दिवाळी अंक २०१५

राशिभविष्य

रामदास's picture
रामदास in दिवाळी अंक
12 Nov 2015 - 7:36 pm

या वर्षी मिपाच्या दिवाळी अंकात काही नवी भर घालावी असा विचार बरेच दिवस करत होतो.जे इतर दिवाळी अंकात नसेल असे ते मिपाच्या दिवाळी अंकात असावे असे नेहेमी वाटते. हाच विचार पुढे नेत या निष्कर्षावर पोहचलो की दृकश्राव्य स्वरुपात जर काही करता आले तर ते करावे. एका संध्याकाळी किसनरावांचा फोन आला " काका,अरुण म्हात्र्यांच्या काही कविता ध्वनीमुद्रीत करून द्याला का ? " मी अरुणला विचारलं त्यानी पण होकार दिला. चिन्मय मांडलेकरच्या मुलाखतीची तयारी केली .

ऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे होस्टेज रेस्क्यू

मोदक's picture
मोदक in दिवाळी अंक
5 Nov 2015 - 10:56 pm

.
.

*******************************************************************

ही कथा आहे अपहरण झालेल्या एका विमानाची..
दोनशे छप्पन्न प्रवाशांची..
बारा विमान कर्मचार्‍यांची..
दहा दहशतवाद्यांची..
दोनशे ऐंशी इस्रायली जवानांची..
हजारो युगांडन सैनीकांची..
जगातल्या प्रत्येक देशाची, त्यांच्या पंतप्रधानांची, त्यांच्या प्रजेची..

तू नि मी

इति'श्री''s picture
इति'श्री' in दिवाळी अंक
2 Nov 2015 - 12:29 pm

.
.
तू समईतील मंद ज्योत, मी
सभोवतीचा फडफड वारा
अविरत तू तेजस्वी तेवता
श्रान्त उभा मी मिणमिणणारा

बाभळीतला काटा मी अन
काट्यातील तू ग़ुल गोजिरा
वळवळतो मी सुरवंटासम
पतंग दंग तू भिरभिरणारा

नवी पालवी तू वासंतिक
सुकून अंति मी ओघळणारा
धूर कोंडता मी वणव्याचा
तू गंध मृदेचा दरवळणारा

प्रत्यक्षात आलेले स्वप्न!!

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in दिवाळी अंक
1 Nov 2015 - 8:38 pm

.
.
गेल्या वर्षी १५ किंवा १६ फेब्रुवारीला वर्धनचा फोन आला. आवाजात अधीरता ओसंडून जात होती. ”आत्या, स्काईपवर ये ना. तुला एक न्यूज द्यायचीय.” गेला महिनाभर नेटचा घोळ चालू होता. रस्त्याचे काम सुरू होते नि एम.टी.एन.एल.च्या वायर्स उघड्या झाल्याने वाय फाय बंद. स्मार्टफोनही नव्हता. त्यामुळे आता स्काईपवर येणे शक्य नाही असे त्याला सांगितल्यावर तो हिरमुसलाच.

मिपाकरांची मनकी बात अर्थात मिपाकर फर्माईश.

नाखु's picture
नाखु in दिवाळी अंक
31 Oct 2015 - 11:12 am

.
.
फार पूर्वी रेडिओ सिलोन 'बिनाका गीतमाला' हा एक लोकप्रिय कार्यक्रम सादर करीत असे. त्यामध्ये लोकांच्या पसंतीची गाणी त्यांना मिळालेल्या गुणपसंतीने क्रमवार वाजवीत असत आणि त्यात एक गाणे सरताज गीत म्हणून शेवटी वाजवले जात असे. त्याची वार्षिक मानांकन पद्धतही होतीच.