पुण्यदेवीची विनवणी
लेखनप्रकार
अनेक शतकी उमर गाठली, नावे मजला ठेवू नका।
मीच विनविते हात जोडूनी, पुण्यावरती जळू नका।।
शिवसूर्यचा दिव्य वारसा शहरवासियो तुम्हा मिळे।
उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका।|
व्हा ज्ञानाचे जोतीबा इथे तुम्ही, शेणमारा हा करू नका ।
कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणू नका।|
सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाने तोडू नका।
इथेच गर्दी, इथेच महागाई, असे शंखच, पोकळ फुंकू नका।|
निव्वळ रस्ते मॉल बिल्डिंगा, म्हणजे शहर मानू नका।
लाख लाख जन माझ्याअंतरी रमले वसले, हे कदापी विसरू नका।|
गावं आपुले करा नामांकित परी, करमणुकीच्या गटारगंगेत मला तुम्ही क्षाळु नका।
मजला देवी म्हणुनी भजू नका, पण दासी म्हनोणही पिटू नका ।|
प्रकाश पेरा अपुल्या भवती, दिवा दिव्याने पेटतसे।
हे ज्याच्या हृदयात ठसे, खरा मिपाकर तोच असे।|
वाचने
2569
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
वा
अरे अय.
असं ओक्साबोक्शी नका रडू हो पुण्यदेवी....
च्यायला! काय हे?