सांगू काय, सांगू काय?
( "एका माणसाची दाढी केवढी लांब सांगू काय ...." या एका बालगीताच्या चालीवर खालील विडंबनात्मक कवीता वाचावी. वरील बालगीत फाउंटेन कंपनीच्या च्या एका बालगीतांच्या व्हि. सी. डी. मध्ये आहे. ते 'यु ट्युब' वर शोधले तरी मिळू शकेल. दैनंदिन जीवनातील, राजकारणातील विविध ठिकाणी विरोधाभास दिसतो, त्यावर उपहासात्मक कविता मी लिहीली आहे.)
एका मॉडेलची वस्त्रे केवढी छोटी, सांगू काय ?
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
एवढी छोटी, एवढी छोटी की,
रॅंपवर चालतांना गळून जाय....
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
काव्यरस
प्रेमात तुझ्या...संपलो मी...!!
प्रेमात तुझ्या गुंतलो मी
माझाच नाही उरलो मी
प्रेमाच्या खेळात जिंकलो मी
हृदयात तुझ्या व्यापून उरलो मी.....
भेटलीस तेव्हा हरखलो मी
हसलीस तेव्हा हर्षलो मी
रुसलीस तेव्हा हुरहुरलो मी
निघालीस तेव्हा हिरमुसलो मी.....
तू दूर होतीस तेव्हा, तुझ्या हृदयात दिसलो मी
परत कधी आलीच नाहीस तेव्हा, माझ्याच अश्रूंमध्ये विरघळून संपलो मी
काव्यरस
काळ्या पैशाला करमाफी दिली तर देशाचा फायदा होईल?
मध्यंतरी एका देशाने तेथील नागरिकांच्या काळ्या पैशावरचा कर रद्द (कर माफी) जाहीर करून त्यांना काळा पैसा बाहेर आणण्याची व तो देशांतर्गत व्यापारात गुंतवण्याची संधी दिल्याचे वाचनात आले.
त्यातून त्यांचे वर्किन्ग कॅपिटल वाढले, देशातील गुंतवणूक वाढली, मंदीच्या काळात परिस्थिती सावरायला मदत झाली आणि रोजगारनिर्मिती झाली.
असा उपाय आपल्या भारतात केला तर???
त्याचे काय फायदे अगर तोटे असतील? अशा मार्गाने का होईना, काळा पैसा योग्य मार्गाने बाजारात येईल? त्यात धोका काय?
आपले काय मत?
-- अरुंधती
आयपीएल-पुणे संघ-नाव सुचवा
कालच सहारा ग्रुपने आयपीएल -४ हंगामापासून "पुणे " ह्या शहराची टिम विकत घेतली आहे.
ती देखील तब्बल १७०० कोटी रुपयांना.
तर इतर संघांप्रमाणेच ह्या संघाला देखील काहितरी छानसे नाव असायला पाहिजे.
मला सुचलेली काहि नावे अशी
१. मराठा वॅरिअर्स
२. पुणे पेशवाज
३. सह्याद्री मराठाज
४. महाराष्ट्रा फायटर्स
मंडळी तुम्हाला देखिल कोणकोणती नावे सुचली आहेत?
रस्ता ओलांडता
रस्ता ओलांडता
आठवते चतुर्थीला गणपतीच्या देवळात
आईचा हात धरून दर्शन घेताना
आठवते अजून तो भरगर्दीतला रस्ता
बाबांचा हात धरून ओलांडताना
आठवतं अंधुकसं पहिल्यांदा जेव्हा
आईनं शाळेत सोडलं होतं
आठवतं जेव्हा, माझ्या हट्टाखातर
बाबांनी खांद्यावर घेतलं होतं
देवळात असो वा रस्ता ओलांडता
किती सुरक्षित आहोत वाटायचे
खांद्यावर बसून बाबांच्या मला
आपण उंच झालो असे भासायचे
पुढे वयाने मोठा, देहाने उंच झालो
शाळा- कोलेजात जाऊन सुशिक्षित झालो
अन रस्ता पार करता करता जाणवले
आपण एकटेच फक्त आता पुढे आलो
आई बाबा जसे होते तिथेच राहिले
रस्त्याच्या त्या दुसरया बाजूला
मधेच
गांधी व मल्ल्या
गांधी व मल्ल्या ह्याची बरोबरी होउ शकते का? 8|
तात्या तुमच्या राज्यात हे काय चाललय? /:)
क्रोधित (चुचु)
मिसळपाव