देणाऱ्याने देत घेणाऱ्याने घेत रहावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे .
देण्याचा आनंद हा घेण्याच्या आनंदापेक्षा खूप मोठा असतो .
२ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर हा आठवडा जगात joy of giving week म्हणून साजरा केला जातो .
भारतात हा आठवडा 'दान उत्सव' या नावाने साजरा केला जातो .
प्रत्येक जण यथाशक्ती सहभाग घेतो ...
देण्याच्या वृत्तीचे अनमोल, दैवी मूल्य आहे. सर्व धर्मग्रंथ ह्या वृत्तीला, कृत्याला अव्वल दर्जा देतात. हा एक मोठ्यातला मोठा संस्कार जोपासला गेला पाहिजे. निसर्गाकडून हीच शिकवण आपल्याला मिळते. ही देण्याची वृत्ती मात्र सहजपणे आढळत नाही. देणं म्हणजे केवळ आर्थिक दान असा गैरसमज नसावा.