Skip to main content

झड श्रावणाची

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 03/10/2016 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
झड श्रावणाची अचानक श्रावणाची झड ती आली अंग अंग भिजवून गेली ओल्या केसातून बट ही ओघळली चिटकून बसली गोऱ्या गाली मोहक हालचाल सुखावून गेली नकळत डोळे विस्फारून गेली कवेत घेता काया ही थरथरली चित्तवृत्ती मोहरून गेली त्रेधातिरपीट उडवून गेली यौवनास माझ्या खिजवून गेली जेव्हा जेव्हा आठवते रात्र ती ओली श्रावणात होते पापणी ही ओली राजेंद्र देवी

!! सैनिक मरतो देश राहतो !!

लेखक कवि मानव यांनी सोमवार, 03/10/2016 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
दोन राष्ट्रांच्या वादामध्ये, निष्पाप बिचारा अपराधी ठरतो, आणि उगाच कारण नसतानाही, सैनिक का सीमेवर मारतो ? !!१!! त्यास न ठाऊक कारण युद्धाचे, पालन करी तो आदेशांचे, तरी बुद्धिबळाच्या खेळा मधला, सहज मरणारा तो प्यादा ठरतो !!२!! डॊकावूनी पहा त्या गणवेशातून, आपल्या सम तो ही माणूस असतो, सौख्य-सोयरे मागे टाकून, कुणास ठाऊक तो कसे राहतो !!३!! लढत मरावे, मरत लढावे, ध्यास घेउनी जीवनभर जगतो, अन तारुण्याच्या उंबरटयावर, अकारण मृत्युच्या शैयेवर चढतो !!४!! युद्ध खरेतर राज्यकर्त्यांचे, तो तर केवळ साधन ठरतो, वाढे यादी हुतात्म्यांची कदाचीत, एक घर मात्र - मुलगा, नवरा वा बाप गमवतो !!५!!

नो...आय डोंट..!!

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी सोमवार, 03/10/2016 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारची वेळ. नेहा काहीबाही करत त्या डेस्कवरच्या कॉम्प्युटरमधे आपलं डोक खुपसुन बसली होती. चेहर्‍यावर कामचं टेन्शन ओळखता येत होतं. कपाळावरच्या आठ्या व्यवस्थित दिसत होत्या. एका निवांत क्षणी चेहर्‍यावर आलेली बट सावरत, डोळ्यांवरचा चश्मा वर डोक्यावर ठेवत आपल्या रोलिंग चेअरवर मागं रेंगाळत जरा कुठे आराम करायच्या तयारीत असतानाच डेस्कवरच हाताशेजारी ठेवलेला॑ तिचा मोबाईल वाजला. अगदी त्रासिक चेहर्‍यानं तिनं मोबाईलच्या स्क्रीनवर पाहिलं. कॉल आईचा होता. "हॅलो..." नेहा. "हां हॅलो, अगं नेहा ऑफिसमधेच आहेस ना? बिझी नाही ना आहेस?

बहुचर्चित "सैराट"

लेखक १००मित्र यांनी सोमवार, 03/10/2016 09:54 या दिवशी प्रकाशित केले.

बहुचर्चित "सैराट"

बहुचर्चित "सैराट" काल बघितला. इतका उशीरा का ? असं काहींच्या मनात आलं सुद्धा असेल, खास करून , माझे काही मित्र मैत्रिणी , ज्यांना हा सिनेमा खूपच भिडलाय. असो. खरं म्हणजे कुठलाही सिनेमा ...अगदी सुपरेस्ट हिट ही का असेना , मला लग्गेच थेटरात जाऊन पहावा असा उत्साह बिलकुल नव्हता, अजूनही नाही. घरात , रविवारी वगैरे , तो पण सैराट किंवा गेल्या रविवारचा मुं-पुणे-मुंबई :२ वगैरे अगदी गाजलेले चित्रपट असतील तर मात्र घरात , हाफ चड्डी घालून , ऐस पैस बसून मला पाहायला आवडतात. मध्ये मध्ये चहा - खाणं चालूच. जाहिराती ? नो प्रोब्लेम man !

दीपशिखा-३. फ्राऊ अँगेला मेर्केल- दि कान्सलेरिन

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 03/10/2016 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
ह्याआधी- दीपशिखा दीपशिखा-१. अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस दीपशिखा-२. गिरीकन्या अरुणिमा सिन्हा . जर्मनी! युरोपातलाच नव्हे तर जगातील एक प्रबल देश! अनेक पेडी इतिहास असलेल्या ह्या देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या बुंडेसकान्सलेरिन अँगेला मेर्केल ह्यांच्याबद्दल एक कुतुहल कायमच मनात आहे.

रडू

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 02/10/2016 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
"आमच्या घरी ना , मला एक छोटा दादा मिळाला आहे. त्याला दोनच काम असतात. मुठ आवळून इकडेतिकडे पाहत बसण , आणि भोकाड पसरण. आता उद्या माझा पेपर आहे आणि हा सकाळपासुन रडतोय. थांबा आजोबांनाच विचारतो तो का रडतो ते.." "आजोबा..आजोबा.. अहो बघा ना तो कसा रडतोय सारखा. बोलून का टाकत नाही काय पाहिजे ते ?" " अरे मानवी भाषेबद्दल पुर्ण अनभिज्ञ आहे तो. भुक लागली मग जिवाच्या आकंताने तो टाहो फोडतो. टाहो फोडला ,की आई जवळ करते हा अनुभव ते गाठीशी बांधून घेतो." " आजोबा , मग डॅडा का कधी रडत नाही ? " " आपण मोठो झालो की मानवी भाषाविश्वात आपला प्रवेश होतो. काना मात्र्ा वेलांटी उकार आपल्याभोवती फेर धरून नाचु लागतात.

औरंगाबाद सायकल कट्टा

लेखक आनंदराव यांनी रविवार, 02/10/2016 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यातला पहिला सायकल कट्टा संपन्न होतानाच या औरंगाबाद सायकल कट्ट्याची बीजे रोवली गेली होती. मोदकरावांचा पुण्यातल्या सायकल कट्ट्याचा हा लेख तुम्ही वाचला असेलच !अर्थातच या दोन्ही कट्ट्याचे प्रणेते मोदकरावाच आहेत हे येथे नमूद करणे अत्यंत महत्वाचे आहे. तर, औरंगाबाद सायकल कट्टा २४ व २५ सप्टेम्बर ला करायचा असे ठरले. व त्याप्रमाणे कायप्पा ग्रुप स्थापन करण्यात आला. त्यात पुण्यातले औरंगाबाद सायकल कट्ट्याला येऊ इच्छिणारे आणि यजमान औरंगाबादकर ( संख्या ३) असे सामील झाले. २४ तारीख येत येत पुण्यातले ८ पैकी ३ गाळपाटले आणि ५ फायनल झाले.

पधारो म्हारे देस : मुंबई – उदयपूर – जयपूर – मुंबई .

लेखक ज्याक ऑफ ऑल यांनी रविवार, 02/10/2016 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही , म्हणजे अस्मादिक आणि आमचं खटलं , साधारण जुलै मध्ये राजस्थान स्वारी वर गेलो होतो. संपूर्ण ट्रीप नेहमी प्रमाणे मी स्वत:च प्लान केली होती. सबब अगदी पहिल्या दिवसापासून Adventure असणार ही कल्पना होतीच. पण ते मुंबई पासूनच सुरु होईल याची तिळमात्र ही कल्पना आम्हांला नव्हती. त्यात अस्मादिक पडलो मराठवाडी , त्यामुळे निजाम-गती (ही कूर्मगती पेक्षा पण हळू असते) ही आमच्या पाचवीलाच पुजलेली . त्यामुळे आमच्या सौ”नी सांगून सुद्धा ,”अगं विमान १२ चे आहे, आपण ११ पर्यंत पोचलो तरी चालेल !" असं म्हणून क्याब ८ ची बुक केली. की बाबा अगदी मुंबई मुंबई म्हणतात तशी गर्दी लागली तरी ३ तासात ३८ किमी पोचणे अवघड नाही !!