रविवार हा सुखाचा.
'अगं ए! जरा मस्त पैकी चहा टाक की एक'
'आधीच सकाळपासून दोन वेळा झाला आहे.' - स्वयंपाकघरातून नको त्या वेळी सत्यकथन.
'पण मला अजून एक हवा आहे.' मी चिवट.
'आंघोळ करा आधी. नाहीतर जेवणही मिळणार नाही.' - स्वयंपाकघर निर्वाणीवर.
निदान रविवार सारख्या साप्ताहिक सुटीच्या दिवशी तरी आंघोळ अनिवार्य नसावी असं माझं प्रांजळ मत आहे. पण अधिक वाद घालून रविवार सारख्या सुट्टीचे सकाळी सकाळीच विसर्जन करावे असे कुठल्याही अनुभवी नवर्याला वाटत नाही. नाईलाजाने उठलो.
मिसळपाव
संजीत रॉय.
डेहराडूनच्या प्रख्यात डून स्कूल मधून शालेय शिक्षण.
दिल्लीच्या सेंट स्टिफन्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन डिग्री.
कॉलेज दरम्यान व नंतर काही वर्षे स्क्वॅश या खेळामध्ये प्राविण्य.
३ वर्षे नॅशनल स्क्वॅश चँपीयन - १९६५, १९६७ व १९७१.
एक यशस्वी, स्वप्नवत करीयर..
अत्यंत उज्ज्वल भवितव्य खुणावत असताना या तरूणाने थोड्याश्या कुतुहलानेच बिहारच्या दुर्गम भागामध्ये दुष्काळी मदतकार्या