दिवाळी अंक मुखपृष्ठ

Primary tabs

अभ्या..'s picture
अभ्या.. in दिवाळी अंक
11 Nov 2015 - 9:25 am

cover_2(1)

दिवाळी अंक २०१५संस्कृती

प्रतिक्रिया

गवि's picture

11 Nov 2015 - 9:50 am | गवि

वा.कल्पक मुखपृष्ठ.
अभ्या, भरपूर श्रमलास अापल्या अंकासाठी. अनेक वर्षं हे सातत्य दिसलंय. कौतुकास्पद..

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Nov 2015 - 12:26 pm | बिपिन कार्यकर्ते

अगदीच. _/\_

यशोधरा's picture

11 Nov 2015 - 9:53 am | यशोधरा

सुंदर!

माम्लेदारचा पन्खा's picture

11 Nov 2015 - 9:55 am | माम्लेदारचा पन्खा

सगळी मेहनत फळाला आलेली आहे... बहोत खूब...!!

बाबा योगिराज's picture

11 Nov 2015 - 9:57 am | बाबा योगिराज

आवड्यास ना भौ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2015 - 9:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या, मिपा दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ आवडलं. भुपाळी ते लावणी असा लोकसंस्कृतीचा ठेवा मुखपृष्ठावर अलगद उमटला आहे. खाली कोपर्‍यात प्रकाशमान झालेला एका स्त्रीच्या हातातील दिवा दिवाळीची जाणीव करुन देतो. खुपच सुरेख. हं आता अस्पष्ट प्रतिमा अजून स्पष्ट करता आल्या असत्या तर मुखपृष्ठ अजून खुलले असते असेही कोणाला वाटेल पण मला हे आवडलं. खाली लिहिलेल्या चार ओळी तितक्याच सुंदर. कलाकार नुसता कलाकार असून चालत नाही तर त्याला नाविन्यतेचाही ध्यास असला पाहिजे, काही सर्जनशीलता असली पाहिजे असं माझं मत आहे, अन तुझ्या कारागिरीतून ते नेहमीच दिसलं आहे. अभिनंदन आभार आणि शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे
(अभ्याच्या कारागिरीचा फ्यान)

सतिश गावडे's picture

11 Nov 2015 - 10:00 am | सतिश गावडे

मलाही बरंच काही म्हणायचं होतं मुखपृष्ठाबद्दल. मात्र इतक्या छान शब्दात ते मांडता आलं नसतं. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Nov 2015 - 11:05 am | डॉ सुहास म्हात्रे

+ २

भन्नाट मुखपृष्ठ !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2015 - 10:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपा आणि मिपावरील विविध उपक्रमासाठी सोबत दिवाळी अंकासाठी आम्ही तुम्हाला खुप राबवून घेतो. अभ्या लेका फुटर कधी देणार, हीडर कधी देणार, कव्हर कधी देणार, दिवाळीची आपली व्यक्तिगत अन्य कामं दिवस रात्र चालु असतांनाही मिपासाठीचं आपलं जे योगदान असतं सालं त्याला तोड नाही. असो. मी केलेलं कौतुकही तुम्हाला सहन होत नाही म्हणुन थांबतो. :)

-दिलीप बिरुटे

आतिवास's picture

11 Nov 2015 - 10:00 am | आतिवास

मस्त आहे.
तुमच्या बोटात जादू आहे खरी.
ती बहरत राहो ही शुभेच्छा.

सस्नेह's picture

11 Nov 2015 - 10:02 am | सस्नेह

तुझी चित्रे ट्रॅडिशनलपेक्षा वेगळी असतात.
कलाकारांच्या प्रतिमा आणखी स्पष्ट किंवा वेगळ्या रंगात हव्या असे वाटते.

प्रतिमा स्पष्ट केल्यास एकूणच परिणाम साधला जाणार नाही आणि एक प्रकारचा बटबटीतपणा जाणवेल, जे आहे तेच उत्तम आहे, आणि कलात्मक आहे.

गवि's picture

11 Nov 2015 - 10:53 am | गवि

सहमत.

चौकटराजा's picture

17 Nov 2015 - 4:05 pm | चौकटराजा

कैक वेळी फोटो जसा असतो तसा तंतोतंत पणा आणला तर त्यालाच अनावश्यक महत्व प्राप्त होते अशा वेळॆस हाफ़्टोन सारखे तंत्र वापरून एक पार्श्वभूमीवर टाकून महत्वाचे फोर ग्राउण्डला घ्यावे लागते.

विशाल कुलकर्णी's picture

11 Nov 2015 - 10:06 am | विशाल कुलकर्णी

अप्रतिम कल्पना आहे. मस्त मुखपृष्ठ !

एस's picture

11 Nov 2015 - 10:11 am | एस

छान मुखपृष्ठ.

जव्हेरगंज's picture

11 Nov 2015 - 10:15 am | जव्हेरगंज

हे मुखपृष्ठ विशेष आवडले!

तुमच्या प्रतिभेला सलाम!!!

मुक्त विहारि's picture

11 Nov 2015 - 10:45 am | मुक्त विहारि

भुपाळी ते लावणी, सगळेच प्रिय.

भूपाळी ऐकता ऐकता पा़.कृ.तील पदार्थ होतात आणि काथ्याकूट आणि जनातले मनातले वाचता वाचता दिवस कधी संपतो, ते पण समजत नाही.

मिपाकरां बरोबर, "तुझी घागर नळाला लाव" अशा लावण्यांचा आस्वाद, आपल्या आपल्या आवडत्या पेयासमवेत, घेता घेता, कट्टे साजरे होतात

मस्त मूखपृष्ठ.

(स्वगत ===> ये अभ्या.., के साथ एक कट्टा मनाना पडॅगा)

रातराणी's picture

11 Nov 2015 - 10:47 am | रातराणी

मस्त!

माम्लेदारचा पन्खा's picture

11 Nov 2015 - 11:08 am | माम्लेदारचा पन्खा


(स्वगत ===> ये अभ्या.., के साथ एक कट्टा मनाना पडॅगा)

प्रचेतस's picture

11 Nov 2015 - 11:13 am | प्रचेतस

बेहद्द आवडले.
हाडाचा कलाकार आहेस तू.

सुहास झेले's picture

18 Nov 2015 - 8:34 pm | सुहास झेले

अगदी अगदी.... !!!

किसन शिंदे's picture

11 Nov 2015 - 11:20 am | किसन शिंदे

मुखपृष्ठ आवडलेच पण त्यावरच्या ओळी फार जास्त आवडल्या. वर सरांनी ज्या शब्दात मांडलंय तसं मला लिहीता येणार पण माझ्याही भावना अगदी त्याच.

चित्रगुप्त's picture

11 Nov 2015 - 12:27 pm | चित्रगुप्त

व्वा . मस्त .

बोका-ए-आझम's picture

11 Nov 2015 - 12:27 pm | बोका-ए-आझम

त्यापेक्षा चांगल्या शब्दांत सांगता येणार नाही. पण एकदम मराठी मुखपृष्ठ आहे!

स्वाती दिनेश's picture

11 Nov 2015 - 12:41 pm | स्वाती दिनेश

मुखपृष्ठ फार सुंदर!
प्रा डॉ नी लिहिले आहेच सगळ्यांच्या मनातले!
स्वाती

बहुगुणी's picture

11 Nov 2015 - 12:45 pm | बहुगुणी

अप्रतिम कलाकृती!

प्रामाणिक मत द्यायचं झालं तर मुखपृष्ठ चांगलं आहे. पण ती पणती जर अजून सुंदर दाखवता आली असती . जुनाट , कळपटलेली वाटतीये . आणि ज्यांचे फोटो लावलेत त्यांची परवानगी घेतलीये का . :-)

जव्हेरगंज's picture

11 Nov 2015 - 5:38 pm | जव्हेरगंज

smile

हेमंत लाटकर's picture

11 Nov 2015 - 10:49 pm | हेमंत लाटकर

प्रामाणिक मत द्यायचं झालं तर मुखपृष्ठ चांगलं आहे. पण ?

तुडतुडी, प्रत्येक गाेष्टीत खोड काढू नये. कधी कधी दिल खोलके चांगले म्हणावे!

तुषार काळभोर's picture

11 Nov 2015 - 12:51 pm | तुषार काळभोर

रचना, रंगसंगती, रेखाचित्रे, काव्यपंक्ती सर्वच एकदम झक्कास!

नाव आडनाव's picture

11 Nov 2015 - 2:13 pm | नाव आडनाव

मस्त.

टवाळ कार्टा's picture

11 Nov 2015 - 2:19 pm | टवाळ कार्टा

चायला कित्ती वेळा लय भारी बोलायचे बे तुला :)

तिमा's picture

11 Nov 2015 - 4:06 pm | तिमा

बिरुटे सरांशी सहमत. उत्तम मुखपृष्ठ केले आहे.

मनीषा's picture

11 Nov 2015 - 4:36 pm | मनीषा

दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ अप्रतीम .

संकल्पना, मांडणी आणि रंगसंगती .. सारेच सुरेख !

प्रभाकर पेठकर's picture

11 Nov 2015 - 4:37 pm | प्रभाकर पेठकर

अतिशय सुंदर मुखपृष्ठ. अस्पष्ट प्रतिमा पांढर्‍या रेखाचित्रात आल्या असत्या तर अधिक मजा आली असती. स्त्रीच्या ओंजळीतील प्रकाशमान पणती फार आकर्षक आहे आणि जणू सुचविते आहे, 'ज्ञानाचा दिवा घरोघर लावा'.

असंच पाहिजे होतं आणि तसंच पाहिजे होतं सांगणं सोपं आहे पण नित्यनेमाच्या धबडक्यातून वेळात वेळ काढून लष्कराच्या भाकरी भाजणे सोपे नाही.

सुंदर मुखपृष्ठासाठी शतशः धन्यवाद.

संदीप डांगे's picture

11 Nov 2015 - 4:52 pm | संदीप डांगे

असंच पाहिजे होतं आणि तसंच पाहिजे होतं सांगणं सोपं आहे पण नित्यनेमाच्या धबडक्यातून वेळात वेळ काढून लष्कराच्या भाकरी भाजणे सोपे नाही.

सहमत...

एक एकटा एकटाच's picture

11 Nov 2015 - 5:41 pm | एक एकटा एकटाच

आवडेश

खटपट्या's picture

11 Nov 2015 - 5:57 pm | खटपट्या

खूप सुंदर काम...

मित्रहो's picture

11 Nov 2015 - 6:00 pm | मित्रहो

वॉव अभ्या मस्त मुखपृष्ठ, कल्पक. आवडले.

अनुप ढेरे's picture

11 Nov 2015 - 6:07 pm | अनुप ढेरे

खूप आवडलं मुखपृष्ठ! प्रा.डाँचा प्रतिसाददेखील!

प्रमोद देर्देकर's picture

11 Nov 2015 - 8:28 pm | प्रमोद देर्देकर

अभ्या मुखपृष्ठ आवडलं. लई भारी.

अद्द्या's picture

11 Nov 2015 - 8:54 pm | अद्द्या

अभ्या

भावा लैच भारी . . मस्तच

दिवाकर कुलकर्णी's picture

11 Nov 2015 - 9:41 pm | दिवाकर कुलकर्णी

छान मुखपृष्ठ . पार्श्व भागी असलेल्या अंधुक प्रतिमानी मुखपृष्ठ जास्त खुलतंय.
मुळगावकर,दलालांच्या सौंदर्य वतींच्या भिन्न प्रकृतीच्या सौंदर्याचा आस्वाद घेत दिवाळी
अंक ओरपायचे हा भूतकाळाचा शिरस्ता.सध्याच्या आभासी विश्वात मुखपृष्ठांची लिपीहि नूतन
हवी.मिपाच्या मुखपृष्ठाकडं पाहून अशा लिपीचं अनावरण होऊ लागल्याचं जाणवतंय.
एकूणंच मिपाच्या तरुणाईला, त्यांच्या उत्साहाला,उन्मेशाला हैट्स अॉफ.

हेमंत लाटकर's picture

11 Nov 2015 - 10:43 pm | हेमंत लाटकर

अभ्या, मस्तयै मुखपृष्ठ!

श्रीरंग_जोशी's picture

11 Nov 2015 - 10:50 pm | श्रीरंग_जोशी

मुखपृष्ठाच्या सादरीकरणाच्या मध्यवर्ती कल्पनेचे नाविन्य खूपच भावले.

अभ्या -
एक मिपाकर म्हणून वर्षानुवर्षे तु दिलेल्या एकाहून एक चित्रानुभुतींसाठी मी कायम ऋणी राहील.

अभ्या, मुखपृष्ठ रॉक्स बे. एकच नंबर.

नीलमोहर's picture

11 Nov 2015 - 11:35 pm | नीलमोहर

दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ सुरेख झालंय..
अगोदरचा फटाकेवाला बैनरही भारी होता !!

जुइ's picture

12 Nov 2015 - 3:11 am | जुइ

नावीन्यपूर्ण रचना आवडली!

गणपा's picture

12 Nov 2015 - 3:57 am | गणपा

माझ्यातर्फे तुला एक पार्टी.