Skip to main content

दत्तकविधान-३

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 12/03/2010 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
संस्थेत आमची प्राथमिक मुलाखत झाली. आमचं मूल दत्तक घेण्याचं कारण, त्यामागची मानसिकता, आमची मानसिक-आर्थिक तयारी, दत्तक मुलाची प्रक्रिया, त्यासाठीची कागदपत्रे, सगळी माहिती देण्यात आली. जवळपास दोन तासांचं ते मार्गदर्शन होतं. त्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं - दत्तक मूल मिळण्यास किमान दीड वर्षाचा कालावधी लागतो. दत्तक घेऊ इच्छिणारे पालक "वेटिंग लिस्ट'वर आहेत! दीड वर्षं हा कालावधी आमच्यासाठी अगदीच अनपेक्षित, प्रदीर्घ होता. आमचं दोन मुलांमधल्या अंतराचं नियोजन बोंबललं होतं. म्हणजे मनस्वी साडेचार वर्षांची होईपर्यंत तरी तिला भाऊ मिळणार नव्हता. तोपर्यंत गावभर बोंब करून कुणाला सांगणंही योग्य नव्हतं.

दत्तकविधान-२

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 12/03/2010 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
हर्षदा आणि मी एकत्र भेटून (एकमेकांशी) लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा दुसऱ्याच बैठकीत आपल्या (भावी) अपत्यांविषयी चर्चा केली होती. सुदैवानं तिची आणि माझी आवड त्या बाबतीतही जुळली... एकट्या मुलांचे प्रश्‍न आसपासच्या कुटुंबांत पाहायला मिळत होते. मुलं एकांडी, हेकेखोर होणं, एकाच प्रकारे विचार करण्याची किंवा दुसऱ्यामध्ये न मिसळण्याची प्रवृत्ती निर्माण होणंही नवीन नव्हतं.

दत्तकविधान-१

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 12/03/2010 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
child ``अमक्‍या तमक्‍याचं तिसरं मूलही असंच सातव्या महिन्यात गर्भात गेलं...'' कुणीतरी मला कळवळून सांगत होतं." "अरे, एवढी गंभीर परिस्थिती होती, तर कुणी सांगितलं होतं, नस्ती रिस्क घ्यायला?'' माझी त्यावरची सहजस्फूर्त, पहिली प्रतिक्रिया ही होती.

बतावणी!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 12/03/2010 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
(स्थळ - क्षीरसागर, विष्णूंचा महाल. एका कोचावर गरुड लॅपटॉपवर 'मिपा मिपा' खेळतोय! टीपॉयवर काही आध्यात्मिक ग्रंथ पसरुन ठेवलेत.) (आतल्या खोलीतून) लक्ष्मी : अहो! अहोऽऽ!! लगबगीनं बाहेर येत : आँ..कुठे कडमडले हे आता? (गरुडाकडे पहात) : ए चोच्या, कुठैत रे हे? अं...आँ....कोण कुठे? अरे अं आँ काय? हे कुठे गेलेत आत्ता सकाळी सकाळी विचारतेय मी? हां हां ते होय, ते मगाशीच बाहेर पडले! जाताना काही सांगितलं नाही पण 'मानससरोवर' असं काहीतरी पुटपुटत होते! मानससरोवर?? इतक्या लांब आणि तुला न घेता कसे गेले? मला काय माहीत?

रेवती संपादकपदी विराजमान..

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 11/03/2010 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, कळवण्यास आनंद वाटतो की आपल्याच एक मिपाकर सभासद आणि हितचिंतक सौ रेवती यांना मिपाचे संपादक बहाल करण्याचे आम्ही ठरवले आहे व तसे ते केले आहे.. मिपावरील इतर संपादकांप्रमाणेच रेवती यादेखील आपली संपादकीय जिम्मेदारी व्यवस्थित सांभाळतील असा आम्हाला विश्वास आहे. अर्थात, आमच्या एखाद्-दोन देवगडी शेलक्या शिव्याकडे त्यांनी इतर संपादकांप्रमाणेच दुर्लक्ष करावे, इतकीच लिबर्टी आम्हाला मिपाचे मालक म्हणून हवी आहे.

दीऊ - पावसाळ्यातील भटकन्ती

लेखक Manish Mohile यांनी गुरुवार, 11/03/2010 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
२००९ चा ऑगस्ट महिना. आम्हाला रक्षाबन्धन, स्वातन्त्र्यदिन व त्याला लागून रविवार अशा लागोपाठ तीन सुट्ट्यान्चा दुग्धशर्करा योग जमून आला होता. त्याचा फायदा घेऊन आम्ही दीऊ ला जायचे ठरवले. अहमहदाबादपासून दीऊ साधारण ५०० कि.मी. आहे. अहमदाबाद-भावनगर-उना-दीऊ असा साधारण मार्ग आहे. १४ तारखेला सकाळी पाच वाजता आम्ही तीन कुटुम्बे निघालो. स्वतःजवळ वाहन असल्यामुळे बस, ट्रेन पकडण्याची कुठचीही गडबड नव्हती. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे उन्हाचा तडाखा कुठेही जाणवत नव्हता. गाणी गात, ऐकत, गप्पागोष्टी करत , मध्ये दोन ठिकाणी चहा व नाश्त्यासाठी थाम्बून दुपारी साधारण दोन अडीच च्या सुमारास आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो.

स्वप्ने

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी गुरुवार, 11/03/2010 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
त्या रात्री स्वप्नांच्या राज्यातली एक नदी तिच्या डोळ्यात उतरली होती... ती डोळ्यातुन स्वप्नं सांडत होती... अन ती स्वप्ने वेचायचा मी निष्फळ प्रयत्न करत होतो... माझी स्वप्ने , तिची स्वप्ने, आमची स्वप्ने ज्या डोळ्यांत मी सजवली होती.. त्याच डोळ्यांतुन ती आज कितीतरी स्वप्ने सांडत होती... अगणित... निघून जाताना तिच्या डोळ्यातले एक स्वप्न माझ्या तळहातावर विसावले होते, अन तळहातावरल्या आसवामध्ये मात्र मला फक्त माझच प्रतिबिंब दिसत होते..

मुंबई - तिरुपती - चेन्नई - मुंबई

लेखक इंटरनेटस्नेही यांनी गुरुवार, 11/03/2010 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
या (2010) वर्षीच्या मे महिन्याच्या उत्तरार्धात ४-6 दिवसांचा मुंबई - तिरुपती - चेन्नई - मुंबई असा धार्मिक प्रवास योजिला आहे. रेल्वेचे confirm आरक्षण झालेले आहे, मात्र अजून राहण्याच्या व फिरण्याच्या ठिकाणांबद्दल काही संशोधन केलेले नाही. सन्माननीय मिपाकरांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी, तिरुपती, चेन्नई येथे प्रवास करत असतानाच्या घ्यावयाच्या काळजी बद्दल माहिती दयावी. अजून एक गोष्ट अशी की, जातानाचा प्रवास जरी ६ जणांना जरी समूहाने करायचा असला तरी वैयक्तिक कारणांमुळे माझा येतानाचा प्रवास एकट्यानेच आहे.

'law and order' या विषयवरील आपले आवडते चित्रपट...

लेखक इंटरनेटस्नेही यांनी गुरुवार, 11/03/2010 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, नुकतेच Law Abiding Citizen (2009 ) आणि Presumed Innocent (1990) हे दोन चित्रपट पाहण्यात आले, दोन्ही चित्रपट सर्वच बाबतीत उत्तम आहेत. नकीच पाहावेत असे आहेत. अशा प्रकारच्या अजून काही चित्रपटांची नावे माहीत असल्यास ती येथे माहीत करून द्यावीत, अशी सर्व माननीय मिपाकरांना नम्र विनंती. त्याच बरोबर सदर चित्रपट कृष्णधवल आहे की रंगीत याचीही माहिती दयावी. -- आपला नम्र, इंटनेटप्रेमी.