माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग - 3
आज लंडन मधील दुसरा दिवस –
नवऱ्याला ऑफिसला लौकर जायचे असल्याने लौकरच सगळं आवरून तो ऑफिसला गेला. अजून माझा लंडन ट्यूब पास काढला नसल्याने आज मला कुठे लांब फिरायला जाता येणार नव्हतं. लंडन ट्यूब म्हणलं की आपल्या मुंबईच्या लोकल ट्रेन्सची आठवण येते. कुठल्याही ठिकाणी पोहोचण्याचा सगळ्यात जलद मार्ग. फक्त यांच्या ट्रेन्स एसी असतात आणि आपल्याइतकी गर्दी नसते. लंडन ट्यूब हि ११ लाइन्स मध्ये विभागली गेली आहे . लंडन ट्यूबचा नकाशा आपलं काम एकदम सोप्पं करून टाकतो.
मिसळपाव