तुमच्या अॅन्ड्रॉईडसाठी...
१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती.
असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची.
अॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
अॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी)
सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!)
आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम.
१. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट.
२. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते.
३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत.
४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता.
५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता.
६. मराठीत टाईप करण्यासाठी -
अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन
ब) PaniniKeypad Marathi IME
क) AnySoftKeyBoard - Devanagari
ड) Lipikaar Hindi Keyboard Free
मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले.
७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो.
८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता.
९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर.
१०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता.
११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त.
१२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता.
१३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :)
१४. TED - Ideas worth spreading :) :)
बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा.
- सुझे !!
वाचने
447843
वाचनखूण
प्रतिक्रिया
716
Walnut Money Manager
Moto x play - I want "sound' with open wifi notification
In reply to Moto x play - I want "sound' with open wifi notification by arun jaykar
बघा जमतं काय
Moto x play - I want "sound' with open wifi notification
In reply to Moto x play - I want "sound' with open wifi notification by arun jaykar
हम्म
मोटो जी फर्स्ट जनरेशन करता
In reply to मोटो जी फर्स्ट जनरेशन करता by कैलासवासी सोन्याबापु
ओव्हर द एयर अपग्रेड पेक्षा
In reply to ओव्हर द एयर अपग्रेड पेक्षा by आनंदी गोपाळ
Ok डॉक्टर साहेब! आपला अत्यंत
LeEcoच्या नवीन फोनात ( ३०ह) 3
हॉट स्पॉट बद्दल माहिती हवी आहे
In reply to हॉट स्पॉट बद्दल माहिती हवी आहे by nandan
सोपं आहे
In reply to सोपं आहे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हॉट स्पॉट बद्दल माहिती हवी आहे
In reply to हॉट स्पॉट बद्दल माहिती हवी आहे by nandan
पासवर्ड
शाम शुंगसाठी नवा कस्टम रोम हाय का ?
In reply to शाम शुंगसाठी नवा कस्टम रोम हाय का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोन रुट केलेला असेल....
Android Kitkar (Micromax) वर
डॅाक्टरांनी android फोनावर
In reply to डॅाक्टरांनी android फोनावर by कंजूस
Samusung notes
In reply to डॅाक्टरांनी android फोनावर by कंजूस
नोट्स साठी अँड्रॉइडवर गुगलचे
In reply to नोट्स साठी अँड्रॉइडवर गुगलचे by विशाल कुलकर्णी
//जे काही टाईप कराल ते आपोआप
धन्यवाद । ते फक्त स्यामसंगलाच
In reply to धन्यवाद । ते फक्त स्यामसंगलाच by कंजूस
ट्राय करा...
In reply to ट्राय करा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपली ओएस वेगळी आहे पण असे
Android N चा कोणाला अनुभव ?
सरकारी अॅप्स
माझ्याकडे सॅमसंग duos GT
In reply to माझ्याकडे सॅमसंग duos GT by प्रकाश घाटपांडे
एकच पर्याय.
In reply to एकच पर्याय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अपडेट
In reply to माझ्याकडे सॅमसंग duos GT by प्रकाश घाटपांडे
मोबाईल बराच जूना आहे असं
या निमित्तानु युपिआइ न
मोटो जी (प्रथम पिढी) लॉलीपॉप
Com. android. phone process
In reply to Com. android. phone process by रातराणी
कोणता फोन आहे हो ?
In reply to कोणता फोन आहे हो ? by मराठी कथालेखक
गॅलक्सि स6 आहे :(
In reply to गॅलक्सि स6 आहे :( by रातराणी
कठीण आहे. सर्विस सेंटर वाले
In reply to गॅलक्सि स6 आहे :( by रातराणी
एक सुचवतो-
In reply to एक सुचवतो- by कंजूस
त्या़ंचा डेटा मेमरी कार्डवर
In reply to त्या़ंचा डेटा मेमरी कार्डवर by मराठी कथालेखक
फॅक्टरी रीसेट करून फोन सुरु
In reply to फॅक्टरी रीसेट करून फोन सुरु by रातराणी
कोणतेतरी अॅप लुडबुड करत असावे
In reply to फॅक्टरी रीसेट करून फोन सुरु by रातराणी
जे झालं ते झालंच पण...
In reply to Com. android. phone process by रातराणी
रिसेट करू नका.
सर्विससेंटरवाले फक्त फ्लॅश
च्याय्ला!
In reply to च्याय्ला! by आनंदी गोपाळ
नाय हो...
मोटो
मार्शमेलो अपडेट केल्यानंतर
In reply to मार्शमेलो अपडेट केल्यानंतर by कंजूस
नाही
आजचे अॅप...Sleep Orbit:
झोप येण्यासाठी अॅप आहे वाटतं!
In reply to झोप येण्यासाठी अॅप आहे वाटतं! by कंजूस
तसं तर आहेच, पण त्याबरोबरच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kiiara - Gold (Official Video)आजचे अॅप्स :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राकासी राकासी... ;) :- Rabhasaनवीन काही अॅप्लीकेशन्स.
सध्या एवढी देतो.
हेडफोन
आजचे अॅप्स :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Malhar Magic : Hindustani Raga with Fusion Arrangement || IndianRaga FellowsIn reply to आजचे अॅप्स :- by मदनबाण
क्रमांक (५) अँटीव्हायरस + अ
In reply to आजचे अॅप्स :- by मदनबाण
क्रमांक (४) बेस्ट बॅटरी
In reply to क्रमांक (४) बेस्ट बॅटरी by कंजूस
पहाटे उठण्याअगोदर चार्जिंग
पहाटे उठण्याअगोदर चार्जिंग बटण ओन करायचेKase?In reply to पहाटे उठण्याअगोदर चार्जिंग by अभ्या..
हाहाहा
मदनबाण, apps चाईनीज आहेत का
In reply to मदनबाण, apps चाईनीज आहेत का by कंजूस
कंकाका,
In reply to कंकाका, by शाम भागवत
मराठी वाचून ऐकवणारी apps दोन
In reply to मराठी वाचून ऐकवणारी apps दोन by कंजूस
हा पर्याय
In reply to मदनबाण, apps चाईनीज आहेत का by कंजूस
मदनबाण, apps चाईनीज आहेत का
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मंत्रभूमीची बदलणारी ओळखIn reply to मदनबाण, apps चाईनीज आहेत का by मदनबाण
फोनचं ओव्हरचार्जिंग म्हणजे?
In reply to फोनचं ओव्हरचार्जिंग म्हणजे? by शाम भागवत
फोनचं ओव्हरचार्जिंग म्हणजे?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मंत्रभूमीची बदलणारी ओळखIn reply to फोनचं ओव्हरचार्जिंग म्हणजे? by मदनबाण
फोन चालु ठेवला तरी चार्जिंग
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मंत्रभूमीची बदलणारी ओळखIn reply to फोनचं ओव्हरचार्जिंग म्हणजे? by मदनबाण
धन्यवाद. _/\_
In reply to फोनचं ओव्हरचार्जिंग म्हणजे? by मदनबाण
आणि महिन्यातून एकदा पुर्णपणे
In reply to आणि महिन्यातून एकदा पुर्णपणे by बांवरे
नवीन माहितीबद्दल धन्यवाद
In reply to मदनबाण, apps चाईनीज आहेत का by कंजूस
@ कंजूस : लेख वाचण्यासाठी/ ऐकण्यासाठी app T2S
In reply to मदनबाण, apps चाईनीज आहेत का by कंजूस
apps चाईनीज आहेत का कसं कळणार?
In reply to apps चाईनीज आहेत का कसं कळणार? by प्रसाद_१९८२
Apps चाईनाचे आहेत का नाहीत
In reply to Apps चाईनाचे आहेत का नाहीत by कंजूस
अनेक चीनी अॅप्स ही सुरक्षित
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Scientific Study on Chanting Gayatri Mantra - Benefits of Gayatri Mantraफोटोतून वस्तू मोजण्याकरिता
उपयुक्त माहिती
चक्रीवादळ आणि पाऊस.
In reply to चक्रीवादळ आणि पाऊस. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वादळ
In reply to वादळ by तुषार काळभोर
प्लेस्टोअर वर...
In reply to प्लेस्टोअर वर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर,
In reply to बिरुटे सर, by कंजूस
दिसत तर नै ये.
In reply to दिसत तर नै ये. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१) Location >>
मला इथेच मिपावरhttp:/
In reply to मला इथेच मिपावरhttp:/ by कंजूस
https://mausam.imd.gov.in/imd
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Scientific Study on Chanting Gayatri Mantra - Benefits of Gayatri Mantrastorage space running out ऑफ
In reply to storage space running out ऑफ by Prajakta२१
१]तुम्ही तुमच्या मोबाइल
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Scientific Study on Chanting Gayatri Mantra - Benefits of Gayatri MantraIn reply to storage space running out ऑफ by Prajakta२१
फोनच्या सेटिंगमध्ये >> about
एखाद्या अॅप्लिकेशनच्या सर्च
In reply to एखाद्या अॅप्लिकेशनच्या सर्च by मराठी_माणूस
एखाद्या अॅप्लिकेशनच्या सर्च
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pyar Mein Kabhi Kabhi... :- Chalte Chalte@ मराठी_माणूस, उदाहरणार्थ?
In reply to @ मराठी_माणूस, उदाहरणार्थ? by कंजूस
gutenberg ह्या पुस्तकाच्या
मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद
@ Prajakta२१,
मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद
काही उपयोगी अप्लीकेशन्स असतील....
1.1.1.1: Faster & Safer
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा... :- तुम्हारी सुलूIn reply to 1.1.1.1: Faster & Safer by मदनबाण
Faster, safer?
In reply to Faster, safer? by कंजूस
एनक्रिप्टेड डीएनएस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tera Ghata | Gajendra Verma Ft. Karishma Sharma | Vikram Singh | Official Videoफास्टर म्हटले तर एवढीच
In reply to फास्टर म्हटले तर एवढीच by कंजूस
+१
क्विकइमेजर / Quickimgur
In reply to क्विकइमेजर / Quickimgur by सुमो
छान
In reply to क्विकइमेजर / Quickimgur by सुमो
वापरून पाहतो.
In reply to क्विकइमेजर / Quickimgur by सुमो
अरे वाह !
In reply to अरे वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कॉपी फॉर्मेट...
In reply to कॉपी फॉर्मेट... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अपलोडचे बटण दिसते ना
In reply to कॉपी फॉर्मेट... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@बिरुटे सर
In reply to क्विकइमेजर / Quickimgur by सुमो
डिरेक्ट इमेज लिंक फॉर वेबसाइट शेअरिंग
योग्य क्रमाने लिंक काढणे.
Imgur trial
जमलं. -----------------
बरेच दिवस माझी DNSCrypt वर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zoo Zoo Zoobie Zooby... :- Dance Dance@pump_upp - best crypto pumps on telegram !
ज्येष्ठ नागरिकांसाठी फोन moto e13 (go edition)
In reply to ज्येष्ठ नागरिकांसाठी फोन moto e13 (go edition) by कंजूस
मोटो
In reply to मोटो by तुषार काळभोर
नोकिया प्रेमी
In reply to मोटो by तुषार काळभोर
इ मालिका सामान्य वापरकर्त्यांसाठी आहे.