Skip to main content

सायकलीशी जडले नाते ३१: श्रीवर्धनमध्ये काय झाले . . .

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 05/05/2016 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

अधांतर

लेखक समीर१२३४५६ यांनी गुरुवार, 05/05/2016 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळची बाजारातील लगबग चालली होती.सर्वजण आपापल्‍या कामात मग्‍न होते. कृष्‍णाही इतर बायकांसोबत आपल्‍या कामाला लागला. आज सर्वजण दुस-या एका वाडीत जाणार होती, भिक्षा मागायला. कृष्‍णा आपला पदर सांभाळून उठतो,आणि लगबगीने आपल्‍या टोळक्‍याकडे पोहोचतो. सर्वजण मिळून नंतर दुस-या वाडीत भिक्षा मागायला जातात. कृष्‍णा आपल्‍या गोड बोलण्‍याने त्‍या समाजात खूपच प्रिय होता, मात्र आपल्‍याला त्‍या समाजात यावे लागल्‍याचे दु:खही त्‍याच्‍या मनात सलत असायचे.कृष्‍णा सर्व लोकांच्‍या टिका सहन करुनही हे काम करत होता. संपूर्ण आयुष्‍य जणू त्‍याने या कामासाठी घालवायचे ठरविले होते.

सैराट : एक दाहक वास्तव.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी गुरुवार, 05/05/2016 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
सैराट चित्रपटाबद्दल खुप लिहिल्या गेलं, बोलल्या गेलं, वाट्सपवर हमरीतुमरीवर येईपर्यंत चर्चा झाल्या. मिपावरही चर्चा रंगली आहेच, ही माझी अजून एक भर. नागराज पोपटरव मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपट प्रदर्शीत झाला आणि प्रदर्शनापूर्वीच सैराट या मराठी चित्रपटाची चर्चा खुप झाली. आणि चित्रपट प्रदर्शनानंतरही सैराट या चित्रपटाची विविध माध्यमातून अधिक उणेची चर्चा अजूनही विविध पैलूंसह सुरुच आहे, असे दिसते. नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री या चित्रपटाची चर्चा खुप झाली, एक वेगळा चित्रपट म्हणुन अनेक प्रसार माध्यमांनी दखल घेतलेली होती .

म्हैसुर - बंदिपुर व्याघ्र प्रकल्प - कुन्नुर

लेखक विनअता पुजारि यांनी गुरुवार, 05/05/2016 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्यात म्हैसुर कुन्नुर आनि बन्दिपुर ला जान्याच थारवत आहे...क्रुपया महिति द्यवि.....

चला बनवुया मट्ण खिमा

लेखक गौतमी यांनी गुरुवार, 05/05/2016 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १. मटण खिमा १/२ किलो २. ४ मोठे कांदे बारीक चिरुन ३. २ मध्यम टॉमाटो बारीक चिरुन ४. आल-लसुण-मिरची-कोथिंबिर पेस्ट (आवडीप्रमाणे) ५. २ तमालपत्र ६. ५-६ मिरी दाणे ७. तेल ८. हळद ९. लाल तिखट १०. गरम मसाला ११. मिट मसाला (मी सुहानाचा वापरला) १२. मीठ १३. बारीक चिरलेली कोथिंबिर चला तर मग करुया सुरुवात. क्रुती: १. प्रथम खिमा थोडी हळ्द आणी आल-लसुन पेस्ट(१/२ चमचा) टाकुन शिजवुन घ्या. (मी छोट्या कुकरमध्ये ५ शिट्यात शिजवुन घेतला.) २. आता खिमा थंड झाला की कढईत तेल घेउन गरम करा. (तेल जरा सढळहस्तेच घ्यायच बरं).यात मिरी दाणे आणि तमालपत्र टाका. आता कांदा परतुन घ्या.

एक संघ मैदानातला - भाग ५

लेखक शि बि आय यांनी गुरुवार, 05/05/2016 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
धाप्प.... योग्याच्या पाठीत अप्पांचा दणकट हात पडला.. " काय गो बायं ... सकाळ सकाळ कशाला बेंबाटतसं..." आप्पांचा दणकट हात पाठीत पडल्यावर योग्याची चोच बंद झाली.. एकदम स्पिचलेस.. "काही नाही.. काही नाही सहजच आपलं ... " म्हणत मान सोडवून घेतली. आप्पांना काय समजायचे ते समजले होतं बहुतेक.. पण त्यांनी ते दाखवले नाही. सगळ्यांना वाँर्मअपला पिटाळले. आम्ही वाँर्मअप करेपर्यंत आप्पा आणि बापू काही तरी बोलत होते. संजूचा सगळा जीव तिथेच अडकला होता. जास्त बोलायची बंदी असल्यामुळे मुकाट सगळ चालू होत. सगळ्यांनी आपापल्या बदलेल्या प्लेस घेतल्या कव्हर फिरवली. सगळ्यांना बरोबर उलट प्लेस दिल्या होत्या.

सैराट .... माझ्या नजरेतून...

लेखक अपरिचित मी यांनी गुरुवार, 05/05/2016 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात पहिल्यांदा कुठल्या चित्रपटाची गाणी मी तो पहायच्या आधी एवढी ऐकली असतील.. असो.. याचे श्रेय प्रमोशनकारांना देण्यात येते... खरं तर ती अती वापरलेली गावाकडची भाषा trailor मध्ये समजली.... आणि मी picture न बघण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं... सोमवारी अचानक box office चे विक्रम मोडलेले idiot box ने दाखवले आणि मराठी बाणा जागवत म्हटलं वीकेंड ची वाट न पाहता बघूनच यावा.. मंगळवार शोधला... तसं पाहिला तर कथा काही नवीन नाही... पण च्या मारी अर्ची खूप भाव खावून गेली राव... नुकतीच नववी पास झाल्याचं समजलं... पण कॅमेरा समोर एक क्षण म्हणून वाटलं नाही कि हा तिचा पाहिला picture आहे असं... खरच भावली...

फिरोज, आज तुझीच का आठवण व्हावी ?

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 05/05/2016 05:00 या दिवशी प्रकाशित केले.
फिरोज, आज तुझीच का आठवण व्हावी ? पण तुझी नव्हे तर अजून कुणाची व्हावी ? याक्षणी तुझ्या सारखा राजर्षी स्वर्गात ऐषफर्मावत असेल असेही शक्य नाही तू ज्या कुंपणावर थांबून रयतेसाठी देशाची राखण केलीस तेच कुंपण शेत खाते आहे पाहून तू अस्वस्थ होत असशील कुठेतरी धडपडतही असशील, काळाने अभिप्रेत नसलेले गूण उधळत ठोके चुकवताना तुझ्या जैवीक गुणसूत्रांचीही आब नाही राखली त्याला तू तरी काय करशील? नैतीकता दूकानातून विकत आणून का कुणाला देता येते ?

झोपडपट्टीतले दिवसः भाग दोन

लेखक तर्राट जोकर यांनी गुरुवार, 05/05/2016 04:17 या दिवशी प्रकाशित केले.
झोपडपट्टीतले दिवस: भाग एक मला कळायला लागलं तेव्हाचं आठवतंय. आम्ही एका सुंदर कॉलनीत राहत होतो. मी जवळच्या प्लेगृपमधे जात होतो. ही कॉलनी किती सुधारलेली होती हे लक्षात येईल. कारण ८३-८४ च्या काळातच इथे प्लेगृप ही संकल्पना होती. छान खेळणी वैगरे असायची तिथे. गणवेषही होता. इंग्रजी पोएम्स होत्या. साडेचार वर्षाचा असतांना, गणवेषात १८-२० मुलांसोबत बाई मध्ये खुर्चीवर बसलेल्या अशा फोटोत मी चौथ्या नंबरला मागच्या रांगेत उभा होतो. माझा जीवलग मित्र खाली बसला होता. बरीच वर्षे जपून ठेवला होता तो फोटो. त्या कॉलनीत आमचं भाजीचं दुकान होतं.

pittsburg बद्दल तातडीची माहिती हवी आहे

लेखक अभिजीत अवलिया यांनी गुरुवार, 05/05/2016 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व प्रथम मी चुकीच्या जागी लेख टाकत आहे त्याबद्दल क्षमस्व. एक अतिशय महत्वाची माहिती हवी आहे. आज अचानक हापिसातून अमेरिकेला जाशील का जून मध्ये अशी विचारणा झाली आहे. pittsburg ला जायचे आहे ५ महिन्यासाठी. तर काही माहिती हवी आहे. १) pittsburg मध्ये ५ महिन्यासाठी भाड्याने घर मिळते का? का युके सारखा ६ महिन्याचा नियम आहे. तसेच माझ्याकडे सोशल सिक्यूरीटी नंबर नसल्याने गेल्या गेल्या घर मिळेल का? त्याच्याशिवाय तिथे पानही हलत नाही असे ऐकले आहे. २) family साठी (मी, पत्नी आणी मुलगा) 2bhk घेणे नियमाप्रमाणे बंधनकारक आहे का?