मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वर्धमान ते महावीर - भाग ३

दशानन ·
लेखनप्रकार
वृद्ध, काही न बोलता, आपली काठी टेकत, निघून, गेला. त्याने डोळे बंद केले व पुन्हा तपामध्ये लीन झाला. समोर खळखळ आवाज करत सरिता वाहत होती, त्याच्या काटावर असलेल्या एका वडाच्या झाडाखाली तप करत असलेला एक साधू उचानक उभा राहिला व याच्याकडे तेथूनच एकटक पहात राहिला, आपल्या शेंडीशी चाळा करत तो म्हणाला “ कोण आहे तरुण? उद्या भेट घ्यावी म्हणतो.” तो आपल्या तपामध्ये मग्न होता, सर्व जगाचे अस्तित्व विसरून. कुठेतरी दोन डोळे त्याच्यावर रोखलेले आहेत, याची त्याला गंधवार्ता देखील नव्हती.

भय इथले संपत नाही (एक)

संजय क्षीरसागर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
http://www.misalpav.com/node/28992 ------------------ कवितेतून नक्की काय म्हणायचंय ते ग्रेस स्वत: कधीही सांगणार नाही. तो फक्त जीवाला सैरभैर करणारी त्याची कविता तुमच्यासमोर ठेवेल आणि प्रत्येक वेळी ती, एखाद्या कॅलिडोस्कोपसारखी असेल. हरेक रसिकाला ती कवितेत, स्वत:चा अर्थ शोधायला भाग पाडेल. आणि ग्रेसच्या कवितेचं वेगळेपण हेच, की समजत नाही म्हणून तुम्ही तिला अंतर देऊ शकणार नाही. एखाद्या विलोभनीय आणि दुष्प्राप्य कामिनीसारखी ती तुम्हाला सतत घेरुन राहील. कारण ग्रेसची मराठी ही तुमची माझी भासली, तरी स्वत:च्या अभिव्यक्तीसाठी त्यानी निर्माण केलेलं ते त्याचं, स्वतंत्र आकाश आहे.

गुड बाय ऑर्कुट

कपिलमुनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज ऑर्कुटचा शेवटचा दिवस! माझे आणि बर्‍याच भारतीय लोकांचे पहिले जालीय सोशल नेट्वर्किंग. भारतात ऑर्कुटमुळे सोशल नेट्वर्किंग रुजला आणि फोफावला .

वाहनविश्व : भाग २ इतिहास

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
आधीचा भाग : वाहनविश्व : भाग १ प्रस्तावना ___________________________________________________________ माणसाच्या उत्त्पत्तीपासुनचं प्रवास हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. दोन पायावर चालणार्या, शिकारीमागे धावणार्या, कच्चं मासं, कंदमुळं खाणार्या माणसाला चाकाचा आणि आगीचा शोध लागला आणि आख्खं जगं झपाट्यानी बदलु लागलं. चाकं, चाकांचे हळुहळु विकसित झालेले उपप्रकार (गिअर्स, पुली, कॅम & फॉलोवर्स ई.ई.) आणि त्यापासुन विकसित झालेल्या वेगवेळ्या गतींचा वापर करुन माणसाच्या जगण्यामधे अमुलाग्र बदल होउ लागले.

Lemon Zest cookies (लिंबाच्या सालीची बिस्किटे)

काव्यान्जलि ·
साहित्य : अमूल बटर (१०० ग्रॅम),साखर (१०० ग्रॅम), मैदा (२०० ग्रॅम), ताज्या लिंबाची साल ,लिंबाचा रस,बेकिंग पावडर, १ अंड. कृती : बटर आणि साखर एकत्र फेटून घ्या. त्यात अंड मिक्स करून फेटून घ्या. नंतर हळू-हळू मैदा घालून फेटून घ्या. या मिश्रणात ताज्या लिंबाची साल ,लिंबाचा रस,बेकिंग पावडर घालून एकत्र करून घ्या. हे मिश्रण ४०-४५ मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा. त्यानंतर एका बेकिंग ट्रे ला तूप लाऊन त्यात हे मिश्रण पसरून घ्या . प्री हिट ओव्हन मध्ये १८० डिग्री ला १५ मिनिटे भाजून घ्या.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ८

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अटलांटीक मधून उत्तर अमेरीकेच्या किनार्‍याने पॅसिफीक महासागर गाठणारा नॉर्थवेस्ट पॅसेज शोधण्याच्या बरोबरच अटलांटीकमधून पूर्वेच्या मार्गाने रशियाच्या उत्तर किनार्‍याजवळून जाणारा नॉर्थईस्ट पॅसेज शोधण्याचे प्रयत्नही १५२५ पासून सुरु होते. इंग्लिश, डच, नॉर्वेजियन आणि मुख्यतः रशियन दर्यावर्दींचा यात सहभाग होता. २२ जून १८७८ मध्ये फिनीश-स्वीडीश दर्यावर्दी अ‍ॅडॉल्फ नॉर्डेन्स्कीओल्ड याने वेगा या जहाजातून स्वीडनमधील कार्ल्सस्क्रोना बंदर सोडलं. रशियाच्या उत्तर किनार्‍याने बर्फाचा मुकाबला करत जात असताना सप्टेंबरच्या सुरवातीला बेरींग सामुद्रधुनीच्या पश्चिमेला त्याचं जहाज बर्फात अडकलं.

#मोदीइनअमेरीका

विकास ·
लेखनविषय:
Modi in America सा रम्या नगरी महान्सनृपतिः सामन्तचक्रं च तत् । पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः ॥ उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते बन्दिनस्ताः कथाः ....

अस्तित्व नसलेला माणूस (दिर्घकथा) भाग - २

दशानन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
“ह्म्म्म, सूर्यवंशीसाहेब, त्याचा कबुलीजबाब तुम्ही जो नोंदवून घेत होता. तो आहे की मागवावा लागेल तुमच्या ऑफिसमधून? “ असे म्हणत डॉ. प्रमोद यांनी पुन्हा ती फाईल हातात घेतली. डॉ. अनंत यांनी आपला टेबलाच्या डाव्या खणातून अजून एक फाईल काढली व त्यातील ४-५ पेपर काढत ते डॉ. प्रमोद यांच्या हातात देत म्हणाले “हा त्याचा कबुलीजबाब! म्हणजे त्यांने स्वत: सांगितलेला... कच्चा मसुदा” डॉ. प्रमोद यांनी तो कबुलीजबाब वाचायला सुरवात केली...

AN ODE TO मिसळपाव ! प्रथम पुष्प

मारवा ·
लेखनविषय:
काव्यरस
मिसळप्रेमींनो !मनोगतींनो ! उपक्रमींनो ! वातानुकुलीत अक्षरींनो ! सर्वसंस्थळसंचारी आंतरजालीय फ़ुलपाखरांनो ! साक्षेपी सात्विक सेन्सॉरी कर्तरीकर्म कुशल संपादकांनो ! किंचीत पक्षपाती आयडीवलयांकीत-स्तिमीत संपादकांनो ! खरया खुरया खोट्या नाट्या भल्या बुरया आयडींनो त्यांच्या डुआयडींनो ! त्यामागील दुर्देवी देवराई निवासींनो ! माहीती जमवुन जमवुन घोळुन रंगवुन माहीतीच्या महामार्गावर माहीतीचा उच्छाद मांडणारया माहीतगारांनो ! स्व-रचित ललित मुग्ध “पुल”कीत गोड गोड लयीत “ललित” लिहत लिहत लेखणी लाल करणारया ललित लेखकांनो!