Skip to main content

नवलाई...

लेखक राजेंद्र देवी यांनी गुरुवार, 06/10/2016 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
नवलाई... ही सवय तुझी का मला माहीत नाही? उशीरा येऊन लवकर जाण्याची घाई अंमळ थांब जराशी मन अजून भरले नाही नभी चंद्रमा झुलतो, अजून रात सरली नाही गाली फुलतो गुलाब त्यावर चंद्रकिरणांची झिलई तुझ्या लडिवाळं बोलण्याची रोज वाटते अपूर्वाई आपण दोघे जागे जग शांत झोपले पांघरून स्वप्नांची दुलई जागेपणी पाहतो आहे आपण उद्याच्या स्वप्नांची नवलाई राजेंद्र देवी

निरोप

लेखक परिधी यांनी गुरुवार, 06/10/2016 07:07 या दिवशी प्रकाशित केले.
बसल्या बसल्या सहज डोळे भरून येतात तुझ्या माझ्या आठवणी पिंगा घालु लागतात तस सांगण्यासारख फारस काही नव्हतंच एकदा फ़क्त "तू बोल" एवढं तरी म्हणायच इंजेक्षनच्या आधी गार गार अल्कहॉलने पुसाव मग सुईने शांतपणे आरपार टोचत टोचत जाव चंद्राच्या शीतल सहवासात तशीच बेसावध चांदणी विरहाची अबोल वेदना हळूहळू होत जाते जीवघेणी खंत याची नाही की वेगळ्या झाल्या वाटा कधी न कधी हात हातातुन सुटनार च होता एकच टोचनी लागून राहिली आहे तरी मनाला डोळ्यात डोळे घालून एकदा निरोपही नाही घेतला

रायगडावर जेव्हा जाणे होते

लेखक अश्विनी वैद्य यांनी गुरुवार, 06/10/2016 02:49 या दिवशी प्रकाशित केले.

रायगडावर जेव्हा जाणे होते

सर्वात प्रथम चौथीच्या पुस्तकात ओळख झालेला शिवाजी महाराजांचा इतिहास, आठवीच्या उन्हाळ्याच्या सुट्टयांत रणजित देसाईंचे श्रीमान योगी भान हरपून वाचताना डोळ्यांसमोर उभा राहिलेला शिवरायांचा इतिहास आणि आज परत एकदा बऱ्याच वर्षांनी रायगडावर पाऊल टाकताच वाचलेल्या अनेक प्रसंगांच्या खुणा, अवशेष धुंडाळत त्याच्या खूप जवळ जाता येणारा छत्रपतींचा तो अजरामर इतिहास. लेकीला महाराष्ट्राच्या या महान इतिहासाची थोडीफार तरी ओळख व्हावी या हेतूने आज तिथे जायचा बेत आखला होता. पाचगणी, महाबळेश्वर, महाड या वाटेने पुढे जात रायगडाच्या दिशेने निघालो.

गॅरेज युनिव्हर्सिटी...१

लेखक टर्मीनेटर यांनी बुधवार, 05/10/2016 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
गॅरेज युनिव्हर्सिटी...१ (सर्व पात्रे व घटना काल्पनिक) "विज्या कुठे आहे रे?" "अरे तो काल रात्रीच गोव्याला गेलाय, येईल तीन चार दिवसांनी, पण तू कसा काय आज सकाळी सकाळी उगवलास?" बाबू शेठचा परिचित आवाज ऐकून फियाट च्या खालूनच कुठलेतरी नट बोल्ट टाईट करता करता अज्या दादा विचारता झाला. "आयला पहाटे माझा सासरा गचकला, बायको आणि मेव्हण्याला अर्जंट पुण्याला सोडून यायच होतं. विज्या आला असता ना रे पटकन जाऊन." आता मात्र पाठीवर सरपटत अज्या दादा गाडीच्या खालून बाहेर येत म्हणाला " काय झालं रे त्यांना अचानक? आणि तू नाही का जाणार?" "हार्ट अटॅक आला होता रात्री... पहाटे खपला.

हमारा स्टेशन हमारी शान

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 05/10/2016 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
'बोरीवली स्टेशनचा कायापालट' अशा शीर्षकाची बातमी वाचली तेंव्हाच ठरवलं होतं की आपण अशा कामात भाग घ्यायचा. त्यानुसार लगेच माहिती काढली आणि एम ए डी (मॅड) म्हणजेच मेक अ डिफरन्स फाउंडेशनबद्दल कळलं. मग काही दिवसानंतर डोंबिवली स्टेशनच्या रंगरंगोटीचे फोटो बघितले. आतुरता अजूनच वाढली. हे सगळं होऊन गेल्यावरच का कळतंय, आगोदर का नाही असं वाटायला लागलं.

दरवाजा हो तो ऐसा हो!

लेखक बाजीप्रभू यांनी बुधवार, 05/10/2016 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
साने गुरुजींच्या "खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे" च्या धर्तीवर "मिपाला पोस्ट अर्पावे" या हेतूने पोटावरती हि एक पोस्ट. डोन्टवरी! यात कुठलेही डायट सल्ले नाहीत, व्रत-वैकल्ले नाही, उपास-तापास नाहीत कि लोखंड उचलायचे प्रकार नाहीत. आहे ते एका "पोटिव्हेशन" बद्दल आयमीन "मोटिव्हेशन" बद्दल. "पोट" हे श्रीमंतीचे लक्षण असतं हे आजोबांचं वाक्य तर चिकन-मटण खाल्यानंतर कमीत कमी दोन तास झोपलं नाही तर माणूस "नरकात" जातो हे बाबांचं वाक्य.

!! यश !!

लेखक कवि मानव यांनी बुधवार, 05/10/2016 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाला जीवनात यशाची घाई असते, यशाचीही चव भलतीच न्यारी असते, ज्याने ती चाखली ती धन्य होतो, जो वंचित राहिला बिचारा तो "अन्य" होतो !! पण यशाच्या अंगी कुठलाही भेद नाही, धर्म, पंत, जात, लहान, थोर नाही, मनगटात बळ आणि मनात जिद्द असेल तर, जगाला काबीज करणेही अशक्य नाही !! तशीच यशाची एक दुसरीही बाजू असते, ती तुम्हाला दुस्य्रांच्या ईर्षेच्या यादीत जोडते, तुम्ही लाख स्वता बरोबर स्पर्धा करत असला तरी, बाकी जग नेहमीच तुम्हाला प्रतियोगी म्हणून ओळखते !! मित्रानो यशाचा असं कुठलंच सूत्र नाही, मेहनत, बुद्धिमत्ता, निष्ठा यांना कुठलाही विकल्प नाही, यश नाही मिळणार म्हणून जो प्रयत्न करणे सोडतो, तो कधीच यशाच्य

माझ्या बालपणीचा सुगंधित ठेवा... गुलाब

लेखक वटवट यांनी बुधवार, 05/10/2016 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
तिथे वर कुठे तरी स्वर्ग असतो म्हणे.... त्या स्वर्गात देव रहात असतात म्हणे... तेच आपलं भविष्य एका पुस्तकात लिहीत असतात म्हणे... त्यांचं ते लिखाण आपल्याच कृतीवर अवलंबून असतं म्हणे... त्यालाच प्राक्तन असं संबोधन असतं... म्हणजे आधीच्या जन्मातल्या आपल्या वर्तणुकीवर ते लिखाण ठरतं म्हणे... आणि त्याच लिखाणाच्या अनुषंगाने आपला दुसरा जन्म आणि त्या दुसर्या जगण्याचा मार्गही ठरतो म्हणे... म्हणजे आधीच्या जन्मात जर आपण काही दुष्कृत्ये केली असतील, तर दुसर्या जन्मात आपल्याला खूप त्रास होतो. त्याचबरोबर आधीच्या जन्मात जर आपण काही सत्कार्ये केली असतील तर दुसरा जन्म सुखाचा जातो...