Skip to main content

उत्तर -दक्षीण

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 17/03/2010 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
आपण बरेचदा एखाद्या ठीकाणची माणसे आपल्या नजरेतून जोखत असतो. आपली नजर म्हणजे अगदी आपला दृष्टीकोन...परस्पेक्टीव्ह्.....आणि त्यातूनच मग शेरे मारत असतो. आणि मग आपण आपले ठरवतो अमूक भागातले लोक अमूक प्रकारचे असतात..... उदा :सरदारजी शूर असतात बीहारी माठ असतात दिल्ली कडचे लोक फार बनेल असतात. पंजाबी गोडबोले असतात , मारवाडी लोक चिकट असतात , आगरी लोक विनोदी असतात वगैरे वगैरे आणि त्यावरून मग त्या त्या भाषीक्/भौगोलीक लोकांशी कसे वागायचे ते ठरवतो.

माझी हॉस्पीटल भरती

लेखक मूखदूर्बळ यांनी बुधवार, 17/03/2010 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी मला अचानक भोवळ आली. कदाचित बजेट सेशन लाईव्ह पाहील्यामुळे असेल किंवा राहुल महाजन च स्वयंवर (त्याच स्वयंवर आणि त्याच्या भावी वधूचा स्वयंवध) पाहील्यामूळे असेल. पण आली खरी. सौ ने घाबरून लगेच फॅमीली डॉक्टरला फोन केला आणि सरळ हास्पीटलचा रस्ता धरला. तळमजल्यावरच्या दोन वॉर्डबॉयनी विड्या फुंकून झाल्यावर " पेशंट कोणाय?" अशी पॄच्छा केली. त्यांचीही चुक नाही म्हणा. कारण मी तसा थोडासा (बरचसा इती सौ) गुटगुटीत आहे खरा. सौ ने माझ्याकडे अंगुली निर्देश केल्यावर त्या दोघांनी सरळ 'कबड्डी कबड्डी' करत माझी गचांडी धरली आणि स्ट्रेचरवर मला उताणा केला.

पुस्तकविश्व.कॉम - मराठी वाचकांसाठी नवीन संकेतस्थळ. BETA 1.0

लेखक नीलकांत यांनी मंगळवार, 16/03/2010 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मराठी पुस्तकांच्या चाहत्यांसाठी आपल्याला आवडलेल्या पुस्तकांवर चर्चा करण्यासाठी, आपल्याला आवडलेल्या पुस्तकांवर परिक्षण लिहीण्यासाठी आणि आपल्यासारखी आवड निवड असलेल्या लोकांशी मैत्री करण्यासाठी अनेक नवीन सुविधा घेऊन नवीन संकेतस्थळ आकार घेत आहे त्याचे नाव आहे पुस्तकविश्व.कॉम ( www.pustakvishwa.com). मराठी पुस्तकांना आणि साहित्यविश्वाच्या घडामोडींना वाहलेले हे संकेतस्थळ अतिशय उत्तम व्हावे यासाठी लोकायत टीम काम करते आहे. पुस्तक परिक्षण, समान आवडी निवडी असलेल्या लोकांशी मैत्री आणि पुस्तक विषयांवर चर्चा आदी या संकेतस्थळाचं स्वरूप असेल.

युलीप बाबत काय करावे?

लेखक सदानंद ठाकूर यांनी मंगळवार, 16/03/2010 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
युलीप बाबत काय करावे? वय वर्षे ३५ पर्यंतचे व्यक्तीने शक्यतो टर्म इंशुरन्स माध्यमातून जिवन विमा घ्यावा व गुंतवणूक म्युच्युअल फंड किंवा अन्य गुंतवणूक पर्यायांमध्ये करावी. ज्यावेळी आपल्या गुंतवणूकीचे मुल्य अपेक्षीत रकमे एवढे होईल, म्हणजेच आपल्या पश्चात वारसाचे सर्व प्रकारच्या आर्थीक गरजा भागण्याएवढे होईल तेव्हा टर्म इंशुरन्सचा हप्ता भरणे बंद करुन सर्व रक्कम गुंतवणूक पर्यायात करावी.

त्यानंतर सगेळ्च थांबले आहे ...

लेखक सुवर्णमयी यांनी मंगळवार, 16/03/2010 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
कशाची पर्वा न करता सूर्य उगवतो आहे, चिमण्या दाणे टिपत आहेत मला वाटत ही शांतता संपेलच आता.. नवा बेड आणलेला दिसतो शेजारी मुलाचे लग्न आहे घरातल्या म्हातार्‍या आजीला भरवणारी बाई..खिडकिशी आहे गरम वारा आत येतो ..उघड्या खिडकीतून .. तशी रेडियोवरची गाणी कुठलीतरी बाबा आदमच्या काळातली ,नाकात गायलेली.. किती आनंदाचे दिवस उरले आहेत कुणास ठाऊक.. ( एक सुंदर तरूणी सलून मधून रस्त्यावर येते) आली वाटत ती.. तिच्या गालावरची बट वारा येतो , बट येते .. (रस्त्यालाही पाने फुटतील असे वाटते अवेळी) तिला पाहून 'आलोच आजी '- म्हणत शेजारचा देखणा तरूण बाहेर पडतो.. मोटरसायकलवर निघतो.. ऐटीत ..

रान...

लेखक विमुक्त यांनी मंगळवार, 16/03/2010 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
"अरं ये अंत्या! कसली धावपळ चाल्लीय इतक्या रातच्याला?" राम्या "अरं, आपला गण्या सकाळी गुरं चरायला घेऊन गेलता रानात... समंधी गुरं आली, पर गण्याचा काय पत्याच न्हाय अजून... आम्ही चार-पाचजण जरा बघून येतो रानात..." अंत्या जांभळी गाव जवळच्या शहरापासून किमान १६ मैल दूर... ३०-४० घरांची वस्ती... पावसाळ्यात पोटापुरता भात पीकतो आणि दुध, तुप, रानातला मध असं काहीतरी शहरात विकून गावकरी तिकट-मिठाची सोय करतात... गुरांना चरायला अख्खं रान आहेच... गावाच्या जवळपास लाकुडतोडी मुळं रान जरा कमी झालयं, पण जरा आत शिरलं की एकदम दाट रान लागतं... रानातुन वाहणारी कुकडी नदी म्हणजे रानाची नस...

आज जरा मूड आहे व वेळ ही..

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 16/03/2010 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, आज जरा मूड ही आहे व वेळ ही.
एकदा मंजुळ आवाजाच्या एक बाई म्हणाल्या, "काहो तुमच्या सोईची रात्री ९ नंतरची वेळ तुम्ही ठेवलित भेटायची पण आम्ही नंतर परत जायचे कसे?"
पुर्वी एकदा एकांनी प्रश्न कांडममधील माझ्या लेखांवर छद्मीपणे लिहून पृच्छा केली होती की जेव्हा तुम्ही अगदी specific प्रश्न विचारलात जसे की, 'माझी पुढची बदली कोठे होइल'? त्यावेळी मात्र नाडी वाचकांने किंवा महर्षींच्या नावाखाली सोईस्कररित्या हे उत्तर देण्याचे टाळले.