लेखकफुंटीयांनी गुरुवार, 16/10/2014 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
मतदान झाल ,निकाल लागला ,आलं सरकार
आलं सरकार , तयाला माझा नमस्कार
अग, ग ..... विंचू चावला
देवा रे देवा ..... विंचू चावला
आता काय मी करू ..... विंचू चावला
अग, ग ..... विंचू चावला
आर आर आबा , बा .....
लेखकनर्मदेतला गोटायांनी गुरुवार, 16/10/2014 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
बाकी काही म्हणा आज एका बातमीने लक्ष वेधून घेतलं...
त्याचा नेमका अर्थ मात्र कळला नाही.
यात असं म्हटलंय... मूल जन्माला घालणे लांबणीवर टाकून जैविक घड्याळाकडे दुर्लक्ष करत करिअरवर लक्ष केंद्रित करणे या महिलांना शक्य होणार आहे. आणि यासाठी अॅपल फेसबुक या कंपन्यांनी आर्थिक मदत देऊ केली आहे. पण हे असं लांबणीवर कसं काय टाकता येइल आणि याचा फायदा काय, याचा तोटा काय. मुलाच्या वडिलांचे काय इ.
लेखकविटेकरयांनी गुरुवार, 16/10/2014 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
विदर्भाचे जौ द्या.. तो तर एक अर्वाचीन प्रश्न आहे आणि मिपावरील चर्चा पाहल्यास नवराज्यकर्त्याना हा प्रश सोडविण्याच्या अनेक टिप्स मिळतील. त्यामुळे हा प्रश्न आता चुटकी सरशी सुटेल असा विश्वास वाटतो.
पण त्यानिमित्ताने " पुणे " नावाचे एक स्वतंत्र "राष्ट्र" असावे असा प्रस्ताव मांडतो. वास्तविक हा प्रस्ताव तसा फार प्राचीन ! किती प्राचीन ते वल्लीशेट ना विचारा , किमान " वाकाट्क" काळ तरी असेल , पण मुद्दा तो नाही , स्वतंत्र पुण्याचा आहे !
- पुणे आणि उर्वरित महाराष्ट्र यातील सांस्कृतिक आणि बौद्धिक दरी प्रचंड खोल आणि रुंद ही आहे.
लेखकअरुण मनोहरयांनी गुरुवार, 16/10/2014 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
रत्नांकीरीच्या जंगलात महाराज सिंहनासिकेतू येरझा-या घालीत होते. इथे ते सुरक्षीत होते. पण क्रूरकर्मा चकलासूर राजधानीत निरपराध लोकांना मारून टाकीत असतांना आपल्याला एकटे लपून रहावे लागत आहे! कोणाची मदत मिळेल?
महाराजांनी अमात्य सौव्रतांना विचारले- “ आपणाला कोण मदत देईल? “
अमात्य उत्तरले- “महाराज, जनता म्हणतेय, पश्चिमेच्या सामकोकेंद्र राजांकडे मदत मागावी. त्यांच्याकडे सामर्थ्यवान वायुयाने आहेत. ते चकलासुराला सहज पराजित करू शकतील.”
“जनता मूर्ख आहे अमात्य! चकलासूर निदान जनतेला मृत्यू तरी देत आहे. सामकोकेंद्र वायुयानातून रासायनीक गोळाफ़ेक करून निरपराधांना मरणापेक्षाही भयानक यातना देईल.
लेखकबोका-ए-आझमयांनी गुरुवार, 16/10/2014 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - आॅस्कर ग्रोएनिंग (लेख ४)
माझ्या कामामुळे मी अनेक प्रकारच्या लोकांना भेटलो, अजूनही भेटतो. एक गोष्ट मी अगदी खात्रीलायक रीत्या सांगू शकतो की लोकांविषयी तुमच्या मनात असलेले विचार आणि प्रत्यक्ष तुम्हाला भेटणारा माणूस यांच्यात फार क्वचित काही साधर्म्य असतं. उदाहरणार्थ समजा मी तुम्हाला अशी पार्श्वभूमी दिली की - ह्या माणसाने नाझींची कुप्रसिद्ध मृत्युछावणी आॅशविट्झमध्ये काम केलेलं आहे, लहानपणापासून तो नाझींचा समर्थक होता, युद्ध चालू झाल्यावर तो एस्.एस्.
लेखकशरदयांनी गुरुवार, 16/10/2014 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
हायकू : मराठीत न रुजलेला
एवढी आवडते जपानी हायकू,
तर कशाला केलीत मराठी बायकू ?
महाराष्ट्राबाहेरचे दोन काव्यप्रकार म्हणजे गझल व हायकू. हे काही आपल्या भूमीतील, संस्कृतीतील नव्हेत. पण कलाप्रेमी महाराष्ट्राने जसे कथक, भरतनाट्य बाहेरून आल्यावरही प्रेमाने आपले म्हटले, उत्तर हिंदुस्थानातील शास्त्रीय संगीत आवडीने जोपासले तसे गझलला गळ्यात गोवले. पण हायकू मात्र दुर्लक्षीला गेला. एक श्री. शिरीष पै सोडल्या तर इतरांनी हा प्रकार आवडीने हाताळलाच नाही. असे का झाले ?
मला वाटते याला दोन गोष्टी कारणीभूत असाव्यात. पहिली म्हणजे हायकूची जन्मभूमी जपान. जपानी भाषा आपल्याला पूर्णपणे अपरिचित.
लेखकसतिश गावडेयांनी गुरुवार, 16/10/2014 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी आमचा माणगांव तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यातील बर्यापैकी मोठा तालुका होता. मात्र प्रशासकीय तसेच लोकांच्या सोयीसाठी या तालुक्याचे विभाजन करुन तालुक्याच्या पश्चिम भागाचा वेगळा तळा तालुका बनवण्यात आला. तेव्हा कुणीही मांणगांव तालुका तोडत आहेत असे कधी कानावर पडले नाही.
गेले दोनेक वर्ष रायगड जिल्ह्याचे विभाजन करुन माणगांवपासून दक्षिणेकडील तालुक्यांच्या दक्षिण रायगड जिल्हा बनणार आहे असे कानावर येत आहे. या नविन जिल्ह्याचे मुख्यालय माणगांव असेल असेही ऐकायला येते.
लेखकपाषाणभेदयांनी गुरुवार, 16/10/2014 05:34 या दिवशी प्रकाशित केले.
कोवळीक
आताशा आयुष्यात माझ्या येवून जा
आलास कधीतरी तेव्हा चांगला राहून जा
तुझीच वाट पाहते कधीची
आर्त पाण्यासाठी तगमगलेली
कितीदिवस म्हणते मी ही वाट पहायची
कधी भ्रमही होतात तू पुन्हा आल्याची
फुले तर तर भरपुर निघाली
पण अजूनही आस आहे फुलायची
- पाभे
लेखकआनन्दायांनी गुरुवार, 16/10/2014 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
यावेळेस मिपावर कोणीच निवडणूकींच्या अंदाजाचा धागा काढला नाही. म्हणून आता मी काढत आहे.
(आन्यथा क्लिंटन, श्रीगुरुजी, ऋषिकेश इत्यादी नेहमी धागे काढतातच.
आसो, आपल्या महाराष्ट्रात आज निवडणूका पार पडल्या. यावेळच्या निवडणूका खर्या अर्थाने उत्कंठावर्धक ठरणार आहेत. पंचरगी लढतीतुन कोणाला काय मिळते याचा अंदाज बांधणे कठीण होतेय.
एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष असेल, पण सिंगल लार्जेस्ट पार्टी नसेल असे म्हटले जातेय. चाणक्य वगळता इतर सर्वांनी भाजपा ला १२५-१३० च्या आसपास जागा सांगतल्या आहेत.
व्यक्तिशः मला चाणक्यवर जास्त विश्वास आहे.