एक संघ मैदानातला - भाग ३
सकाळी ग्राउंडवर गेल्यावर समजले की दीप्तीचा खांदा बसवला आहे आणि ४ दिवस विश्रांती नंतर ती प्रँक्टिस करू शकेल. ऐकून बर वाटलं..... पण आमच्या मिशाळ गब्बरला ते पटलं नाही. आम्हीच तिला मोडलंय अस समजून आप्पांनी जे काही लेक्चर द्यायला सुरुवात केली. अखंड पाऊण तास बोलून झाल्यावर बहुतेक ते दमले... शेवटी आम्ही मांडवली करत स्किल प्रँक्टिस घ्या असं सांगितल्यावर ते गप्प बसले.
नियमांच्या यादीत अजून एका नियमाचा समावेश झाला. व्यायाम करताना, स्किल प्रँक्टिस करताना कामाशिवाय बोलायचं नाही.
मिसळपाव