लोकसंख्या वाढीचा बागुलबुवा

साहना's picture
साहना in काथ्याकूट
7 Feb 2021 - 1:32 pm
गाभा: 

खालील ध्याग्यावर दिलेली प्रतिक्रिया थोडी खूपच लांब झाली म्हणून इथे वेगळा लेख म्हणून पाडत आहे.
https://misalpav.com/node/48280

पाश्चात्य देशांत २-३ दशकांनी एक नवीन पोपट निर्माण होतो. मग हा विषय घेऊन तेथीतील हस्तदंती मनोऱ्यातील लोक येथेच्छ प्रोपागंडा करून लोकांची प्रचंड प्रमाणात दिशाभूल करतात.

महायुद्धानंतर निर्माण झाला तो बागुलबुवा लोकसंख्या वाढीचा आणि हा बागुलबुवा बऱ्याच काळ चालला. भारतासारख्ग रीब देश ह्या विदेशी प्रोपागंडाला जास्त डोके न चालविता बळी पडतात. (सध्या बागुलबुवा वातावरण बदलाचा आहे आणि तो सुद्धा तितकाच दांभिक पणाचा आहे).

लोकसंख्या वाढीचे परिणाम समजण्यासाठी भौतिक शास्त्र किंवा जीवशास्त्र पूर्णपणे निरर्थक आहे. त्यासाठी अर्थशास्त्र समाजणे जरुरीचे आहे. ह्या संदर्भांत अमेरिकेतील १९८० मधील सायमन-एहरलीच हि पैज वाचणे मनोरंजक ठरेल. तर अर्थतज्द्न्य जुलिअन सायमन आणि जीवशास्त्री पॉल एहरलीच ह्यांच्यात एक मोठी जाहीर पैज लागली. १९६८ साली पॉल ह्यांनी पॉप्युलेशन एक्सप्लोजन नावाचे एक भयंकर प्रसिद्ध पुस्तक लिहिले. त्यांच्या मते लोकसंख्या वाढ तात्काळ थाम्बवली नाही तर जगांत प्रचंड अन्न कमतरता होऊन कोट्यवधी लोक मरणार होते. ह्या पुस्तकाने खळबळ माचवली आणि ह्यांच्या नादाला लागून गोऱ्या लोकांनी मुले निर्माण करणे कमी केले (ज्याची फळे ते आज भोगत आहेत). भारत, चीन आणि अनेक देशांनी जास्त विचार न करता विविध योजना राबवून लोकसंख्या वाढ म्हणजे जणू काही भस्मासुर आहे असा प्रोपागंडा निर्माण केला.

ज्युलियन सायमन ह्यांनी त्यांची हि भविष्यवाणी साफ खोटी ठरणार आहे असे जाहीर रित्या प्रकाशित केले आणि १० हजार डॉलर्स ची जाहीर पैज लावली. पैजेच्या नुसार ज्युलियन ह्यांचे म्हणणे होते कि बहुतेक संसाधनाचा तुटवडा तर असणार नाहीच पण वर तीच संसाधने स्वस्त सुद्धा असणार आहे. १९९० साली जुलिअन सायमन हे पैज सहज, म्हणजे अगदी मोठ्या फरकाने जिंकले. त्या दहा वर्षांत जगाची लोकसंख्या सुमारे ८०० दशलक्ष वाढली पण जे ५ धातू त्यांनी निवडले होते त्यांची किंमत बऱ्यापैकी कमी झाली होती.

लोकसंख्या वाढीचे काहीच वाईट परिणाम आहेत असे नाही. लोकसंख्या वाढीचे अनेक वाईट परिणाम आहेत. पण जगांत नक्की किती लोक असायला पाहिजेत हे सुद्धा कोणीही निर्धारित करू शकत नाही. बहुतेकांना लोकसंख्यावाढीचे वाईट परिणाम दिसतात पण त्याचे असंख्य चांगले फायदे दिसत नाहीत. लोकसंख्या कमी झाली तर हे अनेक फायदे गायब होतीलच पण त्या फायद्यांना आम्ही मुकलो आहोत हे सुद्धा समजणार नाही.

सोपे उदाहरण घेऊया. पोलिओ ची लस हि आमच्या साठी वरदान ठरली आहे ह्यांत काहीच दुमत नाही. अक्षरशः कोट्यवधी मुलांचा जीव ह्या लसीने वाचवला आहे. पण फक्त लसच नाही तर अनेक औषधे निर्माण झाली आहेत त्यामुळे आम्हा सर्वांचेच जीवन जास्त सुखकर झाले आहे. तर हि औषधे कशी निर्माण होता ? अक्षरशः हजारो लोकांचे परिश्रम ह्यांत गुंतले असतात. जगाच्या पाठीवर जितके जास्त डॉक्टर, संशोधक आहेत तितकी जास्त औषधांचा शोध लागतो. आज देशाची लोकसंख्या ७ अब्ज ऐवजी ४ अब्ज असती तर मार्केट मधील अनेक औषधें गायब झाली असती. पण मी फक्त औषधांचे उदाहरण दिले आहे. सॉफ्टवेर पासून, टीव्ही वरील विविध चॅनेल पर्यंत अनेक गोष्टी गायब झाल्या असत्या आणि आम्हा सर्वांचा जीवनमानाचा स्तर खूपच खाली गेला असता.

तुमहाला आवडत असलेली कुठलीही गोष्ट घ्या. समजा तुम्हाला तुमचा फोन आवडतो. ह्या फोनच्या निर्मितीसाठी हजारो पेटंटन्स लागली आहेत आणि अक्षरशः लक्षावधी विविध छोटे छोटे शोध अनेक लोकांनी निर्माण केले आहेत. आणि ह्यांत जो एकूण मानवी वेळ गेला आहे त्याची जर बेरीज केली तर कदाचित कोट्यवधी मनुष्य-तास त्या फोन चा शोध लावण्यासाठी खर्च झाले आहेत. समजा देशाची लोकसंख्या अर्धी असती तर तितके मनुष्यतास खर्च होण्यासाठी दुप्पट वेळ लागला असता आणि फोन आपल्या हाती येण्यासाठी २०२० ऐवजी कदाचित २०४० वर्ष लागले असते.

अर्थानं त्याच तर्काने आम्ही असे म्हणू शकतो कि जगाची लोकसंख्या फक्त ७ अब्ज असल्याने आज आमच्या हातात अश्या अनेक गोष्टी नाहीत ज्या कदाचित २०५० मध्ये आमच्या हाती असतील. आज जगाची लोकसंख्या १४ अब्ज असती तर कदाचित आणखीन अजब साधने आणि तंत्रज्ञान आमच्या हाती असते.

> अहो पण लोकसंख्या अशीच वाढत राहिल्यास पर्यावरणाचे काय ?

हा मुद्दा अनेक लोक वर काढतात आणि काही प्रमाणात तो रास्त सुद्धा आहे. पहिली गोष्ट म्हणजे जसे जीवनमान उंचावते आणि लोक जास्त काळ जगू लागतात त्याच वेळी लोकांना मुलें नकोशी होतात. आमच्या आजोबांच्या काळी खाण्यापिण्याचे वांधे होते त्यामुळे लोक दिवसभर काबाडकष्ट करायचे आणि रात्रभर प्रजनन करायचे. महिलांची अवस्था फक्त चूल आणि मूल अशी होती. पण त्यांची चूक नव्हती. रात्री आणखी करणार काय ? मग ४०-५० वर्षांत हृदयविकाराचा झटका वगैरे येऊन मृत्यू.

आता जीवनमानाचा स्तर उंचावलाय. गर्भनिरोधक आल्याने शरीरसुख घेता येते आणि प्रजनन रोखता येते. रोमान्स ची व्याख्या रुंदावलीय. आता जोडपी चित्रपट पाहतात, दिनार करतात, कुठे फिरायला वगैरे जातात. पुस्तके वाचतात आणि नेटफ्लिकस पाहतात. त्याशिवाय प्रत्येक वेळी फिरायला वगैरे जाताना लक्षांत येते कि जास्त मुले म्हणजे खूपच जास्त खर्च त्यामुले फार तर एक दोन मुले खूप होतात. ह्यामुळे आपसूकच जन्मदर खालावत जातो. ह्या दृष्टिकोनातून कर्वे हे खूपच दूरदर्शी आणि विद्वान होते.

मुले जास्त जन्माला घालण्याचे एक कारण म्हणजे मुले मारण्याचे प्रमाण सुद्धा खूप होते. आता ते कमी झाल्याने वंशाला एक दिवा असला तरी पुरतो मोठी माळ लावायची गरज नाही. परंपरागत घरे आता बंद पडत आहेत. बापाने बांधलेल्या घरांत मुलें राहू इच्छित नाहीत म्हणून "वंशाचा दिवा" हि सुद्धा जास्त डिमांड नसलेली गोष्ट झालीय.

मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च आणि लोकसंख्या वाढीचा दर हि दोन महत्वाची व्हेरिएबल्स अर्थतज्ञ पाहतात आणि दोन्ही मध्ये खूपच जास्त संबंध आहे. आणि ह्या संबंधाने मानवी लोकसंख्या चादर पाहून हात पसरेल ह्यांत मला तरी अजिबात शंका वाटत नाही.

मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च :

मार्जिनल खर्च ह्याचा अर्थ प्रत्येक ऍडिशनल मुलाच्या संगोपनासाठी खर्च किती येतो. एका मुलाचा खर्च प्रचंड असतो. कारण मूल नाही तर माता काम करू शकते. एक मूल झाले आणि तिने नोकरी सोडली तर ते पैसे येणे बंद होतात आणि त्यामुळे तो मुलाच्या संगोपनाचा खर्च ठरतो. पण एकदा नोकरी सोडल्यानंतर तिला २ मुले झाली तर त्या दुसऱ्या मुलाचा मार्जिनल खर्च खूपच कमी असतो. (एका मुलासाठी ३ लक्ष वर्षाला खर्च येतो तर दोन मुलांसाठी ३.५ लक्ष खर्च येतो इत्यादी).

जुन्या खाली हा मार्जिनल खर्च खूपच कमी असायचा कारण बहुतेक खर्च हा फक्त अन्नाचा असायचा. आता तुम्ही दुबईला किंवा किमान खंडाळ्याला जाता तर सुद्धा तिकिटाचा खर्च प्रत्येक मुलांमागे होतो तो फार असतो. ४ मुले झाली तर मग तुम्हाला ५ सीटर गाडी सुद्धा चालत नाही.

जसे जसे जीवन मान उंचावते तसे तसे मार्जिनल खर्च हा खूपच वेगाने वाढतो. मुलाला विदेशांत शिकायला पाठवायचे तर ५० लक्ष रुपये पाहिजेत. दोन मुले झाली तर मग १ कोटी. पण गरीबाच्या घरांत हे प्रश्न नसतात.

पण खर्च वाढतो म्हणजे नक्की काय होते ? माणसाला जगांत फक्त दोनच खर्च असतात. एक खर्च असतो ऊर्जेचा दुसरा खर्च असतो दुसऱ्या माणसाच्या वेळेचा. (आयफोन पासून कांदे बटाटे पर्यंत तुम्ही काहीही विकत घेतले तर तुम्ही फक्त ऊर्जा आणि दुसऱ्या लोकांचा वेळ ह्या दोनच गोष्टींचा मोबदला देत असता. समजा ह्या दोन गोष्टी अपरंपार आणि फुकट असत्या तर आयफोन आणि कांदे बटाटे ह्यांची किंमत सुद्धा शून्य असती.). खर्च वाढतो ह्याचा अर्थ तुम्ही जास्त ऊर्जा आणि मानवी वेळ खर्च करत आहात असा होतो. आपण पर्यावरणाच्या नावाने बोंब मारतो तेंव्हा पर्यावरणाला होणारी हानी हि १००% ऊर्जा ह्या एका संसाधना द्वारे तुंबलेली जाऊ शकते. पण ऊर्जा महाग असल्याने आम्ही ती हानी अन-डू करू शकत नाही. जर पर्यावरणाची हानी वाढत गेली तर ऊर्जेचा दर सुद्धा वाढत जातो आणि आणि त्यामुळे मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च.

त्यामुळे हि दोन्ही व्हेरिएबल्स एकमेकांना बॅलेन्स करतात. पण ऊर्जा हि काळाचा ओघांत स्वस्त होत गेली तर लोकसंख्या सुद्धा वाढत जाते आणि पर्यावरणाला हानी सुद्धा होत नाही. ह्या दोन्ही व्हेरिएबल्स मधील गणिती संबंध तसा स्पष्ट पणे अभ्यासाने कठीण आहे कारण लोकसंख्या वाढली कि हे लोक नवीन शोध लावून ऊर्जेचा दर आणखीन कमी करतात.

टीप : युनायटेड नेशन्स किंवा विविध तद्न्य मंडळी जगाची लोकसंख्या सुमारे २०५० मध्ये स्टेबल होईल असे भाकीत करत आहेत. मला त्यांत शंका वाटते. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मते ऊर्जेचा खर्च येत्या २० वर्षांत १०० पटीने कमी होणार आहे. बहुतेक ऊर्जा फ्युजन सेल द्वारे किंवा इतर कुठल्या नवीन शोधांतून निर्माण होईल आणि त्यानंतर सर्वच जीवनावश्यक वस्तूंचा भाव कमालीचा पडणार आहे. ऊर्जा स्वस्त आणि मुबलक होताच, शेती, पिण्याचे पाणी वगैरे गोष्टींचा काहीही तुटवडा असणार नाही त्याशिवाय कार्बन एमिसशन वगैरे उलट करणे सहज शक्य होणार आहे. कदाचित IVF वगैरे प्रक्रिया खूपच सोप्या होऊन गरोदर न राहता सुद्धा मुले निर्माण करणे शक्य होईल आणि त्यामुळे कुठल्याही वयांत मुले निर्माण करणे शक्य होईल आणि कदाचित मंडळी जास्त मुले निर्माण करतील. अर्थांत मी हे भाकीत एखाद्या ज्योतिष्या प्रमाणे वर्तवत आहे.

टीप २ : जगांतील सर्व नैसर्गिक संसाधने हि अक्षय म्हणजे अनलिमिटेड आहेत. एकच असे संसाधन आहे जे अक्षय नाही आणि ते म्हणजे मानवी वेळ. हि संकल्पना बहुतेक इकॉनॉमिक्स च्या पुस्तकांत मंडळी गेलेली असते पण राजकीय कारणासाठी पाश्चात्य राष्ट्रांनी "लिमिटेड रिसोर्सिस" आणि "अनलिमिटेड रिसोर्सेस" किंवा "रिन्यूएबल ऊर्जा" आणि "नॉन रिन्यूएबल ऊर्जा" असल्या श्रेणी शाळांतून आम्हा मुलांच्या डोक्यांत घातल्या. हि विचारसरणी डाव्या लोकांची असून पाश्चात्य देशांतून आपल्या देशांत आली आहेत आणि त्यांत काहीही तथ्य नाही. हि गोष्ट बहुतेक लोकांना पचणार नाही किंवा पटणार नाही कारण ह्या प्रकारच्या प्रोपागंडावर आमच्या देशांत कुणीही प्रश्न विचारला नाही. कुणाला इंटरेस्ट असेल तर वेगळ्या लेखांत विस्ताराने लिहीन. प्रतिक्रिया किंवा खरडवहीवर लिहून कळवा.

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

7 Feb 2021 - 5:44 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

पाश्चात्यांचे माहित नाही पण गिरगावात चाळीत राहत असताना परसाकडला जाण्यासाठी लोकांची जी लाईन लागायची त्यावेळेपासुन 'लोकसंख्या कमीच हवी' असे ह्यांचे मत आहे.

मुक्त विहारि's picture

7 Feb 2021 - 6:21 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

तेंव्हापासून आता लोकसंख्या कदाचित डबल झाली असावी पण परसाकडे जाताना अनुभव सध्या वाईट आहे कि चांगला आहे ? (ह्यां प्रश्नाच्या उत्तरांत माझ्या लेखाचे सार दडले आहे)

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 12:07 pm | मुक्त विहारि

लोकलच्या आसपास दुर्गंधी कमी असायची ... आता वाढली आहे ...

सार्वजनिक व्यवस्थेवर, लोकसंख्या वाढीचा ताण येतोच...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

9 Feb 2021 - 5:32 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

तेव्हा लायनीत उभ्या राहणार्या अनेकानी नंतर फ्लॅट घेतले. पण त्यामुळे बांधकाम वाढले, प्रदुषण वाढले.. वगैरे असो
खायचे/ह*यचे वांदे असणार्या देशानी लोकसंख्या वाढवण्याच्या भानगडीत पडु नये असे आमचे मत आहे. मग भारत असो पाकिस्तान असो वा बांग्लादेश
डेन्मार्क देशाची लोकसंख्या ६० लाखाच्या आसपास आहे. म्हणजे अर्धी मुंबई.. ह्या मंड्ळीनी विचार केला तर ठीक आहे. त्यांच्याकडे साधन संपत्तीही विपुल आहे.
अमेरिकेची लोकसंख्या ३० कोटी असेल पण तो देश आकाराने आपल्या तिप्पट आहे. म्हणजे प्रत्येक नागरिकास तेथे आपल्या ९ पट अधिक जागा/नैसर्गिक संपत्ती आहे.
भारतिय सैन्यात भरती होण्यासाठी सैनिकाच्या एका पदासाठी २० अर्ज येतात. लोकसंख्या वाढ्वा म्हणणारे लोक तेवढ्या प्रमाणात नोकर्या निर्माण करू शकतील? शेयर मार्केट थेट परदेशी गुण्तवणुकीवर चाललेले. गुंतवणुक काढुन घेतली की मार्केट कोसळते. पश्चिम युरोप्/अमेरिकेपेक्षा आपली गुणवत्ता उजवी आहे अशातलाही भाग नाही.

मुक्त विहारि's picture

9 Feb 2021 - 5:42 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

उपयोजक's picture

10 Feb 2021 - 9:14 am | उपयोजक

Marko

मुक्त विहारि's picture

10 Feb 2021 - 9:23 am | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

काळे मांजर's picture

7 Feb 2021 - 6:05 pm | काळे मांजर

छान

मुक्त विहारि's picture

7 Feb 2021 - 6:21 pm | मुक्त विहारि

म्हणजे, येत्या काही वर्षांत, भारताची लोकसंख्या, 1000 कोटी झाली तरी काही फरक पडणार नाही, असे तुमचे मत आहे का?

१००० होईल कि ५०० कोटी ठाऊक नाही पण १००० कोटी असूही शकते. २०० वर्षे मागे भारताची लोकसंख्या १३० कोटी होईल असे कुणी सांगितले असते तर कुणाचाही विश्वास बसला नसता. जी काही लोकसंख्या असेल ती आपसूक तंत्रज्ञानाशी निगडित असेल आणि लोकांचे राहणीमान खूपच उंचावलेले असेल.

प्रदूषण कमी असेल, अन्नधान्य जास्त आणि स्वस्त असेल दरडोई ऊर्जेचा वापर जास्त असेल हे मात्र पैसे लावून सांगू शकते.

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 6:50 am | मुक्त विहारि

तितके प्रदूषण जास्त....

1000 कोटी जनतेला पुरेल, इतके अन्न आपण कसे तयार करणार?

1000 कोटी जनतेला, दळणवळण कसे पुरवणार? साध्या बुलेट ट्रेनला, इतका विरोध होतो...

1981 मध्ये मी डोंबिवली येथून 7:12 ची लोकल, दादरला जाण्यासाठी पकडत होतो...आरामात चढू शकत होतो...आज, लोकल तीच आहे, पण धक्काबुक्की करूनच लोकलमध्ये प्रवेश मिळतो ..अफाट लोकसंख्येचे, परिणाम आहेत....

हा एक भाग झाला ...

ट्रॅफिक जॅम, हा दुसरा भाग झाला

प्रदूषण वाढले आहे, 1966 पासून मी डोंबिवली येथे राहतो, गेल्या 50 वर्षांत डोंबिवली येथील हवा जास्त प्रदुषित झाली आहे... धूळ आणि आवाज, यांचे प्रदूषण वाढलेले आहे ...

ह्या डोळ्यासमोरच्या गोष्टी आहेत ....

साहना's picture

8 Feb 2021 - 9:59 am | साहना

> 1000 कोटी जनतेला पुरेल, इतके अन्न आपण कसे तयार करणार?

हाच प्रश्न तुम्ही १०० कोटी जनतेला अन्न कसे पुरवणार म्हणून १९०० मध्ये विचारू शकला असता आणि तो रास्त सुद्धा वाटला असता.

आता तुम्ही १००० कोटी लोकांविषयी प्रश्न विचारत आहात तो रास्त वाटत आहे.

ह्याचेही एक लिमीट असणारच...

एक वेळ, इमारती उंच होतील, दळणवळण सुधारेल, अन्नपुरवठा पण कदाचित होईल.

पण,

गर्दीवर नियंत्रण राहणार नाही ...जे आत्ता होत आहे

गुन्हेगारीचे प्रमाण वाढेल ... मी संख्येची गोष्ट करत नाही आहे, दर शेकडा प्रमाण वाढेल.

प्रदूषण वाढेल

मानसिक रूग्णांचे प्रमाण वाढेल

व्यक्तीपुजेचे स्तोम जास्तच वाढेल

हुकूमशाहीला अतिशय पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता असल्याने, अराजकता वाढेल...

साहना's picture

8 Feb 2021 - 11:23 am | साहना

> 1981 मध्ये मी डोंबिवली येथून 7:12 ची लोकल, दादरला जाण्यासाठी पकडत होतो...आरामात चढू शकत होतो...आज, लोकल तीच आहे, पण धक्काबुक्की करूनच लोकलमध्ये प्रवेश मिळतो ..अफाट लोकसंख्येचे, परिणाम आहेत....

इथे लोकसंख्या हि समस्या अजिबात नाही. रेलवेचे सरकारी नियंत्रण हि समस्या आहे.

मुंबई ते पुणे हा प्रवास १९८० मध्ये जास्त आरामदायक होता कि आज आहे ?

आपल्या एकूण उत्पन्नाच्या किती टक्के भाग आपण दररोजच्या प्रवासावर खर्च करता ?

१९८० च्या तुलनेत आपल्याकडील वाहने काय आहेत ?

१९८० पासून २०२० पर्यंत विमान प्रवास आपल्याला जुन्या काळी परवडत होता कि आज परवडत आहे ?

एकूण प्रवास ह्या दृष्टिकोनातून सरकारी नियंत्रित वाहतूक सोडल्यास इतर सर्व प्रकारची वाहतूक खूप चांगली झाली आहे ह्यांत शंकाच नसावी.

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 11:45 am | मुक्त विहारि

अफाट लोकसंख्येला ती अपुरीच पडणार ....

पुर्वीचा प्रवास जास्त सुरक्षित होता ... मी वयाच्या 10 व्या वर्षा पासून, प्रवास करत आहे ...

तेंव्हा, सेवाग्राम एक्सप्रेस जास्त सुरक्षित होती.... आता नाही ...

सामान्य माणसाला, विमान प्रवास आत्ता पण परवडत नाही ...

वाहने वाढली आणि प्रदुषण पण वाढले .... जितकी लोकसंख्या जास्त, तितके प्रदूषण जास्त

प्रसाद_१९८२'s picture

7 Feb 2021 - 7:00 pm | प्रसाद_१९८२

'One-child policy' का बरे आणली असावी, त्यांच्याकडील नैसर्गिक संसाधने संपली की आणखी काही कारण होते ?

सरकारी बाबू काही नवीन नियम आणतात त्यांत तारतम्य असतेच असे नाही. ह्या चुकीच्या पॉलिसीची फळे चीनला सध्या भोगावी लागत आहेत.

चौकटराजा's picture

8 Feb 2021 - 9:34 am | चौकटराजा

चीनचे कसले चुकीचे नियम व त्याची कोणती फळे ... जरा इस्कटून सांगाल काय ... ? नाहीतर विधान मागे घ्या !! उगाच काहीतरी टाकत बसू नका !

साहना's picture

8 Feb 2021 - 10:10 am | साहना

लोकसंख्या वाढीच्या बागुलबुव्याला घाबरून चीन च्या बाबू लोकांनी एक मूल पॉलिसी आणली. ह्यामुळे चीन ची लोकसंख्या वाढ जरी मंदावली तरी त्याचे एकूण परिणाम चीन देशासाठी जास्त घातक ठरले आहेत ह्यावर आता सर्वांचेच एकमत झाले आहे. सर्वांचे = इतर जग तसेच चिनी सरकार आणि विद्वान.

२००१ पासून चिनी अभ्यासक चिनी सरकारला हि पॉलिसी बदल्याण्याचे आवाहन करत होते आणि शेवटी चिनी सरकारने सुद्धा देर आये दुरुस्त आहे ह्या तत्वाने हि पॉलिसी चुकली आहे हे मान्य करून ती मागे घेतली आहे.

तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही हे वाचू शकता :

- https://www.bbc.com/news/world-asia-pacific-11404623
- https://www.brookings.edu/articles/the-end-of-chinas-one-child-policy/
- https://www.theguardian.com/world/2019/mar/02/china-population-control-t...
- https://www.nationalgeographic.com/news/2015/10/151030-china-one-child-p...
- https://www.youtube.com/watch?v=eNKQT7Ub2Ps
- https://www.bbc.com/news/world-asia-pacific-11404623

सर्वांत चांगला लेख इथे आहे :

https://www.cato.org/commentary/flawed-assumptions-chinas-disastrous-chi...

लोकसंख्या वाढ कमी करण्याचा सर्वांत चांगला उपाय म्हणजे लोकांचे जीवनमान उंचावणे होय. १९७८ मध्ये दक्षिण कोरियाचा प्रजनन दर चीनपेक्षा जास्त होता. त्यांनी काहीही कायदे केले नाहीत पण त्यांची अर्थी प्रगती वेगाने झाल्याने कोरिआ चा प्रजनन दर आपोआप कमी होत गेला.

चंद्रसूर्यकुमार's picture

8 Feb 2021 - 1:05 pm | चंद्रसूर्यकुमार

या धोरणाचे चीनवर बरेच परिणाम झाले आहेत.

एक तर चीनी समाजात दीर्घायुषी लोकांचे प्रमाण जास्त आहे. काहीही कारण असले चीनमध्ये life expectancy ७६ वर्षे आहे असे आंतरजालावर समजले. भारतात ते ६७ वर्षे आहे. म्हणजे ६० व्या वर्षी निवृत्ती धरली तर सामान्य चीनी निवृत्तीनंतर सरासरी १६ वर्षे जगतो तर सामान्य भारतीय निवृत्तीनंतर सरासरी ७ वर्षेच जगतो. १९७० च्या दशकाच्या शेवटापासून चीनने हे धोरण अवलंबायला सुरवात केली. याचा परिणाम हा झाला की चीनी नागरिकांचे सरासरी वय वाढले. आर्थिक प्रगतीत तरूणांचा हातभार वृध्दांपेक्षा जास्त असतो हे वेगळे सांगायला नको.

दुसरे म्हणजे आता टिपीकल चीनी कुटुंब म्हणजे एक जोडपे त्यांचा एक मुलगा/मुलगी आणि नवरा बायकोचे आईवडिल. म्हणजे दोघांच्या उत्पन्नावर सात जणांना पोसायची जबाबदारी. त्यामुळे चीनी समाजात सेव्हिंगचे प्रमाण गेल्या दहा वर्षात कमी झाले आहे हे https://data.worldbank.org/indicator/NY.GDS.TOTL.ZS?locations=CN वरून कळेल. तरीही चीनी समाज बर्‍यापैकी काटकसरी असल्याने अमेरिकेपेक्षा हे प्रमाण बरेच जास्त आहे पण चीनने इतकी वर्षे जो दर राखला आहे तो कमी होत आहे हे नक्की. आणि चीनने एक मूल धोरण १९७९ पासून अंमलात आणले आणि सेव्हिंगचा दर २०१० पासून कमी व्हायला लागला यात बरेच काही आले नाही का? आता सेविंग्जचा दर कमी झाला म्हणून काय बिघडले? तर सेव्ह केलेले पैसे कोणी आपल्या गादीमध्ये किंवा उशीमध्ये भरून ठेवत नसतो तर बँकेत ठेवतो. त्यातून मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टना कर्जे द्यायला चीनी बँकांकडे भरपूर पैसे इतकी वर्षे उपलब्ध होते ते यापुढील काळात कमी होतील ही भिती आहे. त्यातून चीनने इतकी वर्षे infrastructure development for the sake of it असे काही अंशी केल्याने १००% वापर न होणार्‍या अनेक मोठ्या इमारती, विमानतळे वगैरे पडून आहेत. याविषयी https://www.npr.org/sections/parallels/2015/10/15/446297838/chinas-white... वगैरे अनेक लेखांमध्ये. त्यामुळे चीनी अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या वेगावर प्रश्नचिन्ह नक्कीच उभे राहिले आहे.

चांगल्या हेतूने सरकार करायला काहीतरी जाते आणि त्याचे परिणाम वेगळेच होतात हा प्रकार अनेक ठिकाणी बघायला मिळतो त्यातलाच हा प्रकार दिसतोय.

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 6:53 am | मुक्त विहारि

त्यामुळेच, चीन त्या बाबत जास्त बोलत नाही किंवा चुकीची माहिती देतो..

चीन आणि घराणेशाहीचे अपरिपक्व उमेदवार, यांच्यावर मी कधीच विश्र्वास ठेवत नाही ...

Rajesh188's picture

8 Feb 2021 - 12:59 am | Rajesh188

कंपू बाजी करणारी गँग गायब आहे ह्या धाग्यावर सोयी नी मत व्यक्त करत नाहीत.
फसण्याची शक्यता आहे
एक तर सर्व दावे चुकीचे आहेत अर्थ शास्त्र मधील कोणत्या तरी पानावर बारीक अक्षरात लिहलेले विचार आहेत.
आणि दुसरे मुस्लिम लोक शक्य तेवढ्या जास्त
बायका करून शक्य तेवढी जास्त मुळ जन्मास घालतात.
ह्या धाग्याला पाठिंबा देणे म्हणजे मुस्लिम समाजाच्या मुलांना जन्न देण्या विषयी विचारणा पाठिंबा देण्या सारखे आहे.
अवघड जागेचे दुखणं आहे.
मुस्लिम समाज हा खूप प्रगत विचाराचा असून तो अर्थ व्यवस्था वाढावी म्हणून जगावर उपकार करत आहे हे मान्य करण्या सारखे आहे
त्या मुळे कंपू बाज गायब आहेत.

इथे पाहण्यासारखे काहीही नाही पुढे चला ....

आनन्दा's picture

8 Feb 2021 - 8:01 am | आनन्दा

मुळात पूर्वी मुले हणजे म्हातारपणीची काठी अशी कल्पना भारतात तरी होती..

कितो काही म्हटले तरी ती कल्पना आता हळूहळू मोडीत निघू लागली आहे.. अश्या परिस्थितीत किती पालक आपले तारुण्य मुलांच्या खस्ता काढण्यात खर्च करतील?

त्यापेक्षा नोकऱ्या करिअर करून सेव्हिंग केले, आणि उतारवयात एखाद्या 5 स्टार वृद्धाश्रम बुक केला की झाले नाही का?
सध्या एकल मूल नव्हे, तर मूल नको असं ट्रेंड वाढू लागला आहे.

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 8:39 am | मुक्त विहारि

Double Income No Kid,

अशा पद्धतीने कुणी संसार करत असेल तर, अशा कुटुंबाला सरकारी सोयीसुविधा आणि सबसिडी आधी मिळायला हवी ...

त्यांना गर्भ निरोधक मान्य नाही,मुल ही अल्ला ची देणं आहे असे त्यांचे पक्के मत आहे.
जास्त मुल जन्माला घालण्यासाठी जास्त बायका करा ही त्यांची परंपरा ह्याचा अर्थ सरळ आहे मुस्लिम समज हा प्रगत समाज आहे.
जगाची उन्नती करायची असेल, भरभराट करायची असेल खूप लोकसंख्या हवी आणि त्या साठी आपल्याला च प्रयत्न करायला हवेत असा त्यांचा निस्वार्थी विचार आहे.
आज जी कशी अफाट प्रगती दिसत आहे ती फक्त जास्त लोकसंख्या मुळे.
बाकी पर्यावरण (त्या वर आधारित असलेली शेती आणि रोगराई) मोकळ्या जागा,विस्तीर्ण पसरलेला जंगल आणि हवेतील कार्बन शोषून राखला जाणारा समतोल .
हे सर्व बकवास आहे.
Trump नी असेच तारे तोडले आणि पॅरिस करारा मधून अमेरिका बाहेर पडला आणि biden आल्या बरोबर ट्रम्प चा निर्णय त्यांनी फिरवला.
म्हणजे biden हे अमेरिका द्रोही आहेत.

साहना's picture

8 Feb 2021 - 9:29 am | साहना

पॅरिस करारा मधून बाहेर पडण्याचा ट्रम्प ह्यांचा निर्णय १००% बरोबर होता.

पॅरिस करार काय आहे ते इथे पहा https://www.youtube.com/watch?v=cVkAsPizAbU&t=2s

सहना यांच्याशी अजिबात सहमत नाही.
लोकसंख्या किती हवी याबाबत तारतम्य असायला हवे कारण एका मनुष्य आणि इतर प्राणी असे डायरेक्ट कंपॅरिजन केले जाऊ शकत नाही.
इतर प्राणी फक्त खाणे आणि प्रणय या दोनच गोष्टीसाठी आपले जिवन जगत असतात पण मनुष्याचे तसे नाहीये. त्यामुळे मनुष्यांची संख्या वाढली तर प्राकृतिक संसाधनांवर तसेच मानवनिर्मित संसाधनांवर देखील मर्यादा येणार हे नक्की.

ज्यादिवशी मनुष्य फक्त खाणे आणि प्रणय या दोनच गोष्टीसाठी जगेल.. त्याला वस्त्र, निवारा, नोकरी, शिक्षण, रस्ते, आरोग्य, वीज, पर्यटन, चैनीच्या गोष्टी, पाणी इ सर्व गोष्टींची गरज नसेल तेव्हाच सहना ताईंची मते बरोबर असतील.. पण आता या सर्व गोष्टी मानवी जीवनाचा भाग आहेत त्यामुळे लोकसंख्या वाढवून आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेतोय.

इथे काही लोकं मुस्लिम समाज कसा प्रगतिशील आहे.. 4 4 बायका आणि सोळा पोरं काढून कशी मानवजातीच्या प्रगतीला हातभार लावतायेत हे वाचून डोळे पाणावले. कारण मांजर फक्त एकटीच परत नाही आली तर सोबत आपला जुळा भाऊ देखील घेऊन आली (188).. हे नक्की झाले. इतके दिवस शंका होती पण आज कळले कि गंगाधरच शक्तिमान आहे.

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 9:35 am | मुक्त विहारि

आणि अवतारी मंडळींना, वारंवार सहन करण्या इतपत, मिपाकर सहनशील आहेत ....

रामचन्द्र कह गए हैं की, हंस चबेगा दाना-तिनका, कौवा मोती खाएगा.

सोत्रि's picture

8 Feb 2021 - 10:04 am | सोत्रि

लोकसंख्यावाढ आणि बागुलबुवा => 'अस्माकं बदरीचक्रं युष्मांक बदरीतरुः । बादरायणसंबंधात् यूयं यूयं वयं वयंम् ।'

😄 😄 😄

- (हस्तदंती मनोऱ्यात नसलेला) सोकाजी

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 10:44 am | मुक्त विहारि

सोत्री आले ...

जुने आणि जातीवंत, आय.डी. भेटले की आनंद होतो...

अनुप ढेरे's picture

8 Feb 2021 - 10:04 am | अनुप ढेरे

लोकसन्ख्या कमी करण्यासाठी कोणतेही सरकारी धोरण असु नये असे वाटते. (उदा: अमुक इतकीच मुले असतील तर सरकारी नोकरी इ इ.) शिक्षण, सुबत्ता आली की लोकसन्ख्या वाढ आपोआप नियंत्रणात येते. चीनने वन चैल्ड पोलिसी अलिकडेच मोडीत काढली कारण त्याचे तोटेच दिसले.

चंद्रसूर्यकुमार's picture

8 Feb 2021 - 11:20 am | चंद्रसूर्यकुमार

लेख आवडला. एक प्रश्न-

टॅक्सेशनमध्ये लाफर कर्व्ह असते त्याप्रमाणे लोकसंख्येच्या बाबतीत एखादा ऑप्टिमम पॉईंट असू शकेल का? ही संज्ञा अर्थतज्ञ आर्थर लाफर यांनी आणली.
laffer

सामान्यतः असे वाटेल की कराचे दर कमी केले तर सरकारचे करसंकलन कमी होईल. पण प्रत्येकवेळी तसे होतेच असे नाही. वरील आकृतीत दाखवल्याप्रमाणे सध्याचे कराचे दर टी-४ असतील तर त्यावरून कर टी-३ पर्यंत कमी केल्यास करसंकलन वाढेल. कर आणखी टी-२ पर्यंत कमी केल्यास करसंकलन कमी होईल. याचे कारण हे की समजा ०% टॅक्स असेल तर सरकारचे करसंकलन अर्थातच शून्य असेल. पण १००% टॅक्स असेल तरी सरकारचे करसंकलन शून्यच असेल. याचे कारण १००% टॅक्स असेल तर अर्थव्यवस्थेतील उलाढाली शून्य होतील. आपण जितके कमावतो ते सगळे सरकार कराच्या रूपात द्यायचे असेल तर किती लोक कामधंदा करतील? त्यामुळे १००% टॅक्स असेल तरीही सरकारचे करसंकलन शून्य असेल. त्यामुळे सरकारचे करसंकलन सर्वात जास्त करणारा ऑप्टिमम पॉईंट मध्ये कुठेतरी असतो.

आता माझा प्रश्न हा की लोकसंख्या अगदी कमी असेल तर जीवनमानाचा स्तर कमी असेल हे मान्य. पण वाढती लोकसंख्या हा प्रत्येकवेळी जीवनमानाचा स्तर वाढेल का? की लाफर कर्व्हप्रमाणे मधे कुठचातरी ऑप्टिमम पॉईंट असेल? समजा लोकसंख्या त्यापेक्षा जास्त असेल तर लोकसंख्या कमी होणे हितकर असेल आणि लोकसंख्या त्यापेक्षा कमी असेल तर त्यापेक्षा लोकसंख्या वाढणे हितकर असेल अशी परिस्थिती असेल का?

आनन्दा's picture

8 Feb 2021 - 11:35 am | आनन्दा

सगळेजण याचा आधार घेतयात त्यासाठी

https://en.m.wikipedia.org/wiki/Behavioral_sink

आनन्दा's picture

8 Feb 2021 - 11:38 am | आनन्दा

फक्त प्रॉब्लेम एकच आहे की उंदीर फक्त genetically ऍडव्हान्स होऊ शकतात, technogically नाही..

चंद्रसूर्यकुमार's picture

8 Feb 2021 - 11:50 am | चंद्रसूर्यकुमार

उंदरांवरच्या प्रयोगांवरून व.पुंचा स्टॅटिस्टिक्स मराठे आठवला.

+१ तुम्हाला ह्याचे मर्म समजले आहे.

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 11:47 am | मुक्त विहारि

हा बदलतो

वातावरण, जमिनीची सुपिकता, भौगोलिक परिस्थिति, राजकीय इच्छाशक्ती, हे पण भाग महत्वाचे ठरतात

उत्कृष्ट प्रतिक्रिया आहे. आपला प्रश्न वाचून खूप आनंद झाला. ह्या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही त्यामुळे एक संपूर्ण लेख लिहून सविस्तर उत्तर देईन. ग्राफ सुद्धा देईन.

> पण वाढती लोकसंख्या हा प्रत्येकवेळी जीवनमानाचा स्तर वाढेलच का?

बहुतेक वेळा हो. झांबिया पासून चीन पर्यंत आणि भारत पासून ब्राझील पर्यंत सर्वत्र हाच अनुभव संपूर्ण इतिहासांत आहे. ह्याला अनेक कारणे आहेत जी मी वेगळ्या लेखांत मांडेन. मॅट रिडली ह्यांचे ह्युमन प्रोग्रेस वेबसाईट पहा.

> की लाफर कर्व्हप्रमाणे मधे कुठचातरी ऑप्टिमम पॉईंट असेल?

क्ष अक्षावर लोकसंख्या आणि य अक्षावर राहणीमान ह्यांत लाफर कर्व्ह प्रमाणे संबंध नाही कारण लोकसंख्या आणि राहणीमान ही इंडिपेंडंट व्हेरिएबल्स नाही आहेत. ती दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. उदाहरण म्हणजे सरकार वाट्टेल तो कर दर ठरवू शकते. पाहिजे तर अगदी १००% कर ठरविला जाऊ शकतो. पण लोकसंख्या आणि राहणीमान ह्यांचा तसा संबंध नाही. लोकसंख्या हि राहणीमानावर अवलंबून आहे आणि राहणीमान हे लोकसंख्यवर अवलंबून आहे. काही प्रमाणात दोन्ही सेल्फ रेगुलेटिंग आहेत यिंग आणि यांग प्रमाणे.

मला काही सुपर पावर आहे आणि ठाणोस प्रमाणे चुटकी वाजवून उद्या सकाळी मी जगाची लोकसंख्या डबल केली किंवा अर्धी केली तर तर मात्र कदाचित तुम्हाला लाफ़र कर्व्ह प्रमाणे संबंध सापडेल. पण निव्वळ अकॅडेमिक दृष्टिकोन सोडून प्रत्यक्ष जीवनात त्याचा काहीही उपयोग नाही.

> पण वाढती लोकसंख्या हा प्रत्येकवेळी जीवनमानाचा स्तर वाढेलच का?

जो पर्यंत लोक स्वखुशीने लोकसंख्या वाढवत आहेत तो पर्यंत जीवनमानाचा स्तर वाढत राहील. ह्याची करणे वेगळ्या लेखन देईल. मी उल्लेख केलेल्या सायमन ह्यांच्या पैजेत सायमन ह्यांचा मुख्य मुद्दा तोच होता.

> समजा लोकसंख्या त्यापेक्षा जास्त असेल तर लोकसंख्या कमी होणे हितकर असेल आणि लोकसंख्या त्यापेक्षा कमी असेल तर त्यापेक्षा लोकसंख्या वाढणे हितकर असेल अशी परिस्थिती असेल का?

प्रत्यक्षांत "हित" हे नेहमी वैयक्तिक हित असते. लोकसंख्येची वाढ हितकर आहे कि नाही ह्या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक व्यक्ती मला मूल होणे मला स्वतःला हितकर आहे कि नाही हा निर्णय घेऊन ठरवते. काही कारणांनी मूल नको असेल तर आपसूक प्रजननदर खालावतो. बहुतेक वेळा मला स्वतःला स्वतःचे आयुष्य जगायचे आहे आणि मुलांच्या फंदांत पडायचे नाही असा विचार करून लोक मुलं टाळतात. ह्याचा अर्थ राहणीमान एका स्तराच्या वर गेले आहे असे समजावे आणि आपसूक लोकसंख्या वाढ कमी होते.

लोक वैयक्तिक हित साधतात त्यातून मग समाजाचे हित आपसूक ठरवले जाते.

मुक्त बाजारपेठीय अर्थशास्त्रांत तसेच ऍडम स्मिथ ह्यालाच इन्व्हिसिबल हॅन्ड असे संबोधित करतो.

ह्याचे चपखल उदाहरण म्हणजे आपले स्टॉक मार्केट. कुठल्याही शेअर चा दर मार्केट ठरवते. लक्षावधी लोक कंपनीच्या विविध बातमीवर लक्ष ठेवून भूतकाळांतील त्याचा परफॉर्मन्स वगैरे पाहून दार सेकंदाला "ह्या शेअर चा भाव माझ्या मते अमूक आहे" असे सांगून तो विकत घेण्याचा किंवा विकण्याचा प्रयत्न करत असतात. इथे नक्की "हितकर" भाव कुठला आहे हे कुणालाही ठाऊक नसते पण त्याच वेळी मार्केट अत्यंत वेगाने बदलांना रीस्पॉन्ड करत असते. अमुक कंपनीचा शेअर X आहे तो बरोबर आहे का ह्या प्रश्नाला काहीही अर्थ नाही कारण मार्केट ने तो भाव ठरविला असल्याने तुम्हाला (किंवा आणखी कोना एक्स्पर्ट ला) काय वाटते हा प्रश्न नगण्य आहे. समाज साक्षांत सर्व व्यापून राहिलेला प्रभू नारायण पृथ्वीवर आला तर त्याला त्या कंपनीची इत्यंभूत माहिती असेल. अजून उघडकीस न आलेली स्कँडल्स ठाऊक असतील, बॅलेन्स शीट मधील भानगडी ठाऊक असतील, कुठल्या अफवा सत्य आणि कुठल्या अफवा खोट्या हे ठाऊक असेल त्यामुळे प्रभू नारायण कदाचित खरा भाव आम्हाला सांगू शकेल पण सरकार, एक्सपर्टस, इत्यादी मंडळी इथे पूर्णपणे निरुपयोगी आहेत.

लोकसंख्या किती असावी ह्याचे सुद्धा तसेच आहे. मुले निर्माण करून (किंवा न करून) प्रत्येक व्यक्ती ह्याविषयावर आपले भाष्य करत असतो आणि ह्यांतून लोकसंख्या ठरते. अमुक एक आकडा हितकर आहे कि नाही ह्या प्रश्नाला इथे त्यामुळे काहीच अर्थ नाही.

चंद्रसूर्यकुमार's picture

8 Feb 2021 - 2:33 pm | चंद्रसूर्यकुमार

बहुतेक वेळा हो. झांबिया पासून चीन पर्यंत आणि भारत पासून ब्राझील पर्यंत सर्वत्र हाच अनुभव संपूर्ण इतिहासांत आहे.

यात एक उपप्रश्न म्हणजे गेल्या काही दशकात/शतकांमध्ये राहणीमान उंचावले आणि लोकसंख्या वाढली पण लोकसंख्या वाढल्यामुळे राहणीमान उंचावले असे म्हणता येईल का? म्हणजे अनेकदा दोन गोष्टी एकाच वेळेला होतात त्यावेळी एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट झाली असा अर्थ प्रत्येक वेळेस काढता येईलच असे नाही. गेल्या काही दशकांमध्ये/शतकांमध्ये तंत्रज्ञानात विशेषतः मेडिकलशी संबंधित तंत्रज्ञानात कमालीची प्रगती झाली त्यामुळे ज्या कारणांमुळे गावेच्या गावे, शहरेच्या शहरे एकेकाळी मारली जायची ती कारणे आता काळजी करायचा विषय राहिलेली नाहीत. त्यामुळे लोकसंख्या वाढली. आता असे म्हणता येईल की गरज ही शोधाची जननी असती त्यामुळे ही प्रगती झाली. उदाहरणार्थ कॉलरा/टायफॉईड/प्लेग इत्यादी साथींमुळे एकेकाळी हजारो-लाखो लोक मरायचे त्यामुळे त्यावर उपाय शोधायला म्हणून तंत्रज्ञानाची प्रगती झाली आणि कित्येक नवी औषधे शोधून काढली गेली असे म्हणता येईल. पण आता अशी गावेच्या गावे निर्मनुष्य करणार्‍या साथी राहिलेल्या नाहीत तरीही तंत्रज्ञानाची प्रगती चालूच आहे त्यातून आपल्या राहणीमानाचा स्तर उंचावत आहे आणि लोकसंख्याही वाढत आहे. तेव्हा माझा उपप्रश्न हा- तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे राहणीमान उंचावणे आणि लोकसंख्या वाढणे हे दोन्ही परिणाम होत असतील आणि म्हणून वरकरणी असे वाटत असेल की लोकसंख्या वाढल्यामुळे राहणीमान उंचावत आहे पण त्यामागचे कारण वेगळेच आहे असे असेल का?

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 2:42 pm | मुक्त विहारि

1. प्रदुषण वाढतेच

2. खनिज संपत्ती संपत येतेच. उदा. कोळसा खाणी कोलार येथील सोन्याची खाण

चंद्रसूर्यकुमार's picture

8 Feb 2021 - 2:46 pm | चंद्रसूर्यकुमार

बाकी तंत्रज्ञानाच्या प्रगतीत दरवेळी जीव वाचवावेत हा हेतू असतोच असे नाही तर आपण नफा कमवावा हे हेतू अधिकवेळा असतो. त्यामुळे मी स्वतः अगदी पूर्ण फ्री मार्केटवाला आहे आणि बराचसा ऑस्ट्रीयन इकॉनॉमिक्सवाला आहे. मी प्रोफेसर डॉनल्ड बोडरॉक्स यांचा कॅफेहायेक हा ब्लॉग नेहमी वाचतो. त्यात मागे वाचले होते की १९२४ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष केल्व्हिन कुलीज यांचा मुलगा व्हाईट हाऊसमध्ये टेनिस खेळत असताना गंजलेला पत्रा लागून त्यामुळे इन्फेक्शन झाले आणि ते वाढून त्यात गेला. आज भारतासारख्या देशातले गरीब लोकही त्या कारणाने मरण पावायचे नाहीत. पण १०० वर्षांपूर्वी त्या कारणामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांचा तरूण मुलगा गेला. तसेच जॉन डी. रॉकफेलर त्यावेळचा जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस होता. पण त्यालाही न्यू यॉर्कहून कॅलिफॉर्नियात एखादी महत्वाची गोष्ट पाठवायची असेल तर तीन-चार दिवस लागायचे. पण आज तंत्रज्ञानामुळे बर्‍याचशा गोष्टी इलेक्ट्रॉनिकली पाठवता येणे शक्य झाले आहे आणि एखादे कागदपत्र तातडीने पाठवायचे असले तरी ओव्हरनाईट कुरियरने ते पाठवता येऊ शकेल. रॉकफेलरला चांगली गाणी ऐकायची असतील तर मुद्दामून गायकांना घरी बोलावून वगैरे मेहफिल करावी लागायची. आज आपण ते माऊसच्या एका क्लिकवर घरबसल्या करू शकतो. तेव्हा आजचा सामान्यातला सामान्य माणूसही पूर्वीच्या श्रीमंतातील श्रीमंतांपेक्षा जमिनजुमला, वाडेगढ्या-बंगले वगैरे गोष्टी सोडल्या तर अधिक चांगले आयुष्य जगत असतो. पण ते आपल्याला समजत नाही.

पण सरकार, एक्सपर्टस, इत्यादी मंडळी इथे पूर्णपणे निरुपयोगी आहेत.

+१ लक्ष. एकेकाळी एक्सपर्ट वगैरे लोकांविषयी आदर वाटायचा पण कोरोना काळात त्यांनी केलेली सगळी भाकिते चुकली त्यानंतर तो बराचसा कमी झाला. भारतात ३० ते ५० कोटी कोरोनाच्या केसेस होणार, ३०-४० लाख लोक मरणार वगैरे नानाविध भाकिते त्यांनी केली होती. पण त्यापैकी कोणतेही भाकित (सुदैवाने) बरोबर ठरले नाही. इतकेच नव्हे तर या एक्सपर्ट मंडळींना आपले भाकित का चुकले आणि १८-१९ सप्टेंबरपासून कोरोना अचानक उतरणीला का लागला हे पण सांगता आले आहे असे दिसत नाही. म्हणजे स्वतः काहीतरी अचाट भाकिते करायची आणि ती चुकल्यास का चुकली हे पण सांगता येत नसेल तर यांना एक्सपर्ट नक्की कशाकरता आणि कोणत्या आधारावर म्हणायचे?

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 3:10 pm | मुक्त विहारि

जो सगळ्यात जास्त चुकतो, तो एक्सपर्ट.

असे, आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात ...

.....

1. तंत्रज्ञान कितीही सुधारले तरी, एखाद्या धातूचे सोन्यात रुपांतर होत नाही..

2. एका वर्षांत, एक इंच जाडीची, माती बनवू शकत नाही.

3. प्रदुषण कमी होणार नाही ..उलट कचरा वाढतो, प्लास्टिकच्या बॅगा वाढल्या.... कितीतरी घरांत अजूनही, जुने मोबाईल असतील किंवा हा घन कचरा, एखाद्या ठिकाणी, पडलेला असेल

आनन्दा's picture

8 Feb 2021 - 7:28 pm | आनन्दा

तंत्रज्ञान सुधारले तर तितक्याच चौरस फुटात दसपट उत्पादन घेता येईल - व्हर्टिकल फार्मिंग.. कदाचित 100पट पण..

बाकी चालू द्या, चर्चा वाचायला मजा येत आहे. मी पण सरकारने कायदे करून लोकसंख्या नियंत्रण करू नये, किमान एक कुटुंब 1 मूल या लेव्हलला जाऊ नये, एक कुटुंब 2 मूल पर्यंत आहे हे ठीक आहे, ते देखील मला लोकसंख्या विस्फोटाची भीती आहे म्हणून नव्हे, तर लोकसंख्या असमतोलाची भीती आहे म्हणून.

काय आहे, वर साहना यांनी म्हटल्याप्रमाणे, लोकसंख्या नेहमी ज्यांचे राहणीमान चांगले नसते त्यांचीच जास्त वाढते.. असा असमतोल वाढत गेला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि आपल्या 188 मुख्यमंत्र्यांना काळं मांजर आडवं जेल, म्हणून कायदा आणावा असे माझे मत आहे.

साहना's picture

8 Feb 2021 - 7:49 pm | साहना

> 1. तंत्रज्ञान कितीही सुधारले तरी, एखाद्या धातूचे सोन्यात रुपांतर होत नाही..

चुकीची माहिती आहे. ऊर्जेची किंमत कमी झाली तर प्रचंड प्रमाणात सोने निर्माण केले जाऊ शकते. सोनेच काय कुठलेहि खनिज निर्माण केले जाऊ शकते. समुद्राच्या पाण्यांत प्रचंड प्रमाणात सोने आहे. सध्या हे काढण्याचा खर्च लागणाऱ्या ऊर्जेमुळे प्रोहिबीटिव आहे पण ऊर्जा स्वस्त झाली तर सर्वच खनिजांचे दर आपोआप खाली पडतील.

मी आधी लिहिल्या प्रमाणे खनिज संपत्ती कमी होईल हि भीती पूर्णतः निरर्थक आहे. जगांतील क्रूड ऑईल चे साठे वाढत गेले आहेत, कमी नाही झाले.

> एका वर्षांत, एक इंच जाडीची, माती बनवू शकत नाही.

अहो कशाला पाहिजे ? मातीची कमतरता आहे का कुठे ? नक्की म्हणायचे काय आहे ? गंगाधर उर्फ शक्तिमान सारखे युक्तिवाद कशाला ?

> 3. प्रदुषण कमी होणार नाही ..उलट कचरा वाढतो, प्लास्टिकच्या बॅगा वाढल्या.... कितीतरी घरांत अजूनही, जुने मोबाईल असतील किंवा हा घन कचरा, एखाद्या ठिकाणी, पडलेला असेल

पॉईंट काय आहे ?

एका ठराविक कालावधी नंतर आणि अति वापरामुळे, हे साठे, कधी ना कधी संपणारच आहेत ...

साठे आहे तिथेच आहेत, पण तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे, आता काही ठिकाणी, हे तेल काढणे आर्थिक दृष्टीने परवडत आहे...

अजूनही काही ठिकाणी, तेलाचे साठे आहेत, पण त्यांचा काढण्याचा खर्च जास्त आहे. तेलाची किंमत वाढली की, हे पण साठे वापरात येतील ...

सौदी अरेबिया, उगाच इतर क्षेत्रांत गुंतवणूक करत नाही आहे. अरामको, भारतीय व्यापारांच्या बरोबर उगाच संबंध वाढवत नाही आहे.

नाणार रिफायरीला, उगाच विरोध झालेला नाही.

तेलाचे खूप आर्थिक, सामाजिक, धार्मिक आणि हुकूमशाही पदर आहेत.एकाचा अभ्यास करायला घेतला तर दुसरा समोर येतो...तेल हळूहळू कमी होत आहे, ही वस्तुस्थिति आहे..

कोणे एके काळी, नैसर्गिक वायुंपासून तेल काढणे हा आतबट्याचा व्यवहार होता. तंत्रज्ञान होते पण परवडत न्हवते. तेलाची किंमत वाढल्यामुळे, आता ही प्रोसेस परवडत आहे ....

2. रासायनिक खते आणि कीटकनाशके, यांच्या वापरामुळे, अन्न उत्पादन वाढले पण, जमिनीचा कस कमी होत आहे ...एकदा नापिक व्हायला लागलेली जमीन, परत कसदार व्हायला वेळ लागतो... तुम्हाला ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागेल ...विदर्भ, मराठवाड़ा, कोंकण,खानदेश,पश्र्चिम महाराष्ट्र इथे फिरलात तर, तुम्हाला माहिती मिळेल... जमिनीचा कस कमी झाला आहे, ही वस्तुस्थिति आहे आणि जमिन एका वर्षांत कसदार होत नाही ....

3. लोकसंख्या वाढली की प्रदुषण वाढतेच, हे साधे गणित आहे..

Rajesh188's picture

8 Feb 2021 - 8:37 pm | Rajesh188

हे अनुभवाचे बोल आहेत म्हणून 100% खरे आहेत.
रासायनिक खते वापरून जमिनी चा कस निघून गेला की ती परत उपजावू करणे अत्यंत अवघड आहे खर्चिक आहे.
नवीन शोध पर्याय देतील पण जी गोष्ट फुकट मध्ये उपलब्ध होती त्या साठी खूप मोठा खर्च
येईल.
जंगल जमिनी च्या पोटात गाडली गेल्यावर अनेक वर्षाच्या कालावधींतर खनिज तेल आणि नैसर्गिक वायू तयार झाले असे शास्त्र सांगते .
ती खूप वर्षाची क्रिया प्रक्रिया आहे .
तेच खनिज तेल संपले तर ते कारखान्यात लगेच निर्माण करता येणार नाही.
चांगल्या प्रकार ची दारू हवी असेल तर 50 ते 100 वर्ष त्या दारू ची निर्मिती करण्यासाठी लागतात.

चंद्रसूर्यकुमार's picture

8 Feb 2021 - 11:00 pm | चंद्रसूर्यकुमार

लोकसंख्या वाढत राहावी असे मला वाटत नाही. कारण वाढती लोकसंख्या कायम चांगली असे असेल तर मग लोकसंख्या अमर्याद का वाढू नये म्हणजे उभे राहायला जागा नाही अशी परिस्थिती पृथ्वीवर सर्वत्र (किंवा पाणी हटवून तिथे जमिन रिक्लेम केली तिथे किंवा परग्रहावर वस्ती झाली तर तिथे) आली तरी ते पण चांगलेच म्हणायला लागेल. ते कसे चांगले हे कल्पनाशक्तीला कितीही ताण दिला तरी त्याची मला तरी कल्पना करता येत नाहीये. म्हणजे एक कोणतातरी आकडा येईल त्यानंतर जास्त लोकसंख्या ही अ‍ॅसेट न होता लाएबिलिटी व्हायला लागेल असे मला अजूनही वाटते. वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे लेखिकेच्या नव्या लेखाची वाट बघत आहे.

तरीही

एका ठराविक कालावधी नंतर आणि अति वापरामुळे, हे साठे, कधी ना कधी संपणारच आहेत ...

यात आता ज्या पध्दतीने गोष्टी चालू आहेत त्या तशाच चालू असतील हे एक गृहितक आहे. तंत्रज्ञानाचा विकास या प्रकाराला एंडरएस्टिमेट करून चालणार नाही. एक साधे उदाहरण द्यायचे तर एकेकाळी म्हणजे फार पूर्वीची गोष्ट नाही- १० वर्षांपूर्वीची सौर उर्जा बर्‍यापैकी महाग होती (१० रूपये पर युनिटपेक्षा जास्त). पण दोन वर्षांपूर्वी गुजरातमध्ये २.६५ रूपये प्रति युनिट या दराने पॉवर परचेस अ‍ॅग्रीमेन्ट गुराविमंने केले (https://mercomindia.com/gujarat-ppa-solar-projects/). तेव्हा समजा तेलाचे साठे संपले तरी इतर पध्दतीने (अणुउर्जा, टायडल एनर्जी वगैरे) उर्जा निर्माण करता येणे अशक्य आहे असे नाही. आणखी काही वर्षांनी इलेक्ट्रिक कार्स सर्रास वापरात आल्या की तेलाची उपयुक्तता बरीच कमी होईल. अगदी भारतात एक लॅन्डलाईन फोन मिळण्यासाठी अनेक वर्षे वाट बघणे ते अगदी भाजीवाले-कामवाल्यांपर्यंत सगळ्यांकडे मोबाईल येणे हा मोठा पल्ला १२-१५ वर्षात पार पडला तेव्हा पुढील १२-१५ वर्षात तेलावर/नैसर्गिक वायूवर आधारीत वाहने जाऊन इलेक्ट्रिक वाहने येणे अशक्य आहे असे नक्कीच नाही.

लेखिकेच्या जास्त लोकसंख्या नेहमी चांगली हा दावा मलाही तितकासा पटलेला नाही. पण वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे दुसर्‍या लेखाची वाट बघू आणि नवे कोणते मुद्दे येतात का ते बघू.

> लोकसंख्या वाढत राहावी असे मला वाटत नाही.

माझ्या लेखांत मी तसे लिहिलेही नाही आहे. माझा दावा हायेकीयन आहे. लोकांना त्यांना पाहिजे तशी मुले निर्माण करण्याचे स्वातंत्र्य द्या आणि आपोआप समाजाचे हिट त्यातून साधले जाईल. कुना सरकारी बाबूने काही वैश्विक फॅमिली प्लॅनिंग करण्याची गरज नाही.

> कारण वाढती लोकसंख्या *** कायम चांगलीच *** असे असेल तर मग लोकसंख्या अमर्याद का वाढू नये

तुम्हाला ठाऊक असलेले फ्री मार्केट ची तत्वेच इथे लागू पडतात. जो पर्यंत ट्रेड फ्री आहे तोपर्यंत तो पॉसिटीव्ह सम गेम असतो. सरकारी किंवा इतर कुणी लुडबुड सुरु केली कि त्या व्यवहाराचे सामाजिक चांगले परिणाम कमी होत जातात. वाढती लोकसंख्या तो पर्यंत चांगली आहे जो पर्यंत लोक ती स्वखुशीने वाढवत आहेत. तुम्ही कृत्रिम रित्या लोकांना ती जास्त किंवा कमी करण्यास मजबूर केले तर त्याचे नेहमी प्रमाणे अन इंटेंडेड परिणाम होतील आणि ते बहुतेक करून वाईट असतील. (चीन आणि कोरिया ह्यांचा विरोधाभास पहा).

> ते कसे चांगले हे कल्पनाशक्तीला कितीही ताण दिला तरी त्याची मला तरी कल्पना करता येत नाहीये. म्हणजे एक कोणतातरी आकडा येईल त्यानंतर जास्त लोकसंख्या ही अ‍ॅसेट न होता लाएबिलिटी व्हायला लागेल असे मला अजूनही वाटते.

कल्पना करण्याची गरज नाही कारण अशी स्थिती उध्दभवणे शक्य नाही.

> कोणतातरी आकडा येईल

बरोबर आहे. आपले इंट्युशन बरोबर आहे. पण हा आकडा कसा निर्धारित होईल ? तर लोकसंख्येचा आकडा ठरविण्याऐवजी, प्रत्येक व्यक्ती आपले मूल असेट आहे कि लायेबिलिटी हे वैयक्तिक स्तरावर ठरवेल आणि त्यामुळे एका मोठ्या मार्केट प्रमाणे लोकसंख्येचा एकूण आकडा ह्या इन्व्हिसिबल हॅन्ड ने ठरविला जाईल. अर्थांत काही लोक चांगले निर्णय घेतील तर काही लोक चुकीचे पण फ्री मार्केट च्या तत्वानुसार काय चांगले आणि काय चांगले नाही हे काळाच्या ओघांत स्पष्ट होईल आणि लोकसंख्या एका योग्य आकड्यावर येऊन आपोपाप स्थिरावेल.

हा आकडा नक्की काय आहे हे कुणालाच ठाऊक नाही आणि कुठल्याही एक्स्पर्ट ला सुद्धा तो ठाऊक नसेल त्यामुळे त्या संदर्भांत काहीही कायदे वगैरे केले तरी ते बहुतेक करून चुकीचे असेल हे नक्की.

> तेव्हा समजा तेलाचे साठे संपले

आपले म्हणणे १००% बरोबर आहे. तेलाचे साठे संपणार सुद्धा नाहीत. जर सप्लाय कमी झाली तर किमती वाढतील आणि त्यामुळे मागणी आपोआप कमी होईल. हे सर्व इलॅस्टिक असेल आणि साधारणतः ३०३० मध्ये सुद्धा खनिज तेल जमिनीत उपलब्ध असेलच.

खनिज तेलाच्या आधी पाश्चात्य जग व्हेल ऑईल वापरत होते. व्हेल ऑईल आजही उपलब्ध आहे, फक्त प्रचंड प्रमाणात महाग आहे.

साहना's picture

9 Feb 2021 - 1:11 am | साहना

चक्रम (सर्क्युलर) वाद घालण्यात अर्थ नाही.

कुठलाही खनिजाचा साठा कधीही संपणार नाही. हे माझे मत नसून अर्थशास्त्रांतील एक ठाऊक असलेले ज्ञान आहे. तुमच्या धारणेत प्रमुख दोष हा आहे कि सब्स्टिट्यूशन (पर्यायी पदार्थ) आणि डिमांड/सप्लाय इलॅस्टिसिटी ह्या दोन गोष्टी तुम्ही समजत नाही आहात. दुर्दैवाने काही शब्दांत समजावून सांगण्यासारख्या गोष्टी नाहीत पण ३०० वर्षे आधी जगाची लोकसंख्या २०२० मध्ये ७ अब्ज असेल असे कोणाला सांगितले असते तर त्या व्यक्तीने म्हटले असते कि "जगांत इतके मेण उपलब्ध नाही त्यामुळे इतक्या मेणबत्त्या निर्माण होऊच शकणार नाही आणि त्यामुळे बहुतेक जग अंधारात जगेल". प्रत्यक्षांत ना भूतो अश्या प्रकारच्या उजेडांत आम्ही जगत आहोत. सध्याची स्थती पाहून त्यावरून भविष्य एक्सट्रापोलेट करणे ह्यासारखी चुकीची गोष्ट नाही.

तुम्हाला आवड असेल तर कोबाल्ट धातूंबद्दल हा लेख सुदर आहे आणि सोन्याच्या बद्दल दुसरा लेख:

१. https://fee.org/articles/no-were-not-running-out-of-minerals/
२. https://www.bloombergquint.com/gadfly/is-the-world-running-out-of-gold-t...

> 2. रासायनिक खते आणि कीटकनाशके, यांच्या वापरामुळे, अन्न उत्पादन वाढले पण, जमिनीचा कस कमी होत आ

बरोबर आहे. ह्याला चुकीच्या सरकारी पॉलिसी भारतांत जबाबदार आहेत. बहुतेक प्रगत राष्ट्रांत जमिनीचा कस जास्त चांगल्या प्रकारे मॅनेज केला जातोय.

> . लोकसंख्या वाढली की प्रदुषण वाढतेच, हे साधे गणित आहे.

हो पण त्याचा इथे संबंध काय ? प्रदूषण, प्रदूषणाचे प्रकार आणि आमच्या राहणीमानावर होणारा त्याचा परिणाम बदलत जातो.

मुक्त विहारि's picture

9 Feb 2021 - 8:00 am | मुक्त विहारि

भारतात, सोन्याच्या खाणी होत्या ... त्यातील सोने संपले ...आता काही खाणी बंद आहेत ....

2. सरकारने कधीही, शेतकरी वर्गाला, रासायनिक खते आणि कीटकनाशके, यांच्या वापराची जबरदस्ती केली नाही...

घरखर्च चालवायला, कमीत कमी जागेत, जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यासाठी, ते करणे भाग पडते ...

3. प्रदुषणाचा संबंध येतोच ... आजारपणाचा आणि प्रदुषणाचा संबंध असतोच... 1960-70 मध्ये डोंबिवलीत, शुद्ध हवा होती, आज अफाट लोकसंख्ये मुळे, डोंबिवली येथील हवा प्रदुषित झाली आहे...

कोणतेही मूलद्रव्य सामान्य पणे निर्माण केले जाऊ शकत नाही ! सोने हे पिरियॉडिक टेबलात समावेश असलेला धातू आहे ना ? शोधाशोध करून आजुन पुष्कळ खनिजे शोधली जाऊ शकतील . सूर्यऊर्जा जर सुलभपणे साठवता आली तर इंधनाचा प्रश्न बराच सुटू शकेल ! कदाचित अजूनही पेट्रोल देखील खूप मिळू शकेल पण या केवळ अटकळी भूतकाळातील डेटावर अवलंबून मांडल्या जाऊ शकत नाहीत ! भूतकाळात जे घडले तसे ते त्याच रीतीने घडेल असे म्हणता येत नाही तसे ते घडणार असेही म्हणता येत नाही !

अर्थात वरील उदाहरणे जागतिक पातळीवर लागू असतील कोणता भूप्रदेश इटकर किती अन्य साधनांसाठी अडवला जाऊ शकेल हे त्या त्या देशातच ठरणार आहे! कालांतराने देश हीच संकल्पना मोडीत निघाली तर मानव जातीला काही आशा असेल !

मुक्त विहारि's picture

9 Feb 2021 - 8:04 am | मुक्त विहारि

पण, ते साठवायला खनिजे लागतात .... आणि खनिजे संपणारच आहेत ...

समुद्राच्या पाण्यातून सोने निर्मिती करणारा प्रयोग जगात कुठे झाला आहे का?
असेल तर विश्वासू माहिती पुरवणाऱ्या सायन्स मॅगझिन ची लिंक ध्या .
आणि कोण कोणती खनिजे माणूस बनवू शकतो आणि तसे प्रयोग झाले आहेत ह्याची पण लिंक ध्या.
खनिज तेलाचे साठे कमी न होता वाढत आहेत ह्या तुमच्या वाक्याला काही आधार असेल तर त्याची पण विश्वासू लिंक ध्या.
तुम्ही सांगितले म्हणून खरे मानता येणार नाही.

Rajesh188's picture

8 Feb 2021 - 10:30 pm | Rajesh188

सहनाजी ना माझी नम्र विनंती आहे त्यांनी fusion energy वर सविस्तर लिहावे .
ती जवळ जवळ फुकट कशी उपलब्ध होईल ह्या वर चार शब्द सांगावेत.
पेट्रोल नी 100 री जवळ गेल्या मुळे जनता त्रस्त आहे .
ही fusion energy फुकट मिळणार आहे हे फक्त वाचून सुद्धा आम्ही दिवस काढू .
तेरी परत एकदा विनंती आहे त्यांनी ह्या फुकट निर्माण होणाऱ्या आणि लोकांना सुद्धा अतिशय स्वस्तात मिळू शकणाऱ्या ऊर्जा विषयी सांगावा च

सतिश म्हेत्रे's picture

8 Feb 2021 - 10:35 pm | सतिश म्हेत्रे

अगदी माझ्या मनातले बोललात राजेश राव. साहनाताई उत्तराच्या प्रतीक्षेत.

> लोकसंख्या वाढल्यामुळे राहणीमान उंचावले असे म्हणता येईल का?

आपण कॅफे हायेक वाचता म्हटल्यावर काही गोष्टी तुम्हाला आधीपासूनच ठाऊक असतील. (fee.org आणि reason.com सुद्धा वाचावे).

तंत्रज्ञान सुधारते कारण लोकसंख्या जास्त आहे म्हणून. जगाची लोकसंख्या समाज २ अब्ज असती तर आयफोन पासून इंटरनेट पर्यंत बहुतेक शोध २०२० पर्यंत लागलेच नसते.

जुलिअन सायमन ह्यांचा मुख्य दावा खालील होता.

मानवी वेळ हा एकाच खरा रिसोर्स आहे. इतर सर्व त्याच्यावर अवलंबून आहे. जीवनमानाचा दर्जा हा तंत्रज्ञानाने वाढतो (इथे तंत्रज्ञान ह्या शब्दाचा अर्थ फक्त फोन आणि संगणक नसून, सुई धागा पासून बैलगाडीपर्यंत सर्व काही अंतर्भूत आहे). तंत्रज्ञानाची प्रगती हि मानवी वेळेवर अवलंबून आहे. जितकी लोकसंख्या जास्त तितकी तंत्रज्ञानाची प्रगती वेगाने आणि पर्यायाने लोकांचे राहणीमान उंचावत जाते.

आपण लिहिलंय याप्रमाणे तंत्रज्ञानाने लोकसंख्या वाढते. पोलिओ लसीने लक्षावधी जीव वाचविले. आधुनिक शेती पद्धतींनी अन्न धान्याचे भाव कमी केले इत्यादी. पण त्याच वेळी तंत्रज्ञानाने लोकसख्या कमी सुद्धा होते. परिवार नियोजन आणि गर्भनिरोधक असल्यामुळे. आता ह्याचा नेट एफ्फेक्त पॉसिटीव्ह आहे कि निगेटिव्ह हे ठाऊक नाही. पण दोन्ही गोष्टीमुळे राहणीमान उंचावते.

राहणीमान उंचावले कि लोकांना मुले नकोशी होतात. आणि लोकसंख्येला रेग्युलेट करण्याचे मुख्य साधन हे आहे (सरकारी नियम नाही).

१. https://www.cato.org/blog/prosperity-world-population-growth

अर्धवटराव's picture

9 Feb 2021 - 3:10 am | अर्धवटराव

राहणीमान उंचावले कि वेळेचा उपयोग राहणीमान मेण्टेन करण्यात खर्च होणे, अनेक अपत्यांना तेच उच्च राहणीमान उपलब्ध करुन देण्याची शक्यता न वाटणे इत्यादी कारणमुळे मानसीक कारणांमुळे लोकसंख्या रेग्युलेट होते हे खरं आहे. युरोपमधे अनेक देशांत लोकसंख्या वाध उणे दरात होते आहे यामागे हेच कारण आहे का? कल्पना नाहि.

लोकसंख्या वाढीचे तंत्रज्ञान प्रगतीशी डायरेक्ट काहि संबंध नाहि. बहुतांश लोक्स तंत्रज्ञानाचे उपभोक्ते असतात. अधिकांश लोक्स समस्येचा कळत-नकळत भाग असतात. समस्या सोडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणार्‍या मेंदुची सरासरी फार कमि असते. त्यामुळे तंत्रज्ञान मानवाला कडेलोटापासुन वाचवण्याची किंवा मानवी जीवन आनंददायी करण्याची गॅरॅण्टी घेऊ शकत नाहि.

विनाशातुन आपोआप लोकसंख्या कंट्रोलमधे येते, पण हा मुद्दा सदर चर्चेच्या दृष्टीने औट ऑफ सिलॅबस आहे :)

तर मुळ मूद्दा असा, कि लोकसंख्या वाढीचा पृथ्वीवर मानवी वस्ती करण्यायोग्य वातावरण मेण्टेन राखण्याशी डायरेक्ट संबंध आहे हे उघड आहे. मानवी कल्पकतेला काहि मर्यादा नाहि. त्यामुळे मनुष्य प्राणी हजारो करोडची संख्या गाठुन देखील यच्चयावत सोलर सिस्टीमवर घर बांधुन आरामात जगेल, किंवा आहे ते रिसोर्सेस फस्त करुन तडफडुन मरेल, या दोन्ही एक्स्ट्रीम शक्यता आहेत.

> बहुतांश लोक्स तंत्रज्ञानाचे उपभोक्ते असतात. अधिकांश लोक्स समस्येचा कळत-नकळत भाग असतात.

समजा लाखांत एक माणूस जिनिअस असतो तर असे जिनिअस जास्त कसे निर्माण होतील ? खूप लाख लोकसंख्या असेल तर. आमच्यासारखी माणसे जिनिअस नसली तरी ह्या प्रक्रियेत भाग घेऊन हातभार लावत असतात. लोकसंख्या जितकी जास्त तितके अधिक एलोन मस्क किंवा आईन्स्टाईन हे निर्विवाद सत्य आहे.

> आहे ते रिसोर्सेस फस्त करुन तडफडुन मरेल, या दोन्ही एक्स्ट्रीम शक्यता आहेत.

रिसोर्सेस फस्त करणे हे फ्रिज मधील दूध संपवणे ह्या प्रकारचे नाही. हि प्रक्रिया प्रचंड इलॅस्टिक असते. म्हणजे समजा खनिज तेल कमी होत आहे तर हळू हळू अनेक ऑईल रींग्स बंद पडतील. त्यामुळे त्यांच्या किमती वर जातील. किमती वर झाल्या कि आपसूक आम्ही लोक कमी वाहने वापरू लागेल. मग डिझेल वर चालणारे पावर प्लांट्स बंद पडून त्या जागी कोळसा वापरला जाईल. तरी सुद्धा खनिज तेल जमिनीतून येणे कमी झाल्यावर किमती आणखीन वाढतील मग हळू हळू बस, ट्रेन्स, विमाने महाग होत जातील. हि सर्व प्रक्रिया अनेक दशके चालेल. ह्या दरम्यान मानवी मेंदू बहुतेक करून खनिज तेलाचे पर्याय शोधेल. हे पर्याय नक्की काय असतील हे सांगणे अशक्य आहे. पण बहुतेक करून पर्याय हे असतीलच. पण हि प्रोसेस अत्यंत हळू असेल. जानेवारी १२ २०३५ मध्ये जगांतील खनिज तेल संपले आणि जानेवारी १३ ला तात्यांनी बुलेट भंगारात विकून सायकल घेतली असे होणार नाही.

आणि समज पर्याय नाहीच तर मग एकूण राहणीमानाचा स्तर वेगाने खाली जात राहील. त्यातून एका बाजूने गरिबी, बालमृत्यू, उपासमार इत्यादीने जास्त लोक मरतील, सरासरी आयुर्मर्यादा कमी होत जाईल, लोकसंख्या त्यामुळे कमी होईल आणि जो संसाधांवर ताण पडला असेल तो आपसूक कमी होईल. पण तोपर्यंत सरासरी लोकसंख्या आणि जीवनमान इतके कमी झाले असेल कि पुन्हा प्रजनन दर वाढायला लागेल.

ह्या सर्व गोष्टी १०-२० वर्षांत नाही तर कदाचिन्त १००-२०० वर्षांच्या कालावधीत होतील. माझ्या मूळ मुद्याशी आपला काहीही मतभेद असला तरी किमान हि एक गोष्ट मान्य करणे बहुतेकांना शक्य असावे. इतक्या प्रचंड कालावधीत नक्की लोकसंख्या किती असावी, प्रजनन दर नक्की कधी शून्य व्हावा हे निर्धारित करणे कुठल्याही एक्स्पर्ट च्या आवाक्याच्या बाहेर आहे. त्यामुळे सरकारी हस्तक्षेप ह्यांत चांगल्या पेक्षा वाईट जास्त घडवून आणू शकतो.

तुम्हाला सरकार म्हणजे काय अपेक्षीत आहे? माणसाचं जगणं रेग्युलेट करणारी संस्था? जोपर्यंत समाजजीवन रेग्युलेशन आधारीत आहे तोपर्यंत सरकार नामक संस्था अस्तीत्वात असेलच. आणि जर ति अस्तित्वात असेल तर सरतेशेवटी समाजाच्या सर्व समस्या सरकार दरबारी दाखल होतीलच. त्यामुळे सरकारी हस्तक्षेप अटळ आहे. समाजात होणारे स्तित्यंतरं जास्तीतजास्त सुखकर आणि कमितकमी दु:खकर व्हावेत हि सरकार नामक यंत्रणेची जबाबदारी आहे. हि यंत्रणा ऑर्गेनीक पद्धतीने इव्होल्व झाली आहे. संसदेपासुन ते खाप पंचायतीपर्यंत, आणि राष्ट्रपतींपासुन ते हॅड ऑफ फॅमिली पर्यंत अशी अनेक स्तरीय, अधिकृत-अनधिकृत प्रतलांची हि सांगड आहे. या संस्थेचा हस्तक्षेप टाळणं एकतर शक्य नाहि, किंवा तसा तो टाळलाच तर होणारे परिणाम जास्त क्लेशदायक असतील.

तुम्ही ज्या दोन शतकांच्या स्थित्यंतरांचा परिणाम विशद करताय तो देखील सरकारी हस्तक्षेपाशिवाय होणार नाहि.

माणसाच्या वैयक्तीक निर्णयांमधे सरकारने लुडबुड करु नये, निसर्गाचे आणि समाजाचे हार्डकोर नियम मानवी जीवन ऑटेमॅटीक रेग्युलेट करत असतात, हे म्हणणं तत्वतः ठीक आहे. पण सरकार नामक रचना माणसाच्या गरजेतुनच निर्माण झाली आहे. तिच्या मर्यादा आणि कार्यक्षमता काय असाव्या हा फार सब्जेक्टीव्ह विषय आहे. माणसाच्या लोकसंख्या नियंत्रण करण्यामागे जे विवेकी-अविवेकी विचार असतील तेच त्याच्या सरकारमधे देखील प्रतिबींबीत होतील.

अफाट लोकसंख्ये मुळे, 1960 ते 2020, ह्या फक्त 60 वर्षांत, डोंबोलीची वाट लागली....

काळे मांजर's picture

9 Feb 2021 - 10:08 pm | काळे मांजर

लोकसंख्या वाढले की वाटण्या होऊन शेताचे अप्पेपात्र होते

तसेच शहराचेही होते

चंद्रसूर्यकुमार's picture

9 Feb 2021 - 9:37 am | चंद्रसूर्यकुमार

जगाची लोकसंख्या समाज २ अब्ज असती तर आयफोन पासून इंटरनेट पर्यंत बहुतेक शोध २०२० पर्यंत लागलेच नसते.

हा दावा मी वाचला आहे पण तो तितकासा पटला नाही किंवा पचला नाही.

तंत्रज्ञानाची प्रगती होण्यास स्वतंत्र विचार करण्यावर कमीतकमी बंधने असणे हे सगळ्यात महत्वाचे युरोपात रेनेसान्सच्या नंतर अशी बंधने बरीच कमी झाली आणि स्वातंत्र्याचा अनुभव लोकांना घ्यायला मिळाला. त्यानंतर काय झाले हे सगळ्यांनाच माहित आहे. तीच गोष्ट अमेरिकेची. तिथे तर कसलीच बंधने नव्हती. तसेच आयफोनचा शोध हा कोणत्याही पार्श्वभूमीशिवाय लागलेला नाही. १८८० च्या सुमारास टेलिफोनचा शोध, त्यापूर्वी तारयंत्राचा शोध, दरम्यान रेडिओचा शोध मग सुरवातीला पोलिस-लष्कराच्या वापरासाठी वायरलेस हॅन्डसेट्स मग सामान्यांसाठी मोबाईल फोन आणि मग आयफोन अशी प्रगती झाली. हे शोध बहुसंख्य अमेरिकेत लागले. सामान्य अमेरिकन लोकांना अजूनही अमेरिका म्हणजेच जग वाटते तेव्हा १००-१५० वर्षांपूर्वीही फार वेगळी परिस्थिती असेल असे मानायचे कारण नाही. तेव्हा मुद्दा हा की हे शोध बर्‍याच अंशी नफा कमवावा या उद्देशाने जरी लागले असले तरी जगात किती लोकसंख्या आहे हा मुद्दा शोध लागताना कसा काय महत्वाचा ठरला असेल हे समजायला मार्ग नाही. आजही हे काही इनोव्हेशन चालू आहे ते पण आताची लोकसंख्या हाच घटक लक्षात घेऊन केले जात असेल ना? म्हणजे समजा जगाची लोकसंख्या ७०० कोटी आहे (किंवा भारताची १३० कोटी आहे) तर इनोव्हेशन करणारा- 'अरे यार जगाची लोकसंख्या ८०० कोटी असती (किंवा भारताची १५० कोटी असती) तर हा शोध मी लावला असता' असे थोडीच म्हणणार आहे? मग तेव्हाही शोध लावणारे असे म्हणाले असतील ही कल्पना करायला मला तरी जड जाते.

दुसरे म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे स्वतंत्र विचार करण्यावर कमीतकमी बंधने असणे हे तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी महत्वाचे असते. आपले मिल्टन फ्रीडमनसाहेब म्हणाले आहेत त्याप्रमाणे 'पाश्चिमात्य जगात स्वातंत्र्याच्या वातावरणात जन्माला आल्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य हे मानवी समाजाची नैसर्गिक स्थिती आहे असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. इतिहासात आणि आताही बहुसंख्य लोक स्वातंत्र्य आणि समृध्दीच्या वातावरणात नाही तर दहशत आणि दडपशाहीच्या वातावरणात राहिले आहेत'. समजा आफ्रिकेतल्याप्रमाणे हुकुमशाही/ यादवी याचे वातावरण जगात सर्वत्र असते तरी ६०० नाही ८०० कोटी लोकसंख्या असती तरी इंटरनेटचा शोध लागला असता का? मला तरी हे कठिण वाटते.

तिसरे म्हणजे आता ६००-७०० कोटी लोकसंख्या आहे म्हणून इंटरनेट-आयफोनचे शोध लागले असे गृहित धरले तरी मग अशा काही गोष्टी असतील त्यासाठी आताची ६००-७०० कोटी लोकसंख्या कमी आहे आणि कदाचित १००० कोटी लोकसंख्या असती तर ते शोध लागले असते. ते कोणते हे आता आपल्याला सांगता आले नाही तर मग उपयोग काय? कारण हा सगळा खटाटोप predicting the past साठी होणार.

असे काही प्रश्न पडले होते.

राहणीमान उंचावले कि लोकांना मुले नकोशी होतात. आणि लोकसंख्येला रेग्युलेट करण्याचे मुख्य साधन हे आहे (सरकारी नियम नाही).

नक्कीच. जिथेतिथे सरकारचा हस्तक्षेप नकोच.

मुक्त विहारि's picture

9 Feb 2021 - 11:35 am | मुक्त विहारि

वेगवान संदेशवहन आणि दळणवळण, ह्याचे शोध उत्तरोत्तर होतच राहणार...

जिथेतिथे सरकारचा हस्तक्षेप नकोच.

भारतीय लोकांची मानसिकता वेगळी आहे ... आपल्या लोकांना फटक्यांचीच भाषा समजते ...

उपयोजक's picture

9 Feb 2021 - 3:11 pm | उपयोजक

प्रतिसाद आवडला!

चौकटराजा's picture

8 Feb 2021 - 4:14 pm | चौकटराजा

प्रत्यक्षांत "हित" हे नेहमी वैयक्तिक हित असते. अगदी चूक धारणा !

तुमची सर्व विचारधारा आतापर्यंत पाहता व्यक्ती आधिष्ठित आहे असे दिसते . त्या मुळेच चौथे मूल देखील यशस्वी झाले असे तुम्ही म्हणता आहात ! सर्वच रोख वैयक्तिक प्रगती म्हणजेच एकूण राष्ट्राची एकत्रित प्रगती असा मायक्रो अर्थ शास्त्राचा सिद्धांत आपण उचलून धरता आहात. पुस्तके विकत वाचून घेणे , योगासने करणे ई सुबत्तेमुळे घडते असा उल्लेख तर तुम्ही केलेलाच आहे ! पण एक उदाहरण तुम्हाला दिले तर ते पूरेसे आहे ते असे की हेलमेट घालणे हे वैयक्तिक हित आहे ना ? त्याने फक्त माझेच डोके वाचते की मी ज्या पादचार्याच्या अंगावर गाडी घातली त्याचेही डोके वाचते ? तरीही ते सक्तीचे असणारा कायदा भारत देशात आहे ! जगात आहे ! तो कशासाठी ? तर त्याने एकतर काही सामाजिक प्रश्न निर्माण होत असावेत असा समज कायदे करणाऱ्याचा आहे म्हणून !

मानवी समाजात कायदे आहेत ते सर्व व्यक्तीचे सामायिक असे हित जपले जावे म्हणून. ती सर्व नागरिकांच्या हिताची बेरीज नव्हे .नागरिकात जसे पोलीस असतात तसे चोर देखील नागरिकच असतात. एरवी एक उपमुख्यमंत्री दोन वर्षे तुरुंगात खितपत का पडता ?

आपण सुस्थितीत आले की सभोवार सुबत्ता आली हा जर तुमचा समज दृढ असेल तर मग आणखी काय बोलणार ?

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 4:29 pm | मुक्त विहारि

अजून भर घालतो ....

आमचे एक गुरू आहेत, ते म्हणतात, राजधानीत, जितकी लोकसंख्या कमी, तितकी उत्तम ...

> रीही ते सक्तीचे असणारा कायदा भारत देशात आहे ! जगात आहे ! तो कशासाठी ? तर त्याने एकतर काही सामाजिक प्रश्न निर्माण होत असावेत असा समज कायदे करणाऱ्याचा आहे म्हणून !

चुकीचा कायदा आहे. सीट बेल्ट कायद्याप्रमाणेच.

सुबत्ता व लोकसंख्या नियंत्रण यांचा एक संबंध मला असा दिसतो की सुबत्ता आली की हाव वाढते हाव वाढली की अधिक मुले झाली तर आपली हाव पुरी होणार कशी या काळजीने कमी मुलांना जन्म दिला जातो ! दुसरे कारण मला असे सापडते की आपले शिक्षण ,आपल्याला जाणवणारी स्पर्धा या पेक्षा आपले मुलाला अधिक कठीण परिस्थितीत आयुष्य घडव्हावे लागेल अशी काळजी म्हणून कमी मुले . वेगळी मीमांसा कुणाकडे असेल तर तिचे स्वागत आहे .जगात कुणाला काय वाटून लोकसंख्या का कमी झाली यापेक्षा ती कोणकोणत्या कारणाने वाढते व कोणत्या कारणाने कमी होते हे नीट पाहावे लागेल . माझ्या निरीक्षणात लोकसंख्या वाढीत खालील घटक महत्वाची भर घालतात.

१) जगभर मुलगीच सासरी जात असल्याने मुलगाच आपल्याला म्हातारपणी आधार होईल अशी अटकळ ! ( १९९१ नंतर ही अटकळ फोल होताना दिसत आहे !) त्यामुळे मलगी झाली तर हरकत नाही पण एकतरी मुलगाच हवा ही भावना .
२) आपल्या दोघ नोकरी करत असल्याने आपले एक मूल एकलकोंडे होऊ नये व नाती हळू हळू पातळ होत असल्याने एकाला दुसरे जिव्हाळ्याचे जवळचे कुणीतरी असावे ही भावना .
३) एक मूळ मतिमंद ,अपंग असेल तर त्याची काळजी आपल्यानंतर कोण घेणार सबब दुसर्या मुलाचा जन्म .
४) आपल्या भावाला बहिणीला मूल नाही त्यांची संपत्ती जवळचे नातेवाईक म्हणून आपल्याच मुलांना मिळेल या आशेने आपण एखादे मूल जास्त जन्माला घातले तर काय बिघडले ही भावना .
५) आपला मोठा बिझिनेस आहे त्याला पुढे विकासात घरचेच विश्वासाचे मनुष्यबळ हवे सबब थोडी जास्त मुले असायला काही हरकत नाही ! असा हिशेब !
६) अधिक मुले घरात नांदणे ही मानसिक गरज असणे !
७) बाळ मृत्यू कमी व वैद्यकीय प्रगतीमुळे दिर्घआयुष्य यामुळे एकाच वेळी मुले व आईवडील जगात अस्तित्वात असण्याचा काळ जास्त .

माणसाचे जसे जीवन असते की त्याच्या वाढीला , रोगातून बरे होण्याला एक थ्रेशोल्ड असतो त्यात्यानंतर कितीही उपाय केले तरी देह वाढत नाही वा रोगमुक्त होत नाही प्रमाणे समाजजीवनाचे असते . अन्न निर्मिती ,वैज्ञानिक क्रान्तिकारक शोध लागण्याची शक्यता ई त्याला अपवाद नाहीत. समजा भारताला जमीन कमी पडू लागली तर अमेरिका व्हायोमिंग सारखे एखादे राज्य भारताला फुकट देऊन टाकेल अशी शक्यता किती ? तर फक्त युद्ध झाले तर ! असे त्याला उत्तर मिळेल . एक दिवस असा नक्कीच येईल की भारतातील , चीनमधील लोकांना भारतात परत पाठवावे असा अमेरिकेत फतवा निघेल . अमेरिकेची ती थ्रेशोल्ड लिमिट अजूनही आलेली नाही. ती आली की लोकसंख्या वाढीचे फायद्याचे समर्थ करणाऱ्या सर्व थिअरीज कोलमडून पडतील. माणसाच्या संशोधक मेंदूची माणसाला आजही गरज आहे ती कायम राहील उपयोजित क्षेत्र व श्रम क्षेत्र यातील गरज मात्र कमी होणार हे सांगायला कुणा तज्ञ माणसाची गरज नाही .

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 12:05 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

उत्तम विषय आणि बहुतांशी उत्तम चर्चा. चंद्रसूर्यकुमार यांचा प्रश्नही रोचक आणि नेमका.

एकूण पाहता व्यक्तिगत पातळीवर न जाता चर्चा झाल्यास अधिक रोचक होईल. विषय विचार करण्यासारखा आहे.

टवाळ कार्टा's picture

8 Feb 2021 - 1:37 pm | टवाळ कार्टा

उत्तम चर्चा....

उपयोजक's picture

8 Feb 2021 - 4:37 pm | उपयोजक

गेल्या काही वर्षांपासून तथाकथित उच्च जातींमधील लग्नाळू मुली वधुवरसुचक मंडळात थेट 'नॉन आयटी क्षमस्व,नॉन MBBS क्षमस्व' किंवा विशिष्ट शहरातच राहणारा,स्ववास्तूत राहणारा,किमान इतका पगार असणारा' असे लिहून येत आहेत. सर्वच मुलींच्या अपेक्षा अतोनात वाढल्या आहेत.(यावर सर्वाधिक प्रतिसादांचा धागाही येऊन गेला आहे) तर यामुळे कायमच्या बिनलग्नाच्या राहणार्‍या किंवा चाळीशीत विवाह होणार्‍या पुरुषांमुळे लोकसंख्या वाढीला थोडा आळा बसेल का? कारण जे या उच्च जातींमधे आज होतंय तोच ट्रेंड नंतर अन्य सर्व जातींमधे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 4:46 pm | मुक्त विहारि

आणि त्यांचे राहणीमान बघता, ते योग्य पण आहे ...

अपेक्षा पूर्ण करणारी मुल पण कमी असतात.
म्हणजे सुख वस्तू असणारे.
स्वतःची मोठी जागा असणारे.
उत्तम नोकरी व्यवसाय असणारे.
मुल ही कमीच असतात सर्वच मुलींना असा जोडीदार मिळणे शक्य नसते अस्तित्वात च नाही तर मिळणार कोठून त्या मुळे अनेक मुली सुद्धा वयाच्या 40 शी पर्यंत शोध च घेत अविवाहित असतात.
त्याचा लोकसंख्या वर नक्की परिणाम होणार.
मुलीची कमी होत जाणारी संख्या हे पण विवाह साठी मुलगी न मिळण्याचे कारण आहे .
ज्या गोष्टी ची उपलब्धता कमी त्याची किंमत जास्त.
त्याचा संबंध लोकसंख्या जास्त असणे उद्योग वाढ होण्यास आवश्यक आहे ह्याच्या शी पण आहे.
जेवढी लोकसंख्या जास्त तेवढे स्वस्तात कामगार उपलब्ध होतात.
सर्वच क्षेत्रात निपुण असणाऱ्या लोकांची संख्या जास्त असली की उद्योगांना मनुष्य बळ स्वस्तात मिळते कारण ते विपुल प्रमाणात उपलब्ध आहे.
मोजकेच डॉक्टर,किंवा बाकी स्किल ,unskil लोक उपलब्ध असतील तर त्यांची कमतरता जाणवते आणि त्यांना जास्त पगार सुद्धा द्यावा लागतो .

लोकसंख्या किती असावी हे जसे महत्वाचे आहे त्या पेक्षा जास्त जी लोक आहेत त्यांचा दर्जा काय आहे हे अती महत्वाचे आहे.
1) ते तंदुरुस्त आणि निरोगी आहेत का
2) त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळत आहे का.
3)ते खेळात किंवा बाकी ॲक्टिविटी निपुण आहेत का
4) ते व्यसनी आणि चरसी तर नाहीत ना.
म्हणजे लोकांचा दर्जा हा उच्च असावा .
त्या साठी उत्तम सरकारी यंत्रणा असणे गरजेचे आहे उत्तम स्थिती निर्माण करण्यासाठी उत्तम प्रशासन हे हवेच..
फक्त जास्त लोकसंख्या आहे आणि त्या मध्ये जास्त व्यसनी आहेत ,अशक्त रोगीट आहेत .
शिक्षित आहेत पण सुशिक्षित नाहीत क्रिमिनल आहेत.
अडाणी आहेत .
तर अशा ह्या फक्त आकडे वाढवणाऱ्या लोकसंख्या असलेल्या जनतेचा देशाच्या प्रगतीत काय हातभार असणार.

Rajesh188's picture

8 Feb 2021 - 5:32 pm | Rajesh188

जे आयडी लोकसंख्या वाढ कशी चांगली ह्याचे जोरदार समर्थन करत आहेत त्यांना स्वतःला 8 ते 10 मुल आहेत का?
आहे असा कोणी इथे.
8 ते 10 जावू ध्या 3 मुल असणारा तरी कोणी आहे का नवतरुण इथे.

चौकटराजा's picture

8 Feb 2021 - 5:43 pm | चौकटराजा
मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 5:57 pm | मुक्त विहारि

बोलती बंद प्रतिसाद....

सहमत आहे

लेखाचा रोख आठ दहा किंवा तीन मुले जन्मास घालून लोकसंख्या वाढवावी असा प्रचार करण्याकडे नसावा असे वाटले. लोकसंख्यावाढ हाच विनाश असा बागुलबुवा उभा करुन कृत्रिमरित्या ती कमी करण्याचे कायदे करणे आवश्यक नाही असा रोख दिसतोय. एकंदरीत cause effect यांची दिशा समजण्यात गल्लत होतेय अशी काहीशी वेगळी बाजू मांडण्याचा हा प्रयत्न वाटतो आणि त्यात तथ्य असावे. लोकसंख्या वाढीचे सर्व फायदेच आहेत असे नाही हेही नोंदवलेलं दिसतं. पण जे तोटे म्हणून दाखवले जातात त्यातील कार्यकारणभाव चुकीचा आहे असं मला समजलेलं मूळ धागाकर्त्याचं म्हणणं. चुभूद्याघ्या.

बरोबर आहे. किमान १-२ लोकांना मुद्दा समजला आहे हे पाहून माझे लेखन अगदीच वेंधळटपणाचे नाही असे वाटते. अर्थांत मुद्दा मी जास्त अधोरेखित करायला पाहिजे होता.

लोकसंख्या शेवटी स्वतःला रेग्युलेट करते आणि हे स्व-नियंत्रण सरकारी नियंत्रणापेक्षा जास्त चांगले आहे. हा सारांश होता.

रांचो's picture

9 Feb 2021 - 4:19 pm | रांचो

सर्वात प्रथम, उत्तम लेख आणि तितकीच उत्तम चर्चा घडवुन आणल्या बद्दल लेखीकेचे आभार. मुळात लोकसंख्या वाढ चांगली की वाईट, हा मुद्दा अगदी फार पुर्वी पासुनच चर्चीला जात आहे. अगदी थॉमस मालथसच्या काळापासुन. "स्व-नियंत्रण सरकारी नियंत्रणापेक्षा जास्त चांगले आहे" हे विधान सकृत दर्शनी पटण्या सारखेच आहे. पण, त्या विधानचे संदर्भही तितकेच महत्वाचे असतात. जेंव्हा समाज स्व-नियंत्रण करण्यासाठी लागणारा वेळ खुप असतो आणि वेळ दडवण्याने दुष्परिणामाची तिव्रता अधिक असते, तेंव्हा जगभरात सगळीकडे सरकारे बाजारात असो अथवा लोकसंख्या नियंत्रण, त्यात हस्तक्षेप करीतच असतात. थोडक्यात जेंव्हा अकार्यक्षम बाजार किंवा समाज असतो, तेंव्हा सरकारी हस्तक्षेप जरुरी असतो. उ.दा. अनेक वेळा आलेल्या महामंदी, युरोपियन कर्ज संकट आताचे करोना संकट इ. लोकसंख्येच्या संदर्भात अनेक अतिशय गरीब एशियन, आफ्रिकन देश जिथे नियंत्रित लोकसंख्या अकार्यक्षम समाज लवकर करु शकत नाही.

कुणी तरी दूध पिण्याचे फायदे ह्यावर निबंध लिहिला तर "आपल्या घरी किती म्हशी आहेत" हा प्रश्न विचारणार आहात काय ?

इथे पाहण्यासारखे काहीही नाही. पुढे चला.

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 6:51 pm | मुक्त विहारि

जर एखाद्याला, एखादा विचार पटत असेल, तर तो सूरूवात घरापासून करण्याचा प्रयत्न करतो ...

मला रासायनिक शेतीचे वाईट परिणाम माहिती असल्याने, मी नैसर्गिक पद्धतीने शेती करणे उत्तम ...

आधी केले मग सांगीतले, हेच तत्व इथे लागू पडते ..

एक उदाहरण देतो .....

कुटुंब नियोजनाचे समर्थन करणारे, कर्वे आडनावाचे एक गृहस्थ होते ... त्यांनी स्वतः पासून सुरूवात केली...

१. सर्वानी असे केले पाहिजे.
२. सर्वाना असे करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.

ह्या दोन वाक्यांत फरक आहे. १ मधील वाक्याला राजेश ह्याचा तर्क लागू पडतो. २ ह्याला पडत नाही.

लोकांना हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम करण्याचे स्वातंत्र्य असायला पाहिजे का ? ह्या प्रश्नाचे उत्तर मी हो म्हणून दिले तर मी स्वतःचा धंदा सोडून हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम करायला सुरुवात करावी असा होत नाही.

जे लोक इथे कुटुंब नियोजनाचे समर्थन करत आहेत त्यापैकी किती लोकांनी आपली नसबंदी केली आहे ?

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 7:08 pm | मुक्त विहारि

दुसरे मार्ग वापरले

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 7:15 pm | मुक्त विहारि

तुम्ही सल्लागार आहात....स्वतः करणार नाही...

एक उदाहरण देतो,

मध्यंतरी विडी कामगारांच्या हलाखी बद्दल एक लेख वाचनांत आला होता. लेखक स्वतः विडी कामगारांच्या बरोबर राहिले होते. त्यामुळे तो लेख जास्त भावला ...

क्रियेविण वाचाळता, व्यर्थ आहे.

आनन्दा's picture

8 Feb 2021 - 7:43 pm | आनन्दा

काय संबंध?

लोकांना खाजगी जागी सिगारेट पिण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे असे म्हणणारा स्वतः चेन स्मोकर असला पाहिजे का
लोकांना दारू पाजाणार्याने स्वतः अट्टल असलेच पाहिजे का

प्रपंचातील बरेच मौलिक सल्ले देणारे रामदास स्वामी स्वतः बाल ब्रह्मचारी होते.
समलैंगिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्याने स्वतः समलैंगिक असलेच पाहिजे का?

लेखिका फक्त सरकारने हस्तक्षेप करू नये इतकेच म्हणतेय, सरकारने अनुदान द्यावे असे म्हणत नाहीये.
ज्यांना मरायचे आहे त्यांनी हेल्मेट न घालता रस्त्यावर फिरावे.. ज्यांना आपल्या जीवाची भीती वाटते त्यांनी पिस्तुल घेऊन फिरावे.. पण पिस्तुल असेल आणि वापरण्याची अक्कल नसेल तर? भलत्याच ठिकाणी गोळी घालेल ना तो!!

त्यामुळे ज्याच्याकडे अक्कल आहे त्यालाच ते स्वातंत्र्य असावे.. त्यामुळे एका मर्यादेत राहून, मे बी 2/3 कितीही मुले जन्माला घालण्याचे स्वातंत्र्य असावे.

अर्थात उद्या याच न्यायाने मला 10 बायका करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिले असेही म्हणता येईल.. म्हणजे मग 10* 4 = 40.

मग हे 40 लोक जर साम्यवादी निघाले, (सर्वासामान्यपणे जेव्हढी गरिबी जास्त तितका साम्यवादाकडे ओढा अधिक) तर लोकशाही देशात ते 40 साम्यवादि आपल्या एका भांडवळवादी मुलाची संपत्ती राष्ट्रीयीकृत करण्याची शक्यता वाढते..

तस्मात नियंत्रण असावे!!

1) खून करणे वाईट आहे असे सांगणारा स्वतः खुनी नसावा
2) भ्रष्टाचार कसा समाजाला पोखरतो आणि त्यासाठी कडक शिक्षा हवी असे विचार मांडणार व्यक्ती स्वतः भ्रष्ट नसावं
3) स्त्री चा सन्मान राखला पाहिजे असे सांगणारा व्यक्ती स्वतः स्त्री लंपट नसावा.
4) आपण जे सल्ले देतो त्याचा स्वतःला अनुभव असावा.
एवढी माफक अपेक्षा का असू नये.
5) इंजिनियर लाच जा डॉक्टर च हो असे सांगणाऱ्या व्यक्ती ला त्या क्षेत्रातील पूर्ण अनुभव आणि माहिती असावी.
हल्ली क्रिकेट ची bat पन हातात न घेतलेली व्यक्ती सचिन नी कसे खेळायला पाहिजे आणि त्यांनी अमक्या तमक्या चुका केल्या हे अधिकार वानी नी सांगतो ते नक्कीच योग्य नाही.

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 8:35 pm | मुक्त विहारि

पटली

मुख्यमंत्रीसाहेब, तुम्हाला लेखकाचा मुद्दा काळात नाहीये असे दिसतेय..

लेखकाला लोकानी सदसद्विवेकबुद्धी वापरून निर्णय घ्यावा असे अपेक्षित आहे..
तुम्ही किती मुले जन्माला घालहे सरकारने सांगणे म्हणजे साम्यवाद आहे..
उद्या जर या उद्योगांनी लोकसंख्या कमी झाली तर सरकार प्रत्येकाला 5-5 मुले जन्माला घालायला लावणार का? त्यापेक्षा जे काही व्हायचे असेल ते नैसर्गिकरित्या व्हावे असे लेखिकेचे मत आहे, जे पटण्यासारखे आहेच, परंतु व्यापक जनहिताच्या दृष्टीने विचार करता, सरकारने पूर्ण स्वतंत्र ठेवू नये, कारण सर्वसामान्य जनता तारतम्य बाळगण्याची शक्यता नाही, आणि अश्या गोष्टीमुळे सामाजिक असमतोल वाढेल असे माझे मत आहे.

तुम्हाला काय वाटते मुख्यमंत्रीसाहेब?

Rajesh188's picture

8 Feb 2021 - 9:00 pm | Rajesh188

मला लेखिकेचा दृष्टिकोन पण पूर्ण समजला आहे आणि तुमचा पण दृष्टकिन समजला आहे.
दोघे पण बरोबर आहात .
फक्त लोकसंख्या चा समतोल साधला जावा एवढेच माझे सामान्य मत आहे.
मग तो ऐच्छिक पद्धतीने साधला गेला तर उत्तम च नाही तर काही मर्यादे नंतर हस्तक्षेप करून समतोल साधने गरजेचे आहे एवढीच साधी इच्छा आहे.

लोकांना फक्त फटक्यांचीच भाषा समजते ....

बाॅसने डोळे वटारले की, समस्त भारतीय जनता कामाला लागते .....

फक्त लोकसंख्या चा समतोल साधला जावा एवढेच माझे सामान्य मत आहे.
मग तो ऐच्छिक पद्धतीने साधला गेला तर उत्तम च नाही तर काही मर्यादे नंतर हस्तक्षेप करून समतोल साधने गरजेचे आहे एवढीच साधी इच्छा आहे

मी आज चक्क काही अंशी राजेश यांच्या विधानाशी सहमत आहे
बळजबरी नसली तरी लक्ष ठेवावं लागतेच,देश पातळीवर आणि ते सुद्धा दोन्ही बाजूने
म्हणजे अति लोकसंख्या किंवा पुरेशी लोकसंख्या नसणे या त्या दोन्ही बाजू
२ उद्धरणे देतो ( लोकसंख्या कमी असल्यामुळे सरकारला लक्ष घालावे लागते )
१) सिंगापोर मध्ये ( विविध आर्थिक करणामुळॆ बहुतेक) लोक लग्न करीत नाहीत ( आणि म्हणजे बहुतेकदातयामुळे प्रजोत्पादन होत नाही कारण लग्नबाहेर प्रजोत्पादन त्यामानाने कमी आहे ) त्यामुळे तरुण तरुणींना "उत्तेजित " करण्यासाठी सरकार स्वतः म्याच मेकर म्हणून कि काय वीकएंड क्रूझ जमवून आणायची..
२) "लग्न किंवा लिव्ह इन काह्ही असो पण मुलं करा आणि देशाची लोकसंख्या वाढवा " सरकार प्रत्येक मुलांमागे अंदाजे अडीच लाख रुपये आईला भेट आणि इतर सवलती देत असे ( साधय माहित नाही ) AUSTRALIA
तेवहा जर साहनजी किंवा कोणाचे असे म्हणणे असेल कि "लोकांना पाहिजे ते करू दे आपोआप सगळे सुरळीत होते " तर ते तेवढे काही पटत नाही बुवा .. असो

त्यामुळे, कायदे करणे भाग पडते...

शा वि कु's picture

8 Feb 2021 - 10:25 pm | शा वि कु

.

आनन्दा's picture

8 Feb 2021 - 10:38 pm | आनन्दा

असे का वाटते?

अशी कल्पना करा, आज तुम्हाला एकच मुल झाले, त्याला तुम्ही चांगल्या संधी दिल्यात आणि चांगला पैसा मिळवू लागले वगैरे.. चांगले घर, एखादा व्यवसाय वगैरे.. तुम्ही असे करता कारण तुम्हाला आर्थिक सुबत्ता म्हणजे काय ते माहीत आहे. तुमचे मूल देखील तेच करेल कारण त्याला सुबत्तेची किंमत माहीत आहे.

पण तुमचा शेजारी, ज्याला याची किंमत माहीत नाही, तो ५ मुले जन्माला घालेल. ती ५ मुले दुर्दैवाने तुमच्या मुलासारखे सुखी जीवन जगु शकतील असे नाही.. कदाचित २ जगती, तीन नाही.. मग ते ३ आणखीन ५ मुले प्रत्येकी जन्माला घालतील.. म्हणजे तिसर्‍या पिढीत तुम्च्याकडे १, आणि शेजार्‍याकडे १५+२ = १७.

आता तुम्चे १ जे असेल ते म्हणजे अंबानीची लाईफस्ताइल जगत असेल.. आणि ते १७ खुप स्ट्रगल करत असतील.. ते काय म्हणणार याला, तुझ्या बापाने दिलाय तुला धंदा काढून, तुझे कर्तृत्व काय? म्हणजे तू या धंद्याला लायक नाहीस.
जिथे गरिबी असते तिथे साम्यवादाचा ओढा जास्त असतो. कारण आपल्याला मिळत नाही, आणि कोणाला मिळते, म्हणजे ते अपले शोषण करूनच मिळवले आहे असे माणूस सहज धरून जाऊ शकतो.

अश्या परिस्थितीत जर साम्यवादी वाढले, किंवा कोणत्याही कारणाने पुरेश्या संधी उपलब्ध नसल्याने जर गुन्हेगारी वाढली, तर ज्यचाकडे आहे त्यालाच भीती असते. नंगे से खुदा भी डरता है.. त्यामुळे अश्या परिस्थितीत ज्याचाकडे आहे त्याचेच नुकसान होइल..

मग अश्या परिस्थितीत आपण पद त्याच्यासारखी ५ -५ जन्माला घालून समतोल साधावा का? तुम्हाला काय वाटते?

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 10:41 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

उपयोजक's picture

9 Feb 2021 - 3:28 pm | उपयोजक

Marks

अर्धवटराव's picture

9 Feb 2021 - 9:45 pm | अर्धवटराव

हेच एका वेगळ्या प्रकारे भांडवलशाहीला देखील लागु पडते.
ईर्शा द मॅन आपल्या पेक्षा बेटर... त्यातनच आपल्या प्रगतीच्या आकांक्षेला बळ मिळते :ड

जे काही मी वर लिहिले आहे त्यापेक्षा सोपे करून सांगण्याची माझी क्षमता नाही. त्यामुळं पटत नसल्यास क्षमा करावी. मिपाकर सुद्न्य आहेत आणि किमान इतर काही लोकांना तर्क समजेल अशी भाबडी अपेक्षा.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Feb 2021 - 6:24 pm | अमरेंद्र बाहुबली

लेखाशी सहमत.

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 6:45 pm | मुक्त विहारि

नक्की का?

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Feb 2021 - 7:03 pm | अमरेंद्र बाहुबली

होय

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 8:59 pm | मुक्त विहारि

लग्न केले की, भरपूर मुलांना जन्माला घाल ...

चौकटराजा's picture

8 Feb 2021 - 7:29 pm | चौकटराजा

राजेश जी , इथल्या चर्चा.. फक्त काही नवीन विचार मिळतो का या साठी असतात त्यामुळे मी तरी तसा व्यक्तिगत प्रश्न विचारीत नाही. सर्वच डॉकटर दारू न पिणारे धूम्रपान न करणारे असत नाहीत तसे ते आहे ! लोकसंख्या मर्यादीत ठेवण्यासाठी कायदा करणे युक्त नाही पण त्यावर नियंत्रण व्हावे अशी समाजाची इच्छा असेल तर त्यासाठी काही नकारात्मक व काही प्रोत्साहनात्मक कायदे जरूर करता येतील. जसे तीन मुले असतील तर ग्रामपंचायतीला उभे राहाता येणार नाही ,संडास बांधला नसेल तर नगरसेवक होता येणार नाही असेच काही ! हेल्मेट नसेल तर विमा रक्कम मिळणार नाही असे ही काही ! अर्थात हे सर्व घटनेच्या मूळ चौकटीत बसत असेल तरच हे वेगळे सांगणे नको !

माझा एक शेजारी मला विचारता झाला तुम्ही संघात गेला होतात का ? किती वर्षे ? मी चार पाच वर्षे असे उत्तर दिले ! तो ऐकीव पणे संघाचा द्वेष वाला होता. जेव्हा मी समाजवादावर बोलायचो त्यावेळी त्याला मी संघात गेलो आहे का याची शंका यायची ! दुसरा एक फेसबुकवर होता तो पक्का संघवादी अर्थातच समाजवादाचा द्वेष्टया होता तो मला कम्युनिस्ट म्हणायचा . दोघानाही दोन्ही विचारधारांच्या मधली काही धारा असते याचे भानच नव्हते . तसे अर्थशास्त्राचेही असते . जगात या शास्त्राइतके वाद कोणत्याही शास्त्रात नाहीत . कारण हे एक मानशास्त्राचीच शाखा आहे हे आता मान्य होत आहे. त्यामुळे असे म्हणतात की नवश्रीमंत माणसाला नेहमी भांडवल वाद आवडतो . तो व्यावसायिकांना तर जास्तच आवडतो ! तो खेळाडूंना आवडतो ! कलावंतांना आवडतो कारण यात आपली किंमत ठरण्याची एक अनैसर्गिक अशी पद्धत असते ! उदा खेळाडूने लोकप्रियतेच्या जोरावर शाम्पूची जाहिरात तो ना वापरता देखील करून पैसे मिळविणे !

आपण सांगितल्या प्रमाणे ज्या वेळी आता जे नवश्रीमंत झाले आहेत त्याना येणाऱ्या कौशल्याचा पुरवठा करणारी माणसे बेसुमार होतील त्यावेळी हीच माणसे समाजवादाच्या गोष्टी करतील . एकेकाळी ठेवीच्या जाहिराती देणारे आता कर्जाच्या जाहिराती देत आहेत. आता पेपरात ठेवीची जाहिरात आली तर ती कुठल्यातरी किडुक पतसंस्थेची असते.

एका गंमत इथे लिहितो ते माझेच वाक्य आहे .. खर्च करणे हा मूर्खपणा आहे तसे फार सेव्हिंग करणे हाही मूर्खपणाच ! पण हे दोन्ही मूर्ख लोकच इकोनिमी चालवीत असतात ! सगळेच पोहायला शिकले तर लाइफ जॅकेटचा धंदा बुडेल पण त्याची काळजी देवाला असते. सगळे पोहायला शिकतच नाहीत !

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 8:58 pm | मुक्त विहारि

मुले नकोतच हा माझा अट्टाहास नाही....

नियंत्रण असावेच...

अति मुले जन्माला घातल्याचे दुष्परिणाम, जे डोळ्यासमोर आहेत ते लिहीतो ...

1. स्वतःची 15 एकर जमीन, साल 1900... आजच्या घडीला 7-12 वर, 60 जण असते ...सुदैवाने कुणीही शेतीवर अवलंबून नाही, पण असते तर, सगळ्यांना 10 गुंठेच जागा मिळाली असती. कुणाचेच भागले नसते.

2. मुलगा मॅट्रिकला असतांना वडील वारले, साल 1930, मुलगा हुषार, मेडीकलला प्रवेश मिळाला पण 7 लहान भावंडे, मेडीकल मध्ये वर्षे घालवण्या इतका वेळ न्हवता, प्राण्यांचे डाॅक्टर झाले... त्यांचे उमेदीचे आयुष्य, भावांना शिकवण्यात गेले...

3. साल 1910, उत्तम सरकारी नौकरी, पण कर्व्यांना काय समजते? ही विचारसरणी, 1940 साली निवृत्ती, पदरी 12 मुले, त्यापैकी 4 घरात, 8 बाहेर गावी, कुणीतरी मनी ऑर्डर पाठवणार तेंव्हा महिना निघणार ...

अफाट मुले असल्याने, ही डोळ्यासमोरची उदाहरणे आहेत ....

तरीही कुणाला वाटत असेल तर, भरपूर मुलांना जन्म द्या..

साहना's picture

9 Feb 2021 - 1:22 am | साहना

> अफाट मुले असल्याने, ही डोळ्यासमोरची उदाहरणे आहेत

माझ्या लेखांत मी कुठेही जास्त मुले निर्माण करा असे लिहिले नाही. प्रत्येक व्यक्तीने आपले हित आणि सुख समाधान पाहून आपल्याला पाहिजे तितकी मुले जन्माला घालावीत आणि इतरांनी आणि विशेषतः सरकारने त्यांत ढवळाढवळ करू नये असा लेखाचा रोख आहे. हे सांगण्यास मी कुठे कमी पडले कि वाचणारे उगाच आपले पूर्वग्रह माझ्या लेखावर थोपत आहेत हे मला समजत नाही. लोकांनी आपल्याला पाहिजे तितकी मुले निर्माण केली म्हणून लोकसंख्या विस्फोट वगैरे होऊन काहीतरी खूप वाईट घडेल हे भाकीत चुकीचे आहे इतकाच लेखाचा सारांश आहे.

काही मंडळींनी १२ मुले जन्माला घातली आणि त्यामुळे कुठल्याही मुलांचे संगोपन ठीक होऊ शकले नाही हा तुमचा अनुभव १०० वर्षे मागे प्रत्येक घरांत दिसत होता. पण आणखी उपाय तरी काय होता ह्या मंडळींकडे ? दिवसा काबाडकष्ट आणि रात्री प्रजनन हेच चालू होते. गर्भनिरोधक उपलब्ध नव्हते आणि इंद्रियनिग्रह तर मोठ्या मोठ्यांना जमला नाही ह्या लोकांचे काय ? पण त्याच वेळी ह्यांनी प्रजनन केले म्हणून काही देशाचे वाट्टोळे झाले नाही. अफाट लोकसंख्या असून सुद्धा देश चांगला आहे आणि वेगाने प्रगती करत आहे. प्रचंड प्रमाणात मानव संसाधन आहे म्हणून देशाला काही किंमत आतंरराष्ट्रीय स्तरावर आहे.

त्याकाळी काही कायदे केले नाहीत मग आज करायची काय गरज आहे ? आणि काहीही कायदे नसताना भारताचा प्रजनन दार आपसूकच कमी होत असताना आणखी कायदे करून काय फायदा ?

कुमार१'s picture

8 Feb 2021 - 9:02 pm | कुमार१

अशी समाजाची इच्छा असेल तर त्यासाठी काही नकारात्मक व काही प्रोत्साहनात्मक कायदे

>>> +१११ पटेश !

कायदा / सुविधा (मुद्द्यानुसार )

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 9:16 pm | मुक्त विहारि

साल 1960 ते 1970

छानसे खेडेगाव, टुमदार घरे, भांडणे नाहीत, हवा शुद्ध, बियर बार एखाद दुसरा.रात्री 8 नंतर ध्वनी प्रदूषण शुन्य...

साल 1970 ते 1980

वस्ती वाढली, रिक्षा सुरू, रात्री 10 नंतर ध्वनी प्रदूषण अतिशय कमी.भांडणे थोडी वाढली.

1980 ते 2020

वस्ती अफाट, धुळ अफाट, आवाज अफाट, भांडणे वाढली, बियर बार संस्कृति वाढली..

अफाट लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम असे दिसतात...

अदृष्य परिणाम,

दर माणशी, शेती उत्पन्न कमी झाले.माणसे शहरात यायला लागली.त्यामुळे भाऊबंदकी वाढली.शेते ओसाड पडायला लागली.गोठे ओसाड झाले...

बाप्पू's picture

8 Feb 2021 - 10:23 pm | बाप्पू

असे कसे??

लोकसंख्या वाढली म्हंजी मॅन हौर्स आणि क्रिएटिव्हिटी पण वाढली.. त्यामुळे आपोआप जागा, शेती, गाड्या, रेलवे, दवाखाने, बसेस, हवा, पाणी, झाडे, पैसा, रस्ते हे पण आपोआप वाढेल.. थोडी कळ काढा. तोवर एखादे पुस्तक वाचा.. किंवा चीन चा अभ्यास करा.
नुकतेच लग्न झाले असल्यास अपत्य निर्मिती सुरूच ठेवा.. कोणतीही अडचण येणार नाही. जितकी जास्त मुले तितका प्रगत समाज..

सॅरकॅस्टिक प्रतिसादाबद्दल क्षमस्व पण अती सर्वत्र वर्जयेत या नियमाप्रमाणे एका ठराविक ब्रेकपॉईंट नंतर सर्व कोलॅप्स व्हयला सुरवात होईल.
जास्त लोकसंख्या = प्रगती हे जर समीकरण असेल तर भारत आज जगावर राज्य करत असता पण परिस्थिती काय ते सर्व पाहतायेत.

पृथ्वीचा समतोल, निसर्ग, इतर प्राणी, हे सर्व थोडा वेळ बाजूला ठेवू. फक्त मनुष्याचा विचार करू.
मनुष्य हा इतर प्राण्याप्रमाणे नाहीये जे फक्त खाण्या पिण्याच्या शोधात जगतात आणि वेळ आल्यावर प्राणायसाठी पार्टनर शोधतात.. मानवी जिवन अश्या इतर प्राण्याप्रमाणे नसून त्यापेक्षा खूप वेगळे आहे ज्यामुळे फक्त अन्न आणि निवारा मिळाले कि झाले असं नाहीये. इतर असंख्य गरजा आहेत आणि त्या गरजा आयुष्याचा भाग आहेत. लोकसंख्या वाढली तर त्या सर्वांवर मर्यादा येतील आणि शेवटी मानवाचे आयुष्य इम्पॅक्ट होईल.

वर मूवी म्हणल्याप्रमाणे दर सेकेंदाला एक लोकल सोडली तरीही ती इतकी फुल असेल कि त्यात चढणे मुश्किल होईल..! इतकी मुले होतील कि सर्वांना शिक्षण देणे अवघड होईल. इतकि वाहने होतील कि 10 पदरी रस्ते केले तरी लांबच लांब रंगा लागतील.

त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणात ठेवणे हे मानवाच्या हिताचे आहे.

आपला प्रतिसाद उपरोधिक असला तरी मी उत्तर देते.

> छानसे खेडेगाव, टुमदार घरे, भांडणे नाहीत, हवा शुद्ध, बियर बार एखाद दुसरा.रात्री 8 नंतर ध्वनी प्रदूषण शुन्य...

निव्वळ गतवैभवाची खोटी कल्पना आहे. त्या खेडेगावात कचरा बाहेर जळत असतील. जमीनदार मंडळी गरिबांचे शोषण करत असतील बहुसंख्य जनता अडाणी आणि निरक्षर असेल. बाळ मृत्युदर आभाळाला टेकलेला असेल. आरोग्याच्या सध्या सुविधा सुद्धा नसतील. अनेक आईवडिलांनी स्वतःच्या हातावे आपल्या लहान मुलांना सरणावर चढवले असेल किंवा पुरले असेल. त्याशिवाय तुम्ही "लोकसंख्या वाईट" म्हणून म्हणता ती वाढवण्याचे काम सुद्धा बहुतेक ह्याच लोकांनी अविश्रांत मेहनत घेऊन केले असेल. वीज आहेच असे नाही पण असली तरी भारनियमन.

तुम्ही प्रदूषण म्हणता पण बहुतेक महिला लाकूड नाहीतर शेणी जाळून त्या धुरांत स्वयंपाक बनवत होत्या. आणि सरासरी आयुर्मर्यादा ५० च्या आसपास होती. महिलांना साधी आरोग्याची साधने उपलब्ध नव्हती.

(आज सुद्धा अशी खेडेगावे सर्वत्र आहेत पण बहुतेक भारतीय अश्या खेडेगावांत राहू इच्छित नाही ह्यावरून ह्या खेडेगावांत राहणी अत्यंत निकृष्ट आहे असे बहुतेक भारतीयांना वाटते. )

> वस्ती वाढली, रिक्षा सुरू, रात्री 10 नंतर ध्वनी प्रदूषण अतिशय कमी.भांडणे थोडी वाढली.

त्याच वेळी दळणवळणाची साधने निर्माण झाली. शेतीव्यतिरिक्त इतर व्यवसायांच्या संधी उपलब्ध झाल्या. महिलांची काम करण्याची प्रवृत्ती वाढली. टीव्ही आला, वीज थोडी चांगली आली. पारंपरिक गरीब लोकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या. पिण्याचे पाणी थोडे स्वच्छ झाले. आयुष्यमर्यादा साधारण ५ वर्षांनी वाढली. शेती आणि मजुरी कमी झाल्याने पिळवणूक सुद्धा कमी झाली.

> वस्ती अफाट, धुळ अफाट, आवाज अफाट, भांडणे वाढली, बियर बार संस्कृति वाढली..

हो पण लोकांना हेच आवडत आहे. म्हणून तर खेडेगावांतून लोक अफाट संख्येने शहरांची वाट धरत आहेत.

धूळ किंवा आवाज ह्या वाईट गोष्टी आहेत ह्यात शंकाच नाही पण त्याच वेळी इतर अनेक चांगल्या गोष्टी शहरांत असतात त्यामुळे धूळ आणि आवाज सहन करून सुद्धा लोक मुंबईत किंवा पुण्यात राहणे पसंद करतात टिम्बक्तू बुद्रुक मध्ये नाही. तुम्हाला धूळ दिसते आणि आवाज दिसतो, चांगल्या शिक्षणाच्या सुविदा, चांगल्या पायाभूत सुविधा, मनोरंजनाची साधने, सुरक्षा, चांगले आरोग्य, आर्थिक स्वातंत्र्य इत्यादी गोष्टी दिसत नाहीत.

---

बहुतेक माणसांनी अशी धारणा करून घेतली आहे कि पूर्वी चांगले होते, आता खराब झाले आहे. ह्याला काहीही अर्थ नाही. माणसाचे मन असे आहे कि भूतकाळांतील चांगल्या गोष्टी आठवणीत राहतात पण वाईट गोष्टी आपण सोयीस्कर पद्धतीने विसरतो. १९६० चा काळ चांगला होता म्हणून ओरड करण्यार्यांनी पोलिओ झालेल्या व्यक्तीला किंवा ज्या बापाने आपले मूळ आणि त्याची आई ह्या दोघांना एकाच दिवशी मारताना पहिले आहे त्यांना जाऊन सांगा. काय झाले पाय अधू झाला तर ? बियर बार संस्कृती नव्हती ना !

Rajesh188's picture

10 Feb 2021 - 1:35 am | Rajesh188

200 वर्ष पूर्वी जावू नका त्या वेळचे लोकांचे जीवन कसे होते हे आपल्याला फक्त काही लिखित दस्त्वेज मधून च कळते लीहणारा कोणत्या विचाराचा होता किंवा कोणासाठी लिहीत होता त्या वर त्याचे सत्य अवलंबून आहे.
पण ह्या 100 वर्षातील जनजीवन कसे होते हे लोकांना पक्के ठावूक आहे .आज जे 50 शी मध्ये आहेत त्यांनी ते अनुभवले आहे आणि त्यांच्या आई वडिलांकडून अजुन 50 वर्षाचा इतिहास त्यांना खरा माहीत आहे .
पूर्वी म्हणजे काही वर्ष पूर्वी च खेडेगाव ही अतिशय सुंदर होती.प्रदूषण नव्हत त्या मुळे नदी नाले स्वच्छ होते .
हवामान बदल तर तेव्हा पण होता पण त्याची तीव्रता आता आहे तेवढी नव्हती काही वर्षांनी येणाऱ्या दुष्काळ चा काळ सोडला तर पावूस वेळेवर सुरू होत होता आणि भरपूर पडत होता.
जमिनी मधील पाण्याची पातळी खाली गेलेली नव्हती खूप पाणी होते जमिनीत.
रासायनिक खते, कीटक नाशक नसल्या मुळे शुध्द ऑरगॅनिक धान्य आहारात होते.
संकरित प्राणी नसल्या मुळे देशी कसदार दूध उपलब्ध होते.
लोकसंख्या कमी असल्या मुळे जमिनी जास्त हीत्या.
लोक निती वान होती पैसे किती आहेत ह्या पेक्षा माणूस कसा आहे ह्याला जास्त किंमत होती.
वातावरण अतिशय स्वच्छ असल्या मुळे लोक तंदुरुस्त होती आज च्या सारखे 25 विशित च blood pressure, Madhu मेह,jadpana नव्हता .
लोकांचे आता आयुष्य वाढले आहे ते कोणाचे ज्यांचा जन्म 1900 ते 1870 पर्यंत चा आहे त्यांचेच .
त्या पुढील लोक 50 शी सोडा 40 शी मध्येच स्वर्गवासी होतील अशी त्यांची अवस्था आहे.
आजच्या पेक्षा पाढच्या 100 वर्षाचा काळ हा अतिशय सुंदर होता ..ह्या वर दुमत होण्याचे कारण च नाही.
घर मोठी होती कुटुंब एकत्र होते लोक स्वार्थी नव्हती..
आता शहरांची अवस्था कचरा पेटी सारखी झाली आहे.
फक्त घान,फक्त गर्दी,फक्त दूषित हवा आणि सर्वत्र पसरलेल्या बकालपणा असेच शहरांचे वर्णन करता येईल..
अमेरिकेने मोठ्या नावाने भारतीय लोकांना त्यांच्या देशात प्रवेश दिला म्हणून ते त्या देशातील अमेरिकन लोकांनी कष्टाने उभ्या केलेल्या सुनियोजित शहरात राहत आहेत.
ती फक्त अमेरिकन लोकांची कृपा आहे.भारतीय लोकांना त्यांच्या देशात त्यांनी प्रवेश दिला.
भारतीय लोकांचं तेथील सुनियोजित शहर बसवण्यात काही हातभार नाही फक्त ते अमेरिकेवर भार आहेतं

मुक्त विहारि's picture

10 Feb 2021 - 9:10 am | मुक्त विहारि

आता खेडेगावात राहणे, अतिशय उत्तम आहे ...

1970 साली जी परिस्थिति होती, ती 2020 मध्ये नाही ...

असे असेल तर ओढा लागला असेल ना शहरांतून खेडेगावाकडे ? ???

गवि's picture

10 Feb 2021 - 11:33 am | गवि

:-))
जाऊ द्या हो. ते गावच्या आठवणीने जरा भावुक झालेत. सध्या शहरात आले असतील. ह घ्या हो मुविशेठ.

मुक्त विहारि's picture

10 Feb 2021 - 11:46 am | मुक्त विहारि

माझ्या जीवनशैलीला, गावातील वातावरण पसंत पडते...

ह्याचे अर्थ, शहरात राहणारे अयोग्य आणि मीच तेवढा योग्य, असा होत नाही ....

तुम्ही तुमच्या जीवनशैलीला योग्य असे वातावरण निवडले आहे आणि मी माझ्या ....

समजा जर मला, तुम्ही करता ते काम आवडत असते तर मी शहरच निवडण्याचे Chances जास्त होते ...

याउलट, तुम्हाला जर शेतीची आवड असती तर तुम्ही गाव निवडले असते ....

एकाच व्यक्तीला हजारो कंगोरे असतात, तसेच एकाच समाजाला,एकाच तराजूत तोलणे अयोग्य आहे ...

आता एक कट्टा, शेतावर करू... मस्त पैकी बियर पिऊ ... आजकाल गावोगावी बियर शाॅपी सुरू झाल्या आहेत ...

कुणाला बर्गर प्रिय तर कुणाला चटणीभाकर ...

कुणाला मनोर्यात बसून, पुस्तक वाचून, सल्लागार व्हायला आवडते, तर कुणाला स्वतः माहिती घेऊन ...

त्यामुळे तुमचे विचार आणि माझे विचार, ह्या बाबतीत वेगळे आहेत...

दोघेही दोन धृवांवर उभे आहोत...

मुक्त विहारि's picture

10 Feb 2021 - 9:08 am | मुक्त विहारि

तुमचे अनुभव वेगळे आणि आमचे अनुभव वेगळे ....

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 9:48 pm | मुक्त विहारि

माकडांचा कायदा,

साल साधारण, 1980

आंब्याची झाडे भरपूर आणि आंबा पण भरपूर, घरात खाणारी मंडळी 6, पैपाहुणा कितीही आला तरी, आंब्याला तोटा नाही.. माकडे मारायला परवानगी असल्याने, माकडांचा अजिबात उपद्रव नाही ...

साल 2000, माकडांना अभय ...

झाडे तितकीच, आंबेही भरपूर, घरात खाणारी मंडळी 8, पण, माकडे आंबेच शिल्लक ठेवत नाहीत ... पैपाहुणा आला तर, नको वाटतो... कारण, घरच्यांनाच जेमतेम आंबे मिळतात...

सध्या बर्याच ठिकाणी, रात्रंदिवस, नेपाळी गुरखे, आंब्यांचे रक्षण करायला ठेवावे लागतात... सकाळी माकडे आणि रात्री टाॅर्चवाले आंबे चोर....गुरख्यांचा खर्च वाढल्यामुळे आंब्याचा दर पण वाढला... माकडांच्या लोकसंख्येमुळे, लोकांना जास्त भावात आंबे विकत घ्यावे लागतात...

माकडे, म्हणजे सरकारचे जावईच, असे झाले आहे.

आज, कोकणात फळफळावळ घेण्याचे कष्ट कुणीही करत नाही... बघता बघता, एका तासात, कोबीचा वाफा उध्वस्थ झालेला, मी प्रत्यक्ष बघीतला आहे...

अफाट लोकसंख्येमुळे, एखाद्या शेताची लूट करायला, एखादी टोळी पण तयार होऊ शकते.

कारण, भारतीय समाजाला तारतम्य नाही....

आपल्या लोकांना, फक्त फटक्यांचीच भाषा समजते...

शा वि कु's picture

8 Feb 2021 - 10:08 pm | शा वि कु

न्यूनगंड आणि अहंगंड एकाच प्रतिसादात !

भारतीय समाजाबद्दल न्यूनगंड.

आणि 'इतर लोकं आमच्यासारखे समजूतदार नाहीत हो' हा अहंगंड.

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 10:25 pm | मुक्त विहारि

हेल्मेट सक्तीचा कायदा करावा लागतो, ह्यातच सगळे आले ...

आणि

अहंगडा बद्दल, मीच तेव्हढा समजूतदार, असा तुमचा गैरसमज झाला असेल तर, क्षमस्व ...

सतिश म्हेत्रे's picture

8 Feb 2021 - 10:39 pm | सतिश म्हेत्रे

प्रतिसादाशी सहमत मुविकाका.

उपयोजक's picture

8 Feb 2021 - 10:51 pm | उपयोजक

उपकार केलेत की देशाचं नुकसान केलंय तेवढं सांगा फक्त कोणीही.

https://www.google.com/amp/s/marathi.latestly.com/maharashtra/a-women-fr...

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 10:55 pm | मुक्त विहारि

त्यामुळे दोष देता येणार नाही ...

उपयोजक's picture

9 Feb 2021 - 12:38 am | उपयोजक

दोष का द्यायचा? साहना यांची मते विचारात घेतल्यास.

आणि दुसरी बाजू
या क्रिकेट टीमला पोसायची जबाबदारी कोणाची? आणि उद्या ही मुले गुन्हेगार बनली गरीबीमुळे तर ती जबाबदारी कोणाची?

मुक्त विहारि's picture

9 Feb 2021 - 8:11 am | मुक्त विहारि

गुन्हेगार होण्याची शक्यता वाढू शकते...

आरक्षण मागतायत.त्या मागण्या न्याय्य आहेत की नाहीत याचाही विचार न करता आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी होत आहे.त्यासाठी विविध मार्गाने आंदोलने,अडवणुकी होत आहेत.खुल्या गटातील या जातींनी त्यांच्या जातीअंतर्गत लोकसंख्या मर्यादित न ठेवल्याने त्यांच्यावर ही वेळ आलीय असे म्हणता येईल का?
या जातींची एकगठ्ठा मते मिळण्याच्या आमिषाने राजकारण्यांनी ही आरक्षणे मिळवून दिली तर या जातींना त्यांच्या लोकसंख्येमुळे फायदा झाला असे म्हणावे का? पण राजकारण्यांच्या या एकगठ्ठा मते मिळवण्याच्या लालसेपोटी आरक्षण दिल्याने समाजात जो गहजब माजेल,दुरावा निर्माण होईल त्यात देशाचा तोटा नाही का?

Rajesh188's picture

9 Feb 2021 - 1:55 am | Rajesh188

लोकसंख्या वाढवायची मग त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी उंच इमारती बांधून ती गरज पूर्ण करायची.
सर्व मोकळ्या जागा नष्ट करून त्या जागेवर लोकवस्ती करायची. मुलांना खेळायला पण जागा ठेवायची नाही.
पृथ्वी वर जे अनेक जीव आहेत ती पृथ्वी ची संपत्ती आहे आणि निसर्ग चक्राचे महत्वाचे घटक आहेत त्यांचे जीवन धोक्यात आणायचे .
अन्न पिकवण्यासाठी
जागा कमी पडते म्हणून vertical शेती करायची.एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पोसण्यासाठी विविध कारखाने निर्माण करून प्रदूषण निर्माण करायचे आणि शुध्द हवा हवी म्हणून परत ऑक्सिजन निर्मिती चे कारखाने काढायचे...ट्रेन आणि विविध प्रवासी साधन वाढवत जायचे.
आणि त्याच बरोबर यांत्रिकी करणं करून रोजगार कमी करायचे.माणसाचे पूर्ण आयुष्य फक्त जगावे कसे ह्याच एकमेव प्रश्नात वाया जाईल ह्याची तरतूद करायची.
जमीन कमी पडते म्हणून समुद्रावर अतिक्रमण करायचे त्या अतिक्रमण करण्याचे काय भयंकर परिणाम होतील ह्याचा विचार करायचा.
कशा साठी हे सर्व करायचे .कशाला हवी प्रमाणाबाहेर लोकांची संख्या.
पृथ्वी मनुष्याचे अस्तित्व असावे एवढीच कमीत कमी लोकसंख्या असेल तर ह्या एकमेव सजीव सृष्टी ला अनुकूल अशा पृथ्वी चे रक्षण करायचे की माणसं साठी एकमेव घर असलेल्या ह्या पृथ्वी ला विनाशाकडे घेवून जायचे.
कशात शहान पण आहे हे तुम्ही च ठरवा.

मुक्त विहारि's picture

9 Feb 2021 - 8:09 am | मुक्त विहारि

पटत आहे

सुचिता१'s picture

9 Feb 2021 - 8:08 am | सुचिता१

शाळेत असताना, म्हणजे २५ वर्षापूर्वी एका शिक्षकांनी ही संकल्पना मांडली होती, तेव्हा पुर्ण पणे कळले नव्हते पण तुमच्या लेखातील बरेच मुद्दे विचारात घेण्यासारखे आहेत. विस्ताराने लिहा ही विनंती ़

सुचिता१'s picture

9 Feb 2021 - 8:08 am | सुचिता१

शाळेत असताना, म्हणजे २५ वर्षापूर्वी एका शिक्षकांनी ही संकल्पना मांडली होती, तेव्हा पुर्ण पणे कळले नव्हते पण तुमच्या लेखातील बरेच मुद्दे विचारात घेण्यासारखे आहेत. विस्ताराने लिहा ही विनंती ़

साहना's picture

9 Feb 2021 - 10:06 am | साहना

नक्कीच.

उगा काहितरीच's picture

9 Feb 2021 - 1:06 pm | उगा काहितरीच

नाही बुवा नाही पटलं. हे थोडक्यात असं झालं की प्रत्येक १००,००० व्यक्ती मागे १ चांगला वैज्ञानिक जन्माला येतो म्हणून लोकसंख्या वाढली की वैज्ञानिक वाढतील व जीवनमान उंचावेल.
असंच थोडसं लॉजीक खेळाच्या बाबतीत लावून पहा, दर १०००० व्यक्तिमागे १ चांगला फुटबॉलपटु जन्म घेतो तर चीन / भारत फुटबॉलमधे जगज्जेते असायला हवे होते.

मुक्त विहारि's picture

9 Feb 2021 - 1:11 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

उपयोजक's picture

9 Feb 2021 - 3:32 pm | उपयोजक

माल्कम ग्लॅडवेल यांचं प्रतिभावान मुलांची वैशिष्ट्ये हे पुस्तक वाचलेय का? त्यात आहे याबद्दल.

मुक्त विहारि's picture

9 Feb 2021 - 5:09 pm | मुक्त विहारि

ते जास्त धोकादायक आहे

साहना's picture

9 Feb 2021 - 11:16 pm | साहना

आतंकवादी पेक्षा "विकृत गुन्हेगार" जास्त चांगला शब्द आहे. हो प्रत्येक समाजांत दर डोई विकृत गुन्हेगारांचे काहीतरी प्रमाण असते. लोकसंख्या जास्त तितके हे विकृत लोक जास्त असतील.

ह्यांत काही तरी ब्रम्हज्ञान असल्यासारखे लोक आश्चर्य का व्यक्त करीत आहेत ? शालेय पाठयपुस्तकांतील गणित आहे. जितकी लोकसंख्या जास्त तितके सर्व प्रकारच्या व्यक्तींची संख्या जास्त .... गावाची लोकसंख्या वाढत राहिली तर गावांत जास्त डॉक्टर, जास्त न्हावी, जास्त खानावळी वगैरे येतीलच ना ...

की अतिरेकी तयार होतात असे जन्माने कोणी अतिरेकी होत नाही किंवा गणिताच्या सूत्रांनी पण अतिरेकी तयार होत नाहीत.
जेव्हा न्याय मिळण्याचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हाच हातात हत्यार घेतले जाते.

साहना's picture

9 Feb 2021 - 11:07 pm | साहना

> दर १०००० व्यक्तिमागे १ चांगला फुटबॉलपटु जन्म घेतो

हि धारणा जर सत्य असेल तर भारतांत शेकडो उत्कृष्ट फुटबाँल पटू असायलाच पाहिजेत. ह्यांत न पटण्यासारखे काहीच नाही हे शालेय गणित आहे. आणि नसतील तर धारणा चुकीची आहे.

म्हणूनच तर आम्ही बहुतेक गोष्टी दर डोई पद्धतीने मोजत असतो. आत्महत्यांचे प्रमाणे १२ प्रति १००,००० आहे. खुनांचा दर १ प्रति १००,००० आहे इत्यादी. लोकसंख्या वाढली कि आपोआप एकूण आत्महत्या, खून वगैरे वाढतात. विविध व्यवसायांचे तसेच आहे. लोकसंख्या जास्त तितके एकूण डॉक्टर जास्त, इंजीनियर जास्त, शिक्षक जास्त इत्यादी.

त्याशिवाय नेचर विरुद्ध नर्चर हे सुद्धा आहे. सर्वच समाज मानवी क्षमतेचा योग्य विकास करून घेतो असे नाही. भारतीय समाज मागासलेला असल्याने मनुष्य क्षमता असून सुद्धा विकसित होत नाही. तर हेच भारतीय माणूस देश सोडून इतर समाजांत गेले के जास्त यशस्वी होतात.

सामान्यनागरिक's picture

9 Feb 2021 - 6:34 pm | सामान्यनागरिक

साहनाजी,
आपण जर भारताबाहेर रहात असाल तर लोकसंख्यावाढीमुळे होणारे दुष्परिणाम आणि भविष्यात होणारी आणीबाणीची परिस्थीती याची कल्पना आपणांस येऊ शकणार नाही.
लोकसंख्या नियंत्रित करायला हवी या बद्दल मिपावरच्या विद्वान मंडळींचे दुमत पाहुन आश्चर्य वाटले.

परदेशांत असणाऱ्या नैसर्गिक साधन्संपत्ती आणि लोकसंख्यचे प्रमाण याचे कारण लोकसंख्या लोकांनीच आपण्हुन नियंत्रित केली आहे हे आहे. शिक्षण आणी या विषयाबद्दलचे ज्ञान कमी असल्याने आपल्याकडे लोकसंख्या नियंत्रीत होत नाही. अजुनही संस्कृतीशी निगडीत कारणे आहेत. म्हणुनच मुलगा होई पर्यंत मुली होऊ देणे , मुले ही देवाची देणगी वगैरे अश्या कल्पना लोकांत आहेत.

नैसर्गीक साधन संपत्ती मर्यादित आहे याची पुरती जाणीव आपल्या समाजामधे झालेली नाही. हे दुर्दैव आहे.

मुक्त विहारि's picture

9 Feb 2021 - 7:27 pm | मुक्त विहारि

शिवाय,

इथले राजकारणी, खनिज संपत्तीची धुळधाण करत आहेत...

कोणे एके काळी, कोळशाला चांगला भाव मिळतो, म्हणून जंगल साफ केले. आता फक्त उरले आहेत ते, उघडे बोडके डोंगर ....

डोंबिवलीच्या परिसरतील, टेकड्या नाहीशा झाल्या.

चिमणी हा पक्षी जवळपास नाहीसा झाला.

चतुर गेले, फुलपाखरे गेली, मैदाने नाहीशी झाली, बेडूक गेले...

आता उरले ते फक्त प्रदुषण ...

मायन सिव्हिलायझेशन जंगलं कापत गेली आणि शेवटी निसर्गकोपामुळे नामशेष झाली. त्यांची लोकसंख्या फार नव्हती.
तुम्ही जो प्रोब्लेम दाखवताय त्यामागे आपल्या वैयक्तीक आणि समाज जीवनात 'पुनर्भरण' तत्वाचा अभाव हे एक सोपं कारण आहे.
आपण गरजे पोटी एखादी गोष्ट सुरु करतो, वापरतो, पण तिचा शेवट कसा असावा याबद्दल अनभिज्ञ, निश्काळजी असतो.
गरज म्हणुन आपण जो काहि उपभोग घेतला त्यामुळे एक पोकळी निर्माण होते. ति पोकळी आपण कॉन्शसली भरत नाहि.

खाण उद्योगात जेंव्हा कोळसा किंवा इतर खनीज उकरुन काढतात तेंव्हा बर्‍याच वेळेला आवष्यक तिथे रेतीच्या गोण्या भरुन ठेवतात जेणेकरुन रिकाम्या पोकळीमुळे वरची जमीन धसु नये.
आपण आपल्या रोजच्या जगण्यात हे तत्व वापरतच नाहि. प्रत्येक गोष्टीचा शेवट कुठल्यातरी नवीन सायकलाचा उगम असतो. आपली एक्टीव्हिटी सुरु होते आणि उपभोगावर संपते. त्याऐवजी एक्टीव्हीटीचा उगम ते शेवटाचा उगम अशी स्पायरल जीवनशैली अंगीकारायाला हवी.
असो.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Feb 2021 - 9:29 pm | प्रकाश घाटपांडे

नैसर्गीक साधन संपत्ती मर्यादित आहे याची पुरती जाणीव आपल्या समाजामधे झालेली नाही. हे दुर्दैव आहे.

खाली लिंक दिली आहे. हे लोकायतवाले म्हणतात. कि भारतात दुप्पट तिप्पट लोकसंख्या पोसू शकेल असे नैसर्गिक रिसोर्सेस आहेत प्रश्न फक्त वाटपाचा आहे.. विषमतेचे बळी आहेत लोकसंख्या वाढीचे नाहीत. लोकसंख्येचा बागुलबुवा करुन सामान्य गरीब नागरिकांचे लक्ष सरकार विचलित करत आहेत.

Rajesh188's picture

10 Feb 2021 - 1:59 am | Rajesh188

भारतात असणाऱ्या आणि सर्व जमिनी चे
आणि नैसर्गिक साधन संपत्ती चे समान हिस्से करून प्रतेक व्यक्ती ला समान वाटले तर देशाची लोकसंख्या 200 कोटी झाली तरी देशात एक पण गरीब दिसणार नाही.
हा विचार अतिशय योग्य च आहे.

साहना's picture

9 Feb 2021 - 11:51 pm | साहना

> नैसर्गीक साधन संपत्ती मर्यादित आहे याची पुरती जाणीव आपल्या समाजामधे झालेली नाही. हे दुर्दैव आहे.

नैसर्गिक संपत्ती मर्यादित नाही आहेत. ह्यावर मी पुष्कळ लेखन ह्या ध्याग्यावर केले आहे.