संतू..
"आत्त्या.. मी काय कराय णाई..! भांडी आपोआप खाली पडल्यात.." हे असलं बोलणं म्हणजे नक्कीच संतू. कराय णाई, बगाय णाई, दिसाय णाई.. अशी क्रियापदांची धिरडी हा संतूच करू जाणे..
संतू!! खरं नाव चंद्रकांत ढवणे(ढवने). याची मोठी बहीण माझ्या मामाकडे कामाला होती. मामाकडेच लहानपणापासून राहिलेली तिथेच वाढलेली. आमचं बिर्हाड जेव्हा इचलकरंजीहून कोल्हापूरला हललं तेव्हा माझ्या आईच्या मागे लागून हीने याला आमच्यासोबत कोल्हापूरला पाठवून दिला. "तुमच्या घरी कामाल राहुदे.. तिथे काहीतरी शिकेल आणि र्हाईल.." असं म्हणून तिने त्याला आमच्यासोबत पाठवून दिलं.
मिसळपाव