भटकंती
अविस्मरणीय लिंगाणा...
दुर्गराज श्रीमान रायगडावरून, राजवाडा, राजसदर वा जगदीश्वर मंदीर असो की भवानी टोक, तिथून साधारण पुर्वेला पाहिलं की एक सुळका त्याच्या वैशिष्ट्यपुर्ण आकाराने लगेचंच लक्ष वेधून घेतो. तिथून, उंचीला तो श्रीमान रायगडाच्याही वरचढ भासतो.
सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर आणि हरिश्चंद्रगड : भाग 1
बऱ्याच वर्षांपासून सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर पहावयाचे मनात होते. श्री.वल्ली यांचा लेख आल्यावर तर इच्छा अजूनच प्रबळ झाली होती. पण योग येत नव्हता. गेल्या बुधवारी मात्र हा योग जुळून आला. आमचे पारिवारिक मित्र सौ.व श्री. मुजावर यांच्यासोबत त्यांचीच गाडी घेऊन गोंदेश्वर आणि हरिश्चंद्र गड पहायचे ठरले.
लंडनमधील संग्रहालये (भाग १) - कुठे रहावे ?
नमस्कार मित्रहो, 'लंडनमधील संग्रहालये' असे शीर्षक जरी इथे दिलेले असले, तरी मला अजून लंडनला जायचे आहे. येत्या मार्च मधे आठ-दहा दिवस तिथे राहून बघितलेल्या संग्रहालयांबद्दल लिहावे, अशी इच्छा आहे. लंडनला प्रथमच जाणार असल्याने तिथली काहीच माहिती नाही. airbnb खोली घेऊन उभयतांनी मुक्काम करावा, असा बेत आहे.
जीवधन - वानरलिंगी रॅपलिंगचा थरार
जीवधन !!! ऐन घाटमाथ्यावरचा उभ्या बेलाग कडय़ावरील दुर्ग. सहय़ाद्रीचा भेदक भूगोल, सातवाहनांच्या पाऊलखुणा आणि प्राचीन नाणेघाटाची सोबत या साऱ्यांनीच हा गड भारलेला आहे. दोन वर्षांपुर्वी, सप्टेंबरच्या शेवटाला कोसळधारांच्या संगतीने दाट धुक्याच्या कोंदणातून "जीव" अक्षरक्ष: मुठीत धरून "जीवधन" फत्ते केला होता.
पाऊस: २
ग्रीष्म भाजून काढत होता, काळ्याभोर मातीवर पडलेल्या भेगा जशा काही तृषार्त झाल्या होत्या, पिवळेजर्द वाळलेले गवत नव्या हिरवाईची आतुरतेने वाट पाहात होते, काळाकभिन्न राकट सह्याद्री अंगावर जलधारा झेलण्यासाठी जणू व्याकुळ झाला होता, अल्लड, अवखळ नद्या नव्या प्रवाहांना सामावून घेण्यासाठी आतुर झाल्या होत्या.
हिमालयाच्या कुशीत - चोप्ता- चन्द्रशिला ट्रेक
"अबे चल ना बे, काही नाही होत... मस्त मजा करू" बस एवढ्याच खात्रीलायक आणि दमदार वाक्यानी राहुल नी मला पटवलं. तसं तर निखिल ने सुद्धा आधी विचारलं होतं की आपण ट्रेक ला जायचं का, पण पुण्यात राहून ट्रेक म्हणजे सह्याद्री आणि त्यातही सिंहगड ! पण या वेळी काहीतरी वेगळं शिजत होतं, ट्रेकिंग ला जायचं, ते पण हिमालयात !
आंबोली
सह्याद्रीतील पावसाळा हा सह्याद्रीला जणू काही स्वर्गाचंच रुपडं बहाल करतो. हिरवे गालीचे आणि फेसाळणाऱ्या जलप्रपातांच्या आडून, धुक्याच्या गच्च आच्छादनाखाली लपून सह्याद्री भटक्यांना खुणावू लागला की मग त्याच्या भेटीला निघण्यावाचून दुसरा पर्याय नसतो.
स्वप्नातले गाव !!!
सप्टेंबरची सकाळ, शहर कॅलगरी. रात्री पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण एकदम कुंद-धुकट होते. कोंबडं झाकलं तरी उगवायचं काही राहत नाही अशी म्हण आहे पण कॅनडात हिवाळा असला तर कोंबडं झाकायचीही गरज भासत नाही. सप्टेंबर मध्ये मात्र हे अपेक्षित नव्हते. धुक्यातून वाट काढत बस शहरातून बाहेर पडली तरीसुद्धा धुक्याचा वेढा काही फुटला नाही.
पुणे पंढरपूर पुणे सायकल राईड ३ आणि ४ जुन २०२३...एक विलक्षण अनुभव (परतीचा प्रवास)
Indo Atheletic Society तर्फे यावेळी पंढरपूर राईड ची घोषणा करण्यात आली त्याचवेळेस मी (दोन्ही बाजुचे) आणि बायकोचे (एकेरी) रजिस्ट्रेशन केले आणि निवांत झालो कारण अजुन ३-४ महिने बाकी होते. यंदा उन्हाचा तडाखा जास्त असल्याने एप्रिल आणि मे मध्ये सायकलिंग फार कमी झाले (७०० आणि ६०० किमी) जे इतर महिन्याच्या मानाने निम्मेच होते. तरीही रोज ऑफिसला ये जा सुरूच होते.
वेळणेश्वर
रास्तों पर निगाह रखने वाले, मंज़िल कहाँ देख पाते हैं|
सफर तो ताउम्र हैं, दरमियाँ सुकून के दो-पल कमाने है|
पैस भेट
काल जागतिक मातृदिन होता. “जो जे वांछील ,तो ते लाहो||प्राणिजात ||” असे समस्त विश्वासाठी पसायदान जिथे मागून साऱ्या विश्वाची ‘माऊली’ झालेल्या ज्ञानेश्वरांच्या पैस या खांबाला भेट दिली.उणापुरा तीन फुट कातळ खांब ,जरासा एकटाच!
- ‹ previous
- 4 of 110
- next ›