पुरुषप्रधान मालिका : थूंकू

llपुण्याचे पेशवेll's picture
llपुण्याचे पेशवेll in जनातलं, मनातलं
9 Oct 2009 - 9:56 am

गेले अनेक दिवस (विषेशतः हापिसातून घरी गेल्यावर) डोक्याला शॉट लावणार्‍या आणि महिलांच्या डोळ्यातून पाणी काढणार्‍या अनेक मालिकांचे रतिब विविध वाहीन्या घालत असतात. पूर्वी सास-बहूच्या मालिकांचे रतिब हिंदी वाहीन्या घालत असत (हुश्श तेव्हा आमच्याकडे केबल नव्हती). तर सांगण्याचा मुद्दा हा कि या भयंकर कंटाळवाण्या मालिका घरी गेल्यावर सोसाव्या लागतात. अगदी आतल्या खोलीत जाऊन काही वाचन करावे म्हटले तरी आजूबाजूच्या घरातून येणारा असल्याच मालिकांचा आवाज आणि त्यांचे पार्श्वसंगीत यामुळे डोके उठते. त्यामुळे कधी कधी बा**ला हापिसात बसून काम करत सडलेले बरे असे वाटून जाते. " पण गड्या असल्या लहान सहान कारणानी जर व्यथित होत बसलास तर मैदान मारणार कसं, ऊठ तुला अजून बरीच कामं करायची आहेत." असे आमचे एक प्रतिबिंब आम्हास समजावते. मग आम्ही विचार करु लागतो (आम्ही अधून मधून विचारही करतो बरं).

चायला, या बायकांच्या मालिकांनी डोकं उठवलं आहे. किती म्हणून त्याची तीच ती हळवी शिर्षकगीतं तेच तेच ते कुजकट डायलॉग ऐकत बसायचं. चला या मालिकांची विडंबनं पाडून तशा मालिका तयार करून झीमराठीला देऊ. तेवढंच माझ्या सारख्या त्रासिकजनांची २ घटका करमणूक होईल. विडंबनं मात्र पुरुषप्रधान पाहीजेत.
मालिका १ : थूंकू (मूळ मालिका कूंकू)
जाहीरात
चार पात्रे
पहीले पात्र अर्थात आम्ही: "चायला या अमेरिकेच्या पान खाता येते पण थुंकायची सोय नाही. हिरव्या नोटांचा माज काय कामाचा."
दुसरे पात्रः मालक (अर्थात मालिकेतले): "बा**ला भां*द आम्हाला सांगतात साले पानं खाऊ नका आणि थूंकू नका. अहो जिथे सगळ्या उच्चभ्रू शिग्रेटी संपतात तिथे आमचे तमाखूवाले पान चालू होते आणि वर भाईकाकांनी सांगितल्याप्रमाणे बोटभर चूना. आम्हाला सांगतात साले. आम्हाला पान खाता येते आणि थुंकताही येते पण हिरव्या नोटांचा माज कसा करायचा."
तिसरे पात्रः (भकासराव, शेतकरी गडी) : "पानही आपलं आणि वावरही आपलं हवं तेव्हा खा आणि हवं तेव्हा थुका. पन त्येजायला डाक्टर म्हन्तं जास्त पान खाल्ल्यानं त्वांड येतय. परत तंबाक खातय म्हनून सायेब पन आपल्याला विलायतेला न्यात न्हायत. आता काय करायचं"
पात्र चौथे (नुकतंच कालेजात जायला लागलेल्या टारायक नातलगासारखं कोणतरी, चुना जास्त झाल्यामुळे पोळलेल्या बाजूकडे तोंड ओढून आणि व्याकूळडोळ्यांसकट) : "आता माझ्या पानाचं काय होणार ?"

यातले काही सीन साधारणपणे असे:
प्रसंग १: ( आम्ही व पानपट्टीचे मालक ओसरीवर बसून मस्त पान खात आहोत)
आम्ही: इकडे येऊन पान खाण्याची मजा काही औरच.
मालकः हा इकडे येऊन थुंका पचापच आणि तिकडे जाऊन आम्हालाच भाषण द्या इकडे सगळे स्वच्छ वगैरे.
आम्ही: मालक आम्ही पान खाण्याची म्हणतोय थुंकण्याची नाही. तसेही पान खाऊन मी कुठे थुंकत नाही. कचरापेटीपाशी गाडी थांबवून तिथे थुंकातो, कसे?
मालकः करा म्हणजे आमच्याच उकीरड्यात भर.
(मालकांचे बोलणे मधेच तोडत)
आम्ही: भरलेल्याचा उकीरडा करण्यापेक्षा उकीरड्यात भर चांगली नाही का?
(थोडा पॉझ घेऊन)
मालकः तो कारटन त्या टारायकच्या मागे का लागलाय कळत नाही. जिथे जिथे तो पान खाईल तिथे तिथे हा कारटन जाऊन थुंकतो. मग टारायक सारखा म्हणत असतो माझ्या धोतरावर शिंतोडे उडाले म्हणून.
आम्ही: मालक चालायचंच तुम्ही आम्ही कसे पान खायला शिकलो? आम्ही तर नुसते किमाम खाऊनच भिरभिरलो होतो. आणि तो टारायक सुधा आता कुठे पान खायला शिकतो आहे तर आधी खावं ना साधं फुलचंद मग किमाम मग १२० मग ३०० मग ३२. नाहीतर उगाच खाऊन येणार कलकत्ता मीठा आणि थुंकणार मात्र १२०-३२च्या तोर्‍यात. मालक मी तर म्हणतो ते टारायक झेपत नसताना गेलं असेल हत्ती छाप खायला आणि पडलं असेल झीट येऊन आणि कारटननं आधीच थुंकून ठेवलं असेल ते लागलं याच्या धोतराला, आता प्रत्येकानी आपापली व्यसनं आणि धोतरं सांभाळली पाहीजेत की नाही?
मालक: बरोबर, चायला प्रत्येक जण आपापल्या थुंका सांभाळते तर 'पोलिस' पाहीजे कशाला होते 'पिंकांचे' डाग 'उडवयला'.

प्रसंग २ (पात्रं नवहवलादार टिका आणि मोठा पान) आता हि कोण पात्र ते विचारायचे नाही आम्ही आमचे पोएटीक लायसन का काय ते वापरत आहोत. तसेही मालिका वाढवायला काहीही केलेले चालते.
मोठा पानः काय मग टिकाशेठ कसं काय?
टिका: चाल्लयं बरं आणि काय रे पानपट्टीवर जाऊन कसला दंगा करता रे. मुद्दाम सगळे एकदम पिंका टाकता. पिंका टाकायला बादली ठेवली आहे तरी आजूबाजूला थुंकता. मग ह्याच्या धोतरावर, त्याच्या लेंग्यावर, तिच्या साडीवर शिंतोडे उडतात.
(टिकाला मधेच तोडत)
मोठा पानः का हो पोलिस झाल्यापासून तुम्हाला बरीच काळजी आहे इतरांच्या पदरांची आणि धोतरांची. आणि चायला पोलिस स्वतः थुंकतात तेव्हा. मग तेव्हा लगेच तुमच्या तलवारी म्यान.
टिका:(व्यथित होऊन) अरे पण पानपट्ट्या टिकवायच्या तर थुंकण्यावर बंधन तर पाहीजेच ना! नाहीतर सगळ्याच पानपट्या अस्वच्छ पानप्रेमींना पान देणे बंद नाही का करणार. प्रत्येकानी थोडं थोडं समजून घ्यायला नको का?
मोठा पानः हां बोला आता. आम्ही इतके वर्ष पान खातो इथे येऊन तेव्हा ते मालक आम्ही मस्त १२०-३०० जमवून सोबत पिंका मारायचो. आमच्या कल्ल्यामुळे लोकाना कळले इथे पानपट्टी आहे. आता जास्त लोक पान खायला येऊ लागले तर आम्ही थुंकणे पण बंद करायचे?
टिका: अरे सगळ्याना नाही थुंकायला आवडत.
मोठा पानः पण आम्हाला आवडते तो आमच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न आहे.
टिका: तुझ्याशी वाद घालण्यात अर्थ नाही नाहीतर मोठीच्या मोठी पिंक मारशील आणि मग त्याचे डाग उडवता उडवता नाकी नऊ. (टिका उठून निघून जातो मोठा पानच्या चेहर्‍यावर छद्मी हास्य)

आता २ प्रसंग लिहीले आहेत. आवडले तर पुढचे. आमच्या प्रिय मित्रांपैकी कोणी यात इतर प्रसंगाची भर घातली तर उत्तम.
हां अजून एकः वरील सर्व पात्रे केवळ आमच्या मालिकेत विनोदनिर्मीतीसाठी निर्माण केली आहेत त्याचा वास्तावाशी काही संबंध आढळल्यास तो निव्व्ळ योगयोग समजावा.

विडंबनमाध्यमवेध

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

9 Oct 2009 - 10:06 am | श्रावण मोडक

पुपे, गुरूवारदेखील? धन्य रे धन्य. =)) =)) =)) सकाळची सुरवात मस्त.
जोरदार. येऊ द्या पुढचे भाग.
(एक सूचना - आधी फुलचंद, मग किमाम, मग ३००, मग १२०, मग ३२ ना रे? आधी १२० नी मग ३००? हे म्हणजे मधुबालानंतर... जाऊ द्या!)

प्रभो's picture

9 Oct 2009 - 1:02 pm | प्रभो

पुपे, गुरूवारदेखील? धन्य रे धन्य. =))
सकाळची सुरवात मस्त. जोरदार. येऊ द्या पुढचे भाग.
(एक सूचना - आधी फुलचंद, मग किमाम, मग ३००, मग १२०, मग ३२ ना रे? आधी १२० नी मग ३००? हे म्हणजे मधुबालानंतर... जाऊ द्या!)

अ ते झ (विंग्रजीत ए टू झेड प्रमाणे) सर्व मालिकांचे विडंबणास शुभेच्छा !!
--प्रभो

गणपा's picture

9 Oct 2009 - 2:36 pm | गणपा

>>सकाळची सुरवात मस्त. जोरदार. येऊ द्या पुढचे भाग.
असच म्हणतो.
एकदम खत्तरी.
धुसखोरी बद्दल क्षमस्व
(टुकार मालिकां पासुन सुटका मिळालेला) गणपा

प्रभो's picture

9 Oct 2009 - 2:46 pm | प्रभो

भावा, बायको नाहीये सध्या सोबत तो पर्यंत घे म्हणवून (टुकार मालिकां पासुन सुटका मिळालेला) ..

--प्रभो

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Oct 2009 - 10:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

***** ति*****
=)) =)) =)) =)) =))

टिका काय, मोठा पान काय ... शेवटचं डिस्क्लेमरमात्र अगदी १००% खरं हो!

पेशव्या, आता मलापण सणसणीत शिवी हासडून हसण्याची इच्छा होत आहे रे ... पण इथे *** मुलींनी शिव्या दिल्या की लोकं घाबरतात.

अदिती

निखिल देशपांडे's picture

9 Oct 2009 - 10:07 am | निखिल देशपांडे

अर्रार्रा पेशव्या...
काल खरच कुंकुं बघत बसला होतास की काय...
असो गुरवारच्या उपवासाचा ईफेक्ट दिसत आहे ईथे..
धन्य आहे... एखादा दुसरा प्रसंग लिहिण्या साठी ही जागा राखुन ठेवत आहे.

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

घाशीराम कोतवाल १.२'s picture

9 Oct 2009 - 10:10 am | घाशीराम कोतवाल १.२

जियो जियो पेशवे
बाकि तुमच्या मालिकेचे शिर्षक गीत कसे आहे कोणी लिहीले आहे हो
ते लिहिणासाठी एखाद्या अट्ट्ल पान खाणार्‍यालाच लिहायला लाव
म्हणजे मस्त बनारसी भोला बाबा १२०/१६० ३०० नं३२ सर्व मिश्रण एकत्र करुन पान खाइल तर शिर्षक गीत फर्मास होइल
बाकि तुमच्या पान पट्टी वर *लंग तोड पान मिळले काय ? ;)

**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Oct 2009 - 10:13 am | llपुण्याचे पेशवेll

पानपट्टीवर सर्व पाने मिळतात. ज्याने त्यानं आपल्या वकूबानुसार पान खावे. नाहीतर नंतर शिंतोडे उडले म्हणून तक्रार चालणार नाही. आणि हा आमच्या पानवट्टीवर आम्ही स्वत: लावलेली पाने देतो इकडून तिकडून आणलेली नाही. त्यामुळे पान स्वतःच्या जबाबदारीवर खावे उचकी लागल्यास आम्ही जबाबदार नाही.
:)
(ह घे)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984

घाशीराम कोतवाल १.२'s picture

9 Oct 2009 - 10:49 am | घाशीराम कोतवाल १.२

तर मग पाच स्पेशल पलंगतोड पान लावा
बर फर्मास आमच्या हितचिंतकांना पाठवायची आहे
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती

रामदास's picture

9 Oct 2009 - 10:52 am | रामदास

पान खाण्याआधीच शिंतोडे उदले अशी तक्रार चालणार नाही.

अवलिया's picture

9 Oct 2009 - 10:52 am | अवलिया

खणखणीत. रामदास टच.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

अवलिया's picture

9 Oct 2009 - 10:10 am | अवलिया

=))

पुढचा भाग कधी ??????????????

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विशाल कुलकर्णी's picture

9 Oct 2009 - 10:20 am | विशाल कुलकर्णी

आता "कुलवधु" वर पण संक्रांत येवु द्या ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Oct 2009 - 10:23 am | llपुण्याचे पेशवेll

हम्म विचार चालू आहे पण त्याआधी 'नंद्याचा लंगोट', 'चार दिवस बाजूची' यांचा विचार प्रामुख्याने करत आहे.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984

सहज's picture

9 Oct 2009 - 10:23 am | सहज

पेशवे तुम्ही लावलेले शाही दरबारी पान आवडले.

पुढच्या भाग कधी येतोय? पिकदाणीची व्यवस्था करायला हवी. :-)

टारझन's picture

9 Oct 2009 - 10:27 am | टारझन

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))

लवकर टाक भाड्या पुढचा भाग !!

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Oct 2009 - 10:37 am | बिपिन कार्यकर्ते

पुप्या, *** * **** **** ******. ** **** *** ******. * *** **** ** ***** *****.

=)) =)) =)) =)) =))

अवांतर : आधी प्रतिसाद देवनागरीत लिहिला होता. पण त्यात अक्षरांपेक्षा फुल्याच जास्त दिसायला लागल्या. म्हणून मग सगळ्याच फुल्या केल्या. भावना पोचल्याशी कारण, अक्षरं महत्वाची नाहीत, काय?

आणि हो, डिस्क्लेमर टाकला ते एक बरं केलंत. नाही म्हणजे, उगाच गैरसमज नको व्हायला ना लोकांचा.

बिपिन कार्यकर्ते

नंदन's picture

9 Oct 2009 - 10:42 am | नंदन

जियो पुपेशेट - हे आपलं पुपेसेठ!. कं लिवलंय, कं लिवलंय

मालक मी तर म्हणतो ते टारायक झेपत नसताना गेलं असेल हत्ती छाप खायला आणि पडलं असेल झीट येऊन आणि कारटननं आधीच थुंकून ठेवलं असेल ते लागलं याच्या धोतराला, आता प्रत्येकानी आपापली व्यसनं आणि धोतरं सांभाळली पाहीजेत की नाही?

- =)) =))

निदान आता तरी त्याला आपल्यापुढे काय 'पान' वाढून ठेवलंय याची कल्पना आली असावी.

आमच्या कल्ल्यामुळे लोकाना कळले इथे पानपट्टी आहे. आता जास्त लोक पान खायला येऊ लागले तर आम्ही थुंकणे पण बंद करायचे?

- हे वाक्य हृदयाला भिडले. तुडुंब हळवा झालो (अंमळ बाय डिफॉल्टच होत असतो.). असो, बाकी बंगाली लोकांची पान (खरं तर पानंच्या पानं) खाण्याची सवय आपण फार अचूकतेने येथे नोंदवली आहे. पानाचा सतत तोबरा भरलेला असल्यामुळेच त्यांच्या भाषेत 'ओ' स्वराचा ओनामा झाला असावा काय? (पुपे, ओनामा हो. ओबामा नव्हे. नाहीतर कराल उपदेश सुरू ;).) असो, जाणकार भाषातज्ञ सांगतीलच. तोवर पुढच्या भागांची पानोपानी वाट पाहत आहे.

(ऋषिकेशची परवानगी गृहीत धरून) - माजोरड्या देशाच्या पश्चिम किनार्‍यावर रात्रीचे सव्वादहा वाजले आहेत. ऐका सुमधुर गीत 'पान खाये सैंया हमारो...'

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Oct 2009 - 10:45 am | llपुण्याचे पेशवेll

=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
नंद्याशेठ सुटलेत.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Oct 2009 - 10:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

नंद्या, तू अंमळ माजला सुटला आहेस! किती शिकारी करशील एकाच प्रतिसादात? खरंतर तुझ्या प्रतिसादाला मलातरी इंग्लिशमधूनच उत्तम दाद देता येईल ... पण नको, पुन्हा अपशब्दच आठवत आहेत, थोडं संपादित करून लिहिते! It's wicked good!

अदिती

नंदन's picture

9 Oct 2009 - 10:58 am | नंदन

किती शिकारी करशील एकाच प्रतिसादात?

-- छे, छे. दोनच भाग फक्त. पुढचे मनसुबे मातीत - आपलं धुळीत मिळाले :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Oct 2009 - 11:03 am | बिपिन कार्यकर्ते

पच्च्याऽऽऽऽक्

बिपिन कार्यकर्ते

नंदन's picture

9 Oct 2009 - 11:06 am | नंदन

>>> पच्च्याऽऽऽऽक्
-- याला तोंडी तरीही सक्रिय अशी अजब टिका म्हणता येईल काय?
(तोंडी तरीही सक्रिय विनोदाचे श्रेय भाईकाकांना. पहा: भाडेकरूंचे घरमालकास पत्र)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

ब्रिटिश टिंग्या's picture

9 Oct 2009 - 1:31 pm | ब्रिटिश टिंग्या

जुन्या सदस्यांच्या जुन्या खरडी/प्रतिसाद चोरण्याची जुनी फॅशन जुन झाली मालक!

धमाल मुलगा's picture

9 Oct 2009 - 3:07 pm | धमाल मुलगा

काटाकिर्र चालु आहे एकदम ;)

नंदोबा तर काय पोर्णिमेच्या चांदोबासारखा चमकतोय :)

बाकी...कित्येक वाक्य धाडकन काळजाला भिडली हो....जीव नुसता हळहळहळह्ळहळवा झाला.

चला, पुढचा भाग येऊ द्या.. तोवर आम्ही देवळात जाऊन येतो...आज नर्तनाचा...हे आपलं...नर्तकिर्तन...किर्तनर्तन.....किर्तनाचा कार्यक्रम आहे तो पहायला.....आपलं...ऐकायला जातो. तेव्हढीच टिव्हीपासून सुटका :)

@टिंग्या: तुमच्याकडेही सर्वप्रकारच्या आनंदांवर 'ब्रिटिश' विरजण घालुन मिळते काय हो?

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Oct 2009 - 3:12 pm | llपुण्याचे पेशवेll

>>@टिंग्या: तुमच्याकडेही सर्वप्रकारच्या आनंदांवर 'ब्रिटिश' विरजण घालुन मिळते काय हो?<<
नाही नाही. ते पानात दही घालून खातात. :) असतात एकेकाचे आंबटशौक

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984

हर्षद आनंदी's picture

9 Oct 2009 - 10:55 am | हर्षद आनंदी

ही मालिका बघायची टाळणे आत्तापर्यंत जमलेय, त्यामुळे संदर्भ नीट लागत नाहीत.

पण ह्या मालिका बंद्च झाल्या पाहिजेत.

टुकार मालिका
झी मराठी: कुंकु, अवघाची संसार, कुलवधु, कळत नकळत आणि कुठल्या असतील त्या
स्टार प्रवाह : छत्रपती शिवाजी आणि अग्निहोत्र सोडुन सगळ्या, त्यातल्या त्यात महेश कोठारेची "मन उधाण वार्‍याचे" सगळ्यात बकवास

मी मराठी, साम, ई-टीव्ही मराठी यांच्या वाट्याला अजुन गेलो नाही, भविष्यात जाईन असे वाटत नाही..

छोटा डॉन's picture

9 Oct 2009 - 11:14 am | छोटा डॉन

आग्गायाययाया,
पेशव्या तुझा नेम बेक्कार आहे बे, अगदी करेक्ट पिंका हाणल्यात एकेकाच्या धोतरावर, आता बसा म्हणंआवं धोतरं आपटत विकांताला ...

बाकी आमच्या मनातल्या भावना मांडल्याबद्दल आम्ही तुम्हाला पुढच्या भेटीत एक १२०-३०० खिलवुन देऊ.
च्यायला "तुम्ही पिंका मारता त्या पानठेला चालवण्यासाठी, आम्ही पिंका मारतो त्या राड्यासाठी, बरा न्याय आहे तिच्यायला" ...

येऊदेत अजुन, वाट पहातो आहे ...!!!
(ही केवळ पोच समजावी, बाकीए सविस्तर खरडतोच सवडीने ;) )

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

अवलिया's picture

9 Oct 2009 - 11:14 am | अवलिया

बिपीन कार्यकर्ते, नंदन आणि अदिती, गप्पा मारण्यासाठी खवचा वापर करावा.

अन्यथा सदस्यत्व रद्द करण्यात येईल.

--तात्या मित्रमंडळातर्फे जनहितार्थ जारी

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Oct 2009 - 11:20 am | बिपिन कार्यकर्ते

धोतर सांभाळा, नानासाहेब, धोतर.

बिपिन कार्यकर्ते

निखिल देशपांडे's picture

9 Oct 2009 - 11:21 am | निखिल देशपांडे

" माफ करा पण आपण पदरचे पैसे खर्च करुन खरडवहीची सुविधा उपलब्ध नाही करुन दिलीत. आपल्याला त्रास होत असल्यास चपला घालुन पानरसयात्रेला जा "

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Oct 2009 - 11:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

"धोतर नेसून" हे शब्द राहिलेत देशपांडे!

अदिती

निखिल देशपांडे's picture

9 Oct 2009 - 11:32 am | निखिल देशपांडे

हो हो राहिले खरे... हो रे आम्हाला एका वेळेस दोन दोन संन्यासी नाही सहन होणार...

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

यशोधरा's picture

9 Oct 2009 - 11:17 am | यशोधरा

पुपे, सुटला आहेस! =))

विसोबा खेचर's picture

9 Oct 2009 - 5:50 pm | विसोबा खेचर

संपादकांनी लक्ष देऊन येथील सर्व अवांतर गप्पा उडवून लावाव्यात ही विनंती..

(व्यस्त) तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Oct 2009 - 8:30 pm | प्रकाश घाटपांडे

कुंकु, सुवासिनी,माहेरची साडी वगैर ... मालिका कशा काय चालतात ब्वॉ
आता सासरच धोतर,बुक्का,तमाखु पान अशा बी मालिका काढा म्हनाव शिरियल वाल्यांना.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

धमाल मुलगा's picture

9 Oct 2009 - 8:37 pm | धमाल मुलगा

'हुंड्यातली बाटली' हे शिर्षक कसं वाटतं?
एकदम कौटुंबिक गडबड :)

हरकाम्या's picture

10 Oct 2009 - 1:17 am | हरकाम्या

या पेशव्याला काय झालयं "पेशवेगिरी " करायची सोडुन नसत्या मालिका बघतोय. याला कोणीतरी कामाला लावारे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Oct 2009 - 1:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

या पेशव्याला काय झालयं "पेशवेगिरी " करायची सोडुन नसत्या मालिका बघतोय. याला कोणीतरी कामाला लावारे

एक चूक झाली हरकाम्या शेट, बघतोय नव्हे, लिहीतोय!

अदिती