टायगर प्राँस्

गणपा's picture
गणपा in पाककृती
20 Oct 2009 - 1:27 pm

आज जास्त काही प्रस्तावना न देता, सरळ मुद्यालाच हात घालतो.

श्रिंप इन बोट : (बटर प्राँस् )


साहित्य :
ताज्या टायगर प्राँस् (आकडा तुम्हीच ठरवा.)

२ मोठे चमचे हिरव वाटण. (मिरची, आलं, लसुण, कोथिंबीर)
१/२ चमचा हळद.
१/२ लिंबाचा रस
१ मोठा चमचा मसाला.
काश्मिरी लाल तिखट.
मीठ.
१ मोठा कांदा बारिक चिरुन.
१ कप नारळाच दाट दुध.
१०-१२ काजु पाण्यात भिजवलेले.
बटर.
दाट टॉमेटो प्युरे.

१) कोलंबी शेपटी आणि डोक्याच कोत सोडुन साफ करुन घ्या.
मध्ये चीर देउन आतला काळा दोरा काढुन घ्या.

२) कोलंबीला मीठ हिरव वाटण, हळद, लिंबाचा रस, मसाला लावुन अर्धा एक तास मुरत ठेवा.

३) कांदा काजु एकत्र वाटुन घ्या.

४) पॅन मध्ये १ चमचा बटर वर हे वाटण मध्यम आचेवर परतुन घ्या. मध्ये मध्ये किंचित पाणी टाकुन खाली लागणार नाही याची काळजी घ्या.

५) लाल तिखट आणि टॉमेटो प्युरे टाकुन परत परता. चवी नुसार मीठ टाका.

६) एक कप नारळाच दुध टाकुन परता आणि झाकण लावुन एक वाफ काढा.

७) कोलंब्या टाकुन एकदा परता आणि झाकण ठेवुन ३-४ मिनिटं मध्यम आचवर अजुन १ वाफ काढा.गरजे नुसार पाणी टाकुन रस्सा कमी जास्त दाट ठेवा.

८) वरुन थोड बटर टाकुन चपाती, भाता बरोबर वाढा.

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

ग्रिल्ड स्टफ्ड प्राँस्
साहित्य :
ताज्या टायगर प्राँस् .
२ मोठे चमचे हिरव वाटण. (मिरची, आलं, लसुण, कोथिंबीर)
१/२ चमचा हळद.
१/२ लिंबाचा रस
१ मोठा चमचा मसाला.
मीठ.
सारणा साठी : १ वाटी नारळ, १ चमचा बडीशेप, १ मिरची, कोथिंबिर, असल्यास पुदिन्याची ७-८ पाने, १/४ चमचा साखर, मीठ.
वरील सर्व सारणाचे पदार्थ मिक्सर मध्ये वाटुन चटणी बनवुन ठेवा.
१) ओव्हन १५० डिग्री से. वर तापवत ठेवा.

२) वर सांगितल्या प्रमाणे कोलंबी साफ करुन घ्या. हिरव वाटण, मीठ, मसाला,हळद, लिंबाचा रस लावुन ठेवा.
बांबुच्या काड्या घेउन कोलंबीच्या डोक्या पासुन शेपटी पर्यंत खोचा. यामुळे शिजताना कोलंबी सरळच राहील.

३) कोलंबीच्या पाठिवर चीर देउन सारणा साठी जागा करुन घ्या.

४) सारण भरुन ३-४ कोलंब्या बांबुच्या काडिने आडव्या जोडुन घ्या. ओव्हनच्या ट्रेला बटरचा हात फिरवुन घ्या. ब्रश ने कोलंब्यांना पण बटर लावुन घ्या.

५) ट्रे ओवन मध्ये १०-१५ मिनिटे ठेवुन ग्रिल करुन घ्या. मध्येच परत एकदा बटरचा ब्रश फिरवा.

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

प्रतिक्रिया

दिपाली पाटिल's picture

20 Oct 2009 - 1:31 pm | दिपाली पाटिल

लै भारी हो गणपाबुवा...तुमचा जॉब टायमिंग्स काय आहेत हो म्हणजे कधी बनवता एव्हढं सगळं??? :D

दिपाली :)

मसक्कली's picture

20 Oct 2009 - 1:39 pm | मसक्कली

व्व्वाव... गणूशेट लै भरि

ताट बघुन पानी सुटल तोन्डाला =P~

एक काम करा राव होटेल टाका तुमी रोज नवे पदाथ टेस्ट करायला येउ बगा.... ;) :D

राधा१'s picture

20 Oct 2009 - 1:52 pm | राधा१

तोंडाला पाणी सुटल आहे माझ्या जाम... आत्ता लंच टाइम आहे पण येथे चांगल हॉटेल पण नाही आहे ..अस टाकत जाउ नका प्लीज...!!! :-)
स्नॅप्सस अप्रतिमच... :-)

सहज's picture

20 Oct 2009 - 1:54 pm | सहज

काय फोटोजेनीक डीश असतात रे तुझ्या!

असो काहीतरी खास माश्याची पाकृ टाक रे.

तसेच आपल्या एम्प्लॉयर कडे आमचा रेझ्युमे कसा पोचवता येईल, याबाबत मार्गदर्शन करावे. जेणेकरून आपल्या अविरत,अखंड मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल.
(शिष्योत्तम)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

20 Oct 2009 - 4:05 pm | विसोबा खेचर

निशब्द...!

तात्या.

अनिल हटेला's picture

20 Oct 2009 - 4:18 pm | अनिल हटेला

शॉल्लीट !!
फोतो बघुनच लाजवाब झालो !!:-)

लाजवाब चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!

;-)

प्रभो's picture

20 Oct 2009 - 5:21 pm | प्रभो

गणप्या लेका...जबरा रे.....
हे पण पाठव मागच्या आईस्क्रीम च्या एक ग्लास बरोबर.... :)

--प्रभो

लवंगी's picture

20 Oct 2009 - 7:06 pm | लवंगी

आत्ता येतेय.. जळवायच म्हणजे किती माणसाने!!! >:P

दशानन's picture

20 Oct 2009 - 7:08 pm | दशानन

बरोबर,

ह्याचे पण हात्-पाय बांधून माळ्यावर टाकू या काय :?

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

संदीप चित्रे's picture

20 Oct 2009 - 7:10 pm | संदीप चित्रे

दोन्ही पाकृ आणि फोटू खल्लास !

jaypal's picture

20 Oct 2009 - 7:19 pm | jaypal

तास भर नुसता फोटोच पहात होतो.
लै भारी राव ,आपला तर आवाजच बंद.
अन्नपुर्णेची आपल्यावर अशीच क्रुपा राहो हीच सदिच्छा.

गणपा's picture

21 Oct 2009 - 12:32 pm | गणपा

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे आभार.

नरेन's picture

21 Oct 2009 - 3:30 pm | नरेन

गणपा लेका किति जळवशिल रे आम्हाला?

चित्रादेव's picture

24 Oct 2009 - 6:08 am | चित्रादेव

खतरनाक! :)

मराठमोळा's picture

24 Oct 2009 - 12:04 pm | मराठमोळा

:''( :''( :''( :''( :''(

किती पापं करणार गणपा अजुन. छळवाद मांडलाय नुसता कित्येक दिवसापासुन.

अवांतरः पाकृ एकदम जबरदस्त आणी फोटो तर एक नंबर..

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

शुचि's picture

28 Jan 2010 - 5:47 am | शुचि

त्या कोळम्ब्या दिस्तायत मस्त पण कोलेस्ट्रोल च काय? कोळम्ब्यात रग्गड कोलेस्ट्रोल असत म्हणतात. :P

***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो र्आम अम्हाला देतो

श्रीयुत संतोष जोशी's picture

28 Jan 2010 - 9:57 am | श्रीयुत संतोष जोशी

नको रे बाबा..... सकाळी सकाळी नुसता ऊच्छाद मांडलाय.
याचं वर्णन करायला शब्दं नाहीत.
पण तरीही............... लै म्हंजे लैच भारी हो गणपाशेठ.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

भडकमकर मास्तर's picture

28 Jan 2010 - 10:12 am | भडकमकर मास्तर

:)
_____________________________
.... तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो...
गणपाची पहिली रेसिपी वाचली त्याच रात्री मी डायरीत नोंद केली.. ही इज अ मॆन टु बी वॉच्ड :) ..

प्रभो's picture

28 Jan 2010 - 10:15 am | प्रभो

आडनाव बदललं काय मास्तर???

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी