Skip to main content

मन

लेखक पथिक यांनी गुरुवार, 28/04/2016 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
मन धावून धावून जातं आणि बिलगतं - पानाफुलांना, वृक्षवेलींना, रानवाटांना, डोंगरदऱ्यांना. मन पंख उघडतं आणि झेपावतं त्या सोनेरी उन्हानं भरलेल्या निळ्या आकाशात; आणि तरंगत, उमलत राहतं एखाद्या शुभ्र मेघासारखं. मन चांदण्यात जाऊन बसतं आणि अबोल रात्रीला पुसतं तिच्या सौंदर्याचं त्याच्या व्याकुळतेशी असलेलं नातं. मन वहिवाट सोडतं आणि निघतं त्या वाटेने ज्या वाटेवर पथदिवे नाहीत, मैलाचे दगड नाहीत, दिशा आणि देशांचे फलक नाहीत; जी वाट अमूर्त आहे, अथांग आहे, असीम आहे - मनासारखीच !
काव्यरस

एक संघ मैदानातला - भाग २

लेखक शि बि आय यांनी गुरुवार, 28/04/2016 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
डायरेक्ट दुपारी ४ ला डोळे उघडले.... मस्त झोप झाली होती. परत जेव्हा संध्याकाळी ग्राउंडवर पोचले तेव्हा एक गुड न्यूज मिळाली... आप्पा फक्त सकाळीच येणार होते. हुशशश..... सुटलो, निदान संध्याकाळी तरी मिलिटरी ट्रेनिंग नसणार हे ऐकून जीवात जीव आणि पायातही जीव आला. आत्ता काय ह्या पोरी काही सुटणार नव्हत्या. आमचा ओपनच्या टीमचा सगळा सेट असल्यामुळे कव्हर सेट करता येणार होती. कव्हर फिरवल्यावर लगेच पाम्मीने धावत जाऊन टर्न घेतला…. झालं तूप्याची सटकली. तिने पम्मीच बखोट धरलं आणि तिला बाजूला केलं. ' ताई, टर्न मला लावायला सांगितला आहे दादांनी"... पम्मी वैतागून तुप्याला सांगायला लागली.

नो आय डोन्ट........

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी गुरुवार, 28/04/2016 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
तुला लग्न करायचय का नाही हे मला एकदाच आणि स्पष्ट सांग, म्हणजे मी तुझ्या परत परत मागे लागनार नाही, कळ्ल? आई पुन्हा एकदा त्याच विषयावर येउन थांबली. आता तर हे रोजच झालं होतं. अजुन किती दिवस मी या सगळ्यापासुन पळणार आहे? कधी ना कधी सत्य सांगावच लागनार ना? कधी ना कधी तर आज का नको? बास झालं आता...... मी आहे अशी तर त्यात माझा काय दोष आहे? मी का लपवू सगळ्यांपासून .......... आज सांगायलाच हव.

खर तर मीच द्वाड :)

लेखक सुजल यांनी गुरुवार, 28/04/2016 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचे आठ - साडे आठ तरी वाजले असतील. आमचं अवाढव्य शिप पोर्ट मध्ये उभ होत पण आजूबाजूच्या शांततेमुळे धडकी भरत होती. आजूबाजूच्या पाण्यावर काळोख तर होताच पण पाण्याचा डुबुक डुबुक असा अधून मधून येणारा आवाज चांगलाच अस्वस्थ करत होता. एक प्रकारची वातावरणात निरव शांतता होती आणि त्या अपुर्या प्रकाशात आम्ही शिप ला लावलेल्या तात्पुरत्या जिन्यावरून आमची दिवस भरात केलेली खरेदी ( दोन अवाढव्य ब्यागा ) शिप वर चढवत होतो. एक प्रकारे खूप मुश्किल काम आणि घाम काढणार काम होत ते. पण नेटाने आम्हाला करण भागच होत.

दया तेथ धर्मु च्या थिम वर

लेखक भम्पक यांनी गुरुवार, 28/04/2016 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत नववीत असतांना (१९८९ ) , आम्हाला मराठी पाठ्यपुस्तकात काही कविता / अभंग होते . त्यावेळी मी एक उत्साही नवकवी होतो.सर्व कवितांचे मी विडंबन केले होते . अर्थातच अल्पमतीनुसार. आता सहज आठवले म्हणून टाकतो आहे , हे मी संत ज्ञानेश्वरांच्या 'दया तेथ धर्मु 'वर केले होते.अभंगाची थीम होती जेथे धर्म तेथे विजय. मी तोच अर्थ कायम ठेऊन तत्कालीन काव्य (?) केले होते. यात सनी म्हणजे सनी देओल घ्यावा तर पूजा म्हणजे पूजा बेदी ....( त्याकाळी तीच होती हो तशी....)

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन)

लेखक मेघना मन्दार यांनी गुरुवार, 28/04/2016 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
भाग पहिला - मिसळपाव वर हा माझा पहिलाच लेखनाचा प्रयत्न, त्यामुळे लेखनातल्या चुका सांभाळून घ्या मिपाकरांनो !! माझं ड्रीम डेस्टिनेशन होतं लंडन!! नवर्‍याबरोबरच जायचं असं ठरवलं होतं मी तेंव्हा :) खरं तर ४ वर्षांपूर्वी आई बरोबर UK ला जायची संधी आली होती मला, माझा भाऊ लंडन मध्ये होता त्यावेळी. तसं म्हणायला गेलं तर मला सहज शक्य होतं तिकडे जाणं पण मी नाही गेले. माझं स्वप्न होतं की लंडन ला जायचं तर ते मंदार बरोबरच :) आणि तसं मी माझ्या आईला सांगितलं होतं. आई सुद्धा काही म्हणाली नाही.

व्हेज बिर्याणी (विदाऊट लेयर)

लेखक गौतमी यांनी गुरुवार, 28/04/2016 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
ईथली पहिलीच रेसेपी आहे. आवडली तर नक्की सांगा. लागणारा वेळ: ३० मिनिटे लागणारे जिन्नस: तर त्यासाठी आपल्याला लागेल : १. आधीच तयार केलेला भात २. फरसबी चिरून (भाज्या तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मला त्या दिवशी ज्या मिळाल्या त्या मी वापरल्यात ) ३. फ्लॉवरचे तुकडे ४. मटार १ वाटी ५. १ कांदा बारीक चिरून ६. १.टोमाटो बारीक चिरून ७. १ ते २ तमालपत्र ८. ६ ते ७ काळीमिरी दाणे ९. आलं -लसूण पेस्ट १ ते दीड चमचा १०. लाल तिखट १ चमचा ११. १ ते दीड चमचा बिर्याणी मसाला (मी सुहाना चा वापरला ) १२. तेल १३. हळद १/२ चमचा १४. मीठ चवीनुसार १५. थोडंस हिंग १६.

कवचकुंडले!

लेखक DEADPOOL यांनी गुरुवार, 28/04/2016 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
"अर्जुना उचल ते गांडीव! लाव तो बाण! भेद हे कवच!" अर्जुनाचा डोळ्यावर विश्वासच बसेना! सूर्यपुत्र परत आला होता! 'नाही बंधु, नाही! बंधुहत्येचे पाप पुनश्च माझ्या माथी मारू नकोस!" "माझं मरण अर्जुना तु नाही तर मी स्वतः लिहिलं होतं. असशील तु योद्धा, असशील तु जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर, तर स्वीकार आव्हान!" "बंधु तूच माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ होतास!" "सर्वश्रेष्ठत्वाची भीक नकोय मला.आयुष्यभर भीकच मागत आलोय मी. मरणानंतरतरी अधिकाराचा हक्क दे!" अर्जुनाने मोठ्या कष्टाने बाण उचलला. "तो बाण नव्हे, तुझं सर्वश्रेष्ठ अस्त्र काढ.

भुतान सहली विषयी मार्गदर्शन हव आहे.

लेखक पूर्वाविवेक यांनी गुरुवार, 28/04/2016 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
भुतान सहली विषयी माहिती हवी आहे. मे अखेर ते जून असा ११ दिवसांचा कालावधी आहे. भुतानला जाण्यासाठी हा सिझन योग्य आहे का ? कुणाला या बाबत अधिक माहिती असेल तर सांगा प्लीज. जुना धागा असेल तर कृपया इथे नमूद करावा. धन्यवाद in advance.