत्तवाहिन्यांवर चोवीस बाय सात दळण दळणारे भडक विचारांचे एक्सपर्ट्स आणि अगदी सार्वजनिक चर्चेच्या संकेतस्थळावरही चित्र विचित्र आयडींनी हे भडक विचारांचे लोन पसरवण्याचा उद्योग दिसतो. शिवराळ भाषा, धाकधपटशा, आक्रस्ताळपणा, भडक विचारांचा मारा या निवडणूकीत असणार आहे, तेव्हा प्रभावी मुद्देसुद विचार, आणि विकासाचे विचार, प्रत्यक्ष काम याला किती महत्व असेल ते या निवडणूकीत दिसेल, असे वाटते

हे एकाच बाजुने होते आहे का?

श्रीगणेशा's picture

9 Jan 2022 - 1:06 pm | श्रीगणेशा

कोरोनाच्या वाढत्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर सध्या १५ जानेवारीपर्यंत रोड शो, प्रचारसभांना बंदी असेल.

मतं खेचण्यासाठी लागणाऱ्या वाढत्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर १५ जानेवारीनंतर कोरोना चर्चांना बंदी असेल.

चंद्रसूर्यकुमार's picture

9 Jan 2022 - 1:11 pm | चंद्रसूर्यकुमार

चंडिगड
चंडिगड महापालिकेत काल महापौर पदासाठी निवडणुक झाली. अलीकडे झालेल्या महापालिका निवडणुकीत ३५ पैकी आपला १४, भाजपला १२, काँग्रेसला ८ आणि अकाली दलाला १ जागा मिळाली. महापालिकेत कोणालाही बहुमत न मिळाल्याने महापौर पद कोणत्या पक्षाला मिळणार हे स्पष्ट नव्हते. निवडणुक झाल्यानंतर काँग्रेसच्या ८ पैकी १ नगरसेविका भाजपमध्ये सामील झाली. त्यामुळे आपला १४ आणि भाजपला १३ अशी स्थिती आली. काँग्रेस-अकाली दलाने आपला पाठिंबा दिला असता तर आपचा महापौर निवडून आला असता. पण या दोन्ही पक्षांनी मतदानात भाग घेतला नाही. कारण स्पष्ट आहे. पंजाबमध्ये विधानसभा निवडणुक तोंडावर आली आहे आणि त्यात आप या दोन पक्षांचा प्रतिस्पर्धी आहे. मग ते आपल्याच प्रतिस्पर्ध्याला मदत कशी करतील? चंडिगडच्या महापालिका नियमाप्रमाणे स्थानिक खासदार महापालिकेचा पदसिध्द सदस्य असतो. भाजपच्या किरण खेर चंडिगडच्या खासदार आहेत. त्यामुळे त्यांचे मत भाजपला जाऊन १४-१४ अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यात आपच्या एका नगरसेवकाचे मत अपात्र ठरले. त्याचे कारण कळले नाही. पण त्यामुळे चंडिगडमध्ये भाजपला महापौरपद मिळाले.

गोवा
गोव्यात ममता बॅनर्जींनी प्रचाराचा झंझावात चालवला आहे. सगळीकडे तृणमूलचे बोर्ड आणि फ्लेक्स दिसत आहेत अशा बातम्या आहेत. असे करून भाजपविरोधी मतांमध्ये फूट पडून त्याचा फायदा भाजपलाच होईल अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-sanjay-raut-tmc-mamata-ban... तसेच आप हा बाहेरचा पक्षही काँग्रेसच्या वाटेत काटे पेरत आहे अशी टीकाही राऊतांनी केली. आतापर्यंत शिवसेना ममता बॅनर्जींचे कौतुक करत आली आहे. दीड-दोन महिन्यांपूर्वी ममता बॅनर्जी मुंबईत आल्या तेव्हा शिवसेनेने त्यांचे स्वागत केले होते. पण आता त्याच ममता बॅनर्जींंवर टीका केली जात आहे. एक गोष्ट कळत नाही. तृणमूल बाहेरचा, आप बाहेरचा पण शिवसेना हा महाराष्ट्रातील पक्ष गोव्यात विधानसभा निवडणुक लढवायचे मनसुबे करत आहे तो पक्षही बाहेरचाच आहे की. तो कुठे गोव्यातला पक्ष आहे? पण त्याविषयी राऊत काही बोलणार नाहीत.

चंडिगडच्या महापौर निवडणुकीत किंवा गोव्यात विधानसभा निवडणुकीत अशी टीका शिवसेनेने तृणमूल-आपवर केली या त्यामानाने लहान गोष्टी आहेत. पण यातून एक गोष्ट वारंवार अधोरेखित होत आहे आणि लोकांसमोर येत आहे. एका शहराच्या महापौर निवडणुकीत म्हणजे खूपच लहान निवडणुकीतही हे विरोधी पक्ष एकत्र येऊ शकत नाहीत. गोवा हे राज्य असले तरी मतदारांच्या संख्येच्या दृष्टीने खूप लहान आहे. गोव्यातील विधानसभा मतदारसंघात आहेत त्यापेक्षा मुंबई महापालिकेतील एकेका वॉर्डात अधिक मतदार आहेत. तेव्हा गोवा विधानसभा निवडणुक एकूण राष्ट्रीय पातळीचा विचार केला तर खूप लहान आहे. अशा लहान निवडणुकांमध्येही हे पक्ष एकत्र यायला तयार नाहीत तर आपापसात भांडत आहेत. मग २०२४ मध्ये हे सगळे पक्ष एकत्र येऊन मोदींविरोधात राष्ट्रीय आघाडी उघडणार यावर लोकांचा कसा विश्वास बसणार? आणि जरी अशी आघाडी झाली तरी ती कितपत स्थिर असेल हा प्रश्न उभा राहणारच.

मुक्त विहारि's picture

9 Jan 2022 - 5:07 pm | मुक्त विहारि

कितपत विश्र्वासार्हता असणार?

1978 च्या वेळी, भाजप आणि शेकाप मिळून, सरकार स्थापन झाले होतेच की.... पहिल्या दिवसापासूनच, मोरारजी आणि चरणसिंग, यांच्यात पंतप्रधान पदासाठी रस्सीखेच सुरू झाली...

Trump's picture

9 Jan 2022 - 2:08 pm | Trump

डिगीटल रॅली काय प्रकार असतो?

जेम्स वांड's picture

9 Jan 2022 - 2:34 pm | जेम्स वांड

मोदींची चहावाला सामान्य माणूस ही इमेज वापरून घ्यायला भाजपने ह्या संकल्पनेची मुहुर्तमेढ रोवून अतिशय कल्पक वापर केला होता, त्यावेळी रॅली उर्फ चाय पे चर्चा करायला भाजपचे बूथ कार्यकर्ते भिडले होते, ते वॉर्डनिहाय पेंडॉल सेट करत, तिथं गरम चहा आणि प्रसंगी अल्पोपहार असे बहुतकरून फक्त चहा आणि त्याच्यासोबत एकतर नेतृत्वाचे पक्षी मोदी, शहा आणि इतर गणमान्य नेत्यांचे भाषण एकतर लाईव्ह किंवा प्री रेकॉर्ड, त्याचेच विस्तारीकरण असेल डिजिटल रॅलीज असे वाटते मला.

Trump's picture

9 Jan 2022 - 2:43 pm | Trump

ह्म्म
ट्विटरवर बरेचदा मी काँग्रेस आणि भाजप पुरस्कृत #टॅग असतात. तोही त्यातलाच प्रकार असावा. पण त्याच्या परिणामांबद्दल सांशक आहे.

शिवसेनेची फक्त 1100 मतं, भाजपची साथ मिळाल्यानं जिंकलो! शिवसेना आमदाराचं वक्तव्य

https://marathi.abplive.com/news/maharashtra/shiv-sena-mla-sangola-shaha...
--------

हळूहळू वाचा फुटायला लागली...

ठाकरे सरकारच्या नवीन निर्बंधांनंतर चंद्रकांत पाटलांची टीका; म्हणाले, “हे सरकार गेंड्यापेक्षाही….”

https://www.loksatta.com/maharashtra/chandrakant-patil-reaction-on-new-c...

प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे, त्यामुळे सरकारने त्यांना कोणती काळजी घ्यावी हे सांगावं....ह्या बाबतीत सहमत आहे....

अलिबाग कुलाबा किल्ल्यावरील अनाधिकृत मदार हटवा; सरखेल कान्होजी आंग्रेंच्या वंशजांची मागणी....

https://www.lokmat.com/raigad/remove-unauthorized-madar-alibag-colaba-fo...

अलिबागच्या समुद्रात उभा असलेल्या हिंदवी स्वराज्याच्या सागरी राजधानी म्हणून ओळखला जाणाऱ्या कुलाबा किल्ल्यावर एक नवीनच प्रार्थनास्थळ उभे राहिल्याकडे आंग्रे यांनी लक्ष वेधले आहे..

--------

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या एका आदेशानुसार, मलंगगडावर, शिवसैनिक गोळा झाले होते.......

हेअरकट करताना जावेद हबीब केसात थुंकला, महिलेचा आरोप; Video व्हायरल झाल्यावर मागितली माफी....

https://www.google.com/amp/s/www.lokmat.com/national/jawed-habib-hair-sp...

काय बोलावं ते सुचेना ....

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Jan 2022 - 7:20 am | अमरेंद्र बाहुबली

तो भाजप पक्षात आहे सर. पुढील निवडणूकीत तुम्ही भाजपला मत न देऊन धडा शिकवू शकतात.

48 घंटे में बंद करें जावेद हबीब के सभी सैलून वरना...' : BJP विधायक (https://www.google.com/amp/s/ndtv.in/india-news/bjp-mla-from-indore-akas...)

-------

जावेद हबीब पार्लर के खिलाफ फिर उठी आवाज, महिला भाजपा नेता ने की सीएम से बंद करने की मांग (https://www.google.com/amp/s/www.livehindustan.com/madhya-pradesh/story-...)
-------

निवृत्त नौसैनिकाला मारहाण केली, सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली, तेंव्हा त्या त्या पक्षातील कार्यकर्त्यांनी काय केले?

-----

असो,

आपल्या घराणेशाहीच्या निष्ठेपुढे, मी कधीच नतमस्तक झालो आहे ...

धक्कादायक ! मोदींचा ताफा थांबला तेथील सतलज नदीतून 'पाकिस्तानी बोट' जप्त

-----

https://www.lokmat.com/national/shocking-modis-boat-stopped-pakistani-bo...

-------

विशेष म्हणजे, जेथून ही पाकिस्तानी नाव ताब्यात घेण्यात आली आहे. तेथूनच सतलुज नदी पाकिस्तानातून भारतात प्रवेश करते. अनेकदा येथूनच तस्करी करणाऱ्यांना अमली पदार्थांसह पकडण्यात आले आहे. तर, या प्रदेशात पाकिस्तानकडून शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यात येते. फिरोजपूर हा पंजाबमधील अतिशय संवेदनशील प्रदेश आहे....

शेजारच्यांना धाकच राहिला नाही.

ज्या रस्त्याने मोदी जाणार हे नक्की झाले तो अकस्मात निर्णय होता. मोदी अमक्या रस्त्याने जाणार हे समजल्याबरोबर पाकिस्तान सिमेतून बोट घुसली? आणि मग सीमा सुरक्षा दल काय पाकिस्तानी बोटीला वाजत गाजत आणायला ठेवलं आहे का?

रावसाहेब चिंगभूतकर's picture

9 Jan 2022 - 11:35 pm | रावसाहेब चिंगभूतकर

अकस्मात निर्णय त्या लेव्हल ला घेतले जात नाहीत. SPG ने आधी जी पत्रे पोलिसांना पाठवली होती त्यात पाऊस असण्याबद्दल आणि alternate रूट तयार ठेवण्याबद्दल उल्लेख होता.

An important disclosure has been made in the ASL report regarding the lapse in security of PM Modi in Punjab. The ASL report states that on January 1, when the talks between the SPG and Punjab Police took place, all the options were considered. On January 3, a letter was also sent by the SPG to the Punjab Police, in which information about all alternate routes was shared due to bad weather. At the same time, the Punjab government had said that the PM had suddenly made a plan to go by road, but everything had already been discussed.

This information has been given in page 23 of the ASL report prepared by the SPG after the detailed ASL meeting. ADGP Punjab Police Incharge of Security Arrangement, IG CI Punjab, IGP Ludhiana Range, DIG Ferozepur, DC Ferozepur, SSP Ferozepur and other officers participated in the ASL meeting.

VVIP was a part of the contingency route security arrangement and it was discussed in the ASL meeting. Detailed instructions are listed in the ASL report on how to secure a VVIP emergency route. Page 24 of the SL report also mentions that ‘alternate routes will also be identified and rehearsed’.

Page 24 further mentions that ‘there are also some villages on the way’. There is a possibility of congestion on the route, so proper measures should be taken to control the crowd. Police personnel with ropes can also be deployed at sensitive places to control the crowd. It is again mentioned at the bottom of page 24 that there is a possibility of road movement from Bathinda to Firozpur due to bad weather conditions. Therefore, all the police stations coming in the middle of the way should be alerted.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

9 Jan 2022 - 11:37 pm | रावसाहेब चिंगभूतकर

अर्थात पाकिस्तानी बोट वगैरे प्रकार निरर्थकच असावेत याबद्दल सहमत. माझे उत्तर फक्त अकस्मात निर्णयाबद्दल होते.

आंध्र प्रदेश: कुर्नूलमध्ये मशिदीच्या बेकायदेशीर बांधकामाला विरोध केल्यानंतर इस्लामवाद्यांनी पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केला. मुस्लिम गटाने पोलिस ठाण्याचा घेराव करून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबारही करावा लागला. परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या हिंसाचारात श्रीकांत रेड्डी यांच्या कारचे नुकसान झाले. मुस्लिम जमावाने भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांवरही दगडफेक केली. आत्मकूर येथील पद्मावती शाळेच्या मागे मशीद बांधण्यावरून वाद सुरू आहे. बेकायदेशीरपणे बांधलेली मशीद रोखण्यासाठी भाजप नेते प्रयत्नशील आहेत.

ह्यासाठीच, आमच्या सारख्या अशिक्षित पण हिंदू हितवादी लोकांना, भाजप शिवाय पर्याय नाही...

जागतिक रोबोटिक्स हब बनण्यासाठी चीनने पंचवार्षिक योजना तयार केली आहे. रोबोटिक्ससाठी जागतिक केंद्र बनण्याची आपली महत्त्वाकांक्षा पुर्ण करण्यासाठी चीनने पंचवार्षिक योजनेचे अनावरण केले आहे. सर्व्होमोटर्स आणि कंट्रोल पॅनेल सारख्या प्रमुख घटकांमधील सुधारणांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. स्पीड रिड्यूसर, सर्व्होमोटर्स आणि कंट्रोल्स यांसारख्या मुख्य रोबोट घटकांमध्ये यश मिळविण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील

ह्या असल्या बातम्या पाहिल्या की आपण किती वर्षे मागे आहोत त्याची जाणीव होते.

चंद्रसूर्यकुमार's picture

10 Jan 2022 - 1:19 pm | चंद्रसूर्यकुमार

गोव्यात आम्ही महाविकास आघाडीसाठी प्रयत्न केले पण काँग्रेसकडून प्रतिसाद मिळाला नाही असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. https://www.loksatta.com/desh-videsh/shivsena-sanjay-raut-reaction-befor... आता गोव्यात राष्ट्रवादीबरोबर युती करून शिवसेना निवडणुक लढवणार आहे. शिवसेनेची गोव्यात ताकद शून्य आहे. आतापर्यंत एकदाही स्वबळावर एकही जागा जिंकणे तर सोडूनच द्या इतर कोणाबरोबर युती करूनही शिवसेनेने कधी विधानसभेची जागा जिंकलेली नाही. शिवसेनेने स्वबळावर एकदाही आपल्या उमेदवारांचे डिपॉझिटही वाचवलेले नाही. तर राष्ट्रवादीने काँग्रेसबरोबर युती करून २००७ मध्ये ३ जागा जिंकल्या होत्या. २०१७ मध्ये चर्चिल आलेमाव हे एकमेव उमेदवार राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून गेले होते. पण हे गृहस्थ स्वयंभू आहेत. त्यांना जिंकायला राष्ट्रवादी पक्षाचा उपयोग शून्य झाला होता असे म्हटले तरी चालेल. आता तेच तृणमूल काँग्रेसमध्ये गेले आहेत. पूर्वी एकदा माजी मुख्यमंत्री विल्फ्रेड डिसूझा राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून गोवा विधानसभेवर निवडून गेले होते. पण त्यांचे निधन होऊनही सहा-सात वर्षे उलटली आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडेही नाव घेण्याजोगा एकही नेता राज्यात राहिलेला नाही.

अशा दोन पक्षांबरोबर राज्यात बर्‍यापैकी जनाधार असलेल्या काँग्रेसने का युती करावी? त्या युतीतून काँग्रेसला काय मिळणार होते? आणि संजय राऊत यांची परवाची भाषा होती- आम्ही राष्ट्रवादीबरोबर युती करत आहोत, काँग्रेसने आमच्याबरोबर यावे. एखाद्याला आपल्याविषयी किती अवास्तव कल्पना अशाव्यात?

चंद्रसूर्यकुमार's picture

10 Jan 2022 - 3:37 pm | चंद्रसूर्यकुमार

मनोहर पर्रीकरांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर पणजीमधून निवडणुक लढवायला उत्सुक आहेत. पणजीमधून मनोहर पर्रीकर १९९४ पासून सहावेळा निवडून गेले होते. उत्पल पर्रीकरांनी पक्षासाठी काही काम केल्याचे निदान मला तरी माहित नाही. केवळ मनोहर पर्रीकरांचा मुलगा या एका क्वालिफिकेशनवर त्यांना उमेदवारी दिली जायला नको असे वाटते. पण मागे म्हटल्याप्रमाणे भाजपने बाबूश मोन्सेराट या बलात्काराचे आरोप असलेल्या गणंगाला काँग्रेसमधून आपल्या पक्षात घेतले आहे. बहुदा त्याला उमेदवारी दिली जाईल ही शक्यता आहे. त्याने तरी पक्षासाठी नक्की कोणते काम केले आहे? असल्या घाणेरड्या माणसाला उमेदवारी देण्यापेक्षा उत्पल पर्रीकर कधीही परवडले. त्यांनी पक्षासाठी फार काही केले नसले तरी त्यांची पाटी कोरी आहे. या बाबूश मोन्सेराटप्रमाणे घाणेरड्या आरोपांनी भरलेली नाही. तेव्हा बाबूशपेक्षा उत्पल पर्रीकर उमेदवार म्हणून नक्कीच चांगले. हे टाईप करता करताच एक बातमी वाचली की बाबूश मोन्सेराट आज संध्याकाळी महालक्ष्मी मंदिरापासून आपला प्रचार सुरू करणार होता पण त्याने तो बेत रद्द केला आहे. https://timesofindia.indiatimes.com/city/goa/babush-calls-off-campaign-l... . म्हणजे त्याला उमेदवारी मिळणार नाही ही पण शक्यता दिसते. तसे असेल तर फारच उत्तम.

जर उत्पल पर्रीकरांना भाजपने उमेदवारी दिली नाही शिवसेना उमेदवारी देईल असे म्हटले जात आहे. तसे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत असे आंतरजालावर वाचले पण ती लिंक या क्षणी सहजासहजी मिळाली नाही. जसा आदर मनोहर पर्रीकरांविषयी वाटायचा तो आदर मनोहर पर्रीकरांचे चिरंजीव या एकाच क्वालिफिकेशनमुळे या उत्पल पर्रीकरांविषयी नक्कीच वाटत नाही/वाटणार नाही. पण ते शिवसेनेत गेल्यास मात्र त्यांच्याविषयी थोडीफार असलेली सद्भावनाही संपून जाईल हे नक्की. त्याच शिवसेनेच्या त्याच संजय राऊत यांनी आपल्या वडिलांविषयी नक्की काय गटारगंगा वाहिली होती याची आठवण सगळ्यांनाच करून द्यायला हवी. मनोहर पर्रीकरांनी ऑगस्ट २०१७ मध्ये पणजीमधून पोटनिवडणुक लढवली होती. त्यावेळी व्हॉट्सअ‍ॅपवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की केला गेला होता. त्या व्हिडिओत 'जर पणजीमधून पराभव झाला तर आपण केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून परत जाऊ' असे पर्रीकरांनी म्हटले होते असे त्या व्हिडिओत सांगितले गेले. खखोदेजा. बाकी कोणा भाजप उमेदवाराचा पणजीमधून पराभव होऊ शकेल ही शक्यता मान्य केली तरी खुद्द पर्रीकरांचा पराभव पणजीमधून होईल ही शक्यता जवळपास शून्य होती. तेव्हा या व्हिडिओत तथ्य नसावे असे वाटते. तेव्हा हा व्हिडिओ आल्यावर संजय राऊत काय म्हणाले होते? मनोहर पर्रीकर हे एक अपयशी संरक्षणमंत्री होते. https://www.dnaindia.com/india/report-shiv-sena-says-parrikar-was-a-fail... . पर्रीकर अपयशी संरक्षणमंत्री असतील तर मग व्ही.के.कृष्णमेनन एकदम यशस्वी संरक्षणमंत्री होते नाही का? तसेच २०१८ मध्ये पर्रीकर कर्करोगाने आजारी असताना ते उपचारासाठी परदेशी गेले होते. तेव्हा राज्याला सेनापती नसल्याने प्रशासन कोलमडले आहे इतकेच नाही तर गोव्याला 'आजारी राज्य' म्हणून जाहीर करावे असली गटारगंगा त्याच संजय राऊतांनी वाहिली होती. https://www.lokmat.com/goa/announce-state-ill-health-goa-sanjay-raut/?fb... . आणि त्यावेळी उद्धव ठाकरे हे सामनाचे संपादक होते त्यांना हे सगळे बरळलेले चालले होते. हे इतरांविषयी असले काही बरळत असतील तर मग हे स्वतः आजारी पडल्यावर लोक त्यांच्याविषयीही बोलणारच. त्याला इलाज नाही.

असो. सगळ्यांनाच ज्यांच्याविषयी आदर होता अशा आपल्या वडिलांविषयी असले बरळणार्‍या पक्षात उत्पल पर्रीकर गेले तर मात्र त्यांच्याविषयी थोडीफार असलेली सद्भावनाही पूर्ण संपून जाईल. याची जाण उत्पलना असावी ही अपेक्षा.

उत्पल पर्रीकर यांनी हिंमत दाखवायला हवी, संजय राऊत यांनी दिली मोठी ऑफर

------
https://pudhari.news/maharashtra/mumbai/99185/shivsena-leader-sanjay-rau...
-----

पर्रीकरांच्या कुटुंबानं शिवसेनेशी संबध जोडला तर शिवसेना ताकद पणाला लावायला तयार आहे, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.

--------

गोव्या बाबतीत, सध्या तरी इतकेच....

-----भाजपने बाबूश मोन्सेराट या बलात्काराचे आरोप असलेल्या गणंगाला काँग्रेसमधून आपल्या पक्षात घेतले आहे....

ह्या आपल्या मताशी सहमत आहे...

चंद्रसूर्यकुमार's picture

10 Jan 2022 - 5:32 pm | चंद्रसूर्यकुमार

मध्यंतरी गलवानमध्ये चीनी सैनिकांनी त्यांचा झेंडा फडकावला अशी बातमी आली. त्यानंतर समस्त विरोधी पक्षांनी 'त्यावर मोदी बोलत का नाहीत' हे आकांडतांडव करून झाले. त्यात बेगानी शादी मध्ये दिवाना झालेले राऊतब्दुल्ला सगळ्यात पुढे. इथेही नेहमीच्या यशस्वी कलाकारांनी ते पोस्ट केले असले तरी आश्चर्य वाटू नये. त्यानंतर आपल्या सैन्याने आपले सैनिक गलवानमध्ये तिरंगा घेऊन आहेत हा फोटो पोस्ट केला तिथेच या प्रोपोगांडाची हवा काढून घेतली गेली. त्यानंतर आता पुढे आले आहे की चीनमधून आलेल्या त्या तथाकथित फोटोत सैनिक म्हणून असलेले लोक सैनिक नव्हतेच तर चिनी कलावंत होते आणि त्यांना चिकपने (चिनी कम्युनिस्ट पक्ष) हा 'इव्हेंट' करण्यासाठी मुद्दामून बोलावून घेतले होते. आणि हा प्रकार चीनच्या सोशल मिडिया साईट विबो (weibo) वर चिनी सदस्यांनीच उघडकीस आणला. https://www.newsx.com/world/china-used-actors-to-stage-flag-hoisting-vid...

असा कुठलातरी फोटो आल्यावर लगेच मोदींवर तुटून पडून मग नंतर आपलेच नाक कापून घ्यायची हौस या विरोधकांना का असते हे समजत नाही. तुमचा मोदींवर विश्वास नसेल तर त्याविषयी काहीच आक्षेप असू नये. पण निदान आपल्या सैन्यावर तरी विश्वास ठेवा.

दुर्देव वाटते ते भारताचे. लोकशाहीसाठी चांगल्या विरोधी पक्षाची गरज असते, पण येथे सगळा वनवास आहे.

असा कुठलातरी फोटो आल्यावर लगेच मोदींवर तुटून पडून मग नंतर आपलेच नाक कापून घ्यायची हौस या विरोधकांना का असते हे समजत नाही. तुमचा मोदींवर विश्वास नसेल तर त्याविषयी काहीच आक्षेप असू नये. पण निदान आपल्या सैन्यावर तरी विश्वास ठेवा.

मुक्त विहारि's picture

10 Jan 2022 - 6:48 pm | मुक्त विहारि

+1

सहमत आहे.

दुर्देव वाटते ते भारताचे. लोकशाहीसाठी चांगल्या विरोधी पक्षाची गरज असते, पण येथे सगळा वनवास आहे.

असा कुठलातरी फोटो आल्यावर लगेच मोदींवर तुटून पडून मग नंतर आपलेच नाक कापून घ्यायची हौस या विरोधकांना का असते हे समजत नाही. तुमचा मोदींवर विश्वास नसेल तर त्याविषयी काहीच आक्षेप असू नये. पण निदान आपल्या सैन्यावर तरी विश्वास ठेवा.

चंद्रसूर्यकुमार's picture

11 Jan 2022 - 11:35 am | चंद्रसूर्यकुमार

उत्तर कोरियाची राजधानी प्याँगयाँगमधील लोकांचे हस्ताक्षराचे नमुने सरकारने मागवायला सुरवात केली आहे. त्याचे कारण आहे हुकुमशहा किम जोंग उनविषयी अपशब्द वापरला गेला आहे. देशात मोठ्या प्रमाणावर अन्नटंचाई निर्माण झाली आहे. अशावेळेस अन्नटंचाईवर उपाय शोधायचा सोडून लोकांनी खाणे कमी करावे हा सल्ला किम जोंग उनने दिला आहे. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेची राणी मेरीने 'ब्रेड नसेल तर केक खा' असे म्हटले होते त्यापेक्षा हे थोडेसे सौम्य धोरण म्हणायचे. तर सांगायचा मुद्दा म्हणजे या अन्नटंचाईमुळे लोकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. किमच्या पक्षाची बैठक चालू होती त्या इमारतीच्या बाहेर कोणीतरी 'किम जोंग उनमुळे लोक उपाशी मरत आहेत. He is a son of a *****' अशाप्रकारचे अपशब्द असलेली ग्राफिटी चिकटवली. झालं. आता हे नक्की कोणी केले आहे हे शोधून काढायला सीसीटिव्ही फुटेज तपासून बघितले जात आहेच पण त्याबरोबर लोकांच्या हस्ताक्षराचे नमुनेही गोळा करायला सुरवात केली आहे. ज्याने कोणी हा प्रकार केला आहे तो माणूस सापडला तर त्याची खैर नाही हे नक्की. एक प्रश्न पडतोच. उत्तर कोरियात किमच्या पक्षाकडे सर्वाधिकार असतील आणि किम म्हणेल तो कायदा असेल तर हे पक्षाचे लोक कोणावर तरी सूड उगवायला 'त्याचे हस्ताक्षर त्या ग्राफिटीमधील अक्षराप्रमाणे आहे' या नावावर एखाद्याला गायब करू शकत असतील का?

हे सगळे पाहता भगवंताने आपल्याला अशा कोणत्या देशात जन्माला आणले नाही याबद्दल शतशः आभार मानावेसे वाटतात. आपण असे काही केले तर त्याचे नक्की परिणाम काय होणार याची पूर्ण कल्पना त्या माणसाला असूनही त्याने हे धाडस केले. म्हणजे किम जोंग उनच्या कम्युनिस्ट हुकुमशाहीत जिवंत राहण्यापेक्षा मेलेले परवडले असेच त्याला वाटत असणार ना? उत्तर कोरियातून बाहेर पडता येणे फार म्हणजे फारच कठिण आहे इतका कडक बंदोबस्त तिथल्या लष्कराने केला आहे. तरीही तिथून सीमेवरून दक्षिण कोरियात निसटायचा प्रयत्न करणारे आणि त्यात मरणारे लोक असतात. तीच गोष्ट बर्लिनची भिंत असतानाची. लोक आपला जीव धोक्यात घालून परिणामांची तमा न बाळगता कम्युनिस्ट राजवटींमधून निसटायचा प्रयत्न करत असतात आणि सामान्यांचे हे स्थलांतर नेहमी एकाच दिशेने होत असते. मानवी स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीचा कम्युनिझमइतका मोठा शत्रू मिळणे कठिण आहे.

तुषार काळभोर's picture

11 Jan 2022 - 12:18 pm | तुषार काळभोर

१) दक्षिण कोरियातील अन्याय्य भांडवलशाहीला कंटाळून उत्तर कोरियात स्थलांतर का होत नाही?
२) अमेरिकेतील अन्याय्य भांडवलशाहीला कंटाळून व्हेनेझुएला/क्युबामध्ये स्थलांतर का होत नाही?
३) जपानमधील अन्याय्य भांडवलशाहीला कंटाळून चीनमध्ये स्थलांतर का होत नाही?
४) मध्य व पश्चिम युरोपातील अन्याय्य भांडवलशाहीला कंटाळून रशियात स्थलांतर का होत नाही?
५) साम्यवादात हुकुमशाही का असावी लागते? हुकुमशाहीशिवाय साम्यवाद असं एखादं उदाहरण आहे का?

मुक्त विहारि's picture

11 Jan 2022 - 12:24 pm | मुक्त विहारि

एकतर, चीन मध्ये पाठवावे किंवा उत्तर कोरियात...

चंद्रसूर्यकुमार's picture

11 Jan 2022 - 5:21 pm | चंद्रसूर्यकुमार

capitalism

साम्यवादात हुकुमशाही का असावी लागते?

त्याचे कारण साम्यवाद हा मानवी स्वभावाला अनुसरून नसल्याने जर कोणत्याही बंधन-जबरदस्तीशिवाय साम्यवाद प्रत्यक्षात येऊ शकत नाही. याविषयी मागे कधीतरी मिपावर लिहिले होते. पण ती लिंक आता मिळत नाही.

जावेद अख्तर यांचा मोदींना टोला; म्हणाले, “काल्पनिक धोक्याबद्दल राष्ट्रपतींसोबत चर्चा केली पण २० कोटी…”

https://www.loksatta.com/desh-videsh/javed-akhtar-calls-prime-minister-n...

-----

त्या प्रकरणा बाबत, कोर्टात केस सुरू आहे...

पण, काही मुलभूत प्रश्र्न ...

1. काश्मीरी पंडितांना, जबरदस्तीने हुसकावून लावले, त्या बद्दल, हे कधी बोलले आहेत का?

2. अमरावती दंगली बाबत काही बोलले आहेत का?

3. गेला बाजार, ओवेसीने जेंव्हा, 100 कोटी गैर मुस्लिम लोकांना मारण्याची धमकी दिली, तेंव्हा हे काही बोलले आहेत का?

4. नुकतेच, रायगडावर, मजारीचा मामला झाला, त्या बद्दल हे काही बोलले आहेत का?

------

डाॅन मधला एक उत्तम डायलाॅग आहे, त्याच धर्तीवर मनांत विचार येतो की, हिंदू लोकांना भाजप शिवाय पर्याय नाही हे पटेल तेंव्हा पटेल, पण भाजप आला तर हिंदू लोकं उपेक्षित राहणार नाहीत, हे काही अशिक्षित हिंदू हितवादी लोकांना नक्कीच पटलेले आहे... भाजपात, मोदी, योगी, तेजस्वी सुर्या, अशी खरोखरच बाहुबली मंडळी नक्कीच आहेत...

भारतातील सर्वात मोठ्या ‘मावळ्या’कडून मुंबईतील पहिल्या २ किमी बोगद्याचं काम पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडून शाबासकी...

https://www.loksatta.com/mumbai/cm-uddhav-thackeray-on-excavation-of-the...

-----

अतिशय उत्तम काम ....

उर्वरीत सहा राफेल लढाऊ विमाने लवकरच वायूदलात दाखल होणार, शेवटची तीन असणार आणखी अत्याधुनिक

https://www.loksatta.com/desh-videsh/the-last-three-rafale-that-will-joi...
------

संरक्षणा बाबतीत, भाजप सरकार, योग्य तेच करत आहे...

J 10C आणि राफेल, यांच्यातील, फरक आणि साम्ये, कुणी सांगीतले तर उत्तम...

https://www.esakal.com/desh/big-success-for-navy-successful-test-of-supe...
------

भाजप सरकारच्या काळांत, संरक्षणदल अधिकाधिक सक्षम होत चालले आहे...

निनाद's picture

12 Jan 2022 - 3:48 am | निनाद
  1. हवेतून हवेत अधिक अंतरावर मारा करणारे क्षेपणास्त्र सामावून घेण्याची सोय,
  2. फ्रिक्वेन्सी जॅम करणारे रडार,
  3. अत्याधुनिक संपर्क यंत्रणा,
  4. जमिनीवरील रडारची सूचना देणारे रिसिव्हर,
  5. जमिनीवरील हालचालीची वेगाने नोंद करणारे संवेदक,
  6. विमानाच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राची जलद नोंद करणारी यंत्रणा

हे भारतीय वायूदलाने मागितले आहेत.

मुक्त विहारि's picture

12 Jan 2022 - 11:25 am | मुक्त विहारि

मस्तच

निनाद's picture

12 Jan 2022 - 4:08 am | निनाद

तेजस मार्क २

एचएएल तेजस मार्क २
वैशिष्ट्ये

  • क्रू: एक किंवा दोन
  • लांबी: १४.६० मीटर (४७ फूट १ १ इंच)
  • विंगस्पॅन: ८.५० मी (२७ फूट १ १ इंच)
  • उंची: ४.८६ मीटर ( १५ फूट १ १ इंच)
  • विंग क्षेत्र: ४४ मी २ (४७० चौरस फूट)
  • रिक्त वजन: ७,८५० kg ( १७,३०६ lb) (अपेक्षित)
  • एकूण वजन: १ १,३०० kg (२४,९ १२ lb) (अपेक्षित)
  • कमाल टेकऑफ वजन: १७,५०० kg (३८,५८ १ lb) (अपेक्षित)
  • इंधन क्षमता: ३,३०० kg (७,३०० lb) अंतर्गत; ड्रॉप टाकीसह ३,५०० kg (७,७०० lb)
  • पेलोड : ६,५०० kg ( १४,३०० lb) बाह्य स्टोअर्स
  • पॉवरप्लांट: १ × जनरल इलेक्ट्रिक F४ १४ आफ्टरबर्निंग टर्बोफॅन. (स्वदेशी १ १०KN इंजिन भविष्यात वापरले जाणार आहे) , ५८.५ kN (१३,२०० एलबीएफ) थ्रस्ट ड्राय, ९८ केएन (२२,००० एलबीएफ) आफ्टरबर्नरसह

कामगिरी

  • कमाल वेग: २,३८५.३६ किमी/ता ( १,४८२. १९ mph, १,२८७.९९ kn)
  • कमाल वेग: मॅच १.८
  • श्रेणी: २,५०० किमी ( १,६०० मैल, १,३०० nmi)
  • लढाऊ श्रेणी: १,५०० किमी (९३० मैल, ८ १० एनएमआय)
  • फेरी श्रेणी: ३ बाह्य इंधन टाक्यांसह ३,५०० किमी (२,२०० mi, १,९०० nmi)
  • सेवा कमाल मर्यादा: १७,३०० मी (५६,७५८ फूट)
  • g मर्यादा: +९/−३.५
  • थ्रस्ट/वजन : ०.८९ (७००० lb इंधनासह, २ SRAAMs आणि जनरल इलेक्ट्रिक F४ १४), १.०० (नियोजित) १ १० KNथ्रस्टच्या स्वदेशी इंजिनसह

शस्त्रास्त्र

  • गन: १ x ३० मिमी ( १.२ इंच) GSh-३०- १ [३७]
  • हार्डपॉईंट्स : सुमारे ६.५ टन क्षमतेचे १३ हार्डपॉइंट्स (अपेक्षित), तरतुदींसह:
  • हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे:
  • एमआयसीए (नियोजित)
  • उल्का (नियोजित)
  • अस्त्र (नियोजित)
  • एनजी-सीसीएम (नियोजित)
  • हवेतून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रे:
  • ब्रह्मोस-एनजी एएलसीएम
  • निर्भय (नियोजित)
  • वादळाची सावली (नियोजित)
  • क्रिस्टल भूलभुलैया
  • रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्रे:
  • रुद्रम (नियोजित)

मार्गदर्शित युद्धसामग्री

  • HSLD- १००/२५०/४५०/५००
  • DRDO ग्लाइड बॉम्ब
  • डीआरडीओ लेझर-मार्गदर्शित बॉम्ब
  • सुदर्शन
  • क्लस्टर दारूगोळा
  • लॉइटरिंग दारूगोळा
  • कॅट्स अल्फा

एव्हियोनिक्स

  • एलआरडीई एईएसए रडार
  • DARE युनिफाइड इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट (UEWS)
  • DARE ड्युअल कलर मिसाइल अॅप्रोच वॉर्निंग सिस्टम (DCMAWS)
  • डेअर टार्गेटिंग पॉड

आता चेंगदू जे१०

वैशिष्ट्ये

  • क्रू: १
  • लांबी: १६.०३ मीटर (५२ फूट ७ इंच)
  • विंगस्पॅन: ९.२५ मी (३० फूट ४ इंच)
  • उंची: ५.४३ मीटर ( १७ फूट १० इंच)
  • विंग क्षेत्र: ३३ मीटर २ (३६० चौरस फूट)
  • रिक्त वजन: ९,७५० kg (२ १,४९५ lb)
  • एकूण वजन: १४,००० kg (३०,८६५ lb)
  • कमाल टेकऑफ वजन: १९, २७७ किलो (४२,४९९ पौंड)
  • इंधन क्षमता: ४९५० L (३८६० Kg) अंतर्गत. ४००० एल (३१२० किलो) बाह्य ३ ड्रॉप टाक्यांसह (२x१६०० एल + १x८०० एल)
  • पॉवरप्लांट: १ × Saturn-Lyulka AL-३ १FN आफ्टरबर्निंग टर्बोफॅन इंजिन, ७९.४३ kN ( १७,८६० lbf) थ्रस्ट ड्राय, १२५ kN (२८,००० lbf) आफ्टरबर्नरसह

कामगिरी

  • कमाल वेग: मॅच १.८
  • स्टॉल गती: २०० किमी/ता ( १२० mph, १ १० kn)
  • श्रेणी: २,२५० किमी ( १,४०० मैल, १,२ १० nmi)
  • लढाऊ श्रेणी: ९०० किमी (५६० मैल, ४९० nmi)
  • फेरी श्रेणी: ३,२०० किमी (२,००० मैल, १,७०० nmi)
  • सेवा मर्यादा: १७,००० मी (५६,००० फूट)
  • g मर्यादा: +९/-३
  • चढाईचा दर: ३०० मी/से (५९,००० फूट/मिनिट)
  • विंग लोडिंग: ३८ १ kg/m २ (७८ lb/sq ft)
  • जोर/वजन : १.०५ ( शनि AL-३ १FN३ सह); १. १० ( WS- १०A सह)
  • तात्काळ वळण दर: ३० अंश प्रति सेकंद
  • रोल रेट: ३०० + अंश प्रति सेकंद

शस्त्रास्त्र

  • गन: १× ग्र्याझेव-शिपुनोव GSh-२३
  • हार्डपॉइंट्स: एकूण १ १ (६× अंडर-विंग, २× अंडर-इनटेक आणि ३× अंडर-फ्यूजलेज) ५६०० किलो बाह्य इंधन आणि शस्त्रास्त्रांच्या क्षमतेसह
  • रॉकेट: ९० मिमी अनगाइडेड रॉकेट पॉड्स

क्षेपणास्त्रे:
हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे :

  • PL-८
  • PL- १० (J- १०C)
  • PL- १२
  • PL- १५ (J- १०C)

हवेतून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रे :

  • KD-८८
  • YJ-९ १

बॉम्ब:

  • लेझर-गाइडेड बॉम्ब: ( LT-२ )
  • ग्लाइड बॉम्ब: ( LS-६ , GB३ , GB२A , GB३A )
  • उपग्रह-मार्गदर्शित बॉम्ब: ( FT- १ )
  • अनगाइड बॉम्ब: २५० किलो, ५०० किलो

इतर:

  • विस्तारित श्रेणी आणि लोइटिंग वेळेसाठी ३ पर्यंत बाह्य इंधन ड्रॉप-टँक ( १× अंडर-फ्यूजलेज, २× अंडर-विंग)

एव्हियोनिक्स

  • १४७३H पल्स-डॉपलर फायर कंट्रोल रडार (J- १०A)
  • बाहेरून आरोहित एव्हियोनिक्स पॉड्स:
  • K/JDC० १A लक्ष्यीकरण पॉड (J- १०A वर)
  • Hongguang-I इन्फ्रा-रेड शोध आणि ट्रॅक पॉड टाइप करा (J- १०A वर)
  • KD-८८ आणि YJ-९ १ साठी CM-८०२AKG लक्ष्यीकरण पॉड (J- १०C वर)
  • KG६०० इलेक्ट्रॉनिक काउंटरमेजर पॉड
  • ब्लू स्काय नेव्हिगेशन/अटॅक पॉड

वरील माहितीमध्ये चूक भूल देणे घेणे मी यातला तज्ञ नाही!
मी फक्त विकीवरून येथे देण्याची हमाली केली आहे. अधिक माहिती त्या त्या विकी पानावर वाचावी.

बिहार मौलानाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. आरोपी मौलानाविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, माहिती मिळताच मौलवी फरार झाला!
पाटणामध्ये एका मदरशाच्या मौलवीने अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल होताच मौलाना शाहबाज रझा मदरसा सोडून पळून गेला. या प्रकरणाबाबत दानापूरचे एसपी सय्यद इम्रान मसूद तपास करत आहेत.
अशाच गुन्ह्यांमध्ये मौलवींचा सहभाग असल्याची अनेक प्रकरणे उप्र ते केरळ पर्यंत झालेली दिसून येत आहेत.

मुक्त विहारि's picture

12 Jan 2022 - 11:24 am | मुक्त विहारि

धन्यवाद

वामन देशमुख's picture

12 Jan 2022 - 11:43 am | वामन देशमुख

पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल होताच मौलाना शाहबाज रझा मदरसा सोडून पळून गेला. या प्रकरणाबाबत दानापूरचे एसपी सय्यद इम्रान मसूद तपास करत आहेत

.

हं...

महाराष्ट्रातील परिस्थिती अस्वस्थ करणारी; सरकारचा CBIवर तर परमबीर सिंह यांचा पोलीस दलावर विश्वास नाही- सुप्रीम कोर्ट

------

https://www.loksatta.com/maharashtra/ex-police-commissioner-has-no-faith...

-------

सुप्रीम कोर्टाने केलेली टिप्पणी आहे....

-------

सॅगी's picture

12 Jan 2022 - 1:07 pm | सॅगी

आता सुप्रीम कोर्टाला अक्कल शिकवणारा हग्रलेख नॉटी संपादक पाडतीलच...

मुक्त विहारि's picture

12 Jan 2022 - 7:04 pm | मुक्त विहारि

संपादकांना सगळे समजते.

सॅगी's picture

12 Jan 2022 - 7:51 pm | सॅगी

"नॉटी" संपादकांना सगळे समजते.. (असा त्यांचा समज असतो)

आता दुकानांच्या पाट्या मराठीतच, ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-big-decision-in...

-----

निवडणूका जवळ आल्या वाटतं...

धर्मराजमुटके's picture

12 Jan 2022 - 9:09 pm | धर्मराजमुटके

हा कायदा / नियम अगोदरपासूनच आहे. अंमलबजावणी होत नाही त्याचे काही करता आले तर पहावे सरकारने.

मराठीत देवनागरी लिपीतील अक्षरे दुसऱ्या इंग्रजी किंवा अन्य लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती मंजूर करण्यात आली.

बहुधा हाच नवीन भाग असावा.

मदनबाण's picture

12 Jan 2022 - 7:37 pm | मदनबाण

मागच्या महिन्यात माझ्या वाचनात आलेली बातमी म्हणजे इस्रो आणि चायनीज मोबाईल कंपनी ओप्पो यांच्यात झालेला करार. !
ISRO ties up with Chinese tech giant Oppo for R&D of NavIC messaging service
ISRO-Oppo India deal: Row erupts over Chinese firm's collaboration with Indian space organisation

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुस्कुराहट की बनावट में छुपाए हमने गम, दिखावट की हंसी से दुनिया के सामने खड़े हैं हम |

सुक्या's picture

13 Jan 2022 - 5:10 am | सुक्या

https://www.loksatta.com/thane/unauthorized-construction-by-shiv-sena-ml...

मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा एक वादग्रस्त निर्णय ठाकरे सरकार ने घेतला आहे. शेतकर्‍यांच्या वीज पंपाचे बील कमी न करण्यासाठी महसुलाचे कारण देणार्‍या सरकारणे तब्बल २१ कोटी चा मलीदा एका अवैध बांधकाम करणार्‍या आपल्या सहकार्‍याला वाटला. आजवर कधीही न झालेली बाब.

अजुन किती खालची पातळी गाठणार आहेत कोण जाणे. विशेष म्हणजे लोकायुक्तांना मात्र वेगळे आश्वासन दिले होते.

ह्या सरकारचे खंदे समर्थक आता याचे कसे समर्थन करतील ते पहायचे आहे. नॉटी साले . . .

आग्या१९९०'s picture

13 Jan 2022 - 11:50 am | आग्या१९९०

कुठल्याच सरकारची पापे माफ करू नये,त्यांना योग्य पद्धतीने विरोध करावा हे माझे वैयक्तिक मत. आणि असे चुकीचे पायंडे पाडत असतील तर त्यांना विरोध केलाच पाहिजे. उगीच लंगडे समर्थन करून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेऊ नये. माझा गेले वर्षभर कायदेशीर लढा चालू आहे.
https://www.misalpav.com/comment/1098316#comment-1098316
नियमाप्रमाणे योग्य बिल येईपर्यंत बिल भरणार नाही आणि कृषिवीजबिल माफी नको असेही तक्रारीत नमूद केले आहे. महामंडळाच्या प्रोसेजरप्रमाणे तक्रार केल्यामुळे वीजजोडणी तोडू शकत नाहीत. सगळ्यात कहर म्हणजे पावसाळ्यानंतर वीज वापरत असूनही वापर शून्य दाखवत आहेत. त्याचीही तक्रार केली आहे.

लडाख महसूल विभागाने सरकारी नोकऱ्यांसाठी उर्दू अनिवार्य भाषा म्हणून रद्द केली आहे!

लडाखच्या प्रशासनाने मंगळवारी केंद्रशासित प्रदेशातील विविध सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीसाठी उर्दू ज्ञानाची अनिवार्य आवश्यकता काढून टाकली. सरकारने काढलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार महसूल विभागातील अनेक पदांसाठी 'पदवीसह उर्दूचे ज्ञान' ऐवजी 'कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी' अनिवार्य केली आहे.
सध्याच्या नियमांनुसार, नायब तहसीलदार, पटवारी आदींसह विविध सरकारी पदांवर भरतीसाठी उर्दूचे ज्ञान असलेले पदवीधर असणे बंधनकारक होते. परंतु बदललेल्या नियमांनुसार, या पदांसाठी केवळ पदवी पुरेसे असेल आणि उर्दूचे ज्ञान आवश्यक नसेल.
काश्मिरी राज्यकर्त्यांनी लडाखवर लादलेल्या परकीय उर्दू भाषेपासून मुक्ती दिल्यामुळे लदाख ला आता खरे स्वातंत्र्य मिळाले आहे - असे येथील खासदार नामग्याल म्हणाले आहेत.

Trump's picture

13 Jan 2022 - 12:53 pm | Trump

छान!!

सध्याच्या नियमांनुसार, नायब तहसीलदार, पटवारी आदींसह विविध सरकारी पदांवर भरतीसाठी उर्दूचे ज्ञान असलेले पदवीधर असणे बंधनकारक होते.

हे माहीतीच नव्हते.

मुक्त विहारि's picture

13 Jan 2022 - 2:02 pm | मुक्त विहारि

अतिशय उत्तम निर्णय

भाषा हा संस्कृतीचा गाभा असतो. ब्रिटिशांनी हेच ओळखून, इंग्रजी लादली.

यूपीचे आणखी एक मंत्री दारा सिंह चौहान यांनी योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला.
अखिलेश यादव यांनी त्यांचे समाजवादी पक्षामध्ये स्वागत केले आहे. समाजवादी पक्षाची ताकद उ प्र मध्ये वाढते आहे असे दिसते आहे. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले आहे की, जर त्यांच्या पक्षाला उत्तर प्रदेशात सत्ता मिळाली तर राज्यातील तरुण आणि विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉपचे वाटप केले जाईल.
यादव यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष जिंकल्यास घरोघरी ३०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे.
या फुकट खेळीमुळे दिल्ली प्रमाणे उत्तर प्रदेशात सत्ता पालटू शकेल.

चंद्रसूर्यकुमार's picture

13 Jan 2022 - 9:27 am | चंद्रसूर्यकुमार

उत्तर प्रदेशात अमुक एक होईल किंवा होणार नाही असे बोलणे याक्षणी धाडसाचे होऊ शकेल.

स्वामीप्रसाद मौर्य आणि आता हे दारासिंग चौहान हे मंत्री राजीनामा देऊन पक्षाबाहेर पडले ही खरी गोष्ट आहे. त्यांच्याबरोबर काही आमदारही गेले. असे म्हटले जात आहे की अजून काही आमदार पक्ष सोडून समाजवादी पक्षात जातील. पण भाऊ तोरसेकर म्हणत आहेत त्याप्रमाणे कशावरून हे सगळे लोक आपल्याला उमेदवारी नाकारली जाईल याची कुणकुण लागली म्हणून पक्ष सोडून जात नसावेत? अनेकदा केंद्र-राज्य सरकारविरोधात वातावरण नसेल पण स्थानिक आमदाराविरोधात लोकांच्या मनात असंतोष असेल आणि परत त्याच आमदाराला उमेदवारी दिल्यास स्थानिक पातळीवरील रोषाचा फटका बसून ती जागा गमावावी लागू शकते. असे बर्‍याच ठिकाणी झाले तर तितक्या जागा हातच्या जाऊ शकतात. अशा ठिकाणी उमेदवार बदलल्यास विजय मिळायची शक्यता वाढते. हे गणित लक्षात घेऊन भाजप ४५ ते ५० आमदारांना उमेदवारी नाकारणार आहे असे म्हटले जात आहे. त्या ४५-५० आमदारांमध्ये आपले नाव असेल ही कुणकुण लागली तर हे लोक पक्ष सोडून दुसरीकडे जाऊ शकतात.

बंगालमध्ये शुभेंदू अधिकारी हा ममतांचा एकेकाळचा उजवा हात तृणमूल सोडून भाजपमध्ये गेल्यावरही असेच वातावरण उभे केले गेले होते. नंतर काय झाले हे आपल्याला माहित आहेच.

अखिलेश यादव यांनी सांगितले आहे की, जर त्यांच्या पक्षाला उत्तर प्रदेशात सत्ता मिळाली तर राज्यातील तरुण आणि विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉपचे वाटप केले जाईल.

२०१२ मध्येही ते आश्वासन त्यांनी दिले होते ना? २०१४ मध्ये लोकसभेत भाजपचा मोठा विजय झाल्यावर मुलायमसिंग यादव म्हणाले होते की लोकांनी अखिलेशने दिलेल्या लॅपटॉपवर मोदींची भाषणे बघितली आणि मत मोदींना दिले.

प्रदीप's picture

13 Jan 2022 - 11:55 am | प्रदीप

मंत्री/आमदार आता ६ झाले आहेत असे फ्रीप्रेसच्या बातमीत म्हटले आहे. ह्या सहा जणांपैकी, मौर्य व चौहान हे बाहेरून भाजपांत गेल्या काही वर्षांत आले होते, असेही ही बातमी नमूद करते. इतर चौघांच्या बाबतीत असे काही त्या बातमीत तरी म्हटलेले नाही. इतरस्त्र ह्याविषयी संदिग्धताच दिसते, हे मुख्य प्रवाहांतील मीडियाच्या अलिकडच्या गुणधर्माशी साजेसेच वर्तन आहे. मौर्य प्रभृतींनाही, भाजप ओबीसीसाठी काहीच करत नसल्याचा साक्षात्कार आताच होणे हेही विलक्षणच--- किंवा, सध्याच्या वातावरणात, नाहीच.

प्रदीप's picture

13 Jan 2022 - 12:20 pm | प्रदीप

वरील प्रतिसाद लिहील्यावर लगेच पाहिले तर अजून एक, सातवे आमदार, मुकेश वर्मा ह्यांनीही भाजपचा त्याग केलेला आहे, असे समजले.

अर्थात, मुख्य प्रवाहांतील मीडिया अधिक काही सांगण्यास तयार नाही. पण हे संस्थळ सर्व आमदार/ खासदारांविषयी काही माहिती देते. त्यावरून मिळालेली माहिती अशी की...

Mukesh Varma 2012 BSP
Swamy Prasad Maurya 2021 BSP
Brijesh Kumar Prajapati ??
Bhagawati Prasad 2007 BSP
Vinay Shakya 2009 BSP (LS election candidate)
Roshan Lal Verma 2021 BSP
Dara Singh Chauhan 2014 BSP (LS election candidate)

(वरील साल व पक्ष, सदर व्यक्तिंच्या ह्याअगोदरच्या निवडणूकीची माहिती देतात).

म्हणजे ह्या सातांपैकी किमान सहाजण तरी पूर्वाश्रमीचे बसपाचे सभासद होते.

चंद्रसूर्यकुमार's picture

13 Jan 2022 - 12:23 pm | चंद्रसूर्यकुमार

एका अर्थी असे बाहेरून आलेले लोक जात आहेत हे चांगलेच आहे. असे महाराष्ट्रातही व्हावे आणि राष्ट्रवादीमधून घाऊक प्रमाणावर आलेले लोक परत स्वगृही जावेत ही इच्छा आणि अपेक्षा.

सहमत आहे....

प्रदीप's picture

13 Jan 2022 - 12:34 pm | प्रदीप

केजरीवाल कालपरवापर्यंत कोव्हिड्ग्रस्त असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्या पाश्वभूमीवर हा व्हिडीयो भयानक वाटतो-- साहेब गर्दीत मास्क खाली करून खोकताहेत. अर्थात सर्वकाही लोकांना फुकटात द्यायचे ह्या त्यांच्या धोरणाशी हे सुसंगतच आहे, म्हणायचे!

रायगड, लोहगड आता कुलाबा किल्ला! बांधले थडगे, अंथरली हिरवी चादर…

https://marathi.hindusthanpost.com/special/lohgad-fort-raigad-fort-shri-...
-------

ही गोष्ट खरी आहे का?

रावसाहेब चिंगभूतकर's picture

13 Jan 2022 - 5:37 pm | रावसाहेब चिंगभूतकर

https://youtu.be/Lsf-94UlThY

स्टिंग ऑपरेशन. आता हे सिद्ध समजायला हरकत नाही की PM ना थांबवणे आणि त्यांच्या सभांना जाणारी गर्दी रोखणे हा एक कट होता. पंजाब सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासन लागू करून कट करणाऱ्यांची मुंडी उडवणे हा सर्वात समर्पक मार्ग असेल.

चंद्रसूर्यकुमार's picture

13 Jan 2022 - 10:16 pm | चंद्रसूर्यकुमार

आम आदमी पार्टीने पंजाबचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असावा यासाठी लोकांची मते मागवली आहेत. त्यासाठी ७०७४८६०७४८ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा असे आवाहन केले आहे. मिस्ड कॉल देऊन त्यातून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असावा हे कॉल करणार्‍याचे मत कसे काय कळणार आहे काय माहित. २०१३ मध्ये केजरीवाल पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हाही लोकांकडून मिस्ड कॉल घेऊन काँग्रेसचा पाठिंबा घ्यावा की नाही याविषयी मते मागवली गेली होती. सामान्य माणसाला न समजणार्‍या गोष्टी नेत्याला समजल्या पाहिजेत. तेव्हा नेत्याने सामान्य लोकांनाच विचारून आपली पावले उचलली तर त्याला काय अर्थ राहिला?

निनाद's picture

14 Jan 2022 - 4:51 am | निनाद

सोमवारी, तामिळनाडू सरकारने वरधराजपुरममधील चेन्नईतील श्री नरसिंह अंजनेयर स्वामी मंदिर पाडले आहे.
स्तालिन हा हिंदू विरोधी आहे सतत दिसून आले आहे. या आधीही मुतननकुलम या तलावाच्या काठावर असलेले १२५ वर्षे जुने मंदिर त्याने पाडले होते. एमके स्टॅलिन यांनी तामिळनाडूमध्ये राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर मंदिर पाडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याच सरकारने कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे कारण देत पोंगल सारख्या हिंदू सणाच्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. मात्र अशी बंदी इतर कोणत्याही धर्माच्या कार्यक्रमांवर घातली गेली नाही.

मुक्त विहारि's picture

14 Jan 2022 - 9:46 am | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

चंद्रसूर्यकुमार's picture

14 Jan 2022 - 10:18 am | चंद्रसूर्यकुमार

जयललितांनी वाजपेयींना त्रास दिला होता म्हणून भाजप समर्थकांना अण्णा द्रमुकपेक्षा द्रमुक त्यातल्या त्यात बरा वाटतो असे अनेकदा बघितले आहे. पण रामचंद्रन आणि जयललिता या दोघांनीही असले प्रकार केले नव्हते. भाजप आणि द्रमुक यांच्यात मुळातच विचारांमध्ये हा फरक आहे. त्यामुळे वाजपेयींच्या सरकारमध्ये द्रमुक सहभागी असला तरी दोन्ही पक्ष एकमेकांबरोबर फार गुण्यागोविंदाने नांदत होते असे नक्कीच नाही.

तुषार काळभोर's picture

14 Jan 2022 - 11:12 am | तुषार काळभोर

महाराष्ट्रात जसा भाजपाला (जर गरज लागलीच तर...) इतर कोणाही पेक्षा शिवसेना हा जास्त सहज, सोयिस्कर सहकारी पक्ष आहे, तसा तमीळनाडूत (गरज आहेच..) अण्णा द्रमुक हा जास्त सहज आणि सोयिस्कर पक्ष आहे. द्रमुकचं कडवं द्रविडपण आणि कडवा उच्चवर्णीय हिन्दूविरोध भाजपाला मानवणारा आणि सोसवणारा नाही.

तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारांना तिकीट देतात, मग मला का नाही? उत्पल पर्रीकर यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

https://www.tv9marathi.com/elections/goa-assembly-election-2022/goa-asse...

------

घरचा अहेर मिळाला... भाजपने, ह्यातून योग्य तो धडा नक्कीच घ्यावा, ही अपेक्षा .... स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार देणे, इतपतच अपेक्षा आहे...

चंद्रसूर्यकुमार's picture

14 Jan 2022 - 11:19 am | चंद्रसूर्यकुमार

२०१४ मध्ये मनोहर पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेल्यावर त्यांनी पणजी या विधानसभा जागेच्या आमदारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तिथे पोटनिवडणुक झाली त्यात भाजपचे सिध्दार्थ कुंकळीणकर निवडून आले. त्या जागेवर उमेदवार म्हणून सिध्दार्थ कुंकळीणकर यांची निवड स्वतः मनोहर पर्रीकरांनी आपल्या कार्यकर्त्यांमधून केली होती. तेच २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकांमध्येही जिंकले. २०१७ मध्ये मनोहर पर्रीकर गोव्याला मुख्यमंत्री म्हणून परत आले त्यानंतर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन जागा परीकरांसाठी मोकळी केली होती. उत्पल पर्रीकरांना ते मनोहर पर्रीकरांचे पुत्र या एकाच कारणाने उमेदवारी दिली जायला नको हे मान्य. पण मागे म्हटल्याप्रमाणे बाबूश मोन्सेराटपेक्षा ते कधीही कितीतरी पटींनी चांगले उमेदवार ठरतील. पक्षासाठी काम केलेला उमेदवार हवा असेल तर मग या सिध्दार्थ कुंकळीणकरांचे नाव का डावलले जात आहे हे पण समजायला मार्ग नाही. बाबूश मोन्सेराट हा हरामखोर माणूस पक्षासाठी काम केलेल्या सिध्दार्थ कुंकळीणकरांपेक्षा चांगला उमेदवार वाटत असेल तर मग गोवा भाजप आत्मघाताकडे निघाला आहे हे नक्की.

रात्रीचे चांदणे's picture

14 Jan 2022 - 11:29 am | रात्रीचे चांदणे

गोव्यातील तिकीट वाटप कोण बघतय माहिती नाही परंतु फडणवीस चांगल्या कार्यकत्यावर अन्याय करायला पटाईत आहेत. महाराष्ट्रात तावडे, बावनकुळे आणि खडसे यांची तिकिटे अशीच कापण्यात आली. खडसेवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत म्हणून तिकीट दिले नसेल हे एकवेळ मान्य केलं तरी राणे सारख्याच्याकघरात मात्र एकापेक्षा जास्त तिकिटे देण्यात आली.

चंद्रसूर्यकुमार's picture

14 Jan 2022 - 12:08 pm | चंद्रसूर्यकुमार

फडणवीसच गोव्याचे प्रभारी आहेत :(

मुक्त विहारि's picture

14 Jan 2022 - 12:00 pm | मुक्त विहारि

सारखे उमेदवार, भाजपने, घेऊ नयेत

गंगाजल है सब पवित्र करेगा

गोवा भाजपच का.. महाराष्ट्र भाजपही त्याच वाटेवर आहे.

मुक्त विहारि's picture

14 Jan 2022 - 9:03 pm | मुक्त विहारि

आत्ताच काही निर्णय घेतले तर उत्तम....

झूल अंगावर चढवता येते, पण कातडे आहे तसेच राहते. निवडून येणे ही पात्रता न बाळगता, निवडून नाही आलात तरी चालेल पण, धोरणे बदलणे अयोग्य.

आमच्या पिढीने, शिवसेनेला विश्र्वासाने मतदान केले, पण आता शिवसेनेच्या हिंदूत्वावरचा विश्र्वास उडाला, भाजपच्या बाबतीत तरी ही गोष्ट व्हायला नको.

चंद्रसूर्यकुमार's picture

14 Jan 2022 - 11:35 am | चंद्रसूर्यकुमार

काल कोविडच्या परत बिघडत चाललेल्या परिस्थितीवर पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्याऐवजी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केले.

नेहमीप्रमाणे वाचाळवील संजय राऊत यावर बोलले आहेत की मुख्यमंत्री त्या बैठकीला जाऊ शकले नाहीत म्हणून काय झाले? राज्यात सगळे काही सुरळीत चालू आहे. https://maharashtratimes.com/latest-news/india-news/there-is-no-issue-if... . एक गोष्ट समजत नाही. राज्यात सगळे सुरळीत चालू आहे, आम्ही खूप लोकप्रिय आहोत, आम्ही अमुक आहोत, आम्ही तमुक आहोत या सगळ्या गोष्टी दरवेळेस बोलून का दाखवाव्या लागतात? जर का खरोखरच सगळे सुरळीत चालू असेल किंवा हे खूप लोकप्रिय असतील तर ते अगदीच उघडपणे दिसेल. ते परत परत सांगावे का लागते?

याविषयी ब्रिटनच्या माजी पंतप्रधान (ज्यांना iron lady असे म्हटले जायचे) मार्गारेट थॅचर यांचे एक वाक्य नेहमी आठवते- Being powerful is like being a woman. If you have to tell you are, you are not.

मुक्त विहारि's picture

14 Jan 2022 - 11:58 am | मुक्त विहारि

सतत एकच धोषा लावायचा ....

अर्थात, कितीही धोषा लावला तरी, निवृत्त नौसैनिकाला शिवसैनिकांनी मारहाण केली, ही छापील बातमी, मिटवू शकत नाहीत...

दारु पार्टी प्रकरण बोरिस जॉन्सन यांना भोवणार? भारतीय वंशाचा ‘हा’ नेता ब्रिटीश पंतप्रधान होण्याची दाट शक्यता

https://www.loksatta.com/desh-videsh/odds-favour-indian-origin-rishi-sun...
--------
ही खरी लोकशाही .... आपल्या देशांत, मास्क न लावता, लग्न कार्ये देखील होऊ शकतात, आणि नेते तर, लग्नात कितीही मंडळी बोलावू शकतात, असे होण्याची शक्यता आहे.... /strong>
------

ब्रिटन मध्ये, घराणेशाही नाही, ही बातमी म्हणजे, ह्याचा उत्तम पुरावा आहे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2022 - 9:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उत्तरप्रदेशातली निवडणूक रंगणार असे चित्र दिसायला लागले आहे. सद्य सरकारातल्या आत्तापर्यंत दोन मंत्री आणि आठ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. योगी मंत्रीमंडळातील केबीनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा देऊन ट्वीट करुन ”नाग रूपी आरएसएस एवं सांप रूपी भाजपा को स्वामी रूपी नेवला यू.पी. से खत्म करके ही दम लेगा” सध्या खळबळ उडवून दिलेली आहे. गेले दोन तीन दिवस भाजपा सोडून बाहेर पडणा-या नेते कार्यकर्त्यांच्या बातम्या येत आहेत. स्वामी प्रसार मौर्य हे मोठ्या संखेने सपात दाखल होतील असे वाटलेले नव्हते, असे अखिलेश यादव यांनी म्हटलेले आहे, आम्ही चारशे जागा जिंकु असा दावा केला आहे अर्थात निवडणुका म्हटले की दावे वगैरे करणे चालूच राहील. पण, भाजपावर किती परिणाम होईल हा प्रश्न महत्वाचा आहे. मला व्यक्तीगत वाटते की फ़ार परिणाम होणार नाही. जागा निश्चित कमी होतील परंतु सरकार बनवता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होणार नाही अर्थात लोकशाही आहे, लोक होत्याचं नव्हते करायला फ़ार वेळ घेत नाही.

केंद्रीय नेतृत्त्वावर याचा किती परिणाम होईल. तिकडेही मंत्रीमंडळात अनेकांचा जी गुदमरत असणार आहेच परंतु सध्या कोणी बाहेर पडणार नाही. कदाचित निवडणुका जवळ आल्यावर असे परिणाम तिकडेही होऊ शकतो.

-दिलीप बिरुटे

कोविड नियमांचे उल्लंघन ; अडीच हजार ‘सपा’ कार्यकर्त्यांविरोधात FIR दाखल

https://www.loksatta.com/elections/uttar-pradesh-election-fir-filed-agai...

-------
कोविड-१९ प्रकरणांमध्ये नव्याने वाढ झाल्याचे कारण देत निवडणूक आयोगाने १५ जानेवारीपर्यंत पाच निवडणूक राज्यांमध्ये सार्वजनिक रॅली, रोड शो आणि सभांवर बंदी घातली आहे. त्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचे आदेशही दिले आहेत. यामुळेच निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार यूपी पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहेत.

काळजाचा ठोका चुकवणारे थरारनाट्य; मंडळ अधिकारी, तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

https://www.tv9marathi.com/maharashtra/other-district/nandurbarattempt-b...

--------

ह्या राजवटीत, सरकारी अधिकारी वर्गावर हल्ले चालूच आहेत. ठाण्यात देखील, एका पालिका कर्मचारीवर हल्ला झाला होता.
--------

शाम भागवत's picture

15 Jan 2022 - 5:12 pm | शाम भागवत

महाराष्ट्रातील १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्ट उठवणार अशी चिन्हे दिसत आहेत. ६० दिवसांपेक्षा जास्त दिवसांचे निलंबन योग्य नसल्याची टिपण्णी सुप्रिम कोर्टाने केलेली आहे. यावर सरकारी वकिलांनी आपला युक्तिवाद लागलीच आवरता घेऊन, सरकारशी सल्लामसलत करण्यासाठी मुदत मागून घेतली.

येत्या मंगळवारी कोर्टात सुनावणी आहे. जर कोर्टाने निलंबन उठवले तर मात्र सरकारची नव्हे तर महाराष्ट्र विधानसभेची नाचक्की होईल. कारण अधिवेशन चालू नसल्याने अध्यक्ष निलंबन रद्द करू शकत नाहीत व चूक सुधारू शकत नाहीत. सुप्रिम कोर्टाला विधानसभा अध्यक्षाच्या अधिकारांमधे ढवळाढवळ करायला निमित्त मिळाल्यामुळे संबंधीत तालिका अध्यक्षांचे नाव अजरामर होणार हे नक्की. कारण हा निर्णय आता पायाभूत निर्णय म्हणून समजला जाण्याची शक्यता आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

15 Jan 2022 - 5:40 pm | चंद्रसूर्यकुमार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर मतदारसंघातून निवडणुक लढविणार आहेत. भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली त्यात हा उल्लेख आहे. आतापर्यंत योगी अयोध्येतून निवडणुक लढवतील असे म्हटले जात होते. नेहमीप्रमाणे संजय राऊत यांनी 'योगींविरोधात आम्ही अयोध्येत उमेदवार देऊ' असे म्हटले. पण योगी आपल्या शहरातून- गोरखपूरमधूनच निवडणुक लढवणार आहेत.

समाजवादी पक्षाकडून अखिलेश यादव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील हे नक्कीच आहे. पण ते विधानसभा निवडणुक लढविणार नाहीत. बसपा सत्तेत आल्यास मायावतीच मुख्यमंत्री होणार हे पण वेगळे सांगायला नको. पण या बबुआ आणि बुआंपैकी कोणीच निवडणुक लढविणार नाहीये. काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ही चर्चाच निरर्थक आणि हास्यास्पद आहे त्यामुळे तो प्रश्नच उभा राहत नाही. विधानसभा निवडणुकांमध्ये एक चेहरा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणला जातो तेव्हा त्याने निवडणुक लढवायला नको का? हे नितीशकुमारांविषयी पण लागू आहे आणि २००९ मध्ये मनमोहनसिंगांविषयीही तितकेच लागू आहे.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

15 Jan 2022 - 7:59 pm | रावसाहेब चिंगभूतकर

संजय राऊत याना त्यांच्या घरात तरी कोणी सिरियसली घेत असतील की नाही शंका आहे

चंद्रसूर्यकुमार's picture

15 Jan 2022 - 8:03 pm | चंद्रसूर्यकुमार

तरीही महाराष्ट्र राज्यपातळीवर संजय राऊत माझे सगळ्यात आवडते नेते आहेत. अखंडपणे गुडघ्यातले बोलून खरं तर बरळून कित्येक मते ते आपल्या बाजूला वळवत असतील. केंद्रीय पातळीवर मणीशंकर अय्यर याच कारणाने माझे सगळ्यात आवडते नेते आहेत. महाराष्ट्रात राऊतांच्या खालोखाल नाना पटोले आवडतात.

सुक्या's picture

16 Jan 2022 - 8:52 am | सुक्या

https://timesofindia.indiatimes.com/india/india-bags-order-from-philippi...

भारताची एक शस्र आयातदार देश अशी ओळख जाउन आता शस्र आयातदार/ निर्यातदार अशी होइल. एके काळी सैन्याला दारुगोळा मिळवण्यासाठी सरकार कडे भीक मागावी लागत असे. सरकार कडे पैसे नाही हे कारण देऊन अनेक वर्षे सैन्याचे अधुनिकिकरण थांबवले गेले होते.

त्या अनुशंगाने आता हा बदल नक्कीच सुखावणारा आहे ...

पाकिस्तानची पहिलीवहिली Security Policy जाहीर, हिंदुत्व हा देशासाठी धोका असल्याचा दावा

-------
आता उदारमतवादी हिंदू काय मत व्यक्त करणार?

राजा जयचंदच्या चुकीचे परिणाम, आत्ता दिसायला लागले.

मी तरी, राजा जयचंदच्या पावला वर पाऊल टाकणार नाही...

शेतीमालाच्या दराला उतरती कळा, त्यात व्यापाऱ्यांचा अजब कारभार, नेमके काय झाले खामगाव बाजार समितीमध्ये?

https://www.tv9marathi.com/agriculture/irregularities-in-auction-by-trad...

असे होऊ नये, यासाठीच, भाजपने शेतकरी वर्गाला हितकारक, असे कायदे आणले होते.

आता, महाराष्ट्र सरकार, शेतकरी वर्गासाठी, काय उपाय योजना करणार? हे बघणे रोचक ठरेल...

चंद्रसूर्यकुमार's picture

16 Jan 2022 - 1:03 pm | चंद्रसूर्यकुमार

पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपने बाबूश मोन्सराट या हरामखोराला उमेदवारी दिली आहे. पक्षाच्या या निर्णयाचा निषेध. जर उत्पल पर्रीकर अपक्ष म्हणून उभे राहणार असतील आणि मुख्य म्हणजे शिवसेनेशी काही संबंध नसेल तर पणजीतल्या लोकांनी त्याला मत द्यावे असे वाटते.

मुक्त विहारि's picture

16 Jan 2022 - 1:34 pm | मुक्त विहारि

+1

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Jan 2022 - 1:56 pm | अमरेंद्र बाहुबली

पक्षाचाच निषेध. अजूनही काही लोकांचे डोळे ऊघडलेले नाहीत.

मुक्त विहारि's picture

16 Jan 2022 - 5:21 pm | मुक्त विहारि

उडदामाजी काळेगोरे असणारच

पण, कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांपेक्षा, हिंदू हितवादी भाजप, मला तरी आवडते....

बाय द वे,

नौसैनिकाला मारहाण केली, त्या पक्षा बद्दल, तुमची भुमिका काय आहे?

सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली, त्या पक्षा बद्दल तुमची भुमिका काय आहे?

हिंदू माणसाला जीवे मारण्याची धमकी दिली, त्या पक्षा बद्दल तुमची भुमिका काय आहे?

असो,

घराणेशाहीचा उदो उदो करण्यापेक्षा, थोडेफार वाचन करावे, हे उत्तम. चला आता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, इतिहास वाचायला घेतो..

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Jan 2022 - 5:49 pm | अमरेंद्र बाहुबली

१९४७ नंतर पुढे वाचावा.

मुक्त विहारि's picture

16 Jan 2022 - 6:36 pm | मुक्त विहारि

बर्र

मुक्त विहारि's picture

16 Jan 2022 - 6:46 pm | मुक्त विहारि

‘ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना’ शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरुन राजकारण तापलं!

https://www.tv9marathi.com/politics/amaravati-mla-ravi-rana-criticises-s...

ही अशी भिजत घोंगडी ठेवण्यापेक्षा, आधीच योग्य तो निर्णय द्यायला हवा होता...

बाबरी मस्जिद पाडली कुणी? आणि श्रेय कुणी उपटले?

आपण, एका रुपयांत मिळणारी, झुणकाभाकर पचवली नसल्याने, आपल्याला असे प्रश्र्न पडणार नाहीत.

Trump's picture

16 Jan 2022 - 7:44 pm | Trump

बेकायदेशीर पुतळा असेल तर हटवण्यास काय हरकत आहे?

‘ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना’ शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरुन राजकारण तापलं!

मुक्त विहारि's picture

17 Jan 2022 - 11:16 am | मुक्त विहारि

पण, हे स्पष्टीकरण शासनाकडून वेळीच अपेक्षित होते.

म्हणून तर म्हणालो की, भिजत घोंगडी ठेवू नयेत.

बाबूश मोन्सराट यांना उमेदवारी देणे चुकीचे असेल पण उत्पल यांनी केवळ आपण " मनोहरांचे पुत्र म्हणुन उमेदवारी द्या" हा हट्ट धरणे चुकीचे आहे? मग काँगेस आणि भाजपात फरक तो काय ?

चंद्रसूर्यकुमार's picture

17 Jan 2022 - 10:34 am | चंद्रसूर्यकुमार

नक्कीच.

याविषयी वर लिहिलेच आहे. मनोहर पर्रीकरांचे पुत्र हे एकमेव क्वालिफिकेशन असेल तर उत्पलना उमेदवारी द्यायला नको. पण सध्या भाजपने पणजीमध्ये ज्याला उमेदवारी दिली आहे तो मनुष्य गुंड आहे. बलात्कारापासून अनेक आरोप त्याच्या नावावर आहेत. असल्या हरामखोराला उमेदवारी का द्यायची आहे? आणि तो मुळचा भाजपचा थोडीच आहे? काँग्रेसमधून उचलून त्याला पक्षात घेऊन गळ्यातले लोढणे घेतले आहे. त्याच्यापेक्षा उत्पल नक्कीच चांगले उमेदवार नाहीत का?हा फरक आहे.

जर पक्षाने बाबूश मोन्सेराटला उमेदवारी न देता सिध्दार्थ कुंकळीणकरसारख्या पक्षासाठी काम केलेल्याला, मनोहर पर्रीकरांनी आपल्या विधानसभा जागेवर उमेदवार म्हणून आपल्या कार्यकर्त्यांमधून निवडलेल्याला उमेदवारी दिली असती तर मी पण उत्पलचा दावा अयोग्य आहे असेच म्हटले असते आणि तो एक बंडखोर असेच म्हटले असते. पण बाबूश मोन्सेराटसारखा हलकट माणसाला उमेदवारी देणे पक्षाचा समर्थक म्हणून मला आणि माझ्यासारख्या अनेकांना मान्य नाही हे नक्कीच. त्याच्यापेक्षा स्वच्छ चारित्र्याचा कोणीही उमेदवार चालेल.

चंद्रसूर्यकुमार's picture

17 Jan 2022 - 11:08 am | चंद्रसूर्यकुमार

आणि त्यातही उत्पल जर शिवसेनेत गेले किंवा अपक्ष उमेदवार म्हणून लढत असताना शिवसेनेची कोणतीही मदत घेतली तर मात्र त्यांच्याविषयी असलेली सद्भावना पूर्ण संपेल. आता जी काही थोडीफार सद्भावना (आदर नव्हे) त्यांच्याविषयी आहे ते मनोहर पर्रीकरांचे पुत्र म्हणून आहे. तेच मनोहर पर्रीकर हयात असताना संजय राऊतांनी (आणि उद्धव ठाकरेंनी सुध्दा) त्यांच्याविषयी सामनामधून गटारगंगा वाहिली होती हे पण वर लिहिलेच आहे. एखादा माणूस हयात असताना त्याला शिव्या घालायच्या आणि गेल्यावर मात्र 'तो कित्ती कित्ती चांगला होता' म्हणून गळे काढायचे हे ढोंग आहे. अपेक्षेप्रमाणे राऊत आणि ठाकरे ते करत आहेत. अशा शिवसेनेचा पाठिंबा/मदत उत्पलनी घेतली तर मात्र ती सद्भावना पूर्ण जाईल. शेवटी माझ्यासारख्यांना मनोहर पर्रीकरांना आदर द्यावासा वाटतो. तो त्यांच्या मुलाला आपोआप मिळणार नाही. आणि स्व.मनोहर पर्रीकरांना शिव्या घालणार्‍यांच्याच बरोबर त्यांचे पुत्र गेले तर मग इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा या न्यायाने उत्पलही मनोहर पर्रीकरांविषयी आदर वाटणार्‍यांच्या रोषाचे धनी ठरतील हे पण तितकेच खरे.

बाबूश मोन्सराट या अत्यंत हलकट आणि नराधमाबद्दल आठ, दहा वर्षांपूर्वीच ऐकले होते.
गोव्यात पणजी, पर्वरी, फोंडा, मडगाव येथे नातेवाईक आहेत आणि सगळ्यांकडून मोन्सराटला खच्चून शिव्या घालताना ऐकले आहे.
भाजपाने ही घाण घेऊन वर उमेदवारी पण दिली. अवघड आहे

पूलाच्या उद्घाटन प्रसंगी सेना-राष्ट्रवादी संघर्ष चव्हाट्यावर; NCP कडून ‘जितेंद्र आव्हाड आगे बढो’च्या घोषणा तर सेनेकडून…

https://www.loksatta.com/thane/shivsena-vs-ncp-verbal-fight-during-ignor...
-----

ये तो होना ही था ....

बोका's picture

16 Jan 2022 - 9:39 pm | बोका

एलॉन मस्कला आपापल्या राज्यात येण्याची आमंत्रणे अनेक मंत्र्यांनी दिली आहे. प. बंगाल सुद्धा मागे नाही !em

सुक्या's picture

17 Jan 2022 - 6:31 am | सुक्या

मस्त . . . हे राजकारणी लोक काय खाउन इतके मस्त खोटे बोलतात काय माहीत.
हीच व्हिजन (म्हणजे दीदी ची व्हिजन) टाटा चा प्लांट टाकायच्या वेळेस कुठे गेली होती?
"बेन्गाल मीन्स बिझिनेस्स" हे पन लय भारी . . . ह ह पु वा.

मुक्त विहारि's picture

17 Jan 2022 - 11:19 am | मुक्त विहारि

सहमत आहे

Texas Attack: १० तासांच्या थरारनाट्यानंतर सिनेगॉगमधील ओलिसांची मुक्तता, हल्लेखोर ठार

https://maharashtratimes.com/international/international-news/us-news-su...

-------

पाकिस्तानी वंशाची अमेरिकी मेंदूतज्ज्ञ आफिया सिद्दीकी हिच्या सुटकेसाठी हल्लेखोराने हा हल्ला केला होता, अशी मागणी हल्लेखोराने केली होती. हल्लेखोराचे नाव महंमद सिद्दीकी होते, असे वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वेबसाइटने दिले आहे.

आफिया सिद्दीकी मूळची पाकिस्तानी नागरिक आहे. तिने बोस्टनमधून मास्टर्स आणि पीएच डी मिळ‌वली आहे. अल् कायदाशी संबंध असल्याच्या आरोपावरून तिला अफगाणिस्तानातील गझनी प्रांतात २००८मध्ये अटक करण्यात आली होती. तिला 'लेडी अल् कायदा' नावाने ओळखले जाते.

चंद्रसूर्यकुमार's picture

17 Jan 2022 - 2:07 pm | चंद्रसूर्यकुमार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गोव्यात घरोघरी जाऊन प्रचार करत असल्याबद्दल श्री.रा.रा संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केली. त्यावर 'आम्ही काय करावे हे संजय राऊतांनी सांगायची गरज नाही. त्यांनी आपल्या पक्षाचे बघावे' असे प्रत्युत्तर केजरीवालांनी दिले.

एक गोष्ट कळत नाही. आपण काय करावे हे न बघता इतर सगळ्या जगाने काय करावे हे सांगण्यात संजय राऊत एकदम तज्ञ आहेत. मला स्वतःला केजरीवाल हा मनुष्य अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही. गेल्या ७-८ वर्षात मिपावर मी ते वेळोवेळी लिहिलेही आहे. तरीही कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतः पक्ष शून्यातून उभा करणे आणि दिल्लीत दोनदा विधानसभा निवडणुक अगदी दणक्यात जिंकणे ही गोष्ट त्यांनी साध्य केली आहे. त्यांचे हे श्रेय कोणीच नाकारू शकत नाही. शिवसेनेने स्वबळावर मुंबई महापालिकेतही एकदाही बहुमत मिळवलेले नाही आणि निघालेत दिल्लीत ९०% विधानसभा जागा जिंकणार्‍याने काय करावे हे सांगायला. स्वयंभू असलेला कोणताही नेता एकाबरोबर युती करायची, त्याच्या नावावर आमदार निवडून आणायचे आणि मग सत्तेसाठी विरूध्द बाजूला जायचे असले आयत्या बिळातील नागोबाप्रमाणे प्रकार करणार्‍या ठाकरे आणि संजय राऊत या उपटसुंभांना हिंग लाऊनही विचारणार नाही हे अगदी समजण्यासारखे आहे.

जे काही असेल ते. मला आप आवडत नाही आणि शिवसेना तर त्याहूनही आवडत नाही. तरीही हे सगळे विरोधी पक्ष आपापसात लहानसहान कारणाने भांडत आहेत आणि २०२४ मध्ये मात्र मोदींविरोधी सगळ्या विरोधी पक्षांची मोठी आघाडी बनणार अशा गोष्टी चालू आहेत.

सुखीमाणूस's picture

17 Jan 2022 - 11:14 pm | सुखीमाणूस

बर आहे या फुकटातल्या करमणुकीवर कर नाही भरावा लागत ते.

राउतराव अजुन इम्रान खानला कसे काही शिकवायला गेले नाहीत?

चंद्रसूर्यकुमार's picture

17 Jan 2022 - 3:08 pm | चंद्रसूर्यकुमार

संत रविदास जयंतीनिमित्ताने पंजाबमधील अनेक मतदार बाहेर असल्याने १४ फेब्रुवारी ही मतदानाची तारीख बदलायची मागणी होत होती. तशी मागणी सगळ्याच पक्षांनी केली होती. त्याप्रमाणे निवडणुक आयोगाने ती मागणी मान्य करून मतदान १४ ऐवजी २० फेब्रुवारीला घेण्यात येईल अशी घोषणा केली आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

17 Jan 2022 - 3:23 pm | चंद्रसूर्यकुमार

मुंबई महापालिकेतील प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ करायचा राज्य सरकारने डिसेंबर महिन्यात निर्णय घेतला होता. त्याविरोधात भाजप नगरसेवक कोर्टात गेले होते. मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे त्यामुळे आता मुंबई महापालिकेत २३६ प्रभाग असतील. त्यामुळे प्रभागांच्या सीमांची पुनर्रचना करावी लागेल. त्यासाठी राज्य सरकारने कसलेही काम चालू केले आहे (कुठली समिती/कमिशन नेमले आहे) अशाप्रकारची बातमी मी तरी वाचलेली नाही. तेव्हा यापुढे ते काम सुरू झाले तरी नागरिकांच्या सूचना/अभिप्राय/मते वगैरे मिळून काम पूर्ण करायला महिना दीड महिनाही गेला तरी आश्चर्य वाटू नये. मग या प्रभागांच्या सीमांविरोधात कोणी कोर्टात गेल्यास महाविकास आघाडी सरकारसाठी अगदी सोन्याहूनही पिवळे. कारण मग त्या परिस्थितीत मुंबई महापालिका निवडणुक टाळायचे कारण मिळेल. मग लवकरच पाऊस सुरू होईल त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरशिवाय ही निवडणुक न घ्यायचे कारण मिळेल.

सध्या ज्या प्रकारे कारभार आणि सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यावरून आणि मुंबई महापालिकेत कित्येक वर्षे सत्ता असल्याने प्रस्थापितविरोधी मतांचा जोरदार फटका आपल्याला बसून शिवसेनेचा अभूतपूर्व पराभव होईल ही शक्यता नक्कीच असल्याने महाविकास आघाडी ही निवडणुक शक्य तेवढी लांबणीवर टाकायचा प्रयत्न करणार हे उघड आहे. जर प्रभागांची संख्या वाढवायची होती तर ते काम, हरकती वगैरे सगळ्या गोष्टी डिसेंबरपर्यंत पूर्ण होऊन मग वेळापत्रकाप्रमाणे फेब्रुवारीत निवडणुक घेण्याच्या दृष्टीने काम सुरू करणे शक्य होते. त्यासाठी मग हा प्रभागांची संख्या वाढवायचा निर्णय मे-जून किंवा फार तर जुलै महिन्यात घ्यायला लागला असता. तो तेव्हा न घेता डिसेंबरमध्ये घेतला याचाच अर्थ निवडणुका शक्य तितक्या लांबवायच्या हा महाविकास आघाडी सरकारचा उद्देश स्पष्ट दिसतच आहे. कोरोनाच्या वाढत्या आकड्यांचे निमित्त करून निवडणुक पुढे ढकलावी म्हणावे तर पाच राज्यात विधानसभा निवडणुक होत असल्याने आणि त्यात गोवा-युपीमध्ये शिवसेनाही मोठ्या उत्साहात सहभागी होणार असल्याने (तिथे त्यांना काळं कुत्रही विचारत नाही ही गोष्ट वेगळी) त्या कारणाने मुंबईतल्या निवडणुका पुढे कशा ढकलणार? तेव्हा हे आता प्रभागांच्या पुनर्रचनेचे काम आहे हे कारण आयते मिळाले आहे असे दिसते. या निवडणुका पावसाळा होण्यापूर्वी झाल्या तर आश्चर्य वाटेल.

अर्थात या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलता येणार नाहीत. जर नेमेची येणार्‍या पावसाळ्यानंतर लगेच निवडणुक घ्यावी लागली तर सालाबादप्रमाणे पाणी तुंबणे वगैरे गोष्टी होऊन त्यामुळे मुंबईकरांना त्रास झाला तर तो त्रास आठवणीत अधिक ताजा असल्याने (फेब्रुवारीत निवडणुक झाली असती तेव्हा जितका असता त्या तुलनेत) त्याचा जास्त फटका शिवसेनेला बसायची शक्यता मात्र आहेच.

मुक्त विहारि's picture

18 Jan 2022 - 2:29 pm | मुक्त विहारि

भाजप सत्ते बाहेर राहील...

महापौर शिवसेनेचा पण अधिकार मात्र, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, यांच्याकडे राहतील ...

येत्या विधानसभा आणि लोकसभेच्या साठी, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेला आत्ता चुचकारतील...

भावी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदासाठी, महापौरपदाचे प्यादे बळी देतील...

अर्थात, ह्याची सगळी भरपाई, विधानसभा आणि लोकसभेच्या वेळी, दोन्ही कॉंग्रेस, शिवसेनेकडून सव्याज वसूल करतील...

शिवसेनेची धोरणे पसंत नाहीत, पण .... असे हाल व्हायला नकोत ...

हिंदू की मराठी, ह्यात, माझा कल तरी हिंदू हितवादी असल्याने, भाजप शिवाय मला पर्याय नाही ... धर्म प्रथम ...

१९९६ बालहत्याकांडातील आरोपी सीमा आणि रेणुका गावित या बहिणींची फाशीची शिक्षा रद्द; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे

https://www.loksatta.com/mumbai/mumbai-high-court-pronounce-judgement-on...

ह्या राजवटीत, साधू हत्याकांड होते पण फाशीची शिक्षा झालेले सुटतात...

कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, जनतेच्या भल्यासाठी नाहीत .... हे माझे वैयक्तिक मत आहे....

सर टोबी's picture

19 Jan 2022 - 9:23 am | सर टोबी

दयेच्या अर्जावर वेळेत निर्णय घेतला नसल्यामुळे फाशीची शिक्षा अमलात आणण्याची वेळ टळून गेली होती. थोडी सबुरी दाखवत चला आपले प्रेम व्यक्त करताना.

आग्या१९९०'s picture

19 Jan 2022 - 9:31 am | आग्या१९९०

"मी पुन्हा येईन" वर विश्वास ठेवणाऱ्यांना पहाटेचा शपथविधी फियस्को झाल्यापासून तडफड होतेय बिजेपि समर्थकांची. चालायचेच. निचरा होणे गरजेचे.

चौकस२१२'s picture

19 Jan 2022 - 9:50 am | चौकस२१२

आग्या चला होऊन जाऊद्या
१) फडणवीस आणि भाजप ने तो पहाटेचा खेळ करून आपली पत/ इज्जत घालवली हे अगदी १००% मान्य - त्यामागचे कारण काही का असेना

२) पण मग हे सांगा कि त्यात ५०% सहभागी असलेले माननीय अजितदादा यांना काय बरे शिक्षा मिळाली? स्वतःच्या पक्षाशी अशी जाहीर बेईमानी करून?
पक्ष बदलणं हे वेगळे आणि असा चक्क खोटे पण करणे हे , वेगळे,
एकवेळ राष्ठ्रवादीतच काकांना ना शह देऊन पक्षाची रणनीती जाहीर पने बदलली असती तरी समजले असते ( राष्ट्रीय मध्ये अंतर्गत लोकशाही आहे हे गृहीत धरलाय !)
द्याल उत्तर ? हेच जर उद्य्या दुसऱ्या एखाद्या रुजलेलय लोकशाहीत कोणी एखाद्या वरिष्ठ नेत्याने केले असते तर त्यःची जवळ जवळ संपली असती !
का आपला "इमोशल हाय त्यो " म्हणून एका चॉकलेट मध्ये विषय संपवयाचा !
मी जर राष्ट्रवादी चा कार्यकर्ता असतो तर निश्चित जाब विचारला असता ! तुम्ही?

सुबोध खरे's picture

19 Jan 2022 - 11:25 am | सुबोध खरे

त्यात ५०% सहभागी असलेले माननीय अजितदादा यांना काय बरे शिक्षा मिळाली?

आपली ती सर्दी आणि दुसऱ्याचा करोना असतो साहेब

जरा समजून घ्या कि.

अशे प्रश्न विचारायचे नसतात चौकस२१२. अजितदादा म्हणजे अजितदादा आहेत. त्यांनी कुठलेही धंदे केले तरी ते कायम धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतात. अगदी अजितदादा पण मी कुठे काय केले वगेरे अभिर्भावात असतात. पहाटेचा तो शपथविधी कुठल्याही भाजप समर्थकाला पटला नव्हता. तशी नाराजी अगदी फडणवीसांपर्यंत गेली होती. फडणवीस यांनी पण ती चुक मान्य केली आहे.

पण अजितदादा मात्र आपण त्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंतत्री पदाची शपथ घेतली होती हे विसरुन त्यावर भाष्य करत असतात. त्यांच्या समर्थकांना ती एक खेळी वाटते. बाकी त्या घटने नंतर अजित पवार एक बिनभरवशाचा माणुस आहे, काकांपुढे त्याला काहीही किंमत नाही हेच अधिरेखित झाले.

बाकी शिक्षा वगेरे मिथ आहे. त्यांना कुणी तिथे जबर्दस्ती आणले नव्हते. पण त्या पक्षात जाब विचारला की मार पडतो .. खुप उदाहरणे आहेत ... .

आग्या१९९०'s picture

19 Jan 2022 - 1:58 pm | आग्या१९९०

मी जर राष्ट्रवादी चा कार्यकर्ता असतो तर निश्चित जाब विचारला असता ! तुम्ही?
मीही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नसल्याने जाब विचारू शकत नाही.

रात्रीचे चांदणे's picture

19 Jan 2022 - 9:45 am | रात्रीचे चांदणे

दयेच्या अर्जावर नक्की कोणी निर्णय घेतला नाही, कोर्टानुसार तर अमलबजावणी न झाल्यामुळें फाशी रद्द करून जन्मठेप केली आहे.

बातमी पुर्ण वाचल्यावर कळले की फाशीच्या अमल्बजावणील राज्य सरकारने विलम्ब लावला म्हणुन आरोपी बहीणी याचिका करु शकल्या.

राज्य सरकारला राज्यपालान्चे अधिकार कमी करणे व त्यासाठी नियम बदलणे यासाठी वेळ आहे.

घटनेनुसार राज्यपाल हे पद राज्यान्वर अन्कुश ठेवायला केले आहे. त्यातुन देशभर केन्द्र सरकारचा राज्य सरकारन्बरोबर समन्वय राहील आणी देश एकसन्ध राहील.
जेव्हा राज्यपाल पद काढुन टाकावे असे राज्य सरकार म्हणतात तेव्हा ती मात्र घटनेची पायमल्ली नसते. सन्विधान धोक्यात नसते.
कीती दुटप्पी राजकारण आहे हे.

विरोधी पक्शाना केन्द्रात निवडुन न येण्याची एवढी खात्री आहे कि राज्यात निरन्कुश सत्ता मिळवायला आटापिटा चाललाय. पण भविष्यात केन्द्रात मोदी विरोधक आणि राज्यात भाजपा आली तर काय करणार?

sunil kachure's picture

18 Jan 2022 - 2:54 pm | sunil kachure

भक्त विहरी है पात्र लय भारी आहे

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Jan 2022 - 6:03 pm | अमरेंद्र बाहुबली

खीक्क. आम्हीही ह्या एकपात्री प्रयोगाचा आनंद घेतोय. :)

सुखीमाणूस's picture

19 Jan 2022 - 1:02 pm | सुखीमाणूस

मतप्रदर्शन करते आहे. पात्र नक्किच सच्चे आहे.
इथे काही जणाना बरेच अवतार घेउन comments करायला यावे लागते आणि ते जास्त करुन मन्द गुलाम असतात.

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांना धमकी

गेल्या आठवड्यात पंतप्रधानांच्या सुरक्षेतबाबत कारवाईची मागणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना खलिस्तान समर्थकांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सुमारे डझनभर वकिलांनी धमकीचे फोन आल्याचा दावा केला. शिख फॉर जस्टिसच्या वतीने त्यांना इंग्लंडच्या क्रमांकावरून हे कॉल आले होते....

-------

कॉंग्रेसने केलेल्या चुकीचे परिणाम आहेत.

घराणेशाहीचे समर्थन करणार्या, मतदारांना हे समजेलच असे नाही ...

मुंब्र्यात महापालिका सहाय्यक आयुक्तांवर फुटलेली काच घेऊन हल्ल्याचा प्रयत्न; आरोपी अद्याप मोकाट

https://www.loksatta.com/thane/tmc-official-attacked-in-mumbra-sgy-87-tl...
------

मुंब्रा स्थानक परिसरात सार्वजनिक रस्त्यावर मोहम्मद सलीम कुरेशी याने हा रस्ता त्याच्या मालकीचा असल्याचा दावा करत याठिकाणी पाण्याच्या टाक्यांचे अडथळे उभारले होते....

ह्याच राजवटीत, कल्पिता पिंपळे यांच्यावर देखील हल्ला झाला होता.....

---------

नागपुरातील अल्पवयीन मुलीला युवकाने पळविले; दोन वर्षांनी परतली ती बाळासहच!

https://www.tv9marathi.com/maharashtra/nagpur/a-minor-girl-from-nagpur-w...

------

काळजी घ्या....

निनाद's picture

19 Jan 2022 - 3:32 am | निनाद

पोस्को लावला पाहिजे त्या वसीम खान कय्युम खानला?

मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो, नाना पटोले यांचं आक्षेपार्ह वक्तव्य

------
https://maharashtratimes.com/maharashtra/bhandara/maharashtra-congress-p...

---------

परमपूज्य राहूल गांधी, तर म्हणतात की कॉंग्रेस "अहिंसावादी" आहे ....

धर्मराजमुटके's picture

18 Jan 2022 - 7:31 pm | धर्मराजमुटके

पंजाब निवडणूकीसाठी मुख्यमंत्री पदासाथी भगवंत मान यांचे नाव आप ने जाहिर केले आहे. आता काँग्रेस ने सिद्धू यांचे नाव जाहिर करावे आणि भाजपा ने देखील एखादा असाच उमेदवार पहावा म्हणजे कॉमेडी शो बघीतल्याची मजा येईल.

Trump's picture

18 Jan 2022 - 8:46 pm | Trump

भगवंत मान

यांची काय कथा आह?

सिद्धूची माहीती आहे.

हे तेच महोदय आहेत ना ज्यांनी फेसबुक लाईव करुन संसदेच्या सेक्युरीटीची माहीती सार्‍या जगाला दिली होती?
नवीन नवीन खासदार झाले होते तेव्हा . . .

हो. लोकसत्तामध्ये वाचले.
त्यांनी सुध्दा सुरवात विनोदक म्हणुनच केली होती.

कपिलमुनी's picture

18 Jan 2022 - 10:15 pm | कपिलमुनी
निनाद's picture

19 Jan 2022 - 3:39 am | निनाद

हिंदुत्वविरोधी दंगलीत दिलबर नेगी यांची निर्घृण हत्या करणाऱ्या ताहिर, शाहरुख, फैजल आणि अन्य ३ जणांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे!
दंगलखोरांच्या जमावाने दिलबर नेगी यांचे हात-पाय कापले होते. प्रत्यक्षदर्शींनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की दंगलखोरांनी दगडफेक केली, हिंदुविरोधी घोषणा दिल्या आणि अनेक दुकाने आणि घरे जाळली. त्यांनी असेही नमूद केले की दंगलखोर एका इमारतीत घुसले आणि इमारतीत लपून बसलेल्या मृताची हत्या केली. इमारतीसह त्याचा मृतदेह जाळण्यात आला.

भारतीय न्यायालयातून हिंदू विरोधी लोक सहज सुटून जातात का?
यांचे वकील कोण आहेत?

रावसाहेब चिंगभूतकर's picture

19 Jan 2022 - 8:37 am | रावसाहेब चिंगभूतकर

काही तर याच फोरम वर सुद्धा आहेत. भारताचे पंतप्रधान वर्ल्ड फोरम मध्ये बोलत असताना त्यांचा टेलिप्रोम्प्टर बंद पडला असल्याबद्दल आपल्याच देशाच्या पंतप्रधानांना टोमणे मारणारी कुजकी सडकी जमात आहे ती.