सोने .... एक हिशोब
भारतात किती सोने असेल ...?
स्रीयांची सोन्याची आवड आणि पुरुशांची निवड यावरुन करुया हिशोब...!
भारताची एकुण लोकसंख्या १०० कोटी आहेच..
१) एकुण स्रीया ५० कोटी
= प्रत्येकीकडे किमान १ तोळा असेलच
= ५० कोटी तोळे
= ५०००००० किलो ( १०० तोळे = १ किलो )
२) एकुण पुरुश ५० कोटी
स्रीयांच्या तुलनेत प्रत्येकाकडे २ ग्राम तर असेल
= १० कोटी तोळे
= १०००००० किलो
३) शिरडी , तिरुपती बालाजी , गुरुव्दारा नांदेड , सुवर्ण मंदीर इ. मंदिरे व
देवस्थाने प्रत्येकी १०० किलो तर असेल.
अशी १०० स्थाने नक्कीच असतील
= १०००० किलो
एकुण = ५०००००० + १०००००० + १०००० = ६०१०००० किलो
सोन्याचा किमान भाव रुपये १२ लाख प्रति किलो
एकुण सोन्याची किंमत = ७२१२०० कोटी रुपये
जर भारताला एखादा प्रामाणिक नेता मिळाला व त्याने आवाहन केले....
त्याच्यावर विश्वास दाखवुन प्रत्येक भारतीयाने आपले सोने सरकारी
तिजोरीत जमा केलेच तर ....... ! ! !
बघा बाबानो , विचार करा....
जागल्या
प्रतिक्रिया
6 Apr 2009 - 11:33 pm | नितिन थत्ते
भारतात १३००० टन सोने आहे. जागल्याच्या अंदाजाच्या दुप्पट.
(अवांतरः मघाशी हा लेख गायब झाला होता. का बरे?)
खराटा
(रंग माझा वेगळा)
7 Apr 2009 - 7:57 am | घाशीराम कोतवाल १.२
जर भारताला एखादा प्रामाणिक नेता मिळाला
भारताला आता प्रामाणिक नेता मिळणार =)) =)) =))
त्याने आवाहन केले....
त्याच्यावर विश्वास दाखवुन प्रत्येक भारतीयाने आपले सोने सरकारी
तिजोरीत जमा केलेच तर ....... ! ! !
लोकांनी कष्टाच्या कमाईने घेतलेले सोने सरकार दरबारी का जमा करायचे
हे नोकरशाह त्यात पण भ्रष्टाचार करतील
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
7 Apr 2009 - 9:59 am | पर्नल नेने मराठे
मला पण आवड आहे सोन्यात गुन्तवायची......;;)
चुचु
7 Apr 2009 - 10:20 am | चिरोटा
जगात सर्वात जास्त सोने भारतासारख्या देशात आहे हे वाचून आस्चर्य वाटले होते.जमिनीचे भाव वर खाली होतात्,स्टॉकवालेपण डुबतात पण सोन्याचे भाव सहसा वाढतच जातात.सोन्यात गुन्तवणूक कायमच फायदेशीर ठरते.सरकारी निर्बन्धान्मुळे पुर्वि दुबई,मस्कतहून सोन्याची बिस्किटे आणायची फॅशन होती.
सगळ्यानी सोने जमा केले तर त्याचे करायचे काय? बाहेर कुठ्ला देश ते विकत घेणार्?सोन्याचे वेड भारतातच जास्त आहे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
7 Apr 2009 - 10:28 am | पर्नल नेने मराठे
सरकारी निर्बन्धान्मुळे पुर्वि दुबई,मस्कतहून सोन्याची बिस्किटे आणायची फॅशन होती.
हल्लि ५ किलो आणू शकता ;;)
चुचु
7 Apr 2009 - 11:17 am | दशानन
एक-दोन किलो सोने गिफ्ट म्हणून माझ्याकडे पाठवा ;)
7 Apr 2009 - 11:27 am | घाशीराम कोतवाल १.२
एक-दोन किलो सोने गिफ्ट म्हणून माझ्याकडे पाठवा
पहिली आमच्या डॉलरची सोय करा मग तुम्हाला आम्ही सोन देउ
२ - ३ किलो सोन गिफ्ट
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
7 Apr 2009 - 10:37 am | सँडी
जागल्या भौ, आपल्या बप्पी लाहीरी साहेबांच्या अंगावरचे ७०-८०किलो सोने पण मोजा तुमच्या हिशोबात. ;)
-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
7 Apr 2009 - 3:01 pm | सूहास (not verified)
आपल्या बप्पी लाहीरी साहेबांच्या अंगावरचे ७०-८०किलो सोने पण मोजा तुमच्या हिशोबात..
त्याच स्वत: च एव्हढ वजन आहे का ?? हा हा हा.
बाकी आपल्या त्या सोन्यापेक्षा "भारतात" सोन्याहुन जास्त भाव असणारी लोक्स आहेत्,त्या॑चा वापर कर म्हणाव "प्रामाणीक" नेत्या॑ना..
सुहास
7 Apr 2009 - 3:13 pm | चिरोटा
असे झाले तर सोन्याहून पिवळे!! कसे?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
7 Apr 2009 - 3:21 pm | सुनील
अबबब!!! भारतात इतके सोने तर सोन्याची लंका असलेल्या श्रीलंकेत किती सोने असेल?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
7 Apr 2009 - 3:36 pm | परिकथेतील राजकुमार
मोना... कहा है सोना ?
परा लायन
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
7 Apr 2009 - 9:10 pm | नितिन थत्ते
लायन नाही परासाहेब, लॉयन.
खराटा
(रंग माझा वेगळा)
7 Apr 2009 - 3:49 pm | हर्षद आनंदी
जर भारतीय नागरीक प्रामाणिक असतील, बनायचा प्रयत्न करतील तर नेते काही प्रमाणात प्रामाणिक असतील... इथे तर सगळाच आनंद आहे.
सोने म्हणाल तर त्याची क्रेझ भारतात पुर्वापार पासुन चालत आली आहे.
प्रथम शोध व वापर इथेच झाला आणि इथुन लुटुन जे काही नेले.. त्यावर बरेच लोक मोठे झालेत...
बाकी १३००० टन सोने..
स्विस १५०० अरब $
ऐकायला छानच वाटते आहे...
7 Apr 2009 - 9:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
साफ असहमत. भारतात ५०% स्त्रिया आहेत हे मान्य नाही. भारतातली बेरोजगारी, भूकबळी, निरक्षरता, शेतकर्यांच्या आत्महत्या पहाता प्रत्येकीकडे किमान १ तोळा असेलच हे पटत नाही.
अतिशय सोपी, व्यवहार्य एस.आय. एककं (ग्रॅम, लिटर, सेकंद, इ.) असताना तोळा, मासा अशी एककं सोन्यासाठी का वापरतात? सोन्याच्या गप्पा सुरू झाल्या की आधी बोटं मोडावी लागतात ना!!
असो, हे सोनं बाजारात आलं तर अर्थव्यवस्थेत कसा काय फरक पडेल याचा उहापोह आला असता तर मत नोंदवणं शक्य होतं.
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
7 Apr 2009 - 10:39 pm | नितिन थत्ते
अदितीशी सहमत.
अवांतरः माणसे वास्तवापासून इतकी दूर कशी असतात?
खराटा
(रंग माझा वेगळा)
8 Apr 2009 - 7:52 am | विसोबा खेचर
आकडेवारी अंमळ ढोबळ वाटते आहे..
तात्या.
8 Apr 2009 - 9:48 am | एकलव्य
... समुद्रात किती सोने आहे त्याचाही हिशेब मांडा रे आता.
15 Apr 2009 - 1:48 pm | काजुकतली
जर भारताला एखादा प्रामाणिक नेता मिळाला व त्याने आवाहन केले....
त्याच्यावर विश्वास दाखवुन प्रत्येक भारतीयाने आपले सोने सरकारी
तिजोरीत जमा केलेच तर ....... ! ! !
हम्म्म्म्म्म्म हे सगळे खरेच घडो, माझ्या ह्या जन्मातच...