पूजेची पथ्ये

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in काथ्याकूट
27 Feb 2010 - 6:47 am
गाभा: 

नुकतेच नाडीपरीक्षेवरील एका अनमोल लेखात खालील चमत्काराविषयी वाचले. खालील विधानांकडे टारझन यांच्या एका टिप्पणीमुळे आम्हाला नवीन दृष्टीकोनातून बघता येऊन त्याचा गर्भित अर्थ जाणून घ्यायला मदत झाली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

एका जोडप्याला मुल नव्हते, तेंव्हा महर्षींनी सांगितलेले उपाय केले संतती झाली. पण त्याआधी दैवीउपाय करूनही संततीचा लाभ का झाला नाही याची काही कारणे सांगताना महर्षी म्हणाले, ‘१) पूर्वी केलेल्या पूजा विधीपुर्वक व त्याच क्रमाने केल्या गेल्या नव्हत्या. २) पुजाकरताना पैशाचे गणित मांडून फारच कोतेपणा केला तो नडला. ३) ज्या पुजाऱ्याने मंत्र म्हणून पूजा सांगितली त्याने गडबडगुंडा करून काम आटपले. ४) पुजा करते वेळी स्वच्छता व पावित्र्य पाळले गेले नाही. ’

त्यावरून पूजेची काही पथ्ये ध्यानात आली. ही पथ्ये पाळली नाहीतर अनेक पूजा करूनही संतती होत नाही. मग पुन्हा महर्षींकडे जावे लागते.

- पूजा विधीपूर्वक व योग्य क्रमाने कराव्यात
- पूजा ठरवताना पैशाच्या गणितात कोतेपणा असू नये
- पूजेत गडबडगुंडा करून काम आटपू नये
- पूजेत स्वच्छता पाळावी

त्यावरून साग्रसंगीत पूजेचे माहात्म्य पटले. एरवी आम्ही आम्हाला जमेल तशी, जमेल तेव्हा पूजा करत आलेलो आहोत पण आता आम्ही खबरदारी घेऊ. अधिक विचार करता मला काही इतर पथ्ये सुचली

- पत्नी नसताना एकट्यानेच पूजा करू नये.
- पूजा करताना एकमेकांचा विचार न करता आपल्या प्रिय देवदेवता डोळ्यासमोर आणाव्यात
- पवित्र आचमनांनी पूजाविधी सुकर होतो
- पूजा करताना योग्य आसन वापरणे अनिवार्य आहे. आपल्या पूर्वजांनी अशा आसनांचे वर्णन केलेले आहे.

पूजेत पाळायची अशीच आणखी काही पथ्ये कोणी सांगेल काय?

प्रतिक्रिया

Nile's picture

27 Feb 2010 - 7:52 am | Nile

पुजेची माहिती आपण फारच त्रोटक दिली आहे. तुम्ही अनुभवी दिसता म्हणुन तुम्ही सविस्तर लिहावे अशी विनंती करतो.
मला वाटतं सुरुवात म्हणुन काही प्रश्न विचारतो म्हणजे तुम्हालाही विस्तारायला कल्पना सुचतील .

पुजेतील क्रम सांगा, पुजा करताना कुठल्या आसनात असावे असु नये ते ही सांगा. घरातील कुठली खोली पुजेस योग्य? (इथेही पुर्वाभुमुखी फायद्याची का दक्षिणमुखी 'उत्तर'काळाकरता लाभदायी?) वगैरे.

बाकी,

विचार न करता आपल्या प्रिय देवदेवता डोळ्यासमोर आणाव्यात

हे जरा रिस्की हो! नाही म्हणजे ज्या देवतेची पुजा करतोय तीच रुसुन बसायची, म्हणजे तेल अन तुप अन काय म्हणतात ते सगळंच जायचं. मग बसा हात चोळीत. ;)

(यांनी संजोप रावांची काँमेट लैच शिरीयसली घेतलेली दिसतेय!)

राजेश घासकडवी's picture

27 Feb 2010 - 8:22 am | राजेश घासकडवी

इतर धर्मांतील जे चांगले आहे ते घ्यावे या व्यापक दृष्टीकोनातून मी असे म्हणेन की ख्रिश्चन धर्मगुरूंचे देवपूजेसाठी असे एक विशिष्ट आसन असते. त्याला मिशनरी आसन असे म्हणतात. ते उत्तम.

व हेही सांगावेसे वाटते की घरी पूजा करण्याची सोय नसेल तर जरूर कुठल्या प्रार्थना मंदिरात जावे.

बाकी बाबी जसजश्या सुचतील तसतशा सांगत जाईन.

शैलेन्द्र's picture

27 Feb 2010 - 3:23 pm | शैलेन्द्र

प्रार्थना मंदीरात घरचे देव घेवुन जावे कि तिकडीलच देव वापरावे? तसेच काही अनुभवी पुजारी प्रार्थना मंदीरात न जाता आपदधर्म म्हणुन शेजारील घरी पुजेस जातात...

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Feb 2010 - 8:25 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री नाइल यांनी श्री राव यांच्या प्रतिसादाचा उल्लेख करून पहिल्याच प्रतिसादात चर्चा योग्य मार्गास लावली आहे. प्रस्तुत चर्चाप्रस्तावकाने नुकत्याच केलेल्या गार्‍हाण्यात मिपाकरांच्या या क्षमतेबाबत कुतूहलमिश्रीत आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. श्री रश्दी (जे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे पाइक आहेत व ज्यांना समाजाच्या सुसंस्कृतपणाविषयी थोडीफार जाण आहे) पोर्नोग्राफीविषयी* काय म्हणतात हे जाणून घेणे येथे अनेक गोष्टींमुळे (श्री युयुत्सु यांनी नुकतीच सुरू केलेली चर्चा, श्री राव यांचा प्रतिसाद आणि प्रस्तुत (आम्ही या शब्दाच्या फेटीशने पछाडलो आहोत) संकेतस्थळावर याविषयी असलेले उदार वातावरण) योग्य ठरावे.

श्री रश्दी यांचे विधानः स्वतंत्र व सुसंस्कृत समाज हे त्या समाजाची पोर्नोग्राफी स्विकारण्याची कितपत इच्छाशक्ती आहे त्यावर ठरवले जावे.

*पोर्नोग्राफीस योग्य मराठी शब्द सूचवावा. शक्य असल्यास त्या अनुषंगाने पोर्नोग्राफीने आपल्या जाणीवेत काय बदल घडले आहेत हेही नोंदवावे, ही विनंती. चर्चाचालकांनी या विनंतीचे पहिले पालकत्व स्विकारावे अशीही आग्रही विनंती करतो.

राजेश घासकडवी's picture

27 Feb 2010 - 8:38 am | राजेश घासकडवी

आम्ही पूजेअर्चेविषयी बोलत असताना असले पातकी शब्द? अब्रह्मण्यम्! अब्रह्मण्यम्! श्री. अक्षय यांनी फेटीश व पोर्नोग्राफी असले त्याज्य शब्द वापरून ही मंगल चर्चा विटाळली आहे.

श्री. अक्षय हेच ते, ज्यांनी आमच्या आधीच्या अशाच आत्मिक चर्चेत आमच्यावर गैरहजर पालक असल्याचा आरोप केला होता. हा मुद्दा पुन्हा उकरून काढण्याचा त्यांचा कावा दिसतोय. तेव्हा चालकत्वाची सर्व जबाबदारी पत्करून आम्ही त्यांचा धिक्कार करतो.

पूजाविधींबद्दल त्यांची काही मते, अनुभव असतील तर आम्ही ते स्वीकारायला मोकळ्या मनाने तयार आहोत. असल्या गलिच्छ विषयांवर बोलायचे असल्यास त्यांनी एकट्याचा मार्ग चोखाळावा, ही विनंती.

राजेश

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Feb 2010 - 9:06 am | अक्षय पुर्णपात्रे

<

असल्या गलिच्छ विषयांवर बोलायचे असल्यास त्यांनी एकट्याचा मार्ग चोखाळावा, ही विनंती.

सर्वप्रथम गलिच्छ* (पडलेले, साचलेले आणि मग सडलेले) या शब्दाविषयी तीव्र आक्षेप नोंदवणे आवश्यक आहे. गलिच्छ्तेतून (उदा. चिखल, ज्यातून कमळ उगवावे तसे लोकमान्य चिखली या गावी जन्मले) पवित्र गोष्टींचा जन्म होतो. वरील चर्चाप्रस्ताव जन्मासंदर्भात आहे. तेव्हा या विषयावर चर्चा होणे अत्यावश्यक आहे. तसेच प्रतिसादात एकही आक्षेपार्ह शब्द आढळल्यास आम्ही आमचा प्रतिसाद मागे घेवू.

पत्नी नसताना एकट्यानेच पूजा करू नये.

ही पूजा निसर्गच (कुठल्यातरी दोषासाठी) घडवत असल्याने आम्ही एकटे पूजा करत नाही तेव्हा 'एकला चलो रे' हा विद्यालयीन मार्ग आम्हास सूचवू नये, ही विनंती.

*गलिच्छ हा पोर्नोग्राफीसाठी सूचवलेला मराठी शब्द असल्यास आम्ही आमचा आक्षेप मागे घेवू.

राजेश-जी,
"मिशनरी आसन" हे ख्रिस्ती धर्मगुरूंचे आसन असले तरी तो दादा कोंडकेंच्या तावडीतून सुटलेला द्व्यर्थी शब्दही आहे.
त्यामुळे चर्चा योग्य दिशेने चालली आहे!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

हरकाम्या's picture

28 Feb 2010 - 10:22 pm | हरकाम्या

ह्या चांगल्या चाललेल्या चर्चेत हा "रश्दी " कोण ? ह्या " रश्दी " नामक प्राण्याच्या विधानाचा ह्या चर्चेशी काय संबंध आहे हे मला समजले नाही.
चर्चा पुजाविधी विषयी चालु असताना मला या चर्चेत ह्या "रश्दी " नामक प्राण्याला आपण मध्येच का घुसडावे ? त्याचा हा निकष हा त्याच्याजवळच ठेवणे योग्य असे मला वाटते.

वेताळ's picture

1 Mar 2010 - 1:32 pm | वेताळ

ह्याच्या माजी पत्नीला पद्मलक्ष्मीला एक कन्यारत्न झाले आहे.तिचा बाप मी म्हणुन दोन अमेरिकन नागरिक उठुन बसले आहेत. त्यातला एक डेल कम्युटरच्या मालकाचा धाकटा भाऊ पण आहे.पुर्वी सामाजिक प्रतिष्ठेपायी पितृत्व नाकारणे चालायचे. आजकाल प्रतिष्टा मिळावी म्हणुन पितृत्व स्विकारण्याची स्पर्धा लागली आहे.काळ खुपच बदलला आहे.
विषयांतराबद्दल क्षमस्व.
वेताळ

अक्षय पुर्णपात्रे's picture

1 Mar 2010 - 11:49 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री हरकाम्या, पोर्नोग्राफीच्या पापी उद्योगामुळे लोक एकेकटेच पूजा करू लागतात. भटजींशिवाय व पत्नीशिवाय पूजा करण्याच्या स्वार्थीपणाचे पातक पूजा करणार्‍याच्या माथी मारले जाते. हा रश्दी नावाचा चांडाळ माणूस पोर्नोग्राफीस उत्तेजन देणारी भाषा करतो. अशा चांडाळांमुळे पूजा भरकटत जाऊन फलप्राप्ती कशी होत नाही हेच दाखवण्याचा उद्देश होता. तुम्ही त्याचे नाव तीन वेळा ठळक करून त्या चांडाळाला का महत्त्व देता आहात?

विसोबा खेचर's picture

27 Feb 2010 - 8:08 am | विसोबा खेचर

वा घासकडवी साहेब!

अगदी छान, चविष्ट चर्चा सुरू केली आहे तुम्ही! :)

आपला,
(एक वाह्यात पुजारी!) तात्या.

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Feb 2010 - 8:44 am | अक्षय पुर्णपात्रे

- पवित्र आचमनांनी पूजाविधी सुकर होतो

आचमन (मंत्र म्हटल्यानंतर (पार पाडल्यानंतर) पाणी (किंवा कुठला एक द्रवपदार्थ) तोंडातून (कसल्या ते मंत्र कोणी पार पाडला त्यावर अवलंबुन आहे ) घोळवून बाहेर टाकण्याची क्रिया) पूजाविधीचा आनंद संपवतो असे वाटते. पवित्र आचमने लांबवण्यासाठी काही उपाय आहेत का यावर प्रकाश टाकावा.

विसोबा खेचर's picture

27 Feb 2010 - 8:51 am | विसोबा खेचर

साला हा पूर्णपात्रे जाम चालू इसम आहे! :)

तात्या.

नितिन थत्ते's picture

27 Feb 2010 - 9:00 am | नितिन थत्ते

सहमत. त्यांचे नाव 'पूर्णचालू' असे ठेवावे का?

नितिन थत्ते

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Feb 2010 - 9:09 am | अक्षय पुर्णपात्रे

तात्या व श्री थत्ते यांनी माझ्या प्रामाणिकतेचा विपर्यास केला आहे असे खेदाने नोंदवावेसे वाटते.

पाषाणभेद's picture

28 Feb 2010 - 7:12 am | पाषाणभेद

तात्या, हा पुर्णपात्रे तर आहेच पण धागालेखक पण राजेशही आहेच की चालू.

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

राजेश घासकडवी's picture

27 Feb 2010 - 10:05 am | राजेश घासकडवी

तुम्ही आवर्तनांविषयी बोलत आहात असे वाटते. तुम्ही म्हणता ते आचमन हे त्या आवर्तनांच्या अंती येते. ही मंत्रावर्तने कशी लांबवावीत हा तुमचा खरा प्रश्न आहे. मंत्रोच्चारणाचा ताल, त्याची गती योग्य रीतीने पाळणं हे अत्यावश्यक आहे. त्याचे शब्द मुखाच्या आत बाहेर होत असताना अवरोध होऊ नये यासाठी मुख ओले ठेवणे फायद्याचे ठरते. त्याने ताल वाढवत नेता येतो. व अकस्मात आचमनाचा धोका कमी होतो.

राजेश

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Feb 2010 - 10:25 am | अक्षय पुर्णपात्रे

आवर्तण या शब्दातच ताल व गती अध्यारूत असावे असे वाटते. देवतेची अतिआराधना केल्यास हा (अकस्मात आचमनाचा) प्रसंग उद्भवत असावा असे वाटते. आता ताल व गती यांना सचेतनपणे सांभाळल्यास त्या ताल व गती राहत नाही व त्यांच्या आहारी गेल्यास आकस्मिक आचमन उद्भवते. तेव्हा समोरच्या (किंवा जवळच्या) देवतेची आराधना केल्यासच देवतेच्या प्रसन्नतेनूसार (व पूजेवरील श्रद्धेनूसार) गती व ताल ठरतात. एनकेणप्रकारे बाह्य तालासच मान्य करायचे आहे तर समोरची देवताच 'प्रिय देवते'पेक्षा अधिक योग्य नाही का? प्रिय देवता कितीही प्रिय असली तरी ताल स्वतःच्या (देवीविषयक व देवीपासून समोरच्या आकृतीच्या भिन्नतेविषयक) प्रियतेनूसार ठरते. पूजेमध्ये कल्पकतेचा अभाव असल्यास योग्य समतोल सांभाळता येईल असे वाटते, जे क्र. दोनच्या पथ्यविरोशी (प्रिय व पूजा करतांना सर्वात जवळ असलेली व्यक्ति भिन्न असल्यास) आहे असे सकृद्दर्शनी (प्रायमा फेसी) वाटते.

मंत्रावर्तने लांबवण्यासाठी थोडीफार अनुष्ठाने एकट्याने आधी करावीत.
त्यामुळे साधना पक्की होते.. दिर्घकाल चालणार्‍या पुजेसाठी आवश्यक असलेली आसन स्थिरता पुजेआधी केलेल्या अनुष्ठानाने मिळवता येते..

काही प्रसन्न आणि अनुकूल देवता हे अनुष्ठान आधी करवून घेतात.

"- पत्नी नसताना एकट्यानेच पूजा करू नये.."

या नियमाला अपवाद असावेत..कधी कधी आपल्या स्व्हस्ताने त्या जगन्नाथाची आळवणी जरूर करावी..

राजेश घासकडवी's picture

2 Mar 2010 - 3:09 pm | राजेश घासकडवी

मंत्रावर्तने लांबवण्यासाठी थोडीफार अनुष्ठाने एकट्याने आधी करावीत.

म्हणजे तुम्ही खुंटा हलवून बळकट करणे असे म्हणता आहात असे दिसते आहे...

राजेश

नितिन थत्ते's picture

2 Mar 2010 - 3:24 pm | नितिन थत्ते

पूजेची चर्चा फार लांबत आहे. आता चर्चा बंद करून (आपापल्या घरीच) पूजेची कृती करावी.

पूजेची तयारी जास्त वेळ लांबल्यास पूजेच्या निश्चयातला 'दृढपणा' कमी होतो आणि तो पुन्हा येण्यास वेळ जातो असे जाणकार आणि अनुभवी लोक म्हणतात. :)

नितिन थत्ते

राजेश घासकडवी's picture

27 Feb 2010 - 9:01 am | राजेश घासकडवी

पूजेसाठी तयारीची आचमने मी सांगत होतो. ही आचमने बाहेर न टाकता, सहचारिणीबरोबर पूजेपूर्वी प्राशन करायची असतात. असे केल्याने पूजेची शक्यता वाढते असे तज्ञांचे मत आहे.

तिच्यासाठीचे जल अतिपवित्र (आंग्ल भाषेत याला डिस्टिल्ड) असे म्हणतात. त्यासाठी रूस भागातले उदक - (व्होड - उदक) वापरता येते. (रूस प्रांतात कधीकधी शब्दांना का-प्रत्यय लाडाने, प्रेमाने लावतात हे ध्यानात ठेवावे. )

किंवा विलायत - आंग्ल देशाच्या आसपासच्या प्रांतात असेच अतिपवित्र जल मिळते. ते सुवर्णरंगी असते. ते काही खास दऱ्याखोऱ्यांत प्राप्त होत असल्याने त्यास तिथल्या भाषेतील ग्लेन या शब्दाने सुरू होणाऱ्या वेगवेगळ्या नावाखाली ते मिळते.

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Feb 2010 - 9:25 am | अक्षय पुर्णपात्रे

ग्लेनचा (हस्तांतरज्ज्ञांमध्ये (हे कोण? हा चिरंतन प्रश्न आहे पण सखोलतेविषयी एकमत आहे रुंदीविषयी नाही) आकाराविषयी एकमत नाही) अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद. आचमने बाहेर (म्हणजे स्वत:च्या शरीराबाहेर) टाकावीत हाच अर्थ आम्हालाही अभिप्रेत होता.

त्यासाठी रूस भागातले उदक - (व्होड - उदक) वापरता येते.

हे जे उदक आहे, त्याच्या रंगविषयी अभ्यासकांत मतभेद आढळतात. तेव्हा ते सुवर्णीरंगी आहे हे आपण कुठल्या पुराव्याधारे ठरवले आहे?

Nile's picture

27 Feb 2010 - 10:24 am | Nile

कोणत्या मापात उदकेची मात्रा दिली जावी ह्यावरही दोन शब्द लिहावे.

राजेश घासकडवी's picture

27 Feb 2010 - 12:43 pm | राजेश घासकडवी

आश्चर्यकारकरीत्या उदकाच्या मात्रेचे नियम सरकारने राबवलेल्या काही कार्यक्रमाची घोषणा म्हणून प्रसिद्ध आहेत. ते कार्यक्रम खरे तर अगदी पूजेअर्चेच्या विरुद्ध नसले तरी त्यात काही नवे विधी व उपकरणे सुचवतात. त्यामुळे पूजेच्या आनंदाला 'अव' रोध होतो असं काहींचं म्हणणं आहे. संततीप्राप्तीच्या मात्र ते साफ विरुद्ध आहेत.

ती घोषणा अशी "एक या दो बस"

राजेश

शैलेन्द्र's picture

27 Feb 2010 - 3:39 pm | शैलेन्द्र

आचमणॅ आधीक झाल्यास, पुजाविधीचा ताल व लय बिघडते, तसेच ताल व लय यामुळे जी भावोत्कट अवस्था प्राप्त होने अपेक्षीत आहे ती आचमनानेच प्राप्त होवुन मन्त्रोच्चारीत ध्यान आधीकाधीक वेळ अनुभवण्याचे सुख मीळत नाही. ज्यांस चिन्मय अवस्थेत पोहचण्यास काही अवरोध असेल त्यांस आचमनाचा मार्ग सांगीतला आहे, पण खरा योगी "ताल व लय" हेच चिन्मयानंदाचे खरे सोपान असे समजतो.

तसेच ज्यांस "ताल व लय" नियंत्रित करणे जमत नाही त्यांच्यासाठी खास अभिमंत्रित स्निग्धावरोधक वापरात आहेत.

शैलेन्द्र's picture

27 Feb 2010 - 3:41 pm | शैलेन्द्र

प्रकाटाआ

नितिन थत्ते's picture

27 Feb 2010 - 9:04 am | नितिन थत्ते

मूळ कथेत देवता आणि यजमान यांच्या खेरीज तेथे असलेली पुजार्‍याची उपस्थिती अपेक्षित परिणाम साधण्यात बाधा ठरली असू शकते.

म्हणजे पुजार्‍याकडून आधी पूजाविधी नीट समजून मग पुजार्‍याच्या अनुपस्थितीतच पूजा करावी.

नितिन थत्ते

राजेश घासकडवी's picture

27 Feb 2010 - 9:15 am | राजेश घासकडवी

तुमचा अंदाज ठीक वाटतो. पण आमच्या अभ्यासाप्रमाणे काही संस्कृतींमध्ये पुजाऱ्याची अगर पुजारणीची उपस्थिती पूजेला नव्या पातळीवर नेते असेही जाणते सांगतात. त्या जाणत्याचे नाव मनोज अ. तिवारी का असलेच कायसे असल्याचे आठवते...

राजेश

Nile's picture

27 Feb 2010 - 9:20 am | Nile

श्री थत्ते, तुमच्या चुकीच्या समजुती हे तुमच्या नास्तीकतेचे द्योतक आहे.
अहो ज्यांना पुजा कशी करावी याचे ज्ञान नाही त्यांना मार्गदर्शना करता पुजारी तेथे असतो. चुकीचा मार्ग अवलंबला तर फलप्राप्ती अशक्य हे सुवचन तुम्हाला माहित नाही असे दिसते.

*सध्या व्हर्चुअल पुजारी अशा पुजांकरता फार सोयीचे असतात असे कुठेसे वाचले, चर्चाप्रस्तावकास याबद्दल अनुभव आहे का? ते स्वत: (त्यांना अनुभव आणि तांत्रिक ज्ञान दोन्हीही असल्याने) गरजवंतांना व्हर्चुअली मार्गदर्शन करतात का? करण्यास उत्सुक आहे का?

अप्पा जोगळेकर's picture

27 Feb 2010 - 9:25 am | अप्पा जोगळेकर

नाईल साहेब,

राग मानून घेऊ नका. पण तुम्ही व्यवसायाने भिक्षुकी करता का ?

पूजा करुन फलप्राप्ती होत असती तर कोणी उद्योगधंद केला असता काय?

Nile's picture

27 Feb 2010 - 9:39 am | Nile

अहो आप्पा साहेब, चर्चा-विषयात आम्ही निपुण असतो तर चर्चाप्रस्तावकास सविस्तर लिहा अशी आर्जवे का बरे केली असती? (थोडक्यात, मला इथे भिक्षुक म्हणता येइल, पण व्यवसायाने नाही! )

पुजेचा मोल्सवर्थ च्या शब्दकोशातला (अनेकांपैकी एक)अर्थ पुढीलप्रमाणे: adoration of the gods, थोडक्यात आवडत्या देव-देवतांवरचे प्रेम व्यक्त करण्याचा सोहळा. आता जर ईप्सित फलप्राप्तीकरीता एकाद्या देवतेच्या प्रेम-व्यक्तीकरण-सोहळ्याने *मदत होत असेल तर सोहळ्याला ना का?

*मदत ही प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष होते हे पटवुन देण्याची जबाबदारी चर्चाप्रस्तावकाची आहे, आम्हाला यात फारसे ज्ञान नाही असे आम्ही वरतीच नमुद केले आहे याची कृपया नोंद घ्यावी.

जाता जाता: तुम्हाला पुजेशिवायच फलप्राप्तीचे लाभ झालेले दिसतात, त्यावरही उजेड पाडल्यास आनंदच आहे.

नंदू's picture

27 Feb 2010 - 11:48 am | नंदू

"जाता जाता: तुम्हाला पुजेशिवायच फलप्राप्तीचे लाभ झालेले दिसतात, त्यावरही उजेड पाडल्यास आनंदच आहे."

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

बाकि चर्चा फारच उद्बोधक आणि रोचक होते आहे. चालू द्या.

राजेश घासकडवी's picture

27 Feb 2010 - 9:27 am | राजेश घासकडवी

व्हर्चुअल पेक्षा मी रीअलच पसंद करीन. मात्र पुरुषांना मार्गदर्शन करण्याकडे माझा कल नाही. मी स्त्रियांना मार्ग दाखवायला केव्हाही तयार आहे. पुण्यकर्मच ते शेवटी....

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Feb 2010 - 9:30 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री युयुत्सुंना तुमच्याविषयी तक्रार करावी का? हा विचार करतोय.

शैलेन्द्र's picture

27 Feb 2010 - 3:19 pm | शैलेन्द्र

मार्ग हा चल वस्तुंना दाखवावा लागतो, म्हणजे, कमंडलु आणि पळी यात पळीला मार्ग दाखवणे श्रेयस्कर, असे अनुभवी पुजारी मानतात. आता काही पळ्यांमधे पुरेसे प्राण धारण करण्याची शक्ती नसल्याणे त्यावर कमंडलू ऊलटा घालावा लागतो.

अप्पा जोगळेकर's picture

27 Feb 2010 - 9:04 am | अप्पा जोगळेकर

पूजा करुन मनाला समाधान लाभत असेल तर निराळी गोष्ट आहे. परंतु अमुक पद्धतीने पूजा केली तर संतती होईल आणि तमुक पद्धतीने केली तर संतती होणार नाही या विधानांना काही तार्किक आधार असतो काय ?

- पूजा ठरवताना पैशाच्या गणितात कोतेपणा असू नये

महर्षी तसे म्हणणारच. त्यांचा फायदा आहे त्यात.

धनंजय's picture

27 Feb 2010 - 11:06 pm | धनंजय

अमुक प्रकारे संतती होणार नाही अशा म्हणण्याला तार्किक आधार काय? असेच म्हणतो.

आमच्या पूजाप्रपंचाने संतती होणार नाही असे लोक कितीका सांगोत - आम्ही उभयतः (म्हणजे आमचा हा आणि मी) आमच्याच पद्धतीने पूजा करण्यात काही खंड येऊ देत नाही आहोत. प्रयत्नांती परमेश्वर!

**ठ्ठोऽऽ**

Nile's picture

28 Feb 2010 - 12:19 am | Nile

साष्टांग प्रणिपात आहे तुम्हाला! =)) =))

पाषाणभेद's picture

28 Feb 2010 - 7:10 am | पाषाणभेद

साला काय पण लोक आहेत सगळेच्या सगळे. एका चालू ने एक महान घागा काढला अन बाकी सगळेच्या सगळे एकदम चालू झालेत.

आधी चालूपणाचा मजा घेतो अन नंतर चालू होतो.

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

राजेश घासकडवी's picture

28 Feb 2010 - 7:19 am | राजेश घासकडवी

आमच्या पूजाप्रपंचाने संतती होणार नाही असे लोक कितीका सांगोत - आम्ही उभयतः (म्हणजे आमचा हा आणि मी) आमच्याच पद्धतीने पूजा करण्यात काही खंड येऊ देत नाही आहोत.

सॅन फ्रान्सिस्को परिसरात का? तेथील पूजापद्धतींविषयी माहिती या चर्चेत नव्हती. ती त्रुटी भरून काढल्याबद्दल धन्यवाद.

राजेश

खटपट्या's picture

29 Aug 2013 - 1:25 am | खटपट्या

मला पुजा करायला फार आवडते.
सन्तती नाही झाली तरी चालेल !!

पुजा करुन सन्तती होणार नाही अशी काही विधी आहे का?

नितिन थत्ते's picture

27 Feb 2010 - 9:15 am | नितिन थत्ते

>>पूजा ठरवताना पैशाच्या गणितात कोतेपणा असू नये

म्हणजे एकेका आचमनाची दक्षिणा द्यावी एकदम 'कलशभर' आचमने सवलतीच्या दरात आणू नयेत असे महर्षींना म्हणायचे असावे.

नितिन थत्ते

अप्पा जोगळेकर's picture

27 Feb 2010 - 9:31 am | अप्पा जोगळेकर

पाचवी-सहावीत असताना आम्हांला गोपाळ गणेश आगरकर यांचा 'आमचे अजून ग्रहण सुटले नाही' अशा नावाचा एक धडा होता. त्यामध्ये वेडगळ धार्मिक समजुती, ज्यॉतिष वगैरे गोस्टींवर सडकून टीका केली होती.

गोपाळराव गेले त्याला शंभर्पेषा जास्त वर्षे झाली असतील तरीही आजदेखील 'आमचे अजून (बुद्धीला लागलेले) ग्रहण सुटले नाही' असे खेदाने म्हणावेसे वाटते.

विसोबा खेचर's picture

27 Feb 2010 - 9:35 am | विसोबा खेचर

अरे अप्पा, तू उगाच नको सिरियसली घेऊस..

पूर्णपात्रे आणि घासकडवी भलत्याच पुजेविषयी बोलत आहेत..:)

तात्या.

Nile's picture

27 Feb 2010 - 9:54 am | Nile

अरेच्च्या, त्यात्यांच्या प्रतिसादाने माझा गोंधळ उडाला आहे. तात्या, नक्की कुठल्या पुजेविषयी चर्चाचालु आहे जरा समजवुन सांगा(म्हणजे इथे प्रतिसादातुन सांगा) हो, एव्हढे प्रतिसाद टंकले आहेतच पण अजुन टंकायच्या आधि गोंधळ दुर व्हावा म्हणतो.

अडाणि's picture

27 Feb 2010 - 10:38 am | अडाणि

अप्पा साहेब,
तुम्हि कुठल्या शाळेत जाता ?

ह्या चर्चेतील चाललेली पुजा तुम्हाला कळाली नाही म्हणून विचारतोय....

असो, जाता जाता अजुन एक सल्ला - ग्रहणच्यावेळी पुजा करू नये असे म्हणतात...

-
अफाट जगातील एक अडाणि.

शैलेन्द्र's picture

27 Feb 2010 - 3:53 pm | शैलेन्द्र

हो, पावसाळ्यातही करु नये म्हणतात.. तसेच पाक्षीक पौर्णीमेच्या पुजेचे फळ लगेच मीळते म्हणे..

Nile's picture

28 Feb 2010 - 8:58 am | Nile

पोर्णिमा आणि भरती-ओहोटीचा संबंध आता कळला!

अप्पा जोगळेकर's picture

28 Feb 2010 - 10:31 am | अप्पा जोगळेकर

आम्ही बालवाडीत आहोत. बाकी चालू द्या.

मंगेशपावसकर's picture

27 Feb 2010 - 9:34 am | मंगेशपावसकर

-घासकडवी साहेब मी आपली सदरे नेहमी वाचतो.
प्रोमोट केल्या बद्दल आभारी आहे

मदनबाण's picture

27 Feb 2010 - 9:50 am | मदनबाण

मानस पूजेबद्धल कोणाला माहिती आहे का ? या पूजेला बहुधा कोणतीच पथ्ये लागत नसावीत...

मदनबाण.....

जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif

शैलेन्द्र's picture

27 Feb 2010 - 3:57 pm | शैलेन्द्र

हो, मानस पुजा अती केल्यास माणसास अती शिघ्र चिन्मय अवस्था प्राप्त होवुन पतन होते असे पुर्वज मानायचे पण तसे काही नसते असे आधुनिक चार्वाकपंथी मानतात.

शैलेन्द्र's picture

27 Feb 2010 - 3:57 pm | शैलेन्द्र

हो, मानस पुजा अती केल्यास माणसास अती शिघ्र चिन्मय अवस्था प्राप्त होवुन पतन होते असे पुर्वज मानायचे पण तसे काही नसते असे आधुनिक चार्वाकपंथी मानतात.

मुक्तसुनीत's picture

27 Feb 2010 - 10:26 am | मुक्तसुनीत

एका शाहीराने (बहुदा एका फटक्यात )पूजेच्या संदर्भात म्हण्टलेले आहे :

"दंड" "कमंडलु" बंड माजवुनि मुंड मुंडिशी वृथा तथापि न होय हरिची कृपा !

तस्मात, पूजेच्या पथ्यावर एकंदर श्रेयाचे (ज्याला आउट-कम असे म्हणतात) प्रमाण ठरत नाही असे म्हणावेसे वाटते.

Nile's picture

27 Feb 2010 - 10:35 am | Nile

विचार करण्यासारखा मुद्दा अन त्याच अनुशंगाने काही प्रश्न. पुजेच्या सफलतेत इतर काही बाबींचाही हात असावा असे वाटते. जसें, तुम्ही आराधना करीत असलेल्या देव-देवतेला कुणी दुसराच पसन्न करण्याच्या प्रक्रियेत असेल तर ती (देवता) तुमच्या पुजेत अडथळा होतो का? यावर उपाय काय?

राजेश घासकडवी's picture

27 Feb 2010 - 11:14 am | राजेश घासकडवी

पथ्यं फार उपयोगी असतात महाराज...

दंड कमंडलु द्वंद्व माजता आवर्तन चुकता आचमन जाई स्खलुनि व्यथा

रस्ता हेच ध्येय आहे. रस्ता चुकला की संपलं. तो दाखवण्यासाठी सत्गुरूच पाहिजे.

राजेश

jaypal's picture

27 Feb 2010 - 11:37 am | jaypal

नवसाने / पुजेने मुलं होत असतील तर नव-याची गरज काय? वाचल्याचे आठवते
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

Nile's picture

27 Feb 2010 - 11:39 am | Nile

मम म्हणायला कोणीतरी लागतो ना जयपाल राव!

मदनबाण's picture

27 Feb 2010 - 11:53 am | मदनबाण

जयपालजी पुत्रकामेष्टी यज्ञ कोणी केला होता बरं ? ;)

मदनबाण.....

जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif

jaypal's picture

27 Feb 2010 - 11:57 am | jaypal

केला होता का?
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मदनबाण's picture

27 Feb 2010 - 12:01 pm | मदनबाण

हो,अजुन बर्‍याच राजांनी या देशात अशा प्रकारचे यज्ञ केल्याचे दाखले उपलब्ध आहेत...
उदा:--- http://bit.ly/9J2j06
मदनबाण.....

जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif

jaypal's picture

27 Feb 2010 - 12:19 pm | jaypal

पण दषरथाने १ नाही , २ नाही ३-३ बायका केल्या पण मुल नाही. दोष कुणाचा?
कुठलासा यज्ञ केला आणि कुठलीशी खीर दिली. लगेच सगळ्या राण्या गरभार रहील्या की?
हे यज्ञ,खीर लपवा-लपवी कशाला? महाभारताप्रमाणे सगळ सरळ कबुल करावं. पंडु राजा संतती निर्माण करु शकत नव्ह्ता म्हणुन राज्याला वारस लाभावा हेतुने कोणत्या क्रुशींना बोलावल माहीत आहे ना?
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मदनबाण's picture

27 Feb 2010 - 12:28 pm | मदनबाण

या पैकी कोणाचेही दोष काढण्याची माझी पात्रता नाही... मी फक्त संदर्भ दिला.

मदनबाण.....

जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif

Nile's picture

27 Feb 2010 - 12:39 pm | Nile

अरे बालकांनो, चर्चेचा विषय काय तुम्ही बोलताय काय. अश्या चर्चा भरकटवल्यानेच लोकांना निराश होउन 'काय चाललेय काय' असे काथ्याकुट टाकावे लागतात.

राजेश घासकडवी's picture

27 Feb 2010 - 1:17 pm | राजेश घासकडवी

तो काथ्याकूट चर्चा पुरेशी न भरकटल्याबद्दल होता.

मात्र या चर्चेविषयी ती मुद्याला धरून राहिली तर आमची काही ना नाही. उलट पूजेसारखे काही फार थोडे मुद्दे असे असतात जिथे चित्त एकाग्र असणंच चांगलं असतं.

राजेश

Nile's picture

27 Feb 2010 - 1:22 pm | Nile

अहो म्हणुनच 'अश्या चर्चा' भरकटवल्याने असं लिहलंय ना. ;)

-गिर्‍या तो भी.

नितिन थत्ते's picture

27 Feb 2010 - 12:56 pm | नितिन थत्ते

द मा मिरासदार यांच्या पुस्तकात याचे गंमतीदार स्पष्टीकरण होते
पुत्र होण्यात जर का मिष्टेक होत असेल तर करावयाचा यज्ञ.

नितिन थत्ते

विजुभाऊ's picture

27 Feb 2010 - 11:40 am | विजुभाऊ

संतती होण्यासाठी पूजा करायची असेल तर


-बहुतेक पूजा विधीपूर्वक व योग्य क्रमाने कराव्यात
- पूजा ठरवताना पैशाच्या गणितात कोतेपणा असू नये
- पूजेत गडबडगुंडा करून काम आटपू नये
- पूजेत स्वच्छता पाळावी

त्यावरून साग्रसंगीत पूजेचे माहात्म्य पटले. एरवी आम्ही आम्हाला जमेल तशी, जमेल तेव्हा पूजा करत आलेलो आहोत पण आता आम्ही खबरदारी घेऊ. अधिक विचार करता मला काही इतर पथ्ये सुचली

- पत्नी नसताना एकट्यानेच पूजा करू नये.
- पूजा करताना एकमेकांचा विचार न करता आपल्या प्रिय देवदेवता डोळ्यासमोर आणाव्यात
- पवित्र आचमनांनी पूजाविधी सुकर होतो
- पूजा करताना योग्य आसन वापरणे अनिवार्य आहे. आपल्या पूर्वजांनी अशा आसनांचे वर्णन केलेले आहे.

वरील सर्व वाक्यात पूजा ऐवजी *भोग हा शब्द चपखल बसतो
बघा विचार करून .....अर्थ फारसा बदलत नाही.

राजेश घासकडवी's picture

27 Feb 2010 - 12:50 pm | राजेश घासकडवी

ही पवित्र पूजेची चर्चा चालू आहे आणि त्यात आपण या असल्या सूचना करत आहात? आणि ते सुद्धा एवढी चर्चा त्यावर करून झाल्यावर?

तुम्ही आधीचे प्रतिसाद जर वाचण्याचे कष्ट घेतलेत तर आम्ही नक्की कुठचा शब्द वापरतो आहोत हे स्पष्ट होईल. :-)

राजेश

Nile's picture

27 Feb 2010 - 1:01 pm | Nile

विजुभाउ हे गाद्यांचे व्यापारी असल्याने त्यांना पुजा वगैरेत पवित्र काहीही कळत नाही, त्यांना फक्त व्यापार कळतो असे कुठेसे वाचल्याचे स्मरते.

विसोबा खेचर's picture

27 Feb 2010 - 1:17 pm | विसोबा खेचर

झाली का रे पूजा फोकलिच्यांनो? :)

तात्या.

सुनील's picture

27 Feb 2010 - 1:40 pm | सुनील

अत्यंत मनोरंजक चर्चा सुरू आहे. चालू द्या.

(महामहोपाध्याय) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

गुपचुप's picture

27 Feb 2010 - 2:50 pm | गुपचुप

चांगलीच रंगात आलीये चर्चा... चालू दे.... चालू दे. आज पूजा होऊंनच जाऊ दे.....

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

प्रकाश घाटपांडे's picture

27 Feb 2010 - 4:32 pm | प्रकाश घाटपांडे

पुजा करण्यापुर्वी पवित्रजल सिंचन हे पंचमहाभुतांना तृप्त करण्यासाठी केले पाहिजे. अन्यथा ते अतृप्त आत्मे हे पुजा विधीत काही दुरिते आणतात. कधी कधी ते आत्मे आपल्या आप्त स्वकीयांच्या शरीरात प्रवेश करतात. अशा वेळी त्यांच्या उदरात पवित्र जल जाण्यासाठी त्यांना विधिवत बोलावुन सामुहिक आचमन करणे सोयीचे ठरते असा संकेत आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

शैलेन्द्र's picture

27 Feb 2010 - 4:44 pm | शैलेन्द्र

कुलदेवतेच्या पुजेस इतके सायास केल्यास पुजेची वारंवारता धोक्यात येवु शकते, विशिष्ट व दुश्प्राप्य देवतेस प्रसन्न करण्याचा हा योग्य मार्ग आहे.

कुलदेवतेच्या पुजेस शांत व घट्ट दरवाजाचे पुजाघर व मंत्रोच्चाराची संयमीत लय इतके पुरेसे आहे...

प्रकाश घाटपांडे's picture

27 Feb 2010 - 5:02 pm | प्रकाश घाटपांडे

कुलदेवतेच्या पुजेस शांत व घट्ट दरवाजाचे पुजाघर व मंत्रोच्चाराची संयमीत लय इतके पुरेसे आहे...

आम्हाला एक शंका आहे.लष्करात सैनिक जेव्हा मार्च करित जातात व वाटेत जेव्हा एखादा तकलादु पुल येतो त्यावेळी कदमताल लयीमुळे निर्माण झालेला रेझोनन्स हा तो पुल कोसळवु शकतो , त्यामुळे पुलाचे वेळी ते विस्कळीत होतात व मार्गक्रमणा करतात. मंत्रोच्चाराची संयमित लय ही जर अशाच प्रकारची आपत्ती आणणार असेल तर? विशिष्ट ध्वनी उच्चार करण्यापेक्षा त्यात दडलेल्या अर्थाची कृती अधिक पुजनीय ठरणार नाही का?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

शैलेन्द्र's picture

27 Feb 2010 - 5:15 pm | शैलेन्द्र

खरेतर कुलदेवतेची पुजा ही देवतेशी असलेल्या जवळीकीमुळे, तांत्रिक न होता भावीक होत असते असे अनुभवी पुजारी म्हणतात. राहीला मंत्रोच्चाराचा भाग, तर तो फक्त अत्रुप्त आत्मे आसपास असताना टाळावा अथवा संयमीत करावा. आणी घट्ट दरवाजाचे पुजाघर हा ध्वनी आतच ठेवते.

शैलेन्द्र's picture

27 Feb 2010 - 4:45 pm | शैलेन्द्र

कुलदेवतेच्या पुजेस इतके सायास केल्यास पुजेची वारंवारता धोक्यात येवु शकते, विशिष्ट व दुश्प्राप्य देवतेस प्रसन्न करण्याचा हा योग्य मार्ग आहे.

कुलदेवतेच्या पुजेस शांत व घट्ट दरवाजाचे पुजाघर व मंत्रोच्चाराची संयमीत लय इतके पुरेसे आहे...

सुनील's picture

27 Feb 2010 - 6:22 pm | सुनील

पूजेसमयी यजमान दक्षिणाभिमुखी तर इष्टदेवता उत्तराभिमुखी असल्यासच अपेक्षित फलप्राप्ती होते, असे शास्त्र सांगते.

(महामहोपाध्याय) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

राजेश घासकडवी's picture

28 Feb 2010 - 12:16 am | राजेश घासकडवी

पाठीला पाठ लावून पूजा कसे करतात याचं साधारण चित्र आमच्यासमोर उभे करू शकाल का? मंत्रोच्चारासाठी ते दुष्कर नाही का होणार?

राजेश

सुनील's picture

28 Feb 2010 - 6:44 am | सुनील

दोघेही दक्षिणाभिमुखी असल्याचे चित्र डोळ्यासमोर आणा. ते अधिक कष्टप्रद असावे, असे वाटत नाही काय?

अवांतर - दक्षिण ऐवजी अधर आणि उत्तर ऐवजी उर्ध्व असा शब्दप्रयोग अधिक उचित ठरेल काय?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नंदू's picture

28 Feb 2010 - 6:53 am | नंदू

अशा अवस्थेत फलप्राप्तिचं काय ?

राजेश घासकडवी's picture

28 Feb 2010 - 7:09 am | राजेश घासकडवी

अवांतर - दक्षिण ऐवजी अधर आणि उत्तर ऐवजी उर्ध्व असा शब्दप्रयोग अधिक उचित ठरेल काय?

यातूनही पाठीला पाठ कशी टळते. आपण अधिकाधिक कठीण सूचना करत आहात असं वाटत नाही का...

नंदू's picture

28 Feb 2010 - 7:16 am | नंदू

दक्षिण ऐवजी अधर आणि उत्तर ऐवजी उर्ध्व अशा अवस्थेत पाठीला पाठ टाळता येईल.

राजेश घासकडवी's picture

28 Feb 2010 - 7:27 am | राजेश घासकडवी

प्रथम कोणी अधर तोंड करून आडवे पडल्यास दुसऱ्याला उर्ध्व तोंड करण्यासाठी पाठीला पाठ नाही लागणार?

Nile's picture

28 Feb 2010 - 7:16 am | Nile

श्री सुनील आणि श्री राजेश,
आंतरजालावर शोध केला असता तुम्ही बोलत असलेल्यापैकी काही आसनांची थोडीफार माहिती मिळाली. ज्यांना कठोर आराधना करायची आहे ते अशा प्रकारच्या आसनांचा आधार घेतात असे कळते. या अवस्थेत पुजा अवघड नाही पण आहुती देणे दुरापास्त होते असे काहींचे म्हणणे पडल्याचे वाचनात आले.

चिंतातुर जंतू's picture

28 Feb 2010 - 12:12 am | चिंतातुर जंतू

आमच्या पवित्र श्रध्दास्थानांविषयीची ही वक्तव्ये वाचवाचून एव्हाना आमच्या भावना भडकून भडकून त्यांचा अगदी अहिताग्नी झाला आहे. या धाग्यावरच्या दुष्कर्मी इसमांची एक यादी करून ती कतारच्या राणीकडे धाडत आहे.

- (भडकलेला) चिं. जंतू X(

आम्ही लहान आहोत व स्लो लर्नर आहोत. त्यामुळे तुम्हा ज्येष्ठ मंडळीची चर्चा चटकन कळली नाही. असो बेटर लेट दॅन नेव्हर. इथे अनेक अनुभवी पुजारी आहेत असं दिसतंय. तरी आमच्यासारख्या होतकरुंना मार्गदर्शन करावे. आम्ही कायमच 'आपला हात जगन्नाथ' या तत्त्वास अनुसरुन पूजापाठ केले आहेत. परंतु आता त्याचा वीट आला आहे. तरी विवाहितांनी आणि जे पूजा सांगण्यासाठी बाहेर जातात त्यांनी आमच्यासारख्या 'लिंबूटिंबूंना' मोलाचे मार्गदर्शन करावे.

सुनील's picture

28 Feb 2010 - 11:27 am | सुनील

आत्तापर्यंतच्या चर्चेत घंटामाहात्याबद्दल कोणीच कसे बोलले नाही?

घंटेचे माहात्य फार! प्रत्यक्ष पूजा सुरू करण्यापूर्वी घंटेला गंध-पुष्प वहावे लागते!

आत गाभार्‍यात पूजेत रममाण झालेल्यास, बाहेर दुसरा इच्छूक दर्शनार्थी आल्याची सुचना घंटाच देते! याउप्परही तिचे काही माहात्म्य असल्यास सांगणे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

राजेश घासकडवी's picture

28 Feb 2010 - 12:26 pm | राजेश घासकडवी

सुनीलजी,
तुम्ही आत्तापर्यंत पूजेच्या चर्चेत न आलेल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या शब्दांना, संकल्पनांना इथे स्थान दिलंत याबद्दल धन्यवाद.

आपण म्हटल्याप्रमाणे घंटेचे पूजाकर्मात दोन भिन्न उपयोग आहेत. एक गाभाऱ्यात वाजणारी घंटा व एक बाहेर ठणाणा बोंब मारणारी.

पैकी गाभाऱ्यातली ही आवर्तनांत वाजते, व मंत्रोच्चरणाचा ध्वनी व लय यांच्याशी एकरूप होते. व योग्य आचमनांनंतर थांबते.

बाहेर वाजणारी, ही प्रसंगानुरूप बदलते. सार्वजनिक प्रार्थनामंदिरात ती नव्या पूजेच्या वेळेची सूचना असू शकते. तर वैयक्तिक पूजेत ती केवळ गाभाऱ्यात प्रवेश नाही म्हणून मानसपूजेचं प्रतीक म्हणून येते.

राजेश

प्रकाश घाटपांडे's picture

28 Feb 2010 - 3:20 pm | प्रकाश घाटपांडे

बाहेर दुसरा इच्छूक दर्शनार्थी आल्याची सुचना घंटाच देते! याउप्परही तिचे काही माहात्म्य असल्यास सांगणे.

अशावेळी पुजेत रममाण असलेला नकारघंटा वाजवतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

सुधीर काळे's picture

28 Feb 2010 - 3:38 pm | सुधीर काळे

ही चर्चा श्री घासकडवी व अक्षय यांच्यातली "जुगलबंदी" असून बाकीचे लोक मुख्य कलाकार दमले म्हणजे मागे बसून एकादी तान मारणारे वाटताहेत. (उदा. "मधुबनमें राधिका नाचे रे" या 'कोहिनूर'मधल्या गाण्यात मुक्रीवर चित्रित करण्यात आलेल्या दोन ताना!)
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

पाषाणभेद's picture

28 Feb 2010 - 6:22 pm | पाषाणभेद

या ठिकाणी सामुदायीक रित्या केल्या जाणार्‍या पुजेचा उल्लेख न आल्याने खटकले. सामुदायीक केली जाणारी पुजा ही यजमान समुहाने असतांना करायची की ईष्टदेवता सामुदायीक असतांना करायची किंवा दोन्ही समुहाने असले तर चालते हे काही मला नेहमी एकट्याने पुजाविधी करणार्‍याला समजले नाही.

मला वाटते आदिवासी समुहात अजुनही या प्रथेचे पालन केले जाते. टारझन हा आफ्रिकेत राहून आलेला असल्याने त्याला जे अनुभव आले, ते महत्वपुर्ण असतील. तसेच काही पुजाविधी हिरव्या देशात अगदी सर्रास चालतात हेही ऐकून आहे. हिरवट देशात हिरवा१, हिरवा२ इ. परवाना घेतलेल्या सदस्यांचा (त्या गाभार्‍यातील सदस्यांचा नव्हे हो येथील सदस्यांचा) काय अनुभव आहे ते देखील समजले तर अत्यंत आनंद होईल.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

शैलेन्द्र's picture

1 Mar 2010 - 12:58 pm | शैलेन्द्र

सामुदायीक पुजा ही केवल आनंदासाठी केली जात असल्याने व घट कण चुकीचे आहेत असे शास्त्रात सांगितलेले असल्याने ती सर्वमान्य नाही, तसेच, सामुदायीक पुजा करताना फलप्राप्ती झाल्यास ते श्रेयस कोणाचे हे ठरवने कठीण जाते.

काही जाणकार सामुदायीक पुजेस जाताना कुलदेवतेस न नेता ग्रामदेवतेस नेतात व इतरांच्या कुलदेवतेच्या पुजनाचे लाभ घेतात.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Mar 2010 - 1:34 pm | प्रकाश घाटपांडे

घट कण चुकीचे असल्याने कुलदेवतेची वस्त्रे ग्रामदेवतेला घातली जातात . चंदनाची वस्त्रगाळ उटी लावताना थंडपणा महत्वाचा असतो. कुलदेवता महिषासुर मर्दिनी असल्यास पुजा बाधित होते. पुजेचे सामुदायिक महत्व लक्षात घेता ग्रामदेवतेचा तो मान आहे. त्यामुळे फलप्राप्ती ही ग्रामदेवता पुजनाचीच होती
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

जे.पी.मॉर्गन's picture

1 Mar 2010 - 4:30 pm | जे.पी.मॉर्गन

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

धन्य आहे बुवा तुम्हा लोकांची ! मी इथे भर दुपारी हापिसात (स्वतःचंच) पोट धरून खो खो हसतोय.... गाल दुखायला लागलेत.... माझा स्पॅनिश सहकारी डॉक्टरला बोलवायच्या तयारीत आहे... आमच्या जवळपासच्या काही इष्ट आणि काही अनिष्ट देवता माझ्याकडे "जेवणापर्यंत तर बरा होता" अश्या नजरेनी बघताहेत........ वाट लावलीत राव !

इयत्ता ९वी नंतर "अश्या" चर्चा विशेष झाल्या नव्हत्या. (आम्ही विचार 'मंथनापेक्षा' कृतीवर भर देणारे !)..... राजेश पासून सगळ्यांनीच जी काही कल्पनाशक्ती लढवली आहे.... मान गये !

वैयक्तिक मत असं की फलप्राप्तीसाठी पूजा हा पूजेमागचा हेतू असू नये ! मनोभावे षोडशोपचारे पूजा करावी आणि पूजा झाल्यावर हातावरून पाणी सोडून "इदं न मम" म्हणून पुढच्या इष्टदेवतेच्या आराधनेला लागावे ! सुदैवानी आपल्याकडे इष्टदेवतांची वाण नाही.

असो.. मला ह्या विषयावर लिहायला इतकाच वेळ आहे ! तुमची पूजा अर्चा चालूदे ! ;)

सुनील's picture

2 Mar 2010 - 3:19 pm | सुनील

संपूर्ण चर्चेत, पूजा ठरवताना पैशाच्या गणितात कोतेपणा असू नये ह्या पथ्याबाबत फारसा उहापोह झालेला आढळला नाही.

हेही पथ्य फार महत्वाचे आहे. अर्थात, नित्यनेमानी होणार्‍या घरगुती स्नान-संध्येला हे जरी फारसे लागू होत नसले तरी, तीर्थक्षेत्री जाऊन काही अभिषेक्-अनुष्ठाने करायची झाल्यास, ह्याकडे फार लक्ष पुरवावे लागते. अन्यथा मनाजोगते कार्य झाल्याचे समाधान मिळत नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पाषाणभेद's picture

3 Mar 2010 - 8:26 am | पाषाणभेद

>>>>"तीर्थक्षेत्री जाऊन काही अभिषेक्-अनुष्ठाने करायची झाल्यास"

तसेच या वेळी सोवळे नेसून, पितांबर घालून पुजा करावी असा शासकीय नियमाच्या जाहीरातीही आजकाल बर्‍याच वेळा दिसू लागलेल्या आहेत. त्या मागची कारणे काय आहेत? की आताच्या विज्ञानयुगातही आपण सोवळे ओवळे, अस्पृष्य स्पर्श अशा प्रतिगामी चालीरीती पाळतच आहोत? असल्या पुजेच्या वेळी खरे तर अंग(वरची)वस्त्रे काढून ठेवण्याची प्रथा पुराणकालापासून चालत आलेली आहे.

त्याचप्रमाणे असल्या सार्वजनिक ठिकाणी पुजाविधी करण्याच्या जाहिरातीदेखील आजकाल पुजारी व्यवसायातील व्यक्ती करीत असतात. एकुणच हा व्यवसाय फारच मोठ्याप्रमाणात फोफावला आहे.

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

राजेश घासकडवी's picture

3 Mar 2010 - 9:33 am | राजेश घासकडवी

शासनाने या पवित्र कार्याच्या आचारसंहितेत दखल घ्यावा हे आम्हांस बिलकुल पटलेले नाही. संततीप्राप्ती हा जो मूळ उद्देश होता तो नाहीसा होऊन सोवळे नेसा व गंमत म्हणून पूजा करा अशी नव्या पिढीत धारणा होत चाललेली आहे.

असो. काळ बदलला आहे, दुसरे काय. सोवळे नेसल्याने अनिष्ट असुरांच्या 'मदतीं'ची बाधा टळते यात तथ्य आहे हे आम्हास नाईलाजाने का होईना मान्य करावे लागते. तेव्हा जनहितासाठी आम्ही ते स्वीकारतो, व लोकांनाही स्वीकारावे सांगतो - विशेषत: ग्रामदेवतांची पूजा करताना. यात पूजापाठ वाढल्याने आम्हा आचारसंहिता-रक्षकांचा स्वार्थच आहे असे कोणी म्हणाल्यास दुर्लक्ष करावे.

आमच्या मते जितक्या पूजा अधिक होतील तितका मनुष्यजमातीचा पुण्यसंचय वाढेलच. त्यामुळे आम्ही सार्वजनिक, वैयक्तिक असा भेद करत नाही. केवळ कुलदेवतेचा कोप होऊ नये अशी काळजी घेतली की झालं.

राजेश

शैलेन्द्र's picture

3 Mar 2010 - 2:43 pm | शैलेन्द्र

खरंतरं आपण केवळ कुलदेवतेचाच ऊल्लेख करुन वस्तुस्थीतिची एकच बाजु समोर ठेवतोय असे नाही का वाटत? काही भिन्नलींगि पुजारी कुलदैवताचीही तसेच वागतात जसे आपण कुलदेवतेशी वागतो. किंबहुना ग्रामदेवतांपेक्षा ग्रामदेवांची संख्या फार जास्त आहे. तसेच हे ग्रामदेव स्वःताच आशिर्वाद देण्यास तत्पर असल्याने त्यांच्या पुजार्‍यांस विनासायास पुण्य प्राप्त होते.

नितिन थत्ते's picture

3 Mar 2010 - 12:37 pm | नितिन थत्ते

१०० प्रतिसाद झाले.

कोण म्हणतो आजकालच्या तरुणांत पूजाअर्चा या विषयात अनास्था आहे?

नितिन थत्ते

प्रकाश घाटपांडे's picture

3 Mar 2010 - 4:28 pm | प्रकाश घाटपांडे

अनास्था कशी असेल त्यात तथ्येच आहेत ना!
असो! पुजा असो वा जीवण; सार्वजणिक झाले कि काही पथ्ये पाळावीच लागतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

बॅटमॅन's picture

5 Mar 2013 - 7:50 pm | बॅटमॅन

हे साले जुणेजाणते मिपाकर महाचालू आहेत!!!! मुद्दाम धागा वर काहाडत हाये =))

आहिताग्नी वाघुळवाडे.

प्रसाद गोडबोले's picture

16 Aug 2013 - 11:39 am | प्रसाद गोडबोले

मस्तच =))

असलाच, स्वयंपाकाच्या पथ्यांचा पण धागा होता बहूदा :D

होबासराव's picture

28 Aug 2013 - 6:28 pm | होबासराव

हा हा हा

बॅटमॅन's picture

28 Aug 2013 - 6:54 pm | बॅटमॅन

या पूजापथ्यांबद्दल प्रा.गळतग्यांचे मत न सांगितल्याबद्दल श्री. घासकडवी यांना संमंतर्फे समज दिली जावी.

तदुपरि वरती पोर्नोग्राफी या शब्दाच्या मराठी प्रतिशब्दाबद्दल खल पाहिला आणि मिपाकरांच्या अज्ञानाने अं.ह. झालो. अहो, तो शब्दच मुळात आपल्याकडून (सर्व भाषांची जननी संस्कृतकडून) घेतलेला आहे.

झाडांआड, पानांआड जे केले जायचे ते पर्णग्रासी. पुढे पानांच्या सळसळीआड फकारी शब्द ऐकू आल्याने त्याचे पर्णग्राफी झाले. हा शब्द बंगाली अ‍ॅक्सेंटमध्ये उचारल्यावर त्याचे "पोर्णोग्राफी" झाले आणि ब्रिटिशांचे राज्य पहिल्यांदा बंगालवर झाल्याने त्याचे पुढे "पोर्नोग्राफी" झाले.

दुसरी व्युत्पत्तीही सांगितली जाते त्यातही भारताचाच मुख्य वाटा आहे.. ज्या प्रकारची चित्रे आपल्या पुण्यभू भारतातील पोरे काढीत नसत त्याला म्हणत पोर-न-ग्राफी, त्यावरून शब्द रूढ झाला.

राजेश घासकडवी's picture

28 Aug 2013 - 10:52 pm | राजेश घासकडवी

पूजेसारख्या पवित्र विषयावर पॉर्नोग्राफीसारख्या विषयावर चर्चा व्हावी हे काही आवडलं नाही. मात्र चर्चा शब्दाच्या व्युत्पत्तीबाबतच असल्यामुळे बॅटमॅन यांचा केवळ निषेध करून थांबतो.

अवांतरच करायचं तर, पर्ण या शब्दाचा पॉर्न शी लावलेला संबंध फारच गहन सत्य सांगून जातो. मात्र त्याची व्युत्पत्ती कदाचित पाश्चात्त्य इतिहासातच सापडू शकेल. अनेक चित्रांमध्ये चित्र काढतानाच अंजीराचं पान गळून नेमकं काही विशिष्ट गोष्टी झाकण्याचं काम करतं. त्यामुळे पान किंवा पर्ण हे महत्त्वाचं ठरलं असावं. बाकी संस्कृतातूनच सगळ्या भाषा निर्माण झाल्या असल्यामुळे तो शब्द पर्णवरूनच आला असावा याबाबत शंका नाही.

आशु जोग's picture

29 Aug 2013 - 12:13 am | आशु जोग

वा छान अर्थ सांगितलात.

याचा प्रसार केल्या जाइल

अनुप ढेरे's picture

28 Aug 2013 - 11:55 pm | अनुप ढेरे

धूम्रपानामुळे धार्मिक भावना कमी होते किंवा अपेक्षित पुण्यप्राप्ति होत नाही यात कित्पत तथ्य आहे?

राजेश घासकडवी's picture

29 Aug 2013 - 7:02 am | राजेश घासकडवी

तुम्ही हा एक नवीनच मुद्दा उपस्थित केला आहे. 'यतो धूम्रस्ततो वन्हि' अशी म्हणच आहे. पण हा नियम सरसकट लावण्याबद्दल किंचित काळजीपूर्वक असण्याची गरज आहे. 'वन्ही तो चेतवावा रे' असं म्हणत सतत वन्हीचेतन करत राहिलं तर सरपण लवकर संपून जाण्याचा धोका असतो. लाकडं जळून राख होऊन ती मऊ पडतात असंही ऐकिवात आहे.

तसंच आपल्या पूज्य संस्कृतीत धूम्राचे व धू्म्रपानाचे विविध प्रकार सांगितले आहेत. काही विशिष्ट वल्लींच्या धूम्राचं सेवन केल्यास ब्रह्मानंदाची प्राप्ती होते, आणि त्या धूपदीपनातून पूजाविधीचं पुण्य शतगुणित होतं असं काही साधकांचं म्हणणं आहे. मात्र हा मार्ग नवख्यांसाठी नव्हे, इतकीच सूचना देऊन तुमच्या पूजासिद्धीला सुयश चिंतितो.

अनुप ढेरे's picture

29 Aug 2013 - 9:50 am | अनुप ढेरे

विशिष्ट वल्लींच्या धूम्राचं सेवन केल्यास ब्रह्मानंदाची प्राप्ती होते

जरा नावं सांगाल का? म्हणजे आम्ही विल्सच्या उदबत्त्या वापरणं सोडून या नव्या हर्बल उदबत्त्या वापरू...

राजेश घासकडवी's picture

29 Aug 2013 - 10:25 pm | राजेश घासकडवी

पूजेच्या वातावरणनिर्मितीसाठी पवित्र धूम्राच्या उदबत्त्या कामी येतात. मात्र त्या बाजारात जशाच्या तशा मिळत नाहीत. अशा मंगल धुरकामाविषयी बरंच लिहिता येईल पण ते या धाग्यावर प्रस्तुत ठरणार नाही.

चित्रगुप्त's picture

29 Aug 2013 - 1:17 am | चित्रगुप्त

पोर्नोग्राफी = रतिचित्रण

खटपट्या's picture

29 Aug 2013 - 1:36 am | खटपट्या

कोणाकडे पूजेची चीत्रफीत असल्यास क्रुपा करुन लिन्क द्यावी.

अहो कित्ती तरी लिंका मिळतील की हो, शोधा म्हंजे सापडेल ;)

दादा कोंडके's picture

29 Aug 2013 - 10:18 am | दादा कोंडके

घासकडवी, पुर्णपात्रे आणि शैलेंद्र यांचे प्रतिसाद वाचून हहपुवा झाली!

लोक्स उदया पासुन पुढिल काहि दिवस मिपा वर येणे बहुधा जमणार नाहि.
पेश-ए-खिदमत है घासुगुर्जि का धांसु धागा =))

शैलेन्द्र's picture

19 Jan 2016 - 10:52 pm | शैलेन्द्र

आहाहा काय ते दिवस होते.. पूजा काय, सखुची पिशवी काय...

सत्ययुग होत राव ते..

धागा ज्या सेन्सॉर नियमांच्या चौकटीच्या कक्षेत खेळवलेला आहे ते ग्रेटच
एक किस्सा आठवला एक नाटक तेंडुलकरांच गिधाडे बहुधा ( चुकभुल देणे घेणे ) त्यात एक सीन होता त्यात रक्ताचा डाग दिसत असे त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यावर यांनी अशी शक्कल लढवली होती. लाल डागा ऐवजी निळा रंग डागाचा कपड्यावर द्यायचा आणि एक घोषणा नाटकापुर्वी करायची. की तो रंग लाल आहे असे प्रेक्षकांनी समजुन पाहावे.
व्हायच अस की मुळ रंगापेक्षाही अधिक तीव्रतेने प्रेक्षकांच लक्ष त्या प्रसंगाकडे त्या बाबी कडे वेधल जायच आणि तेही नियमांच्या चौकटीतच.
ही पण एक मजा आहे एक केशव पंडित नावाच कॅरेक्टर इंटरेस्टींग पात्र वेद प्रकाश शर्मा च्या हिन्दी उपन्यास मध्ये एकेकाळी गाजवल होत जो केवळ कायद्याचा आधार घेऊन कुठलीही हिंसा न करता अस काहीस मोठ मोठी कामगिरी पार पाडत असतो त्यावर एक चित्रपटही बनला होता बहुधा. आठवत नाही नीट पण वेद प्रकाश शर्मा म्हणजे त्या ए एक व्हीलर च्या हिंदी क्राइम मेरठ मेड उपन्यासांमधल एक त्यातल्या त्यात दर्जेदार नाव होत त्यांची एक गाजलेली म्हणजे
वर्दी वाला गुंडा

पक्षी's picture

20 Jan 2016 - 11:48 am | पक्षी

आता सगळा प्रकार लक्ष्यात आला.
मिपाकरांच्या talent चा जवाब नाही...
_____/\________

तर्राट जोकर's picture

25 Apr 2016 - 2:12 pm | तर्राट जोकर

अरे काय भयाण धागा आणि कहर प्रतिसाद आहेत. _()_

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Apr 2016 - 4:23 pm | ज्ञानोबाचे पैजार

मिपाकर एवढे देवभोळे असतील असे वाटले नव्हते.

नुसते वर्णन वाचून त्या प्रकारे आसन घालुन पूजा करणार्या साधकांच्या कधीकधी ते आसन अंगलट येऊ शकते. अर्धवट माहितीच्या आधारे अंदाजपंचे आसने करुन केलेल्या पूजाविधी मुळे क्वचित प्रसंगी देवता प्रसन्न होण्या ऐवजी तिचा कोपही होऊ शकतो. या कारणास्तव नुसती वर्णने करण्या पेक्षा पूजेच्या वेळी करायच्या आसनांचे जर काही फोटो दिले असते तर नवोदित साधकांची चांगली सोय झाली असती.

या शिवाय मुख्य पूजा सुरु करण्याआधी स्थल देवता, ग्राम देवता, कुलदेवता, नवग्रह इत्यादिंना आवाहान केले जाते त्या वेळी कोणती पथ्ये पाळावी, कोणत्या देवतेला काय अर्पण केले की ती लवकर प्रसन्न होते, या विषयी सुध्दा मिपा महर्षी मार्गदर्शन करतील का?

गुरु वीण नाही दूजा आधार

पैजारबुवा,

राजेश घासकडवी's picture

26 Apr 2016 - 8:12 am | राजेश घासकडवी

मिपाकर एवढे देवभोळे असतील असे वाटले नव्हते.

हे पाहा पैजारबुवा, मिपाकरांच्या धार्मिकतेबद्दल आणि पूजाप्रेमाबद्दल असे वावगे बोल काढण्याची गरज नाही. असे प्रश्न विचारण्याबद्दल मी तुम्हाला या संदर्भात उलट प्रश्न विचारू इच्छितो 'तुम्ही नास्तिक तर नाही ना?' किंवा 'हाय कंबख्त, तूने पूजा कीही नही' असं म्हणावं का?

अर्धवट माहितीच्या आधारे अंदाजपंचे आसने करुन केलेल्या पूजाविधी मुळे क्वचित प्रसंगी देवता प्रसन्न होण्या ऐवजी तिचा कोपही होऊ शकतो.

हे आपण अगदी खरे बोललात. आसने ही तपस्येनेच साध्य होतात. त्यासाठी सुरूवात सोप्या आसनांनी करून मगच पुढची कठीण आसने करावीत एवढेच आम्ही म्हणू शकतो.

या कारणास्तव नुसती वर्णने करण्या पेक्षा पूजेच्या वेळी करायच्या आसनांचे जर काही फोटो दिले असते तर नवोदित साधकांची चांगली सोय झाली असती.

आधुनिक पिढी ही चित्रांवर फार अवलंबून राहायला लागली आहे हे आमचे स्पष्ट मत आहे. मनश्चक्षुंसमोर प्रतिमा उभी करता यायची पूर्वीच्या जमान्यातल्या लोकांना. आता काय, आधी प्रतिमा असल्याशिवाय प्रत्यक्ष काही उभंच राहात नाही...

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Apr 2016 - 9:46 am | ज्ञानोबाचे पैजार

गुर्जी अबोध बालकाचा एखादा शब्द चुकला तर त्याला मोठ्या मनाने माफ करा. मी माझे वाक्य सुधारतो.

इथे मिपावर, माझ्यासारखेच देवभोळे, इतके जण भेटतील असे वाटले नव्हते.

माझ्या त्या दुसर्या प्रश्नाचे उत्तर पण जमले तर द्या ना. स्थल देवता, ग्राम देवता, नवग्रह यांची पूजा न करता मुख्य पूजा केली तर तशी पूजा ही चटावरच्या श्राध्दा सारखी पटकन उरकल्यासारखी वाटते. पण इतर देवतांकडे जास्त लक्ष पुरवले तरी मुख्य देवता नाराज व्हायची शक्यता असते. या सर्व पूजांमधे समन्वय कसा साधावा?

पैजारबुवा

राजेश घासकडवी's picture

26 Apr 2016 - 5:32 pm | राजेश घासकडवी

तुम्ही चांगला मुद्दा मांडला आहे. पूजा हे आयुष्यभर चालणाऱ्या तपस्येचे एक अंग आहे. या तपस्येसाठी सर्वच देव-देवतांचे पूजन करण्याचा योग येऊ शकतो. मात्र इतरांनाही पूजल्यास एका देवीचा - विशेषतः कुलदैवताचा कोप होऊ शकतो. त्यामुळे तपस्या परिपूर्ण करण्यात अडचणी येतात. 'माझी भक्ती फक्त तुझ्याठायी आहे' असं प्रत्येक दैवताला समजावून देता आलं तर तुम्हाला पुण्य महत्कृत म्हणजे आधुनिक मराठीत ज्याला मॅक्सिमाइझ असे म्हणतात, तसे करता येईल. यासाठी देवळं लांबच असलेली बरी.

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2016 - 5:51 pm | टवाळ कार्टा

पूजा फक्त देवळातच करावी असे थोडेच आहे?

बॅटमॅन's picture

26 Apr 2016 - 10:51 am | बॅटमॅन

आता काय, आधी प्रतिमा असल्याशिवाय प्रत्यक्ष काही उभंच राहात नाही...

अगदी असेच नाही. अजूनही कल्पनाशक्तीची धार बोथट न झालेले अनेक साधक आहेत. मूकं करोति वाचालं तसे ते साधनेनेच झोपलेल्यास उभे करू शकतात.

तर्राट जोकर's picture

26 Apr 2016 - 11:30 am | तर्राट जोकर

_()_ मूकं करोति

अमित_निंबाळकर's picture

26 Apr 2016 - 12:00 pm | अमित_निंबाळकर

पूजे साठी मूर्ती योग्य का फोटो ??

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2016 - 12:34 pm | टवाळ कार्टा

इतके रामायण होउन रामाची सीता कोण =))

फोटो सुद्धा चालू शकेल, किंवा पूजेची यथासाग माहीती सांगणारी चलचित्रे हल्ली ऑनलाईन उपलब्ध असतात. त्याआधारे पूजा उरकता येऊ शकते. मूर्तीपूजेचा घाट घालायचा की नाही हा व्यक्तिगत प्रश्न आहे.

वैभव जाधव's picture

26 Apr 2016 - 6:10 pm | वैभव जाधव

अरे पूजेची पथ्ये सूक्ष्म च असू दे. स्थूलत्वाने निर्देश केल्याने मजा निघून जाते. 'सटल' ठेवा, 'ग्रोस' करु नका!

सूड's picture

26 Apr 2016 - 6:17 pm | सूड

हो हो

अनुप ढेरे's picture

27 Apr 2016 - 10:29 am | अनुप ढेरे

ही टनाटनी पुजेची पथ्य वाटतायत. अंनिस काय सांगते या पुजेबद्दल?

बाळ सप्रे's picture

27 Apr 2016 - 11:51 am | बाळ सप्रे

अंनिस म्हणते पूजेत समर्पणभाव हा केवळ पूजकाकडून असून चालत नाही तर देवतेकडूनही हवा, अन्यथा पूजा फलदायी होउ शकेल पण आनंददायी होउ शकणार नाही..
म्हणजे पूजा करून देवतेला प्रसन्न करणे हे अर्ध सत्य आहे. देवता प्रसन्न असेल तरच पूजेला पाचारण करता येइल व पूजा आनंददायी होइल..

गामा पैलवान's picture

30 Apr 2016 - 2:10 am | गामा पैलवान

बाळ सप्रे,

या विधानाशी लाखवेळा सहमत. ही अक्कल जर धागालेखकाला असती तर हा धागा काढायची वेळच आली नसती. साधनांमध्ये गुंतून पडल्याने ध्येयाचा विसर पडला आहे.

आ.न.,
-गा.पै.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Apr 2016 - 5:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पूजेचा विषय असल्यामुळे का काय, हा धागा सतत तुकोबाच्या गाथेसारखा वर येतो. वर येण्याच्या तुलनेसाठी इतरही काही कल्पनाचित्रं सुचली होती, पण पूजेची वेळ झाल्यामुळे आवरतं घेते.

वैभव जाधव's picture

1 May 2016 - 5:32 pm | वैभव जाधव

बेटा, तुझसे ना हो पायेगा!
-रामाधीर गँग्स ऑफ वासेपूर

आमचेकडे पुजाविधीची सर्व साधने व पोथ्या (सप्तरंगीत चित्रांकीत) मिळतील. आसनांना लागणारे फर्निचर, कपडे आदीदेखील पुरवितो.

वाजवी दर, योग्य व आनंदी सेवा ही आमची वैशिष्ठ्ये. परदेशातही सेवा देतो. (जास्त साधने घेतल्यास टपालखर्च माफ.) घरी येवून पुजाविधीसाठी भटजी उपलब्ध. सर्व कामे मालकच करतात. (आधीच अपॉइंटमेंट घेणे)

(कृपया ओळख दाखवून कमी पैसे देवू नयेत. कोणतीही कुपने चालत नाहीत. सर्व प्रकारची क्रेडीट कार्डांची सोय. आमची दुसरी कोठेही शाखा नाही.

- (जाहिरात)

तिमा's picture

1 May 2016 - 8:39 pm | तिमा

कुठलीही पूजा ही, 'पूज्य' असलेली व्यक्ति वा मूर्ति, समोर असल्याशिवाय सफळ होत नाही.

mayu4u's picture

15 Apr 2020 - 7:28 pm | mayu4u

फुटलोय!

चौथा कोनाडा's picture

18 Apr 2020 - 1:08 pm | चौथा कोनाडा

MHRDT

सुनील's picture

18 Apr 2020 - 1:58 pm | सुनील

दशकांपूर्वीचा हा धागा आणि त्यातील प्रतिसाद (माझे धरून) वाचताना पुनःप्रत्ययाचा आनंद झाला!
धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद!!

योगी९००'s picture

21 Apr 2020 - 12:33 pm | योगी९००

खूप मजेदार धागा आणि प्रतिसाद...

तुम्हीच ना ते महामहोपाध्याय सुनिल?

सुनील's picture

21 Apr 2020 - 3:57 pm | सुनील

हो, मीच तो!!