"तुरीच्या दाण्यांची कचोरी" ही विदर्भातील पारंपरिक आणि चविष्ट नाश्त्याची रेसिपी आहे. हिवाळ्यात तुरीच्या शेंगांपासून काढलेले हिरवे दाणे वापरून बनवली जाणारी ही कचोरी कुरकुरीत आणि मसालेदार असते. ती चहा किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासोबत उत्तम लागते.
दारात ८ फूट तुरीचे एक झाड आलंय,ते तुरींच्या शेंगांनी खुप लगडलेले आणि वाकलेलं आहे.एक तोडी केली तेव्हा आज कचोरी केली.पुढच्या तोडीला आमटी करणार आहे.
आवश्यक साहित्य (भरणासाठी):
तुरीचे हिरवे दाणे (सोललेले): १ वाटी +१/२ वाटी मटार
ओले खोबर्याचे तुकडे: १ वाटी (बारीक कुट)
हिरव्या मिरच्या,आलं: २-३ (बारीक चिरलेल्या)
धनेपूड-३ टीस्पून
जिरे+बडीशेप पूड : १ टीस्पून
हळद: १/२ टीस्पून
लाल तिखट: १ टीस्पून (चवीनुसार)
मीठ: चवीनुसार
कोथिंबीर+कसूरी मेथी : ३ टीस्पून (बारीक चिरलेली)
तेल: १ टेबलस्पून (भरण परतण्यासाठी)
आवश्यक साहित्य
मैदा: २ वाट्या
तूप किंवा तेल: ४ टेबलस्पून (मळण्यासाठी)
मीठ: १ चिमूट
गरम पाणी: आवश्यकतेनुसार (मळण्यासाठी)
कृती-
: तुरीचे दाणे +मटार दाणे स्वच्छ धुवून घ्या.कुकरमध्ये २ शिट्टींत वाफवून घ्या.वाफवून झाल्यावर मिक्सरमधून मध्यम आकारासाठी फिरवून घ्यायचे.
एका कढईत १ टेबलस्पून तेल गरम करा. त्यात जिरे आणि हिरव्या मिरच्या घालून परतवा. नंतर कुटलेले खोबर्याचे तुकडे, धने पावडर, हळद, लाल तिखट ,जिरे+बडीशेप पूड आणि मीठ घालून २-३ मिनिटे परतवा. उकडलेले तुरीचे दाणे+मटार दाणे घालून ५-७ मिनिटे मंद आचेवर शिजवावे, जेणेकरून दाणे मऊ होतात पण फुटत नाहीत. शेवटी चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण थंड होऊ द्या. हे सारण तयार आहे.
पारीचे कणीक :
एका भांड्यात मैदा, मीठ आणि तूप घालून चांगले मळा. हळूहळू गरम पाणी घालत मऊ आणि लवचिक डोघ तयार करा (खस्ता डोघासाठी तूप चांगले मिसळा). डोघाला १० मिनिटे झाकण लावून बाजूला ठेवा.
कचोरी भरून आकार द्या: डोघाची लहान-लहान गोळ्या करा . प्रत्येक गोळी चपट्या करून भरणाचा थोडा भाग भरून बंद करा. हाताने हलकेच चपटे करा किंवा लाटा जेणेकरून भरण बाहेर येऊ नये. मध्यभागी थोडे जाड ठेवा.
या कचोऱ्यांना वरतून तेल लावून #airfryer मध्ये १८०°वर १० मिनिटे ठेवा.नंतर उलटून परत १८०°वर ५ मिनिटे ठेवा.
किंवा
तळा: कचोर्या मंद आचेवर सोनेरी व्हायपर्यंत तळा.
ही कचोरी चटणीसोबत (लिंबू-मिरची चटणी किंवा कोथिंबीर चटणी) सर्व्ह करा.
ती २-३ दिवस टिकते, म्हणून स्टोअर करून ठेवता येते.
पौष्टिकता: तुरीचे दाणे प्रोटीन आणि फायबरने युक्त असल्याने ही कचोरी आरोग्यदायी आहे.

वाचने
3269
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक फोटो झाडाचाही हवा.
हटके पाककृती
वाह
भारीच!
पा. कृ. इतकाच
डोघ...इति कृ.बु.भाऊंचा शब्द
In reply to पा. कृ. इतकाच by अनन्त्_यात्री
लिलवानी कचोरी
गुजराती लिली एटले हिरवी.
In reply to लिलवानी कचोरी by Bhakti
तुरीच्या झाडाला,भुईला वाकल्या
भारीच
छान!!!!
तुरीची आमटी केली बरं का..
In reply to छान!!!! by संजय पाटिल
तिकडे वाचून थांकू म्हणायला
In reply to तुरीची आमटी केली बरं का.. by Bhakti
तुरीकचोरी हा शब्द परफेक्ट जमतोय.
छानच