Skip to main content

कट्यार, गाणी, गीतकार

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शनिवार, 29/10/2016 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
कट्यार, गाणी, गीतकार स्थळ शिवाजी पार्क, दादर. वेळ संध्याकाळी ७च्या सुमारची, मी CCDजवळ वाट पाहत होतो. शेवटी एकदाचा धापा टाकत समीर आला, तेवढ्यात मागोमाग मंदारही आला. आता तुम्ही म्हणाल की कोण समीर? कोण मंदार? तर समीर सामंत आणि मंदार चोळकर. हे दोघेही तरुण पिढीचे तरुण कवी, गीतकार. कविता करणं आणि आपल्या समविचारी मित्रांबरोबर मैफली जमवून त्या ऐकणं, ऐकवणं हा आवडता उद्योग. २०१०-११च्या सुमारास या दोघांना आणि अशाच काही इतर तरुणांना अचानक एक व्यासपीठ मिळालं. Orkut. आजपर्यंत जे मिळालं नव्हतं, ते त्यांना ह्या व्यासपीठावर मिळायला लागलं - प्रतिक्रिया.

हॉटेल जाधवगड

लेखक प्रभाकर पेठकर यांनी शनिवार, 29/10/2016 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
हॉटेल जाधवगड हॉटेल जाधवगड हे सासवड-नारायणपूर रस्त्यावर पुण्यापासून ४० कि.मी.वर आहे. ह्याला 'गड' असे म्हटले, तरी 'रायगड', 'सिंहगड' यासारखे हे भव्यदिव्य प्रस्थ नाही. भुईकोट किल्ला किंवा एखादी गढीच म्हणा ना! हा गड आणि आजूबाजूचा १५ एकराचा परिसर ही जाधव घराण्याची व्यक्तिगत मालमत्ता आहे. जाधवरावांच्या इतिहासात खोलवर उतरल्यावर जाणवते की हे मूळचे यादव राय. देवगिरी आणि सिंदखेड ह्या दोन्ही ठिकाणी यादवरायचे उल्लेख आहेत. पुढे सिंदखेडच्या यादवरायचे जाधवराव झाले. ह्याच कुळातील पिलाजीराव जाधवराव हे शाहू महाराजांच्या सैन्यात सरदार होते.

न्यू यॉर्क : १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 29/10/2016 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
=============================================================================== न्यू यॉर्क : ===> १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क १... ===> =============================================================================== न्यू यॉर्क शहर अनेक जगावेगळ्या गोष्टींनी खच्चून भरलेले आहे. त्यातल्या अनेक गोष्टी जगप्रसिद्धही आहेत.

काजू गुलकंद विडा

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 29/10/2016 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
काजू-गुलकंद विडा . साहित्यः १ वाटी काजूपूड अर्धी वाटी साखर पाच टे.स्पून पाणी पाव वाटी काजू-बदाम काप अर्धी वाटी गुलकंद चांदीचा वर्ख खाण्याचा हिरवा रंग . कृती : एका नॉ

हराभरा कबाब

लेखक इशा१२३ यांनी शनिवार, 29/10/2016 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! काय, फराळ केलात? आता चार-आठ दिवस रोज फराळाचं खाऊन कंटाळलात की मग जोडीला काहितरी खमंग करून खा.

समोसा

लेखक प्रभाकर पेठकर यांनी शनिवार, 29/10/2016 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
समोशाचे सर्वसाधारणपणे दोन प्रकार आहेत - १) पंजाबी समोसा २) पट्टी समोसा. पंजाबी समोशासारखेच 'दिसणारे' दुसरे समोसे म्हणजे लखनौ समोसा आणि गुजराथी समोसा. पंजाबी समोसा, लखनौ समोसा आणि गुजराथी समोसा ह्यांना एकच संज्ञा वापरली जाते, ती म्हणजे 'पंजाबी समोसा'. वरून दिसायला सारखेच असले, तरी त्यातील सारण वेगवेगळे असते. पंजाबी आणि गुजराथी समोशात बटाट्याची 'भाजी' असते. पंजाबी समोशात मसाले जरा तीव्र असतात, तर गुजराथी समोशात बटाट्याची भाजी तुलनेने सौम्य असते. दोन्ही समोशातील भाजी पिवळ्या रंगाची असते.

मुगाचे पौष्टिक लाडू

लेखक पूर्वाविवेक यांनी शनिवार, 29/10/2016 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
मुगाचे पौष्टिक लाडू साधारणपणे मुगाचे लाडू हे नेहमीच्या (साल काढलेल्या) डाळीच्या पिठापासून बनवले जातात. परंतु मी (खरे तर माझ्या सासूबाईंनी) इथे थोडा बदल केला आहे. सालवाली मुगाची डाळ आणि इतर साहित्य वापरून हे लाडू अधिक पौष्टिक बनवले आहेत. हे लाडू उपवासालाही चालतात. थंडीच्या दिवसांत भरपूर उष्मांक देतात.

नागपूरची स्पेशल संत्रा बर्फी

लेखक अनन्न्या यांनी शनिवार, 29/10/2016 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना ही दिवाळी आनंदाची जावो!! . नागपूरवारीत हमखास आणली जाणारी मिठाई म्हणजे संत्रा बर्फी!! पण आम्हा कोकणातल्या मंडळींना नागपूर फारच लांब! त्यामुळे आता घरी केल्याशिवाय काही संत्रा बर्फी मिळणार नाही.