डोळे
डोळे
अप्रतिम लावण्य लाभलेली आणि सागराच्या निळाईप्रमाणे डोळे असलेली सोनाली लहानपणापासून खूपच हुशार मुलगी होती. तिचे आई-वडील साधे मध्यमवर्गीय पालक होते. मात्र सोनालीची स्वप्नं खूप वेगळी होती. तिच्या आईची इच्छा होती की सोनालीने बी.एड. करावं आणि एखाद्या शाळेत चांगली नोकरी करावी. वडील तिला नेहमी म्हणायचे की मुलींनी बॅँकेत नोकरी केलेली चांगली. मात्र सोनालीने आई-वडिलांच्या मनाविरुद्ध एक खूपच वेगळं करियर निवडलं होतं आणि त्या तिच्या निवडीचं फळ आज तिला मिळालं होतं. सुरुवातीला फारसं समजत नसल्याने, बी.एड. करू अशा विचाराने तिने बी.ए. करायला सुरुवात केली होति.
मिसळपाव