Skip to main content

कन्नडा हाडु

Published on 28/11/2007 - 09:43 प्रकाशित मुखपृष्ठ
दुर्दैवाने काही लोकांच्या मते जगातील सर्वोत्कृष्ट साहित्य उजवीकडून डावीकडे लिहिण्यात येणार्‍या एका भाषेत निर्माण झाले आहे. मात्र आपल्याच इतर भारतीय भाषाभगिनींमधील अनेक साहित्यकृतींकडे सामान्य जनतेचे दुर्लक्षच झाले आहे. हाय! उदा. कन्नड भाषेतील खालील लोकप्रिय गाणे पहा. (बहुतेकांना नुसतेच पहावे लागेल, वाचता येणार नाही. पुन्हा एकदा हाय!) आम्हाला संपूर्ण कल्पना आहे की कन्नड भाषेतील उच्चारांचा गोडवा देवनागरीमध्ये उतरणे शक्य नाही. उदा पत्नी आपल्या पतिला "री" अशी जी गोड लाडिक हाक मारते त्याची री मराठीत ओढता किंवा लिहिता येणे सर्वस्वी कठीण. पण व्याभिचारी आस्वादाला आमचा पाठिंबा आहे.

याद्या 14802

हुकलेली संधी

Published on 28/11/2007 - 09:32 प्रकाशित मुखपृष्ठ
माध्यान्हीची वेळ | जराशी निवांत | लाभतो एकांत | घरामध्ये || झाली सामसूम | आटोपता काम | करिती आराम | सारेजण || खळ्यामध्ये बैल | करिती रवंथ | बसुनी निवांत | झाडाखाली || गडीमाणसेही | खावया भाकरी | गेली त्यांच्या घरी | नुकतीच || दळ्णकांडणी | पडलासे खंड | सारे काही थंड | अंगणात || चिमण्याही गेल्या | आपुल्या खोप्यात | राघू पिंजर्‍यात | विसावला || मंदसा तेवतो | देव्हार्‍यात दीप | म्हातारीचा जप | चालू असे || पाणी द्यावयाचे | करून निमित्त | नार गेली आत | खोलीमध्ये || आयन्यात बाई | पाहे पुन्हा पुन्हा | गालावरी खुणा | रात्रीच्या त्या || आठवता सारे | दूर झाली लाज | चमकली वीज | देहामध्ये || प्रीत
लेखनविषय:

याद्या 24883
Taxonomy upgrade extras

महंमद इक्बाल यांची उर्दू शायरी

Published on 28/11/2007 - 02:20 प्रकाशित मुखपृष्ठ
दुर्दैवाने काही लोकांच्या मते उर्दू शायरी ही मद्य आणि प्रेयसी ह्यांच्याभोवतीच घोटाळत राह्ते. अर्थातच अर्वाचीन उर्दू साहित्यात विविध विषयांवर लेखन झाले आहे, पण सामन्य मराठी मणसांपर्यंत ते पोहोचले नाही असे वाटते. बर्‍याच वेळा त्यांचा पुर्वदुषित दृष्टिकोनही ह्याला कारणीभूत असतो. असो. वास्तविक पाहता उर्दू भाषेतील अतिशय सुंदर कल्पनाविलास, अप्रतिम प्रतिमा, हळव्या, नाजुक कविकल्पना इतर भाषांमधे अभावानेच सापडतील. उर्दू भाषा ही अतिषय नजाकतदार आणि काव्यमय आहे. वरवर पाह्ता सहज वाटणार्‍या ओळींमधेही गहन अर्थ दडलेला असतो - उर्दू काव्य हे समजावून घेऊन आस्वाद घेण्याचे आहे.

याद्या 22701

अविश्वास ठराव

Published on 27/11/2007 - 12:16 प्रकाशित मुखपृष्ठ
उगाच प्रतिसाद/लेखांची कापाकापी करत सुटणार्‍या "अति कार्यक्षम"संपादक सदस्यांवर जाहीर अविश्वास ठराव आणण्यासाठी हा प्रस्ताव आहे. 'प्रभारी संपादक' ह्या पदापासून 'संपादक' असे प्रमोशन घेण्यापूर्वी समस्त संपादक मंडळाने ह्या ठरावाला सामोरे जावे. अर्थातच ह्यावर प्रभारी संपादक ह्या नात्याने आमच्यावरही अविश्वास ठराव गुदरल्यास आम्ही आमचे अधिकार मालक श्री. तात्या अभ्यंकर ह्यांच्या स्वाधीन करून एक सामान्य सदस्य म्हणून मिसळपावचा आस्वाद घ्यायला मोकळे होऊ. जय मिसळपाव! -कोलबेर

याद्या 6484

उर्दू ग़ज़लांचे भावानुवाद

Published on 26/11/2007 - 12:20 प्रकाशित मुखपृष्ठ
लोकहो, सध्या मराठी संकेतस्थळांवर सुप्रसिध्द उर्दू शायरांच्या उत्तमोत्तम ग़ज़लांचे "भावानुवाद" करण्याचे पेव फुटले आहे. या नवीन, 'उमलत्या' अनुवादकांच्या तडाख्यातून ग़ालिबसारखे शायरही सुटलेले नाहीत.

याद्या 18912

पांढरपेशी कविता

Published on 25/11/2007 - 17:10 प्रकाशित मुखपृष्ठ
पांढरपेशी कविता क्षितीज खादी कुरतडताना इमारतींच्या गच्च्या फिरते वणवण ऊन खडीच्या रस्त्यांवरती कच्च्या मिचमिचणारा प्रकाश शहरी जागा चोवीस तास खिडकीमधल्या चंद्रालाही चाळीशीचा त्रास गंधभारला धूर झिरपतो हवेत जर्जर ओल्या मेंदू बुरसट, हृदये कोंदट हवेशीर पण खोल्या गणती नाही किती चिरडली झुरळे पायाखाली दरवाज्याच्या फटीत मेल्या असतील लाखो पाली चादर गुधडत लोळत पडली कळकट मळकट गादी फुटक्या फरश्या मोजत बसली चामखिळींची लादी शौचकूपांच्यासभोती फुलल्या उठवळ बागा कुंपणही मागत आहे त्याच्या हक्काची जागा जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही! दर्प सांगती अभिमानाने उच्छ्व

याद्या 5496

पत्ता शोधणे - एक कला

Published on 25/11/2007 - 16:31 प्रकाशित मुखपृष्ठ
६४ कला कोणत्या आहेत हो? त्यात पत्ता शोधणे ही कला ही समाविष्ट आहे का? नसल्यास करता येईल का? का? सांगतो. सिनेमा चालबाज: शक्ति कपूर पहिल्यांदा शहरात येतो. तो कादर खानला एक पत्ता (अनुपम खेरचा) विचारतो. कादर खान चाकू काढून त्याच्याकडील सामान लुटून घेतो. शक्ति कपूर विचारतो, " अरे, पत्ता तर सांग". कादर खान म्हणतो," ऐसा करो, यहाँ से आगे जाओ. चौक पे बायें मुड जाना. अगले चौक से बायें मुड जाना. तो फिर आगे एक और चौक आयेगा. वहा से फिर बायें मुडना. अंत में और एक बार बाये मुडना. तुम यहॉं आओगे. तुम मुझे मिलोगे. मैं फिर तुम्हे लूट लुंगा." हा झाला सिनेमातला गंमतीचा भाग.

याद्या 8598

मिसळपावावर भूत

Published on 25/11/2007 - 02:02 प्रकाशित मुखपृष्ठ
मिसळपावावर मी भूत बनून वावरत होतो त्याचा हा पुरावा. मी येऊन गेलो तरी मिसळ पाव ला त्याची खबर लागली नाही. सदस्य म्हणून ही आणि पाहुणा म्हणून ही. विचार केला बघुया भूत बनून लेख लिहिता येतो का? ;) मिसळपाव पंचायत समिती आणि संहिता संचालकहो, मी काही चुका काढण्याकरीता किंवा मिसळपावच्या तांत्रिक गोष्टींमध्ये काही त्रूटी दाखविण्यासाठी हे लिहित नाही आहे. फक्त माझा एक मजेशीर अनुभव लिहिला.
लेखनप्रकार

याद्या 8101