प्रति तानाजी, प्रति बाजिप्रभू
सरसेनापती नेताजी पालकर यांना प्रति शिवाजी म्हणत असत हे सर्वांना माहीत आहे परंतू प्रति तानाजी आणि प्रति बाजिप्रभू फारसे कोणाला माहीत नाहीत म्हणून हा खटाटोप!
तानाजी मालूसरे यांनी रात्रीच्या अंधारात कडा चढून जाऊन किल्ले सिंहगड सर केला होता त्याचप्रमाणे कानोजी (का कान्होजी) यांनी किल्ले पन्हाळा सर केला होता. आनंदराव मकाजी आणि कानोजी हे दोघे पन्हाळा सर करावयाला गेले होते. सिद्दी जोहर ला पन्हाळा द्यावा लागला हे शल्य शिवरायांना सारखे सलत होते! त्यामूळे ही मोहीम हाती घेण्यात आली होती.
मिसळपाव
आत्ताच सकाळ आणि म.टा. मधे वाचले की ज्ञानपिठ पारीतोषिक विजेते ९२ वर्षीय विंदा करंदीकर यांचे मुंबईत भाभा इस्पितळात निधन झाले.
"देणार्याने देत जावे-घेणार्याने घेत जावे" असे म्हणणार्या विद्वान साहीत्यिकाने जसे स्वतःच्या लेखणीने भरभरून दिले तसेच स्वतःला ज्ञानपिठ मिळाल्यावर त्या बक्षिसातील रोख रक्कमही जनकार्यासाठी परत केली होती हे आठवले...
विंदांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली.