ऑगस्टच्या एका विकांताला आमच्या क्लब पटनीने एक ट्रेक करायचा ठरवला. तो होता तांदूळवाडीचा, पलघर जवळ. तशी ह्या ट्रेकची डिफिकल्टी लेवल मध्यम आहे, त्यामुळे तसा काही हा जिवघेणा ट्रेक नव्हता. पण ह्या ट्रेक मधे दोन पॅच असे आहेत जे पुर्ण दगडी आहेत. नेहमी ट्रेक करणारा ते नीट पार करु शकतो पण कधितरी करणार्याला दोरखंडाचे सहाय्य लागेल.
काही भाग हा फक्त पायवाटेचा आहे.डाव्या हाताला डोंगर उजव्या हाताला दरी. मधे दोन पाय ठेवता येईल इतकी जागा.
डव्या बाजूला आधार धरायला झाडं पण नाहीत फक्त माजलेले गवत.आणी अशाच एका ठिकाणी आमच्या आधीच्या विकांती क्लबचा एक सदस्य उतरताना पाय घसरून पडला होता. त्याला पट्ट्याच्या साह्याने वर काढून दोघेजण खांद्याचा आधार देत खाली घेऊन आले होते.
ट्रेकची तयारी क्लबने एका ट्रेकिंग / ईव्हेंट जमवणार्या कंपनीस दिली होती सो तयारी चा काही त्रासच नवता. (खरं तर ट्रेकची तयारी हा ट्रेकचा सगळ्यात मजेशीर भाग आहे.) आम्ही काही लोक ठाण्यातून, काही दादर तर काही वाशी असे निघालो.
ह्या ट्रेक साठी मुंबई - अहमदाबाद हा राजमार्ग घ्यावा लागतो. सफाळे च्या पुढे एका ठिकाणी डावीकडे वळाले की १०-१५ मिनिटाच्या अंतरावर तांदूळवाडी गाव लागते.
(मुंबई - अहमदाबाद राजमार्गावरून दिसणारा तांदूळगड - धुक्यात न्हालेला)
गडाच्या पायथ्याला पोचून चहा-नाश्टा केला. प्रत्येकाला स्वतःचे खाण्याचे डबे मिळाले आणी १०-१५ जणांचे कंपू करून सर्वांनी ट्रेक ला सुरूवात केली.
(पायथ्याहून दिसणारा तांदूळगड)
साधारण एक तृतियांश टप्पा पाऊण-एक तासात पार झाला की खालील दृश्य दिसते. हा चढा टप्पा पार केला की वर सांगितलेला इकडे डोंगर तिकडे दरी वाला प्रवास चालू होतो.
मस्त आरामात एक एक टप्पा पार करत टवाळक्या करत , प्रत्येक ठिकाणी फोटोसेशन करत आंम्ही आडीच-तीन तासाने वर पोहोचलो. एकसलग केला तर हा गड दोन तसात चढता येतो.
हा गड शिवरायांच्या काळात मुलुखावर लक्ष ठेवण्यासाठी वापरत असल्याने यावर इमारती जवळजवळ नाहीतच.
एक तळे आहे सध्या फक्त आणी थोडे भग्नावशेष. खाली गडावरील अथवा टप्प्यांवरील काही छायाचित्रे.
(ह्या फुलाचे नाव माहित नाही. जाणकार कृपया सांगतील का?? )
काटेसावर
इतकी छान हिरवळ होती कि तिथल्यातीथे मस्त लोळून घ्यावे वाटत होते...वाराही मस्त सुटला होता..थोडा बोचराच...उडून जाउ की काय वाटत होतं..पण काय ती गवताची सळसळ....मन खुष करून गेली.
हिरवे हिरवे गार गालिचे, हरिततृणांच्या मखमालीचे !
हिरवे हिरवे गार गालिचे, हरिततृणांच्या मखमालीचे ! - गडाच्या दुसर्या बाजूने
गडावर पोहोचल्यामुळे आनंदीत मी व माझे रूम पार्टनर्स
गडमाथ्यावरून वैतरणानदीचा खूपच सुंदर आणी विस्तीर्ण नजारा दिसतो.
गडमाथ्यावरच एक बोडकं झाड होतं...आधी रायगडावर आणी आता भर पावसाळ्यात बोडकं झाड बघून खरं तर अचंबाच वाटला.
गडावरील काही आधुनीक प्रेमविरांचे नक्षीकाम
गड चढताना बारीक बारीक पाउस पडत होता..नव्हता म्हटले तरी चालेल..जेवण करून गड भटकून आणी थोडे टीम बिल्डींग गेम खेळून झाल्यावर उतरताना मस्त पाऊस पडायला सुरूवात झाली. चढताना ज्या दोन खडकाळ पॅच ला दोरखंड बांधले होते ते उतरताना शेजारच्या गावातील तरूण चोरून घेउन गेले. पोरींची आणी नॉनट्रेकर्सची पंचाईत झाली. त्यात एकजण एक पॅच उतरताना पाय मुरगाळून बसला. त्याला एक ऑर्गनायजर आणी आम्ही तीन मित्रांनी खांद्याचा अधर देउन खालपर्यंत उतरवले.
गड उतरल्यावर मस्त चहा-भजीचा पोटोबा करून घरी परतलो...जाता -येता बसमधे सुंदर ललनांच्या साथीत अंताक्षरी खेळताना वेळ कसा गेल हे समजलेच नाही.आणी त्या अंताक्षरीत सगळ्यात हीट गाणं होतं हीरो नं. १ मधलं "सातो जनम तुझको पाते ,गोरी तेरे नैनो मै हम बस जाते" =))
(खास मिपाकरांसाठी : या गाण्याची २-४ मस्त विडंबनं पण उस्फुर्तपणे जागच्या जागी सादर झाली)
प्रतिक्रिया
27 Oct 2009 - 1:52 am | गणपा
मस्त रे. तुला पण विमुक्तावाला किडा चावला का.?
जळवा साल्यांनो आम्हाला. :)
27 Oct 2009 - 5:07 pm | दशानन
असेच म्हणतो.
27 Oct 2009 - 7:52 am | चित्रा
वर्णन छान.
27 Oct 2009 - 8:15 am | प्राजु
वर्णन आणि फोटो दोन्ही छान. विमुक्ताकडे ट्यूशन लावली का रे तू?
- प्राजक्ता
http://praaju.blogspot.com/
27 Oct 2009 - 10:57 am | अमोल केळकर
सुंदर निसर्ग
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
27 Oct 2009 - 11:16 am | jaypal
वर्णन आणि फोटो दोन्ही लै भरी.
मला पण भटकंतीची आवड आहे पण ग्रुप नाही.
जमल्यास आगामी ट्रेक ला बोलवा जरुर येउ.
"काही भाग हा फक्त पायवाटेचा आहे.डाव्या हाताला डोंगर उजव्या हाताला दरी. मधे दोन पाय ठेवता येईल इतकी जागा." असाच थरार हरिश्चंद्रगडावरही येतो.
(व्हाया खुबिफाटा)
माझा व्यनि - jayendra001@rediffmail.com
jayendra001@gmail.com
mbl 9702113322
27 Oct 2009 - 11:37 am | प्रभो
नक्कीच बोलवेन....सध्या अवघड दिसतय...
येत्या ९ तारखेला बहुतेक उडतोय चंगळवादी अमेरिकेस..... :)
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
27 Oct 2009 - 11:38 am | jaypal
27 Oct 2009 - 11:41 am | sneharani
मस्तच...
फोटोदेखील मस्तच....!!!
27 Oct 2009 - 11:46 am | अवलिया
सुरेख रे ! परभो !!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
27 Oct 2009 - 11:59 am | बाकरवडी
वा वा वा !!!! अप्रतिम. तुम्ही, विमुक्त ही लोकं सगळी नशिबवान आहेत. मस्त मस्त फिरता तुम्ही !
फोटो मात्र मस्तच !! :)
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
27 Oct 2009 - 1:01 pm | वाहीदा
तांदूळवाडी ट्रेकला मी ही अगदी मरता मरता वाचले होते....
छान आठवण करून दिलीत प्रभो सर तुम्ही, मला त्या ट्रेकची !!
अचानक माझी गुडघ्याची वाटी च सरकली अन मी धाडदीशी पडले... आईई ग्ग .. पायातून जिवच गेला ... कधीच विसरणार नाही
खरेच आधार धरायला फक्त माजलेले गवत ! पण ते गवत मातीला किती घट्ट होते ...अन त्याच्याच आधाराने मी वाचले अन पुढे दोर खंडाचा आसरा घेतला .. जर माझे ट्रेकर्स मित्र नसते तर मी कधीच अल्लाह ला प्यारी झाले असते :-)
तांदूळवाडी गड चढायला अवघड पण उतरायला सोपा जाणवला
धन्यवाद प्रभो आठवण जागी झाली...
फनूस (गवत) बनके जिसकी हिफाजत खुदा करें...
वह शमा क्या बुझें(?).. जिसे रोशन खुदा करें...
शुक्रीया खुदा !!
~ वाहीदा
27 Oct 2009 - 1:11 pm | प्रसन्न केसकर
अन फोटो पण चांगलेच आलेत. मला तीन नंबरचा फोटो आवडला!
27 Oct 2009 - 2:17 pm | श्रावण मोडक
फिर लेका तू!
27 Oct 2009 - 2:43 pm | टारझन
अहाहा !! हिरवेगार फोटो पाहुन ताजातवाना झालो !!
झकास फोटो !! रे !!
- जंबो
27 Oct 2009 - 5:21 pm | स्वाती२
मस्त भटकंती! तुम्हा भटक्यांचा हेवा वाटतो.
27 Oct 2009 - 8:42 pm | चतुरंग
झक्कासच फोटू आणि वर्णन.
बाय द वे त्या वरल्या त्रिकुटापैकी तू कोणता रे? आणि तो मधला पोरगा फार शिग्रेटी फुकतो का? त्याचे ओठ काळसर दिसताहेत! ;)
(कोणे एके काळी ट्रेकर)चतुरंग
27 Oct 2009 - 8:47 pm | प्रभो
>>बाय द वे त्या वरल्या त्रिकुटापैकी तू कोणता रे? आणि तो मधला पोरगा फार शिग्रेटी फुकतो का? त्याचे ओठ काळसर दिसताहेत!
मी डाव्या बाजूचा....
आणी मधल्याचे ओठ काळसर दिसायला बहुतेक त्याची मैत्रीण कारणीभूत असावी असा संशय येतोय..... :)
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
27 Oct 2009 - 9:03 pm | चतुरंग
आणी मधल्याचे ओठ काळसर दिसायला बहुतेक त्याची मैत्रीण कारणीभूत असावी असा संशय येतोय.....
तेच ते. दोघीही जाळतात!
चतुरंग
28 Oct 2009 - 4:24 am | शाहरुख
भावा, सुंदर ललनांचे फोटो दाखिव की..
पब्लिकनं झाडाझुडपांचे,दगडांचे फोटो काय कमी दाखिवल्यात काय :-D
28 Oct 2009 - 12:47 pm | प्रभो
>>भावा, सुंदर ललनांचे फोटो दाखिव की..
तात्या काय कमी दाखवतोय का?? मी पण भर घालू होय त्यात??? =))
अजून पहायचे असतील तर तात्याला आजची बायडी चालू करायला लाव.
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
28 Oct 2009 - 5:15 am | धनंजय
मस्त भटकंती केलेली दिसते.
जांभळी आणि सफेद फुले बहुधा आंबेहळदीची असावीत.
आंबेहळदीच्य झाडाचे चित्र :

28 Oct 2009 - 7:55 am | विसोबा खेचर
मस्त! :)
28 Oct 2009 - 12:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटू झकास.
28 Oct 2009 - 1:18 pm | भाग्यश्री कुलकर्णी
मस्त आहेत फोटो.अन् वर्णनही.
29 Oct 2009 - 12:05 am | प्रभो
सर्व वाचकांचे आणी सिद्धहस्त (लिहायला हात सिद्ध असलेल्या) प्रतिसादकांचे आभार!!
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
29 Oct 2009 - 9:15 am | विश्वजीत
चढताना ज्या दोन खडकाळ पॅच ला दोरखंड बांधले होते ते उतरताना शेजारच्या गावातील तरूण चोरून घेउन गेले.
हे झकास!