Skip to main content

बरळप्रहरी..

लेखक गवि यांनी बुधवार, 05/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
हातात आहे ग्लास आणि सर्वकाही सत्य आहे बहरत्या या बरळप्रहरी सर्वकाही शक्य आहे फेसाळती शाम-ए-गझल अन बेगडीसा सूर आहे आज सच्ची काहीबाही वाहवाही शक्य आहे अधभरा अन अधरिकामा जीवनाचा जाम आहे याच प्रहरी भाडखाऊ फलसफाही शक्य आहे और जामे-आरजू गर मुठ्ठिमध्ये घट्ट आहे बाकी सारे मिथ्य कहेना या प्रवाही शक्य आहे यकृताच्या गाळणीला कुछ पलांचे काम आहे याचवेळी काव्य काही अर्थवाही शक्य आहे

शब्द

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 05/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या बोलण्यातले शब्द तोंडून बाहेर पडताच गोठून गेले... माझ्या कानात अजून ते गुंजतात अगदी झाडावरल्या ताज्या गुलाबासारखे... मला नकळत माझा त्यांना स्पर्श होतो तू जवळ असतांना तुझा हात हाती असतो तसा

राजा रवी वर्मा, चित्रकला, रणजीत देसाईंची कादंबरी आणि केतन मेहेतांचा रंग रसिया...

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 05/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
सात नोव्हेंबर ला "रंग रसिया" रिलीज होत आहे. मित्रांनो, रणजित देसाईंचे राजा रवी वर्मा पुस्तक वाचलेत का? पूर्ण भारतात "राजा रवि वर्मा" च्या जीवनावरचे ते एकमेव आणि मराठी पुस्तक आहे. त्याचे नंतर इंग्रजीत भाषांतर झालेले आहे. आगामी हिंदी चित्रपट "रंग रसिया" त्यावरच आधारित अाहे. रणदिप हूडा आणि नंदना सेन हे त्यातले कलाकार आहेत. एखाद्या चित्रकाराच्या जीवनावर ची ही प्रथम आणि एकमेव कादंबरी आहे. रवी वर्मा आणि त्याचे जीवन खुप वादग्रस्त होते. त्याचे मामा राज वर्मा याने त्याच्यातला कलाकार लहानपणापासून ओळखला. त्या वेळचा इतिहासाचा कालखंड आणि एकूणच त्यावेळची मातृसत्ताक पद्धती आपल्याला आश्चर्यचकीत करते.

आल्प्सच्या वळणांवर - भाग ७ - आलेच आणि ऱ्होन ग्लेशियर, फुरका-सस्टेन पास आणि परिसर

लेखक मधुरा देशपांडे यांनी बुधवार, 05/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आल्प्सच्या वळणांवर - भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६ इंटरलाकेनला भटकल्या नंतर पावसाने तशी पुढच्या दिवशी विश्रांती घेतली. पण हवामान ढगाळच होते. त्यामुळे त्या दिवशी फारसे काही पाहिले नाही.

आणि यांनी घडविली अमेरिका! .. ३) अँड्र्यू कार्नेगी

लेखक अमित खोजे यांनी बुधवार, 05/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
जॉन डी रॉकफेलर आता अमेरिकेतील सर्वात श्रीमंत माणूस झाला होता. त्याची एकूण संपत्ती १५० मिलिअन डॉलर्स (२२५ बिलिअन डॉलर्स आज) होती. स्टँडर्ड ऑईल ९८% रॉकेल ची एकटी मालक होती. परंतु जगातील सर्व मोठ्या भांडवलदारांना स्पर्धक हे असतातच. आणि भविष्यातील सर्वात मोठ्या स्पर्धकाला रॉकफेलरने स्वतःच जन्माला घातले होते. अँड्र्यू कार्नेगी! ज्याचा हात धरून अँड्र्यूने धंद्यातील धडे गिरवले त्या टॉम स्कॉटची वाताहत केल्याबद्दल अँड्र्यू जॉनला बिलकुल क्षमा करणार नव्हता. पुढे चालू ..

जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ३

लेखक मार्गी यांनी बुधवार, 05/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- २ सर्व वाचकांना धन्यवाद! मदतकार्याचे आकलन ६ ऑक्टोबरची पहाट! श्रीनगरमध्ये सुखद थंडी आहे. आज श्रीनगरमध्ये ईद साजरी होणार आणि इथले सेवा भारतीचे सर्व कार्यकर्ते आपल्या घरी ईद साजरी करतील. एका अर्थाने हा त्यांच्यासाठी सुट्टीचा दिवस आहे. अर्थात् ते दुपारी सेवा भारतीच्या कार्यालयात येऊन परत कामाला लागतील. पण दुपारपर्यंत ते तिकडेच असल्याने आज गावांमध्ये आरोग्य शिबिर होणार नाहीत.

चांदणी

लेखक सुर्या गार्डी यांनी मंगळवार, 04/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच.. चंद्रकोरीच्या मिठीत मिलनाची आस असायचीच... बघेल सारं जग आपल्याकडे याची तमा कशाला बाळगायची... चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच... रोज रात्री चांदणी चोरुन चांदोबाला पहायची... चंदाराजाचं लक्ष्य नाही म्हणून सारखीच रुसायची... तरीही चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच... रुसता रुसता एखादी मधूनच चमकायची अन् चांदोबाचं लक्ष्य स्वतःकडे वेधायची... कारण चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच...
काव्यरस

छगनलालांचे सापळे (भाग ८)

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 04/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग : http://misalpav.com/node/29328 ========================================================================== किरण हा साहेबांचा तिसरा मुलगा.आला तोच मुळी तोंडात पानाचा तोबरा भरून.त्याने स्वतःहून काहीच न विचारल्याने, मी पण जास्त लक्ष न देता, स्वतःला कामात जुंपून घेतले.तो त्याच्या मनाचा राजा तर मी माझ्या मनाचा बादशा.गेला उडत. साधारण पणे १च्या सुमारास साहेबांचा फोन आला.त्यांना रिपोर्ट केला आणि जेवायला बसलो.सुदैवाने माझ्या जेवणाच्या डब्याची जबाबदारी आमच्या एका शेजार्‍याने घेतल्याने, ती चिंता न्हवती.पहिल्या दिवसापासूनच मी एक धोरण ठेवले होते, की

छगनलालांचे सापळे (भाग ६)

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 04/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग : http://misalpav.com/node/25470 हा भाग डोक्यात फार आधीच तयार होता...पण काही कारणांमुळे लिहायला उशीर झाला...दिरंगाई बद्दल क्षमस्व....