कालचे चंद्रग्रहण!

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in मिपा कलादालन
8 Aug 2017 - 6:49 am

सुरुवात चांगली झाली पण जशी भीती होती त्याप्रमाणे ढग आले , ११.३० पर्यंत वात पहिली खरी पण एकंदरीत काही ढग हटण्याची चिन्ह नव्हती शेवटी सुरुवात झाली त्यावेळचे च २-४ फोटो काढता आले.
https://www.mediafire.com/folder/n9teyq8w3m85wtt,215vmm5d4tbbmzz,1uzoooshskjtwvb,xjf305d207q94uu,3g547hpqoq5uv3p/shared

नाद वारुणी वारुणी, उठे रोमरोमांतुन

चामुंडराय's picture
चामुंडराय in जे न देखे रवी...
8 Aug 2017 - 4:58 am

मूळ कविता - आली कुठूनशी कानी, टाळ मृदुंगाचि धून (कवी - सोपानदेव चौधरी)

आली कुठूनशी कानी, चषकांची किन किन
नाद वारुणी वारुणी, उठे रोमरोमांतुन

स्कॉच व्हिस्की ती भरली, धुंद मद्य चषकांनी
थंड बियर फेसाळती, गजर चिअर्स उंचावुनी

वारुणीच्या चषकात आईसक्यूब्ज ओले चिंब
चखना असे साथीला, काजू चिकन आणि श्रिम्प

खंबा दिसला सामोरी, काय सांगू त्याची शोभा
मद्य घेवुनी अंतरी, स्वागतास माझ्या उभा

चिंता संसाराची सरे, माझ्या साकियाँच्या साथीत
माझे मन झाले दंग, उमर खय्यामच्या रुबायांत

आली कुठूनशी कानी......

vidambanकविता