याचे गाणे ऐकाच

अन्वय's picture
अन्वय in जनातलं, मनातलं
12 Oct 2009 - 12:33 am

हेमंत ब्रीजवासी या बालकाचे गाणे ऐकले. डोळ्यात पाणीच उभे राहिले. काय तयारी आहे त्याची.
http://lilchamps2009.mypopkorn.com/videos/hemant-brijwasi-performance-oc...
तुम्ही पण ऐका

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

विंजिनेर's picture

12 Oct 2009 - 6:38 am | विंजिनेर

चांगला गातो मुलगा. पण मनुष्यरूपातल्या मर्कटाला(रितेश) परिक्षक म्हणून माना डोलावताना बघून जास्त करमणूक झाली....

सुबक ठेंगणी's picture

12 Oct 2009 - 8:24 am | सुबक ठेंगणी

ह्या गाण्यातलं कारुण्य त्याच्या आवाजातून बरोबर उतरलंय.
पण प्रतिसाद मात्र नेहमीप्रमाणेच नाटकी वाटले.

विसोबा खेचर's picture

12 Oct 2009 - 8:27 am | विसोबा खेचर

माझं मत -

मुलगा जे गातो आहे त्यात सुरांची सच्चाई कमी, कुणाची तरी नक्कल अधिक वाटते. अर्थातच, गळ्याला चांगली फिरत असल्यामुळे ती नक्कल त्याच्याकडून बर्‍यापैकी निभावून नेली जात आहे असं म्हणता येईल..

मुलाने जी सरगम गायली आहे त्यात लयीचं वजन काहीच जाणवत नसून लयीच्या बाबतीत मार खाल्ला आहे असं म्हणावं लागेल. विशेष करून सरगम गातांना लय खूप सांभाळावी लागते, तिचं वजनं डोक्यात पक्कं असावं लागतं!

अर्थात, मुलाचं वय लहान असल्यामुळे आत्तापासूनच त्याच्या डोक्यात हवा जाऊ न देता कुणा समर्थ गुरूच्या तालमीत त्याला सोपवल्यास तो पुढे चांगलं गाऊ शकेल अशी आशा आहे.

आमच्या जगान्नाथबुवांच्या भाषेत सांगायचं तर,

'लक्षणं ठीक वाटताहेत!'

तूर्तास इतकंच..

तात्या.

विष्णुसूत's picture

12 Oct 2009 - 11:18 am | विष्णुसूत

सहमत आहे.
गायन प्रकार पंजाब/लाहोर गायकित मोडतो. वया च्या मनाने हा मुलगा फार छान गायला आहे.
स्थिर स्वर कुठे जाणवले नाहित. आवाज फुटल्यावर शुध्द स्थिर स्वरांच्या जागा दाखवताना विशेष मेहनत करावी लागणार आहे. भरत बलवल्ली नावाचा एक गायक अशा प्रकारची गायकी फार सुरेख करतो. काहि लोक त्याची तुलना दिनानाथ, वसंतराव वैगरें शी करतात.

अन्वय's picture

12 Oct 2009 - 4:42 pm | अन्वय

तात्या, तुमच्या मताशी काही प्रमाणात सहमत. पण या वयात नुसरत फतेह अलीला काही प्रमाणात कॉपी करणेही सोपे नाही. हेमंत ब्रीजवासीने नुसरतचे 25-30 टक्के गाणे निभावणे हीदेखील मोठी गोष्ट आहे. मूळ गाणे ऐकल्यानंतर त्याच्या गायकीतला कच्चेपणा जाणवतो. हा त्याच्या वयाचा दोष आहे. इतक्‍या लहान वयात त्याच्याकडून आणखी किती अपेक्षा करायची?
हेमंतच्या आवाजाला फिरत चांगली आहे. कदाचित त्याच्या घरातच गाणे असावे, असे वाटते. आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्याला चांगल्या गुरूचा सहवास मिळावा, असे आम्हालाही वाटते.

लवंगी's picture

12 Oct 2009 - 9:35 pm | लवंगी

दुव्याबद्द्ल धन्यवाद