Skip to main content

अडगळ

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 03/05/2016 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
'मोहरा' पिच्चर आणला तवाची गोष्ट. मोकळं मैदान गाठून, शंकराच्या दगडी देवळाच्या बाजूला टेबल मांडून, त्यावर टिवी ठेऊन पिच्चर दाखवायची व्यवस्था केली ती दाद्यानं. हा दाद्या उधळ्या माणूस. एक म्हणता तीन तीन पिच्चर आणणारा. गणपतीची वर्गणी पुरली नाय तर स्वताचे शे-पाचशे घालून हौसमौज करणारा. तर त्या दिवशी त्यानं ग्यांगला सरप्राइज म्हणून एक दोन बीपी ची पण कॅसेटं आणलेली. रात्री ऐश करायची म्हणून गावठी दारुपण त्यानं तयार ठेवली होती. तर अशी सगळी व्यवस्था करुन दाद्या गुटख्याच्या पुड्या फोडत व्हीसीआर वर चित्र आणण्याची खटपट करणाऱ्या पोरांना उगाचच आयबहीनीवरनं शिव्या घालत होता.

'प्लॅटफॉर्म'

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 03/05/2016 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
इसी 'प्लॅटफॉर्म' पे... अमीर देखें, देखे हमने गरीबभी. यहां देखी सुबह सुरजसे पेहले, यहां देखी रात चांदके साथ, यही रुकती थी जिंदगी हर तीन मिनट के बाद. यही दिखते थे लोग अंजाने, कोई घबराए, कोई मुस्कुराते, कोई मेरे जैसे, जाने अंजाने, इसी 'प्लॅटफॉर्म' पे... मस्त नाव आहे नई? मला तर जाम आवडतं, (प्लॅटफॉर्म म्हणजे... रेल्वे प्लॅटफॉर्म बद्दल बोलतोय, इतर ही प्लॅटफॉर्म असतात म्हणा पण मुंबईत राहिलेल्या माणसाला एकच प्लॅटफॉर्म माहीत असतो त्यातलाच मी एक, असो...) त्यावर सगळी मंडळी (वाट बघत) असतात!

एक चक्कर सिक्किमची

लेखक स्वीट टॉकर यांनी मंगळवार, 03/05/2016 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
भारताचा नकाशा पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येईल. सिक्किम असं एकमेव राज्य आहे ज्याची सरहद्द भारताच्या दुसर्‍या एकाच राज्याशी आहे. ओके, ओके! ही क्विझ प्रोग्रॅमसाठी तयारी नव्हे. वीस बावीस वर्षांपूर्वी सिक्किममध्ये पेलिंग आणि वर्सेला गेलो होतो. म्हटलं अनुभव शेअर करावेत. इथून ट्रेननी कलकत्ता, मग रात्रभरच्या ट्रेन प्रवासानंतर सिलिगुडी. तिथून आठ तास बस प्रवास – पेलिंग. वाचूनच दमल्यासारखं होतं खरं पण प्रत्यक्षात तसं नाही. ग्रुपबरोबर गेलं की आपल्यासारखेच बोलघेवडे आणि बोलघेवड्या बरोबर असतात. प्रवास मजेत होतो. नवीन ओळखी. नवीन गप्पा. नवीन अनुभव. सिक्किम अगदी हिरवं कंच्चं! लोक समाधानी. आयुष्याचा वेग धीमा.

(इच्छा अधूरी..)

लेखक नीलमोहर यांनी मंगळवार, 03/05/2016 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
शून्य मनाने बसलो होतो अंधारात आला तो तिकडून! सांगितले खुणावत येतीय भेटाया तुला! किती आसुसलो मी! निव्वळ चखण्यावर न भागणार एकेका घोटा तहानलो मी! आज आस सारी मिटणार दिसली ती नजरेस बनली जी माझी होण्यासाठी! आता रिता झाला गिलास नवा पेग भरून घेण्यासाठी! थांब बे पेताडा मालक गरजला! बिल भरशील? पेग भराया निघाला! सा* गरिबी आड आली क्वार्टरही हाती न लागली! खंबा लावायची इच्छा इच्छा अधुरीच राहिली! बाटली गेली माघारी बेवड्याचा संताप झाला! आणि दारू सोडून बेवडा बार बाहेर निघाला! ___________________ प्रेरणा: __/\__ ** डेडपूल, प्रथम तर इतक्या सुर

ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०५ : बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 03/05/2016 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ !

समन्वय व ताळमेळ

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 02/05/2016 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
एका गावात एक तरुण मुलगा राहतं होता त्याला २ बहिणी होत्या एकुलता एक भाऊ असल्याने २ न हि बहिणी ची भावा वर माया असते.. तिघेही गरिबीत दिवस काढत असतात भावाचे लग्न ठरते ..मुलगी गरीब घरची असते ... लग्ना निमित्त भावास एक नवा शर्ट व प्यांट शिवण्याचे ठरते..व त्या प्रमाणे शिवायला टाकतो नेहमी प्रमाणे शिंपी महाराज आज देतो उद्या देतो असे करत शेवटी कसेतरी ्लग्नाच्या अधल्या दिवशी रात्री ८ वाजता कपड्याचे पार्सल त्या तरुणाला देतो.. घरी आल्यावर बहिणी वाट पाहतं असतातच..व त्या म्हणतात आधी जेवून घे... जेवण गप्पा करत चालले असते ते झाल्यावर बहीण म्हणते बघ तरी कपडे कसे झाले आहेत.. मुलगा शर्ट घालतो तो व्यवस्थित शिवलेल

यथा शास्त्रप्रमाणेनं...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 02/05/2016 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेखनाचा रोख हा धार्मिकविधींमध्ये साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात? हे दाखवून देणे हा आहे. 1)मुंजीतील क्षौर विधी-(न्हाव्याकडून) डोक्याचे केस काढणे. (गोटा करणे) (केंव्हा तरी) घडलेला घटना प्रसंग:- न्हाव्याकडून वस्तरा फिरवून झाल्यावर डोक्यावर काही केस राहिले. पुढे मुंजमुलाची तशीच अंघोळ झाली. नंतर कपडे घालून मुंजमुलगा मांडवात आला. कुणाला तरी राहिलेले केस दिसले. "हे चूक आहे" अशी चर्चा तिथे नातेवाईक/पुरोहित .. इत्यादिंकडून घडली. पुन्हा मुंजमुलास पाटावर बसवून राहिलेले केस न्हाव्याकडून काढण्यात आले.

सायकलीशी जडले नाते ३०: चाकण- माणगांव

लेखक मार्गी यांनी सोमवार, 02/05/2016 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.