कळकट कंदील जीवनावरील महाभाष्य
कंदील कळकट ..जीवनावरील महाभाष्य
कवीवर्य समीरसूर यांच्या या महान कवितेवर लिहावयाचे भाग्य मला लाभले, धन्य, धन्य झालो मी ! ज्यांचे नावच इतके काव्यमय, त्यांचे काव्य महान असणारच. समीरसूर म्हणजे वेळूच्या बनातून वारा वहातो तेव्हा येणारा मधूर आवाज, वाह वाह. वेळू हा शब्द वेणूपासून आला असे म्हटले म्हणजे यमुनाकाठच्या कुंजवनातील बासरीचे मधुर स्वर व त्यावर जीव ओवाळणार्या गोजिर्या गोपी आठवतात.
मिसळपाव
